वजन कमी करणे
0
Answer link
शरीरातील चरबी कमी करण्यासाठी काही उपाय खालीलप्रमाणे:
- आहार:
- कॅलरी कमी करा: आहारात कमी कॅलरी घ्या.
- प्रथिने: आहारात प्रथिने भरपूर ठेवा. त्यामुळे भूक कमी लागते.
- फायबर: जास्त फायबर असलेले अन्न खा.
- साखर आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा:process केलेले अन्न पदार्थ खाणे टाळा.
- व्यायाम:
- कार्डिओ: धावणे, पोहणे, सायकल चालवणे यांसारखे व्यायाम करा.
- वजन प्रशिक्षण: वजन उचलून स्नायू मजबूत करा.
- जीवनशैली:
- पुरेशी झोप: दररोज रात्री 7-8 तास झोप घ्या.
- ताण कमी करा: ताण कमी करण्यासाठी योगा करा.
- धैर्य ठेवा: चरबी कमी करण्यासाठी वेळ लागतो, त्यामुळे नियमित प्रयत्न करत राहा.
टीप: कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
1
Answer link
खर सांगायचं म्हणजे मी काहीं तत्वनेता नाही,
फक्त माझ्या वाचनात आले त्या अनुभवावरून सांगतो.
कोणाचेही वजन असो अथवा पोठवरील चरबी एक दोन दिवसात वाढलेले नाही,
त्यामुळे चरबी कमी करणे एक दोन दिवसात होणार नाही. त्यासाठी योग्य वेळ कालावधी द्यावीच लागते.
त्यात पण सातत्य ठेवावे लागते.
नियमित कोणताही कसलाही व्यायम अथवा अन्य काही कसरत करा.
1) चालणे 2) धावणे 3) खेळ खेळणे 4)पोहणे
5) गड किल्ले चढने 6) डान्स 7) योगासने 8)दोरीवरच्या उड्या 9) सायकलिंग (सायकल चालवणे) 10) आहारावर नियंत्रण
सुरुवत थोडी थोडी करा. 10 मिनिट, 15 मिनिट,
नंतर सराव झालं तर जास्त वेळ द्या 20 मिनिट, 30 मिनिट, एक तास, दोन तास
चालने : दररोज एक तास चालण्याने आपले वजन कमी होण्यास मदत होते. चालणे हा एक असा व्यायाम आहे ज्यामध्ये आपल्याला दुसऱ्या कोणत्याही गोष्टीची गरज लागत नाही. चालताना मन शांत आणि मुड चांगला करण्यासाठी आपण गाणे देखील ऐकू शकतो.
धावणे
सुरुवातीला फक्त काही दिवस चालण्याचे काही दिवस चालल्यानंतर, धावणे किंवा जॉगिंगचा समावेश केला जाऊ शकतो. वजन कमी करण्याचा प्रयत्न करताना धावणे हा व्यायामाचा एक उत्तम पर्याय आहे असे मानले जाते. धावण्याचे संपूर्ण शरीरावर विविध प्रकारचे परिणाम होतात आणि त्वरीत कॅलरी बर्न करून वजन कमी करण्यात मदत होते. सांख्यिकी दर्शविते की अर्ध्या तासाची धाव साधारणपणे २९५ कॅलरीज पर्यंत बर्न करू शकते.
खेळ : कुढल्याही प्रकारचा खेळ खेळल्याने आपल्या शरीराचा व्यायाम होतो. त्यामुळे आपण तंदुरुस्त राहू शकतो. परंतु सध्याच्या जीवनशैलीमध्ये आपल्याकडे खेळण्यासाठी वेळच राहिला नाही. मात्र, वेळ काढून आपण क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल सारख्या खेळ खेळले पाहिजेत. यामुळे तुमची मनःस्थिती चांगली राहते आणि तुम्ही तंदुरुस्त राहता.
पोहणे : जर आपल्याला पोहायला येत असेल तर आपण दररोज अर्धा तास तरी पोहले पाहिजे. पोहणे हा एक चांगला व्यायाम आहे. यामुळे तुमचे वजन वेगाने कमी होईल.
