
क्रोध
1
Answer link
काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे सहा शत्रू (षड्रिपु) मानले जातात कारण ते माणसाच्या विवेकबुद्धीवर प्रभाव टाकून त्याला अधोगतीकडे नेऊ शकतात. पण या शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी आणि जीवनात संतुलन राखण्यासाठी काही सद्गुण (मित्र) आवश्यक असतात.
षड्रिपुंवर विजय मिळवणारे मित्र (सद्गुण)
काम (अतृप्त इच्छा) ↔ संयम (संयम आणि समाधान)
अति कामनांमुळे असंतोष निर्माण होतो. त्यावर उपाय म्हणजे संयम आणि समाधान ठेवणे. जे मिळाले त्यात आनंद मानणे आणि आवश्यकतेपेक्षा अधिक इच्छांना ताब्यात ठेवणे हे खरे मित्र.
क्रोध (राग) ↔ क्षमा (क्षमता आणि सहनशीलता)
राग हा विवेकशक्ती नष्ट करून विनाशाकडे घेऊन जातो. त्यावर उपाय म्हणजे क्षमा आणि सहनशीलता ठेवणे. शांत आणि समतोल राहणे हेच यावर उपाय.
लोभ (लालसा) ↔ दान (त्याग आणि उदारता)
लोभ माणसाला कधीही समाधानी होऊ देत नाही. त्यावर उपाय म्हणजे दान आणि त्याग. गरजूंना मदत करणे आणि आपल्याकडे असलेल्या गोष्टींचे योग्य वाटप करणे ही मोठी शक्ती आहे.
मोह (अज्ञानात्मक आसक्ति) ↔ विवेक (समजूतदारपणा आणि ज्ञान)
मोह माणसाला वास्तविकतेपासून दूर नेतो. त्यावर उपाय म्हणजे विवेक आणि ज्ञान मिळवणे. सत्य काय आहे हे समजून योग्य निर्णय घेणे महत्त्वाचे.
. मद (अहंकार) ↔ विनय (नम्रता आणि सद्भावना)
अहंकार माणसाला अंध करतो आणि त्याच्या प्रगतीत अडथळा आणतो. त्यावर उपाय म्हणजे विनय आणि नम्रता. मोठेपणा म्हणजे दुसऱ्यांना खाली पाहणे नव्हे, तर सर्वांना समानतेने पाहणे.
मत्सर (ईर्ष्या) ↔ प्रसन्नता (संतोष आणि आत्मसंतोष)
दुसऱ्याच्या यशाने जळण्यापेक्षा स्वतःला सुधारण्यात लक्ष द्यावे. स्वतःच्या प्रगतीत आनंद मानणे आणि समाधानी राहणे हा मत्सराचा खरा उपाय आहे.
शेवटी:
माणसाच्या जीवनात शत्रू आणि मित्र दोन्ही असतात, पण कोणाला महत्त्व द्यायचे हे आपल्या विचारांवर आणि कृतींवर अवलंबून आहे. जर आपण या मित्रांना स्वीकारले, तर शत्रू आपोआप कमजोर होतील आणि जीवन आनंददायक, समतोल व यशस्वी होईल.
0
Answer link
उत्तर: होय, क्रोध हा निश्चितपणे मनाची शांती भंग करणारा विकार आहे.
स्पष्टीकरण:
- क्रोधामुळे नकारात्मक भावना: जेव्हा आपल्याला राग येतो, तेव्हा आपल्या मनात नकारात्मक भावना निर्माण होतात. जसे की, चिडचिड, वैताग आणि असंतोष.
- तणाव आणि चिंता: क्रोधाच्या स्थितीत, आपले शरीर तणावग्रस्त होते, ज्यामुळे चिंता वाढते.
- निर्णयक्षमतेवर परिणाम: रागाच्या भरात आपण योग्य निर्णय घेऊ शकत नाही, ज्यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
- संबंधांवर परिणाम: क्रोधाच्या कारणामुळे आपले इतरांशी संबंध बिघडण्याची शक्यता असते.
