
भावनिक नियंत्रण
3
Answer link
रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे ते म्हणजे स्वतः वर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
आजकाल लोकांमध्ये रागीटपणा चे प्रमाण वाढले आहे. जर आपण देखील रागीट आहात व जर आपल्याला देखील राग लगेच येतो, तर याच्यावर उपाय करणे जरुरी आहे. हे आपल्या सुखी जीवनासाठी महत्वपूर्ण आहे. काही लोकांना एवढा राग येतो की त्यांना स्वतः वर नियंत्रण ठेवता येत नाही. ते रागाच्या भरात काहीही करतात, त्यांना इतर गोष्टींचा भान रहात नाही.
अति रागाचे दुष्परिणाम :
१) क्रोध एक सामान्य आणि जास्त करून स्वाथ्यप्रद मानवाच्या मनातील भावना आहे. रागावर आपण जर लगेच नियंत्रण केलेत तर ते चांगले आहे, जर आपण रागावर नियंत्रण नाही केलेत तर आपल्या समस्या वाढतात. त्या शारीरिक असो, मानसिक असो व भावनिक किंवा सामजिक अति रागामुळे काहीच समजत नाही आणि रागाच्य भरात आपण काहीही करून बसतो. आणि आपले स्वतःचे जास्त नुकसान होते.
२) अतिरागामुळे आपल्या जीवनातही नाही तर आपल्या आरोग्यावर देखील त्याचे वाईट परिणाम होतात. रागामुळे आपल्या हृदयाचे ठोके जोराने वाढतात, रक्तदाब मोठ्या प्रमाणत वाढते, तणाव वाढते हे त्याचे प्रारंभिक परिणाम आहेत.
३) श्वास घेण्याची प्रक्रिया जोराने होते, जेव्हा राग येतो तेंव्हा शरीर व मन विचलित होते. फक्त आपल्या आरोग्यावर नाही तर आपल्या इतर गुणवत्ते वर देखील प्रभाव पडतो.
४) रागामुळे आपल्याला खूप समस्यांना सामोरे जावे लागते, जसे हृदयविकाराचा झटका, आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, त्वचे चे आजार , अनिद्रा, पचना संबंधी च्या समस्या, चिंता वाढणे, डोकेदुखी, उच्चरक्तदाब, नकारात्मक भावना निर्माण होते. राग आपली विचार करण्याची शक्ती कमी करतो अशावेळी स्वतःची चुकी असली तरी माणूस ती मानायला तयार नसतो तो नेहमी दुसऱ्याची चुकी शोधत असतो यामुळे अजून राग येतो.
रागावर नियंत्रण कसे करावे
१) जेंव्हा पण आपल्याला खूप राग येईल तेंव्हा मोठा श्वास घ्या व सोडा. जर आपण काही वेळासाठी असे केलेत तर आपला राग कमी होईल.
२) अशावेळी आपले डोळे बंद करा मोठा श्वास घ्या आणि आपल्या मनात काय चालेय त्याकडे लक्ष द्या.
३) आपल्यला माहित असेल श्वास तणाव दूर करते आणि मन शांत ठेवण्यास मदत करते, जर आपल्याला रात्री नीट झोप लागत नसेल तर हे देखील राग येण्याचे कारण असू शकते, म्हणून दररोज ८ तास झोपणे जरुरी आहे.
४) यामुळे आपले मन व शरीराला आराम भेटेल आणि आपली बैचैंनी कमी होईल, ज्यामुळे राग येणार नाही. झोपल्या मुळे आपल्या रागावर नियंत्रण राहते. तसेच आपण ध्यान (meditation) करा आपल्याला लाभ होईल, प्राणायम चा नियमित अभ्यास करा संतुलित आहार करा, जेंव्हा पण आपल्याला राग येईल तेंव्हा काहीतरी मनात ल्या मनात गुणगुणत जा अस केल्याने आपला राग शांत होईल.
3
Answer link
रागावर नियंत्रण कसे मिळवावे
प्रेम, आपुलकी, दुख: अगदी याचसारखी राग ही सुद्धा एक भावना आहे.
पण बऱ्याचदा या रागामुळे नुकसानच होते.
या जगात एकही अशी व्यक्ती नसेल की जिला राग येत नसेल.
राग येण्याचे प्रमाण मात्र कमी जास्त असू शकते.
काही माणसे स्वभावाने शांत असतात, त्यांना सहसा राग येत नाही. पण काही माणसे मुळातच तापट असतात.
