घरगुती उपाय वजन-उंची वजन कमी करणे आरोग्य

बारीक होण्यासाठी उपाय सांगा?

2 उत्तरे
2 answers

बारीक होण्यासाठी उपाय सांगा?

6
वजन कमी करण्याचे उपाय

कमी खाऊन वजन कमी करण्याचा प्रयत्न करणे व अत्याधिक खाणे दोन्ही आरोग्यासाठी घातक आहे. शरीराला कोणत्याही प्रकारचा अपाय न होता वजन कमी होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आधुनिक जीवनशैलीमध्ये भरपूर खा, तयार बनविलेले पदार्थ खा, कितीही खा, अशा पध्दतीने आहार घेतला जातो, गरजेपेक्षा जास्त आहार शरीरात ढकलला जातो. आपल्याकडे अन्न पदार्थाचे स्वरूप, त्यातील पौष्टिक घटक न बघता फक्त पॅकिंग किंवा कंपनीचे नाव बघून अन्नपदार्थ खाल्ले जातात. या सर्व प्रकारामुळे लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार अशा जीवघेण्या आजारांचे प्रमाण वाढत चालले आहे.

योग्य राहणीमान, योग्य मात्रेतील योग्य वेळी घेतला जाणारा सर्वसमावेशक आहार व आहार सिध्दांताचा अवलंब केला तर मधुमेह, हृदयविकार, लठ्ठपणा यांसारख्या आजारांचे प्रमाण निश्चित कमी होऊ शकते. एखाद्या वादळाप्रमाणे झपाट्याने वाढत चाललेले मधुमेह, रक्तदाब, वाढते वजन, हृदयविकारावर नियंत्रण मिळविण्यासाठी ताबडतोब उपाययोजना करण्याची आणीबाणीची वेळ येऊन ठेपलेली आहे.

वाढत चाललेल्या वजनाची मुळेही आईच्या गर्भावस्थेच्या काळापासून असू शकतात. गर्भावस्थेतील अतिमात्रेतील, अतिपौष्टिक आहारदेखील जन्मानंतरच्या वाढलेल्या वजनास कारणीभूत ठरत असतो. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात त्याच पध्दतीने जन्मणा-या बाळास भविष्यात काय आजार होऊ शकतात हे एक चाणाक्ष आई-वडिलांची प्रकृती बघून एका क्षणात सांगू शकतो.

वजन कमी करण्यासाठी नियमित व्यायाम करा, व्यायामात सतत बदल करा, एकाच प्रकारचा व्यायाम काही काळानंतर फायदेशीर ठरत नाही.

शरीरातील आळस, सुस्ती झटकून सतत क्रियाशील राहण्याचा प्रयत्न करावा. अनुवंशिकतेने वजन वाढले आहे म्हणून स्वत:ला दोष देऊ नका.

कुठल्याही प्रकारचे क्रॅश डाएट करू नका. दररोज एकच एक पदार्थ खाण्यापेक्षा आहारामध्ये विविधता आणण्याचा प्रयत्न करावा.

किती खातोय यापेक्षा काय खातो आहे याकडे लक्ष द्या. दररोज एकच एक पदार्थ खाण्यापेक्षा आहारामध्ये विविधता आणण्याचा प्रयत्न करावा. लक्षात घ्या नियमित जेवणाऐवजी आठवड्यातून दोन वेळा फळे, दोन वेळा कोशिंबीर, दोन वेळा कडधान्ये, दोन वेळा फळांचा रस, दोन वेळा पालेभाज्यांचा रस किंवा सूप घेण्याचा प्रयत्न करावा. आपली आरोग्य तपासणी नियमित करावी.





उत्तर लिहिले · 20/2/2020
कर्म · 3860
0
वजन कमी करण्यासाठी काही उपाय खालीलप्रमाणे आहेत:

आहार:

  • कॅलरी कमी करा: वजन कमी करण्यासाठी, तुम्ही खाल्लेल्या कॅलरींपेक्षा जास्त कॅलरी बर्न करणे आवश्यक आहे.

  • प्रथिनेयुक्त (protein) आहार घ्या: प्रथिने तुम्हाला पोट भरल्यासारखे वाटायला मदत करतात, ज्यामुळे तुम्ही कमी खाता.

  • फळे आणि भाज्या भरपूर खा: फळे आणि भाज्यांमध्ये कॅलरी कमी असतात आणि ते पोषक तत्वांनी परिपूर्ण असतात.

  • जंक फूड टाळा: जंक फूडमध्ये कॅलरी जास्त असतात आणि ते पोषक तत्वांनी परिपूर्ण नसतात.

व्यायाम:

  • नियमित व्यायाम करा: दररोज किमान 30 मिनिटे व्यायाम करणे आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.

  • कार्डिओ व्यायाम करा: कार्डिओ व्यायाम, जसे की धावणे, पोहणे किंवा सायकलिंग, कॅलरी बर्न करण्यास मदत करतात.

  • वजन प्रशिक्षण करा: वजन प्रशिक्षण स्नायू तयार करण्यास मदत करते, ज्यामुळे चयापचय वाढते.

जीवनशैलीत बदल:

  • पुरेशी झोप घ्या: झोपेच्या कमतरतेमुळे वजन वाढू शकते.

  • तणाव कमी करा: तणावामुळे जास्त खाण्याची शक्यता वाढते.

  • भरपूर पाणी प्या: पाणी पिण्याने तुम्हाला पोट भरल्यासारखे वाटते आणि तुम्ही कमी खाता.

हे काही सामान्य उपाय आहेत जे तुम्हाला वजन कमी करण्यास मदत करू शकतात. कोणता उपाय तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही डॉक्टरांचा किंवा आहारतज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1180

Related Questions

आहार आणि आरोग्य यांचा परस्पर संबंध स्पष्ट करा?
वृद्धांसाठी आरोग्य कार्यक्रमाची माहिती थोडक्यात वर्णन करा?
बद्धकोष्ठता टाळण्यासाठी कोणता आहार घ्यावा?
वृद्धत्वामुळे येणाऱ्या मानसिक अवस्थेचे वर्णन करा?
बांधकाम मंजुरीसाठी कोणकोणत्या आरोग्यविषयक तरतुदी करण्याची गरज आहे?
1 चपाती मध्ये किती कॅलरी असते?
कॅलरी आणि प्रथिने यांचे प्रमाण शरीरासाठी कसे असावेत?