- शारीरिक आरोग्य: क्रोधाचा आपल्या शारीरिक आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होतो. रक्तदाब वाढणे, हृदयविकाराचा धोका वाढणे अशा समस्या उद्भवू शकतात.
म्हणून, क्रोध हा मनाच्या शांतीसाठी हानिकारक आहे आणि त्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
टीप: अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:
5
Answer link
तुमच्या पती सोबत तुमचे खुप भांडण होतात. यासाठी तुम्ही शांत रहा. पतीला जी गोष्ट आवडतं नसेल ती गोष्ट तुम्ही करू नका. पती भांडत असेल तर तुम्ही शांत रहा ! तुम्ही उत्तर देऊ नका. भांडणामध्ये काही गैरसमज झाला असेल तर ती गोष्ट पतीला विचारा की "माझं काय चुकलं, मी ती चूक सुधारेल". किंवा याउलट पतीकडून काही चूक झाली असेल तर ती चूक त्यांना पटवून देऊन तुम्ही त्यांना ती चूक सुधारण्यासाठी सांगा. एकमेकांना समजून घ्या. भांडणातील लहान लहान गोष्टी सुधारण्यास प्रयत्न करा. नाते हे नाजूक असतात. भांडणाच्या वेळेस रागात आपण काही पण बोलून देतो. मग त्याचे उत्तर हे रागात न देता थोड्या comedy ने दिले तर खूप चांगले होईल. म्हणजे भांडणाभांडणामध्ये त्यांना हसवून द्या. त्यांनी तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि तुम्ही त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
3
Answer link
रागावर नियंत्रण कसे मिळवावे
प्रेम, आपुलकी, दुख: अगदी याचसारखी राग ही सुद्धा एक भावना आहे.
पण बऱ्याचदा या रागामुळे नुकसानच होते.
या जगात एकही अशी व्यक्ती नसेल की जिला राग येत नसेल.
राग येण्याचे प्रमाण मात्र कमी जास्त असू शकते.
काही माणसे स्वभावाने शांत असतात, त्यांना सहसा राग येत नाही. पण काही माणसे मुळातच तापट असतात.
कोणी काही टोचून बोलले, ते दुखावले गेले किंवा त्यांच्या मनाविरुद्ध काही घडले, कोणीतरी त्यांना फसवले तर त्यांना राग अनावर होतो.
काही प्रमाणात हे समजण्यासारखे आहे. पण खरी समस्या सुरु होते ती जर या रागावर नियंत्रण ठेवता येत नसेल तर.
जर लहान सहान गोष्टींनी राग येत असेल, राग अनावर होत असेल तर ती चिंताजनक बाब आहे.
यामुळे वैयक्तिक व व्यावसायिक संबंध बिघडू शकतात.
रागात बोललेल्या अपशब्दांचे पडसाद दीर्घ काळासाठी, कधी कधी आयुष्यभरासाठी सुद्धा राहतात.
राग आल्यावर, चिडचिड झाल्यावर बऱ्याचदा बोलण्याचे भान राहत नाही.
सारासार विचार सुद्धा केला जात नाही.
अशावेळी रागात समोरचा दुखावला जाईल, त्याचा अपमान होईल असे बोलले जाते.
राग शांत झाल्यावर चूक लक्षात येऊन काही फायदा नसतो कारण तोंडातून एकदा बाहेर आलेले शब्द परत आत घेता येत नाहीत.
समोरच्या माणसाच्या मनावर ते शब्द घाव करतातच.
अशा रागामुळे बरेच नुकसान होऊ शकते शिवाय चिडचिड करणे, राग राग करणे हे तुमच्या मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी सुद्धा हानिकारक असते.
बऱ्याचदा चिडका स्वभाव म्हणून विषय सोडून दिला जातो.
पण अशी व्यक्ती एकाकी पडण्याची शक्यता असते.
स्वभावाला औषध नाही असे म्हणतात. पण यावर उपाय नाही असे नाही.