कोणी काही टोचून बोलले, ते दुखावले गेले किंवा त्यांच्या मनाविरुद्ध काही घडले, कोणीतरी त्यांना फसवले तर त्यांना राग अनावर होतो.
काही प्रमाणात हे समजण्यासारखे आहे. पण खरी समस्या सुरु होते ती जर या रागावर नियंत्रण ठेवता येत नसेल तर.
जर लहान सहान गोष्टींनी राग येत असेल, राग अनावर होत असेल तर ती चिंताजनक बाब आहे.
यामुळे वैयक्तिक व व्यावसायिक संबंध बिघडू शकतात.
रागात बोललेल्या अपशब्दांचे पडसाद दीर्घ काळासाठी, कधी कधी आयुष्यभरासाठी सुद्धा राहतात.
राग आल्यावर, चिडचिड झाल्यावर बऱ्याचदा बोलण्याचे भान राहत नाही.
सारासार विचार सुद्धा केला जात नाही.
अशावेळी रागात समोरचा दुखावला जाईल, त्याचा अपमान होईल असे बोलले जाते.
राग शांत झाल्यावर चूक लक्षात येऊन काही फायदा नसतो कारण तोंडातून एकदा बाहेर आलेले शब्द परत आत घेता येत नाहीत.
समोरच्या माणसाच्या मनावर ते शब्द घाव करतातच.
अशा रागामुळे बरेच नुकसान होऊ शकते शिवाय चिडचिड करणे, राग राग करणे हे तुमच्या मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी सुद्धा हानिकारक असते.
बऱ्याचदा चिडका स्वभाव म्हणून विषय सोडून दिला जातो.
पण अशी व्यक्ती एकाकी पडण्याची शक्यता असते.
स्वभावाला औषध नाही असे म्हणतात. पण यावर उपाय नाही असे नाही.
काही गोष्टी जाणीवपूर्वक करून तुम्ही नक्कीच रागावर नियंत्रण ठेऊ शकता.
तुम्ही जर खूप चिडक्या स्वभावाचे असाल तर या गोष्टींमुळे तुमची चिडचिड कमी व्हायला नक्की मदत होईल.
रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की तुमचा राग हा बाह्य गोष्टींवर अवलंबून असतो.
जसे की ट्राफिक, एखादी व्यक्ती, एखाद्या व्यक्तीशी झालेला संवाद, एखाद्या व्यक्तीने केलेलं दुर्लक्ष.. इत्यादी.
त्यामुळे या बाह्य गोष्टींचा तुमच्या मनावर किती परिणाम होऊ द्यायचा हे फक्त आणि फक्त तुमच्या हातात आहे.
जी काही परिस्थिती असेल त्यावर चिडायचे की शांत राहून त्या परिस्थितीवर विजय मिळवायचा हे तुम्हीच ठरवू शकता.
१. आपला राग समजून घ्या:
तुम्ही जर स्वतःच्या वागणुकीवर नीट लक्ष दिले तर तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला काही ठराविक गोष्टींनी राग येतो.
काही व्यक्तींचा तुम्हाला राग येतो.
त्यामुळे अशा गोष्टी, व्यक्ती तुम्ही ओळखून त्यांच्यापासून शक्य तितके दूर राहायचा जर प्रयत्न केलात तर राग येण्याचे प्रमाण कमी होईल.
काही वेळेला राग येण्या अगोदरच तुम्हाला त्याची कल्पना आलेली असते.
याला आपण वार्निंग साइन म्हणू.
रागावर नियंत्रण मिळवायचे असेल तर हा क्षण ओळखणे खूप महत्वाचे आहे.
ज्या क्षणी राग येणार असल्याची जाणीव तुम्हाला होईल त्या क्षणाला तुम्ही असाल त्या परिस्थितून बाहेर पडायचा प्रयत्न केला पाहिजे.
ही वेळ ओळखून स्वतःला शांत करणे ही रागावर नियंत्रण मिळवण्याची पहिली पायरी आहे.
२. राग येणाऱ्या विषयांचा विचार सोडून द्या:
काही वेळा एखाद्या घटनेमुळे तुमची चिडचिड होते किंवा एखाद्या व्यक्तीशी वाद झाल्यामुळे राग आलेला असतो.
अशा वेळेला ती घटना, तो वाद वारंवार आठवत बसण्याची चूक करू नये.
