2 उत्तरे
2
answers
राईस ब्रॅन तेल काय आहे?
6
Answer link
सालासकट तांदूळ भरडून त्याचं साल काढलं जातं. तांदूळ पॉलिश करण्याच्या प्रक्रियेत तांदळावरचा कोंडा आणि बीज (दाणे) अलग केले जातात.
या सगळ्याला राइस ब्रॅन असं म्हटलं जातं. यामध्ये १२ ते १३ टक्के स्निग्धांश असतो. ई जीवनसत्त्व व इतर आरोग्याच्या दृष्टीनं उपयुक्त घटक असतात. या ब्रॅनचा उपयोग ब्रेकफास्ट सीरीयल्स, बनवताना केला जातो. कारण ब्रॅनमध्ये असलेला तंतू (फायबर) मलोत्सर्जनासाठीउपयुक्त समजला जातो.
राइस ब्रॅनवर प्रक्रिया करून त्यापासून राइस ब्रॅन तेल काढलं जातं. त्यामध्ये मेदाम्ले असतात. तळण्यासाठी हे तेल अत्यंत योग्य समजलं जातं. जपान आणि चीनमध्ये हे तेल डीप फ्राईंग आणि स्टर फ्राईंग या दोन्हीसाठी वापरलं जातं. राइस ब्रॅन तेल हलकं आणि मंद वास असलेलं असतं. तळतांना पदार्थात ते कमी शोषलं जातं. त्यामुळे पदार्थ तेलकट होत नाहीत.

0
Answer link
राईस ब्रॅन तेल म्हणजे तांदळाच्या कोंड्यापासून काढलेले तेल. तांदूळ मिलिंग प्रक्रियेदरम्यान उपउत्पादन म्हणून कोंडा मिळतो. या तेलामध्ये उच्च स्मोक पॉइंट असतो आणि ते अनेक आरोग्यदायी गुणधर्मांनी परिपूर्ण असते.
राईस ब्रॅन तेलाचे फायदे:
- हृदयासाठी चांगले: राईस ब्रॅन तेलामध्ये ओरिझनॉल (Oryzanol) नावाचे अँटिऑक्सिडेंट असते, जे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते.
- रोगप्रतिकारशक्ती वाढवते: या तेलातील अँटिऑक्सिडंट्स रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत करतात.
- त्वचेसाठी उत्तम: राईस ब्रॅन तेल त्वचेला मॉइश्चरायझ करते आणि संरक्षण करते.
- वजन कमी करण्यास मदत: हे तेल चयापचय सुधारते आणि वजन कमी करण्यास मदत करते.
उपयोग:
- स्वयंपाकासाठी: उच्च स्मोक पॉइंटमुळे तळण्यासाठी आणि भाजण्यासाठी उत्तम.
- त्वचा आणि केसांसाठी: सौंदर्य उत्पादनांमध्ये वापरले जाते.