काही गोष्टी जाणीवपूर्वक करून तुम्ही नक्कीच रागावर नियंत्रण ठेऊ शकता.
तुम्ही जर खूप चिडक्या स्वभावाचे असाल तर या गोष्टींमुळे तुमची चिडचिड कमी व्हायला नक्की मदत होईल.
रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की तुमचा राग हा बाह्य गोष्टींवर अवलंबून असतो.
जसे की ट्राफिक, एखादी व्यक्ती, एखाद्या व्यक्तीशी झालेला संवाद, एखाद्या व्यक्तीने केलेलं दुर्लक्ष.. इत्यादी.
त्यामुळे या बाह्य गोष्टींचा तुमच्या मनावर किती परिणाम होऊ द्यायचा हे फक्त आणि फक्त तुमच्या हातात आहे.
जी काही परिस्थिती असेल त्यावर चिडायचे की शांत राहून त्या परिस्थितीवर विजय मिळवायचा हे तुम्हीच ठरवू शकता.
१. आपला राग समजून घ्या:
तुम्ही जर स्वतःच्या वागणुकीवर नीट लक्ष दिले तर तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला काही ठराविक गोष्टींनी राग येतो.
काही व्यक्तींचा तुम्हाला राग येतो.
त्यामुळे अशा गोष्टी, व्यक्ती तुम्ही ओळखून त्यांच्यापासून शक्य तितके दूर राहायचा जर प्रयत्न केलात तर राग येण्याचे प्रमाण कमी होईल.
काही वेळेला राग येण्या अगोदरच तुम्हाला त्याची कल्पना आलेली असते.
याला आपण वार्निंग साइन म्हणू.
रागावर नियंत्रण मिळवायचे असेल तर हा क्षण ओळखणे खूप महत्वाचे आहे.
ज्या क्षणी राग येणार असल्याची जाणीव तुम्हाला होईल त्या क्षणाला तुम्ही असाल त्या परिस्थितून बाहेर पडायचा प्रयत्न केला पाहिजे.
ही वेळ ओळखून स्वतःला शांत करणे ही रागावर नियंत्रण मिळवण्याची पहिली पायरी आहे.
२. राग येणाऱ्या विषयांचा विचार सोडून द्या:
काही वेळा एखाद्या घटनेमुळे तुमची चिडचिड होते किंवा एखाद्या व्यक्तीशी वाद झाल्यामुळे राग आलेला असतो.
अशा वेळेला ती घटना, तो वाद वारंवार आठवत बसण्याची चूक करू नये.
त्या वेळी आलेला राग तिथेच सोडवा.
नंतर त्याबद्दल विचार करून चिडचिड करून काहीच फायदा नसतो.
उलट असे भूतकाळातील वाद आठवत बसून त्यावर पुन्हा पुन्हा राग व्यक्त केल्याने तुमचा वर्तमान सुद्धा खराब होणार असतो.
यामुळे तुम्ही विनाकारण चिडचिडेपणा करण्याची शक्यता असते.
त्यामुळे तुम्हाला ज्या गोष्टींमुळे राग येतो अशा गोष्टींचा विचार न करणे हे महत्वाचे आहे.
३. रागात तोंडून अपशब्द निघणार नाही याची काळजी घ्या:
बऱ्याचदा असे होते की राग आल्यावर तुमचा तोल ढळतो.
हे अत्यंत नैसर्गिक आहे. पण यामुळे तुम्ही परिस्थितीला नकळतपणे अधिक गंभीर करत असता.
यामुळे परिस्थितीतून मार्ग तर निघत नाहीच उलट गुंता जास्त वाढतो.
याच मुळे रागात तुमच्याकडून अपशब्द उच्चारले जातात.
हे टाळता यावे, रागावर नियंत्रण मिळवून सारासार विचार करता यावा व समोरचा दुखावला जाईल असे तुमच्याकडून वागले बोलले जाणार नाही यासाठी काही ट्रिक्स आहेत.
तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी या ट्रिक्सचा नक्कीच फायदा होईल.