त्या वेळी आलेला राग तिथेच सोडवा.
नंतर त्याबद्दल विचार करून चिडचिड करून काहीच फायदा नसतो.
उलट असे भूतकाळातील वाद आठवत बसून त्यावर पुन्हा पुन्हा राग व्यक्त केल्याने तुमचा वर्तमान सुद्धा खराब होणार असतो.
यामुळे तुम्ही विनाकारण चिडचिडेपणा करण्याची शक्यता असते.
त्यामुळे तुम्हाला ज्या गोष्टींमुळे राग येतो अशा गोष्टींचा विचार न करणे हे महत्वाचे आहे.
३. रागात तोंडून अपशब्द निघणार नाही याची काळजी घ्या:
बऱ्याचदा असे होते की राग आल्यावर तुमचा तोल ढळतो.
हे अत्यंत नैसर्गिक आहे. पण यामुळे तुम्ही परिस्थितीला नकळतपणे अधिक गंभीर करत असता.
यामुळे परिस्थितीतून मार्ग तर निघत नाहीच उलट गुंता जास्त वाढतो.
याच मुळे रागात तुमच्याकडून अपशब्द उच्चारले जातात.
हे टाळता यावे, रागावर नियंत्रण मिळवून सारासार विचार करता यावा व समोरचा दुखावला जाईल असे तुमच्याकडून वागले बोलले जाणार नाही यासाठी काही ट्रिक्स आहेत.
तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी या ट्रिक्सचा नक्कीच फायदा होईल.
1) तुम्हाला राग येईल तेव्हा समोरच्यावर आरोप करणे टाळावेत. “तू नेहमीच असे करतोस/करतेस” किंवा “तू कधीच माझ्या मनाचा विचार करत नाहीस.” ही वाक्ये धोकादायक असतात.
बहुतेक वेळा त्यात तथ्य नसते. ती केवळ रागाच्या भरात बोलली जातात.
पण या वाक्यांमुळे तुम्ही परिस्थिती आहे त्या पेक्षा सुद्धा गंभीर करून ठेवत असता. यामुळे तुमच्या रागात भरच पडत असते.
तुमच्या अशा वागण्यामुळे लोक सुद्धा तुम्हाला टाळू शकतात. यामुळे तुम्ही एकाकी पडण्याची शक्यता असते.
तसे होऊ नये, यासाठी वेळेतच रागावर नियंत्रण मिळवले पाहिजे. राग नियंत्रणात राहावा यासाठी असे आरोप, अपशब्द टाळले पाहिजेत.
2) यामुळे समोरचा सुद्धा तुमच्याशी नीट बोलायचा प्रयत्न करेल व तुमचा राग कमी व्हायला मदत होईल.
तुमच्या बाबतीत एखादी वाईट गोष्ट घडली किंवा कोणी तुमच्याशी वाईट वागले की असा एक समज केला जातो की हे सगळे आपल्या बाबतीतच होत आहे. हे खरे नसते.
पण जेव्हा राग येतो तेव्हा हा विचार केला जात नाही. रागात असे वाटते कि तुमच्या विरुद्ध पूर्ण जग उभे आहे.
पण असे जेव्हा वाटेल तेव्हा स्वतःला हे आवर्जून सांगितले पाहिजे की असे नाही. ही एक वेळ आहे आणि ती निघून जाणार आहे.
राग आल्यावर तुम्ही जर शांतपणे असा विचार केलात तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
3) तुम्ही रागात बोलत असाल तर तुमची बोलण्याची पद्धत, टोन सगळेच बदलते. तुमचा आवाज काहीवेळा चढतो.
अशावेळेला समोरच्याला सुद्धा राग येण्याची शक्यता असते. एक घाव दोन तुकडे करून कोणाचाच फायदा होणार नसतो.
म्हणूनच रागावर नियंत्रण मिळवायचे असल्यास ही एक महत्वाची पायरी आहे. जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा तुम्ही तुमच्या बोलण्याच्या पद्धतीकडे लक्ष दिले पाहिजे.
तुम्ही बोलण्याची पद्धत सुधारली, आवाजाचा टोन सुधारला तर तुमचा राग कमी होऊन तुमच्या समस्येवर तोडगा निघेल.
४. दीर्घ श्वसन
राग आल्यावर करण्याची अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे दीर्घ श्वास घेणे. राग आल्यावर हे सुचणे आणि ते जमणे हे जरी अवघड असले तरी ते अत्यंत महत्वाचे आहे.