पुश-अप: ही आणखी एक कसरत आहे जी तुम्हाला वजन कमी करण्यात मदत करू शकते. पुश-अपमुळे हृदयाचे आरोग्य सुधारते आणि स्नायूंच्या ताकदीव्यतिरिक्त लठ्ठपणा कमी होतो असे मानले जाते. म्हणून, असा दावा केला जाऊ शकतो की ही प्रक्रिया सातत्याने वापरल्याने वजन कमी करण्याच्या प्रयत्नांना मदत होऊ शकते.
झुम्बा : आजकाल झुम्बाचा व्यायाम करण्यावर अधिक भर दिला जातो. झुम्बा केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. झुम्बा आपण कोणत्याही वेळला करू शकतो.
दोरीवरच्या उड्या : जर आपण घराबाहेर जाऊन व्यायाम करू शकत नसतोल तर आपण दोरीवरच्या उड्या मारून वजन कमी करू शकतो. दोरीवरच्या उड्यांमुळे वजन कमी होण्यास मदत होते.
0
Answer link
बॉडी कटिंगसाठी डाएट (Body cutting diet) म्हणजे शरीरातील चरबी कमी करून स्नायू वाढवणे. यासाठी योग्य आहार आणि व्यायाम आवश्यक आहे. खाली एक नमुना डाएट प्लॅन दिला आहे, जो तुम्हाला मदत करू शकेल.
आहाराचे नियोजन:
- प्रथिने (Protein):
- मांस, अंडी, मासे, चिकन, पनीर, टोफू, कडधान्ये, डाळी यांचा आहारात समावेश करा.
- प्रथिने स्नायूंच्या वाढीसाठी आणि दुरुस्तीसाठी आवश्यक आहेत.
- कार्बोहायड्रेट्स (Carbohydrates):
- ब्राऊन राईस, ओट्स, क्विनोआ, शेंगा, फळे आणि भाज्यांचा आहारात समावेश करा.
- कार्बोहायड्रेट्स ऊर्जा देतात, पण त्यांची मात्रा नियंत्रित ठेवा.
- चरबी (Fats):
- एवोकॅडो, नट्स (nuts), बिया (seeds), ऑलिव्ह ऑईल (olive oil) आणि मासे यांसारख्या हेल्दी फॅट्सचा (healthy fats) आहारात समावेश करा.
- हेल्दी फॅट्स शरीरासाठी आवश्यक आहेत, पण त्यांची मात्रा नियंत्रित ठेवा.
- फळे आणि भाज्या:
- हिरव्या पालेभाज्या, फळे आणि रंगीत भाज्या भरपूर खा.
- त्यामध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात.
नमुना आहार योजना:
- सकाळचा नाश्ता:
- ओट्स आणि फळे किंवा
- अंडी आणि ब्राऊन ब्रेड
- दुपारचे जेवण:
- चिकन/पनीर आणि ब्राऊन राईस, डाळ आणि भरपूर भाज्या
- रात्रीचे जेवण:
- मासे/चिकन/टोफू आणि भाज्या
- snacks (मध्य-वेळ):
- नट्स (nuts) आणि बिया (seeds) किंवा फळे
टीप:
- पुरेसे पाणी प्या.
- साखर आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा.
- व्यायाम नियमित करा.
इतर महत्वाचे मुद्दे:
- कॅलरी नियंत्रण: बॉडी कटिंगसाठी, तुम्हाला तुमच्या रोजच्या कॅलरी intake पेक्षा कमी कॅलरी घेणे आवश्यक आहे, ज्यामुळे शरीरातील चरबी कमी होईल.
- प्रथिने (Protein) सेवन: दररोज पुरेसे प्रथिने घ्या. साधारणपणे, 1.6 ते 2.2 ग्रॅम प्रथिने प्रति किलो वजन आवश्यक आहे.
- व्यायाम: वजन उचलण्याचे व्यायाम (weight training) स्नायू वाढवण्यासाठी महत्त्वाचे आहेत. कार्डिओ व्यायाम चरबी कमी करण्यास मदत करतात.