1) तुम्हाला राग येईल तेव्हा समोरच्यावर आरोप करणे टाळावेत. “तू नेहमीच असे करतोस/करतेस” किंवा “तू कधीच माझ्या मनाचा विचार करत नाहीस.” ही वाक्ये धोकादायक असतात.
बहुतेक वेळा त्यात तथ्य नसते. ती केवळ रागाच्या भरात बोलली जातात.
पण या वाक्यांमुळे तुम्ही परिस्थिती आहे त्या पेक्षा सुद्धा गंभीर करून ठेवत असता. यामुळे तुमच्या रागात भरच पडत असते.
तुमच्या अशा वागण्यामुळे लोक सुद्धा तुम्हाला टाळू शकतात. यामुळे तुम्ही एकाकी पडण्याची शक्यता असते.
तसे होऊ नये, यासाठी वेळेतच रागावर नियंत्रण मिळवले पाहिजे. राग नियंत्रणात राहावा यासाठी असे आरोप, अपशब्द टाळले पाहिजेत.
2) यामुळे समोरचा सुद्धा तुमच्याशी नीट बोलायचा प्रयत्न करेल व तुमचा राग कमी व्हायला मदत होईल.
तुमच्या बाबतीत एखादी वाईट गोष्ट घडली किंवा कोणी तुमच्याशी वाईट वागले की असा एक समज केला जातो की हे सगळे आपल्या बाबतीतच होत आहे. हे खरे नसते.
पण जेव्हा राग येतो तेव्हा हा विचार केला जात नाही. रागात असे वाटते कि तुमच्या विरुद्ध पूर्ण जग उभे आहे.
पण असे जेव्हा वाटेल तेव्हा स्वतःला हे आवर्जून सांगितले पाहिजे की असे नाही. ही एक वेळ आहे आणि ती निघून जाणार आहे.
राग आल्यावर तुम्ही जर शांतपणे असा विचार केलात तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
3) तुम्ही रागात बोलत असाल तर तुमची बोलण्याची पद्धत, टोन सगळेच बदलते. तुमचा आवाज काहीवेळा चढतो.
अशावेळेला समोरच्याला सुद्धा राग येण्याची शक्यता असते. एक घाव दोन तुकडे करून कोणाचाच फायदा होणार नसतो.
म्हणूनच रागावर नियंत्रण मिळवायचे असल्यास ही एक महत्वाची पायरी आहे. जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा तुम्ही तुमच्या बोलण्याच्या पद्धतीकडे लक्ष दिले पाहिजे.
तुम्ही बोलण्याची पद्धत सुधारली, आवाजाचा टोन सुधारला तर तुमचा राग कमी होऊन तुमच्या समस्येवर तोडगा निघेल.
४. दीर्घ श्वसन
राग आल्यावर करण्याची अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे दीर्घ श्वास घेणे. राग आल्यावर हे सुचणे आणि ते जमणे हे जरी अवघड असले तरी ते अत्यंत महत्वाचे आहे.
यामुळे राग कमी व्हायला मदत होते. रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी हा अवघड वाटत असला तरी अतिशय प्रभावी उपाय आहे.
यामुळे तुमच्या मनातील विचारांचे वादळ शांत होईल. डोळे मिटून दीर्घ श्वास घेतलात तर काही क्षणासाठी तरी तुम्ही आहे त्या परिस्थितीपासून दूर जाल.
डोळे मिटल्यावर, राग कमी व्हायला मदत व्हावी यासाठी तुम्ही तुमच्या आवडीच्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आणू शकता, किंवा तुमच्या आयुष्यातील एखादी प्रिय घटना आठवू शकता.
या गोष्टी केल्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
५. बोलण्यापूर्वी विचार करा
वर म्हटल्याप्रमाणे राग आलेला असताना विचार न करता बोलले जाते. यामुळे बरेच न भरून येण्यासारखे नुकसान होते.
म्हणूनच रागात बोलण्यापूर्वी विचार करा. दोन मिनिटे सुद्धा खूप होतात.