यामुळे राग कमी व्हायला मदत होते. रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी हा अवघड वाटत असला तरी अतिशय प्रभावी उपाय आहे.
यामुळे तुमच्या मनातील विचारांचे वादळ शांत होईल. डोळे मिटून दीर्घ श्वास घेतलात तर काही क्षणासाठी तरी तुम्ही आहे त्या परिस्थितीपासून दूर जाल.
डोळे मिटल्यावर, राग कमी व्हायला मदत व्हावी यासाठी तुम्ही तुमच्या आवडीच्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आणू शकता, किंवा तुमच्या आयुष्यातील एखादी प्रिय घटना आठवू शकता.
या गोष्टी केल्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
५. बोलण्यापूर्वी विचार करा
वर म्हटल्याप्रमाणे राग आलेला असताना विचार न करता बोलले जाते. यामुळे बरेच न भरून येण्यासारखे नुकसान होते.
म्हणूनच रागात बोलण्यापूर्वी विचार करा. दोन मिनिटे सुद्धा खूप होतात.
पण तुम्ही जर बोलण्यापूर्वी विचार करायचे ठरवले तर तुम्ही रागावर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी व्हाल.
जर समोरचा तुम्हाला राग येईल असे वारंवार बोलत असेल तर काहीवेळा हे करणे कठीण वाटू शकते. पण हीच तुमच्या परीक्षेची वेळ असते.
हवे तर तुम्ही काही वेळ घेऊ शकता. समोरच्याला नंतर बोलू असे सांगून त्याला व तुम्हाला शांत व्हायला वेळ घेऊ शकता.
मनाचे Talks
5
Answer link
संताप ही नैसर्गिक भावना आहे. पण योग्य ठिकाणी व्यक्त झाली तर चांगली आहे राव!! नाहीतर वर्षानुवर्षे जोपासलेली नाती संतापामुळे क्षणात तुटतात. अनेकदा तर संतापामुळे लग्ने तुटल्याचीसुद्धा अनेक उदाहरणे आहेत. बऱ्याचवेळा भावना कंट्रोल करणे अशक्य होऊन बसते आणि संताप उफाळून येतो. आणि मग तुमचा कबीर सिंग होतो. काहीवेळा तर् दुसऱ्यांना कंट्रोल करण्याच्या नादात आपणच जास्त बोलून बसतो.
असं म्हणतात की तलवारीने झालेल्या जखमा भरुन येतात, पण जिभेने झालेल्या कधीच भरुन येत नाहीत. या सगळ्या गोष्टींचा परिणाम खूप काळ राहतो. परिस्थिती पहिल्यासारखी होण्यासाठी खूप वेळ जाऊ द्यावा लागतो. अनेकांना संताप आवरण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात.
जर तुम्हाला तुमचे घरचे विणकर बोलत असल्याची फिलिंग येत असेल तर तसे समोरच्या व्यक्तीला स्पष्ट सांगा. मनात भावना कोंडल्या गेल्या तर त्याचा उद्रेक संतापाच्या रूपात होतो. अशावेळी शांतपणे समोरच्या व्यक्तीला तुमच्या भावना सांगितल्या तर प्रॉब्लेम पण दूर होतो आणि तुम्हाला संताप पण येत नाही. संताप आल्यावर कुणी तुम्हाला असा काही सल्ला देत असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करणेच योग्य आहे । राग यायला लागल्यावर शांतपणे स्वतःचे आत्मपरिक्षण करायला हवे. इतका राग का येत आहे या मागील कारणाचा शोध घ्यायला हवा. रागराग करणे खरेच गरजेचे आहे का?
जेव्हा तुमच्या मनाविरुद्ध गोष्टी घडत असतील अशावेळी त्या ठिकाणावर निघून बाहेर फिरायला जाणे तुम्हांला रागावर कंट्रोल करण्यासाठी मदत करू शकते. भांडणाच्या ठिकाणाहून दूर गेल्यावर माणूस खूप लवकर शांत होतो.
असं म्हणतात की तलवारीने झालेल्या जखमा भरुन येतात, पण जिभेने झालेल्या कधीच भरुन येत नाहीत. या सगळ्या गोष्टींचा परिणाम खूप काळ राहतो. परिस्थिती पहिल्यासारखी होण्यासाठी खूप वेळ जाऊ द्यावा लागतो. अनेकांना संताप आवरण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात.
