3 उत्तरे
3
answers
बारा बलुतेदार म्हणजे काय?
9
Answer link
बलुतं किंवा बलुते याचा शब्दशः अर्थ होतो धान्याचा वाटा. हा शब्द महाराष्ट्रातील बलुतेदार व्यवस्थेशी जोडलेला आहे. जुन्या काळात महाराष्ट्रात शेती व्यवसायाभोवती संपूर्ण अर्थव्यवस्था चालत असे. यात शेतकरी हा धान्य पिकवायला जबाबदार असे, आणि विविध व्यवसाय करणारे बारा बलुतेदार असत. जसे की कुंभार, लोहार, सुतार इत्यादी. हे सर्व लोक आपल्या कामाच्या मोबदल्यात शेतकऱ्याकडून धान्याचा वाटा घेत. म्हणून त्यांना बलुतेदार म्हणत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातही ही बारा बलुतेदार पद्धत अमलात असल्याचे इतिहासात पुरावे आहेत.
बलुतेदारांची संख्या एकूण बारा होती.
- कुंभार
- कोळी
- गुरव
- चांभार
- मातंग
- तेली
- न्हावी
- परीट
- माळी
- महार
- लोहार
- सुतार
4
Answer link
. पूर्वी खेडेगावांमध्ये वस्तु-विनिमय पद्धत अस्तित्वात होती या पद्धतीच्या केंद्रस्थानी शेतकरी होता. म्हणजेच शेतकरी हा धान्य पिकवत असे आणि जे शेतकरी नव्हते ते शेतकर्यास व इतरांस सेवा पुरवीत असत. यामध्ये जे शेतकर्याच्या नैमित्तिक स्वरूपाच्या गरजा पुरवत त्यांना अलुतेदार (नारू) तर जे महत्त्वाच्या व नेहमीच्या गरजा भागवीत त्यांना बलुतेदार (कारू) असे म्हणत. हे गावाचे वतनदार असत आणि पिढ्यान्पिढ्या तेच ठरावीक काम करीत.
बलुतेदारांची यादी संपादन करा
बलुतेदारांची संख्या एकूण बारा होती.
कुंभार
कोळी
गुरव
चांभार
मातंग
तेली
न्हावी
परीट
माळी
महार
लोहार
सुतार
बलुतेदारांच्या अन्य याद्या संपादन करा
कुंभार
कोळी
गवळी
गुरव
चांभार
जोशी
धोबी
न्हावी
मातंग
लोहार
सुतार
teli
क्वचित काही ठिकाणी ’तेली’ऐवजी ’मुलाणा’ दिले आहे. याचा अर्थ असा की बलुतेदारांची नावे इलाख्या-इलाख्यांत वेगवेगळी असू शकते. यादी कोणतीही असली तरी प्रत्येक गावात बाराही बलुतेदार असतीलच असे नाही. ज्या गावात बलुतेदार नव्हते तेथे अलुतेदार हे बलुतेदाराचे काम करत असत. तेली हिंदू तर मुलाणा मुसलमान असतात.
मुस्लिम बलुतेदार संपादन करा
आत्तार
कुरेशी
छप्परबंद
तांबोळी
पिंजारी-नदाफ
फकीर
बागवान
मदारी
मन्यार
मोमीन
मिसगर (?)
शिकलगार
0
Answer link
बारा बलुतेदार ही महाराष्ट्रातील पारंपरिक ग्रामीण सामाजिक आणि आर्थिक व्यवस्थेचा एक भाग होती.
बलुतेदार म्हणजे:
- गावातील विशिष्ट कामे करणारे व्यावसायिक आणि कारागीर.
- ते त्यांच्या कामाच्या बदल्यात गावकऱ्यांकडून धान्य किंवा इतर वस्तूंच्या रूपात मोबदला घेत असत. ह्या मोबदल्याला 'बलूत' म्हणत.
बारा बलुतेदारांमध्ये खालील व्यावसायिकांचा समावेश होतो:
- सुतार: लाकडी वस्तू बनवणारा
- लोहार: लोखंडी वस्तू बनवणारा
- चांभार: चप्पल बनवणारा
- कुंभार: मातीची भांडी बनवणारा
- न्हावी: केस कापण्याचे काम करणारा
- धोबी: कपडे धुण्याचे काम करणारा
- तेली: तेल काढण्याचे काम करणारा
- शिंपी: कपडे शिवण्याचे काम करणारा
- भट (गुरव): पूजा करणारे
- कोळी: मासे पकडणारे
- महार: गावची रखवाली करणारे
- चावडी: गावातील जमाबंदीचे काम करणारे
हे बारा बलुतेदार गावातील दैनंदिन जीवनासाठी आवश्यक सेवा पुरवत असत.