पण तुम्ही जर बोलण्यापूर्वी विचार करायचे ठरवले तर तुम्ही रागावर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी व्हाल.
जर समोरचा तुम्हाला राग येईल असे वारंवार बोलत असेल तर काहीवेळा हे करणे कठीण वाटू शकते. पण हीच तुमच्या परीक्षेची वेळ असते.
हवे तर तुम्ही काही वेळ घेऊ शकता. समोरच्याला नंतर बोलू असे सांगून त्याला व तुम्हाला शांत व्हायला वेळ घेऊ शकता.
मनाचे Talks
5
Answer link
संताप ही नैसर्गिक भावना आहे. पण योग्य ठिकाणी व्यक्त झाली तर चांगली आहे राव!! नाहीतर वर्षानुवर्षे जोपासलेली नाती संतापामुळे क्षणात तुटतात. अनेकदा तर संतापामुळे लग्ने तुटल्याचीसुद्धा अनेक उदाहरणे आहेत. बऱ्याचवेळा भावना कंट्रोल करणे अशक्य होऊन बसते आणि संताप उफाळून येतो. आणि मग तुमचा कबीर सिंग होतो. काहीवेळा तर् दुसऱ्यांना कंट्रोल करण्याच्या नादात आपणच जास्त बोलून बसतो.
असं म्हणतात की तलवारीने झालेल्या जखमा भरुन येतात, पण जिभेने झालेल्या कधीच भरुन येत नाहीत. या सगळ्या गोष्टींचा परिणाम खूप काळ राहतो. परिस्थिती पहिल्यासारखी होण्यासाठी खूप वेळ जाऊ द्यावा लागतो. अनेकांना संताप आवरण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात.
जर तुम्हाला तुमचे घरचे विणकर बोलत असल्याची फिलिंग येत असेल तर तसे समोरच्या व्यक्तीला स्पष्ट सांगा. मनात भावना कोंडल्या गेल्या तर त्याचा उद्रेक संतापाच्या रूपात होतो. अशावेळी शांतपणे समोरच्या व्यक्तीला तुमच्या भावना सांगितल्या तर प्रॉब्लेम पण दूर होतो आणि तुम्हाला संताप पण येत नाही. संताप आल्यावर कुणी तुम्हाला असा काही सल्ला देत असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करणेच योग्य आहे । राग यायला लागल्यावर शांतपणे स्वतःचे आत्मपरिक्षण करायला हवे. इतका राग का येत आहे या मागील कारणाचा शोध घ्यायला हवा. रागराग करणे खरेच गरजेचे आहे का?
जेव्हा तुमच्या मनाविरुद्ध गोष्टी घडत असतील अशावेळी त्या ठिकाणावर निघून बाहेर फिरायला जाणे तुम्हांला रागावर कंट्रोल करण्यासाठी मदत करू शकते. भांडणाच्या ठिकाणाहून दूर गेल्यावर माणूस खूप लवकर शांत होतो.
असं म्हणतात की तलवारीने झालेल्या जखमा भरुन येतात, पण जिभेने झालेल्या कधीच भरुन येत नाहीत. या सगळ्या गोष्टींचा परिणाम खूप काळ राहतो. परिस्थिती पहिल्यासारखी होण्यासाठी खूप वेळ जाऊ द्यावा लागतो. अनेकांना संताप आवरण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात.
जर तुम्हाला तुमचे घरचे विणकर बोलत असल्याची फिलिंग येत असेल तर तसे समोरच्या व्यक्तीला स्पष्ट सांगा. मनात भावना कोंडल्या गेल्या तर त्याचा उद्रेक संतापाच्या रूपात होतो. अशावेळी शांतपणे समोरच्या व्यक्तीला तुमच्या भावना सांगितल्या तर प्रॉब्लेम पण दूर होतो आणि तुम्हाला संताप पण येत नाही. संताप आल्यावर कुणी तुम्हाला असा काही सल्ला देत असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करणेच योग्य आहे । राग यायला लागल्यावर शांतपणे स्वतःचे आत्मपरिक्षण करायला हवे. इतका राग का येत आहे या मागील कारणाचा शोध घ्यायला हवा. रागराग करणे खरेच गरजेचे आहे का?