जर तुम्हाला तुमचे घरचे विणकर बोलत असल्याची फिलिंग येत असेल तर तसे समोरच्या व्यक्तीला स्पष्ट सांगा. मनात भावना कोंडल्या गेल्या तर त्याचा उद्रेक संतापाच्या रूपात होतो. अशावेळी शांतपणे समोरच्या व्यक्तीला तुमच्या भावना सांगितल्या तर प्रॉब्लेम पण दूर होतो आणि तुम्हाला संताप पण येत नाही. संताप आल्यावर कुणी तुम्हाला असा काही सल्ला देत असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करणेच योग्य आहे । राग यायला लागल्यावर शांतपणे स्वतःचे आत्मपरिक्षण करायला हवे. इतका राग का येत आहे या मागील कारणाचा शोध घ्यायला हवा. रागराग करणे खरेच गरजेचे आहे का?
जेव्हा तुमच्या मनाविरुद्ध गोष्टी घडत असतील अशावेळी त्या ठिकाणावर निघून बाहेर फिरायला जाणे तुम्हांला रागावर कंट्रोल करण्यासाठी मदत करू शकते. भांडणाच्या ठिकाणाहून दूर गेल्यावर माणूस खूप लवकर शांत होतो.
3
Answer link
छोट्या छोट्या गोष्टींवर उगीचच प्रचंड राग येत असेल तर तो नेमका का येतो ते डॉक्टरांकडे जाऊन तपासून घेतले पाहिजे.ते जाणून घेतल्यावर डॉक्टरांच्या किंवा मानसोपचार तज्ञाच्या सल्ल्याने त्यावर योग्य तो उपचार करून घेणंही महत्त्वाचं आहे.काहीवेळा राग येणं हे कोणत्याही आजारामुळे नसतं,त्याला कोणतंही वैद्यकीय किंवा शास्त्र्ााrय कारण नसतं अशा रागासाठी काही गोष्टी शिकल्या पाहिजेत. त्यात पहिलं म्हणजे कुणाची एखादी गोष्ट चुकली तर आपण रागावलंच पाहिजे हे मनातून काढून टाका. कारण काहीही असले तरी रागाशिवायही त्यावर वेगळी प्रतिक्रिया आपण व्यक्त करू शकतो हे स्वतःला सांगणं.
नियमित मेडिटेशन म्हणजे विपश्यना करायलाच हवी. नियमित व्यायाम, एक्सरसाईज केली तर राग येण्याचं प्रमाण कमी होईल.
दुसऱ्या माणसाला माणूस समजणं. त्याच्याकडून चूक होऊ शकते. तो काही देव नाही असं मनात आणलं तर आपल्या रागावर आपण ताबा मिळवू शकतो. आपण दुसऱयाकडूनही खूप अपेक्षा ठेवतो. मग त्या पूर्ण झाल्या नाहीत की संताप वाढतो. पण त्याच्याकडून जास्त अपेक्षा ठेवल्या नाहीत तर राग येणार नाही.
बरेचदा स्वतःवरही आपण चिडतो. पण आपणही एक माणूस आहोत, आपल्याकडूनही चूक होऊ शकते असं मानलं तर आपण स्वतःवरही रागावत नाही.चूक होणं ही काही खूप मोठी गोष्ट नाही. त्यामुळे स्वतःला किंवा दुसऱयाला आपण माफ करण्याची सवय लावून घ्यायला हवी.तरच रागावर पूर्णपणे नियंत्रण ठेवता येईल. माफी देणं आणि घेणं हे खूप महत्त्वाचं आहे.क्षमाशील राहणं यामुळे राग कमी करतं.कुणी वाईट वागलं असेल, कुणी चूक केली असेल तर आपण क्षमाशील राहिलो तरीही राग कमी होऊ शकतो.
मानसोपचार घेणं किंवा सायकॅट्रीककडून उपचार घेणं हेही खूप महत्त्वाचं आहे. झोप चांगली आणि पूर्ण होणं गरजेचं आहे. उपाशीपोटी राहिल्यावरही राग येण्याचं प्रमाण वाढू शकतं.
सुसंवाद साधला तर रागावर ताबा ठेवता येतो. घरात, मित्रमंडळींमध्ये सुवंवाद साधला तरीही राग येण्यासारखी वेळच येत नाही.... 😊
0
Answer link
रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी काही उपाय खालीलप्रमाणे आहेत:
टीप: कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
- श्वासावर लक्ष केंद्रित करा: जेव्हा तुम्हाला राग येईल, तेव्हा दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. श्वासावर लक्ष केंद्रित केल्याने मन शांत होते.