Disclaimer: कोणताही डाएट सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
6
Answer link
वजन कमी करण्याची घाई त्रासदायक व धोकादायक ठरू शकते. त्यामुळे घाई न करता वजन कमी करण्यासाठी योग्य ते उपाय केले पाहिजे. दररोज रनिंग करणे, थोडा वेळ योगासने करणे यामुळे अनावश्यक चरबी कमी होण्यास मदत होते. तसेच आहारातून जंक फूड, फास्ट फूड, हॉटेलचे जेवण बंद करणे. तसेच जेवणाआगोदर अर्धा तास आधी सलाद खा. त्यामुळे तुम्हाला जेवणही कमी जाईल आणि भूकही भागेल. गोड खाणे बंद केले तर चांगले होईल. आहार आणि व्यायाम या दोन गोष्टींवरच भर दिला तर नक्कीच आपले वजन कमी होईल.
6
Answer link
वजन कमी करण्याचे उपाय
कमी खाऊन वजन कमी करण्याचा प्रयत्न करणे व अत्याधिक खाणे दोन्ही आरोग्यासाठी घातक आहे. शरीराला कोणत्याही प्रकारचा अपाय न होता वजन कमी होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आधुनिक जीवनशैलीमध्ये भरपूर खा, तयार बनविलेले पदार्थ खा, कितीही खा, अशा पध्दतीने आहार घेतला जातो, गरजेपेक्षा जास्त आहार शरीरात ढकलला जातो. आपल्याकडे अन्न पदार्थाचे स्वरूप, त्यातील पौष्टिक घटक न बघता फक्त पॅकिंग किंवा कंपनीचे नाव बघून अन्नपदार्थ खाल्ले जातात. या सर्व प्रकारामुळे लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार अशा जीवघेण्या आजारांचे प्रमाण वाढत चालले आहे.
योग्य राहणीमान, योग्य मात्रेतील योग्य वेळी घेतला जाणारा सर्वसमावेशक आहार व आहार सिध्दांताचा अवलंब केला तर मधुमेह, हृदयविकार, लठ्ठपणा यांसारख्या आजारांचे प्रमाण निश्चित कमी होऊ शकते. एखाद्या वादळाप्रमाणे झपाट्याने वाढत चाललेले मधुमेह, रक्तदाब, वाढते वजन, हृदयविकारावर नियंत्रण मिळविण्यासाठी ताबडतोब उपाययोजना करण्याची आणीबाणीची वेळ येऊन ठेपलेली आहे.
वाढत चाललेल्या वजनाची मुळेही आईच्या गर्भावस्थेच्या काळापासून असू शकतात. गर्भावस्थेतील अतिमात्रेतील, अतिपौष्टिक आहारदेखील जन्मानंतरच्या वाढलेल्या वजनास कारणीभूत ठरत असतो. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात त्याच पध्दतीने जन्मणा-या बाळास भविष्यात काय आजार होऊ शकतात हे एक चाणाक्ष आई-वडिलांची प्रकृती बघून एका क्षणात सांगू शकतो.
वजन कमी करण्यासाठी नियमित व्यायाम करा, व्यायामात सतत बदल करा, एकाच प्रकारचा व्यायाम काही काळानंतर फायदेशीर ठरत नाही.
शरीरातील आळस, सुस्ती झटकून सतत क्रियाशील राहण्याचा प्रयत्न करावा. अनुवंशिकतेने वजन वाढले आहे म्हणून स्वत:ला दोष देऊ नका.
कुठल्याही प्रकारचे क्रॅश डाएट करू नका. दररोज एकच एक पदार्थ खाण्यापेक्षा आहारामध्ये विविधता आणण्याचा प्रयत्न करावा.
किती खातोय यापेक्षा काय खातो आहे याकडे लक्ष द्या. दररोज एकच एक पदार्थ खाण्यापेक्षा आहारामध्ये विविधता आणण्याचा प्रयत्न करावा. लक्षात घ्या नियमित जेवणाऐवजी आठवड्यातून दोन वेळा फळे, दोन वेळा कोशिंबीर, दोन वेळा कडधान्ये, दोन वेळा फळांचा रस, दोन वेळा पालेभाज्यांचा रस किंवा सूप घेण्याचा प्रयत्न करावा. आपली आरोग्य तपासणी नियमित करावी.