जेव्हा तुमच्या मनाविरुद्ध गोष्टी घडत असतील अशावेळी त्या ठिकाणावर निघून बाहेर फिरायला जाणे तुम्हांला रागावर कंट्रोल करण्यासाठी मदत करू शकते. भांडणाच्या ठिकाणाहून दूर गेल्यावर माणूस खूप लवकर शांत होतो.
11
Answer link
नमस्कार ।
माझे एक गुरू सांगायचे
राग हा अग्निचा गोळा सारखा असतो ते दुसऱ्यावर फेकल तर दुसऱ्याच राख होतो आणि यात आपलं स्वतः पण राख होतो
" राग - राग भीक माग " अस खूप वेळा म्हणलं जात
कारण ज्याला राग जास्त असतो त्याला भीक मागायची वेळ येते
मग आपल्याला रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी काय करावे लागेल..?
" राग नियंत्रण ठेवण्यासाठी प्रथमतः आपल्याला माहीत करून घेणे आवश्यकता की राग कश्यासाठी , का येत आहे आणि राग आल्यावर त्याचा प्रतिकार कसा असेल "
राग च नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही योगासन , प्राणायाम आणि ध्यानधारणा करू शकता ,
अस केल्याने आपलं मन प्रसन्न होतो मन प्रसन्न झाल्यावर रागावर आपोआप नियंत्रण होतो ।
पुस्तके भरपूर वाचा
राग येणे याच कारण एकच आहे
आपल्या मनाविरुद्ध घडणे
आपल्या मनालाच आपण प्रसन्न ठेवलं ना सर्वकाही ठीक होईल ।
आशा करतो की तुम्ही विचारलेला प्रश्नाचं उत्तर मिळाले असेल ।।।।
माझे एक गुरू सांगायचे
राग हा अग्निचा गोळा सारखा असतो ते दुसऱ्यावर फेकल तर दुसऱ्याच राख होतो आणि यात आपलं स्वतः पण राख होतो
" राग - राग भीक माग " अस खूप वेळा म्हणलं जात
कारण ज्याला राग जास्त असतो त्याला भीक मागायची वेळ येते
मग आपल्याला रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी काय करावे लागेल..?
" राग नियंत्रण ठेवण्यासाठी प्रथमतः आपल्याला माहीत करून घेणे आवश्यकता की राग कश्यासाठी , का येत आहे आणि राग आल्यावर त्याचा प्रतिकार कसा असेल "
राग च नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही योगासन , प्राणायाम आणि ध्यानधारणा करू शकता ,
अस केल्याने आपलं मन प्रसन्न होतो मन प्रसन्न झाल्यावर रागावर आपोआप नियंत्रण होतो ।
पुस्तके भरपूर वाचा
राग येणे याच कारण एकच आहे
आपल्या मनाविरुद्ध घडणे
आपल्या मनालाच आपण प्रसन्न ठेवलं ना सर्वकाही ठीक होईल ।
आशा करतो की तुम्ही विचारलेला प्रश्नाचं उत्तर मिळाले असेल ।।।।
धन्यवाद
0
Answer link
'नको रे मना हा क्रोध हा' या ओळी समर्थ रामदास स्वामींच्या 'मनाचे श्लोक' या रचनेतील आहेत. या ओळींमध्ये, ते आपल्या मनाला क्रोधापासून दूर राहण्याचा उपदेश करत आहेत.
समर्थ रामदास स्वामी म्हणतात की क्रोधावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, कारण क्रोधामुळे अनेक नकारात्मक गोष्टी घडू शकतात. क्रोधामुळे माणूस विवेक गमावतो आणि त्याचे परिणाम गंभीर होऊ शकतात.
या ओळीचा अर्थ: हे मना, क्रोधाच्या आहारी जाऊ नकोस.