- 1 ते 10 आकडे मोजा: जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा मनातल्या मनात 1 ते 10 आकडे मोजा. यामुळे तुम्हाला विचार करण्यासाठी वेळ मिळेल आणि तुम्ही शांत होऊ शकाल.
- ताण कमी करा: नियमित व्यायाम, ध्यान आणि योगा केल्याने ताण कमी होतो आणि राग नियंत्रणात राहतो.
- नकारात्मक विचार टाळा: नकारात्मक विचार मनात येऊ देऊ नका. सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा प्रयत्न करा.
- संवादाने तोडगा काढा: ज्या गोष्टींमुळे तुम्हाला राग येतो, त्याबद्दल शांतपणे बोला आणि तोडगा काढण्याचा प्रयत्न करा.
- वेळेचं व्यवस्थापन करा: वेळेचं योग्य नियोजन केल्याने ताण कमी होतो आणि रागावर नियंत्रण मिळण्यास मदत होते.
- पुरेशी झोप घ्या: दररोज रात्री 7-8 तास झोप घेणे आरोग्यासाठी आवश्यक आहे. अपुरी झोप रागाला निमंत्रण देऊ शकते.
- मदत मागा: गरज वाटल्यास मानसोपचारतज्ज्ञाची मदत घ्या. ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकतील.
0
Answer link
नक्कीच, अशा परिस्थितीत तुम्ही काही गोष्टी करू शकता:
या उपायांमुळे तुम्हाला तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यास आणि नकारात्मक विचार कमी करण्यास मदत होईल.
1. भावना ओळखा आणि स्वीकारा:
- प्रथम, तुम्हाला नक्की काय वाटत आहे ते समजून घ्या. राग, निराशा, दुःख अशा भावनांना ओळखणे महत्त्वाचे आहे.
- आपल्या भावनांना स्वीकारणे हाHealing प्रक्रियेचा पहिला टप्पा आहे. "मला राग येत आहे आणि हे normal आहे," असे स्वतःला सांगा.
2. श्वासावर लक्ष केंद्रित करा:
- जेव्हा तुम्हाला खूप राग येतो, तेव्हा दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. यामुळे तुमचे मन शांत होण्यास मदत होईल.
- 5-6 वेळा दीर्घ श्वास घेतल्याने तुम्हाला आराम वाटेल.
3. विचार बदला:
- तुमच्या मनात येणाऱ्या नकारात्मक विचारांना सकारात्मक विचारांमध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न करा.
- "हे माझ्या मनाविरुद्ध आहे, पण मी यातून काहीतरी शिकू शकतो," असा विचार करा.
4. दृष्टिकोन बदला:
- परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून बघा. प्रत्येक घटनेत काहीतरी सकारात्मक शोधण्याचा प्रयत्न करा.
- For example, "या अनुभवामुळे मी अधिक मजबूत बनणार आहे," असा विचार करा.
5. संवाद साधा:
- ज्या व्यक्तीमुळे तुम्हाला त्रास झाला आहे, त्याच्याशी शांतपणे संवाद साधा.
- तुमच्या भावना स्पष्टपणे व्यक्त करा, पण रागाच्या भरात बोलणे टाळा.
6. शारीरिक हालचाल करा:
- शारीरिक हालचाल (exercise) केल्याने तणाव कमी होतो. तुम्ही व्यायाम करू शकता, धावू शकता किंवा योगा करू शकता.
7. छंद जोपासा:
- तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींमध्ये स्वतःला व्यस्त ठेवा. चित्रकला, संगीत, नृत्य किंवा वाचन यांसारख्या गोष्टींमधून तुम्हाला आनंद मिळेल.
8. तज्ञांची मदत घ्या:
- जर तुम्हाला स्वतःहून यावर नियंत्रण मिळवणे कठीण वाटत असेल, तर मानसोपचारतज्ज्ञाची (Therapist) मदत घ्या. ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकतील.
9. स्वतःला वेळ द्या:
- कोणतीही गोष्ट स्वीकारायला वेळ लागतो. त्यामुळे स्वतःला पुरेसा वेळ द्या आणि हळूहळू गोष्टी स्वीकारण्याचा प्रयत्न करा.