वजन कमी करणे आरोग्य

पोटावरील चरबी कशी कमी करावी?

2 उत्तरे
2 answers

पोटावरील चरबी कशी कमी करावी?

1

खर सांगायचं म्हणजे मी काहीं तत्वनेता नाही, 
फक्त माझ्या वाचनात आले त्या अनुभवावरून सांगतो.

कोणाचेही वजन असो अथवा पोठवरील चरबी एक दोन दिवसात वाढलेले नाही,
त्यामुळे चरबी कमी करणे एक दोन दिवसात होणार नाही. त्यासाठी योग्य वेळ कालावधी द्यावीच लागते.

त्यात पण सातत्य ठेवावे लागते.
नियमित कोणताही कसलाही व्यायम अथवा अन्य काही कसरत करा.


1) चालणे 2) धावणे 3) खेळ खेळणे 4)पोहणे 
5) गड किल्ले चढने 6) डान्स 7) योगासने 8)दोरीवरच्या उड्या 9) सायकलिंग (सायकल चालवणे) 10) आहारावर नियंत्रण 

सुरुवत थोडी थोडी करा. 10 मिनिट, 15 मिनिट,
 नंतर सराव झालं तर जास्त वेळ द्या 20 मिनिट, 30 मिनिट, एक तास, दोन तास

चालने : दररोज एक तास चालण्याने आपले वजन कमी होण्यास मदत होते. चालणे हा एक असा व्यायाम आहे ज्यामध्ये आपल्याला दुसऱ्या कोणत्याही गोष्टीची गरज लागत नाही. चालताना मन शांत आणि मुड चांगला करण्यासाठी आपण गाणे देखील ऐकू शकतो.

धावणे
 सुरुवातीला फक्त काही दिवस चालण्याचे काही दिवस चालल्यानंतर, धावणे किंवा जॉगिंगचा समावेश केला जाऊ शकतो. वजन कमी करण्याचा प्रयत्न करताना धावणे हा व्यायामाचा एक उत्तम पर्याय आहे असे मानले जाते. धावण्याचे संपूर्ण शरीरावर विविध प्रकारचे परिणाम होतात आणि त्वरीत कॅलरी बर्न करून वजन कमी करण्यात मदत होते. सांख्यिकी दर्शविते की अर्ध्या तासाची धाव साधारणपणे २९५ कॅलरीज पर्यंत बर्न करू शकते.

खेळ : कुढल्याही प्रकारचा खेळ खेळल्याने आपल्या शरीराचा व्यायाम होतो. त्यामुळे आपण तंदुरुस्त राहू शकतो. परंतु सध्याच्या जीवनशैलीमध्ये आपल्याकडे खेळण्यासाठी वेळच राहिला नाही. मात्र, वेळ काढून आपण क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल सारख्या खेळ खेळले पाहिजेत. यामुळे तुमची मनःस्थिती चांगली राहते आणि तुम्ही तंदुरुस्त राहता.

पोहणे : जर आपल्याला पोहायला येत असेल तर आपण दररोज अर्धा तास तरी पोहले पाहिजे. पोहणे हा एक चांगला व्यायाम आहे. यामुळे तुमचे वजन वेगाने कमी होईल.


पुश-अप: ही आणखी एक कसरत आहे जी तुम्हाला वजन कमी करण्यात मदत करू शकते. पुश-अपमुळे हृदयाचे आरोग्य सुधारते आणि स्नायूंच्या ताकदीव्यतिरिक्त लठ्ठपणा कमी होतो असे मानले जाते. म्हणून, असा दावा केला जाऊ शकतो की ही प्रक्रिया सातत्याने वापरल्याने वजन कमी करण्याच्या प्रयत्नांना मदत होऊ शकते.

झुम्बा : आजकाल झुम्बाचा व्यायाम करण्यावर अधिक भर दिला जातो. झुम्बा केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. झुम्बा आपण कोणत्याही वेळला करू शकतो.

दोरीवरच्या उड्या : जर आपण घराबाहेर जाऊन व्यायाम करू शकत नसतोल तर आपण दोरीवरच्या उड्या मारून वजन कमी करू शकतो. दोरीवरच्या उड्यांमुळे वजन कमी होण्यास मदत होते.
उत्तर लिहिले · 19/9/2023
कर्म · 7460
0

पोटावरील चरबी कमी करण्यासाठी काही उपाय खालीलप्रमाणे आहेत:

आहार:
  • प्रथिने (Protein) युक्त आहार घ्या: प्रथिने स्नायू तयार करण्यास आणि चरबी कमी करण्यास मदत करतात. Healthline

  • फायबर (Fibre) युक्त आहार घ्या: फायबर पचनक्रिया सुधारते आणि पोट भरलेले ठेवते. NHS

  • साखर आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा: यामुळे चरबी वाढते. Healthline

  • पुरेसे पाणी प्या: पाणी चयापचय वाढवते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकते. Mayo Clinic

व्यायाम:
  • नियमित व्यायाम करा: एरोबिक व्यायाम (Aerobic exercise) चरबी कमी करण्यासाठी उत्तम आहे. Harvard Health

  • वजन प्रशिक्षण (Weight training) घ्या: स्नायू तयार करण्यासाठी आणि चयापचय वाढवण्यासाठी मदत करते. NHS

  • पोटाचे व्यायाम करा: जसे की सिट-अप्स (Sit-ups) आणि प्लँक (Plank).

जीवनशैली:
  • पुरेशी झोप घ्या: कमी झोप चयापचय कमी करते आणि चरबी वाढवते. Mayo Clinic

  • तणाव कमी करा: तणावामुळे कोर्टिसोल (Cortisol) वाढते, ज्यामुळे चरबी वाढते. Harvard Health

हे काही उपाय आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही पोटावरील चरबी कमी करू शकता.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1180

Related Questions

आहार आणि आरोग्य यांचा परस्पर संबंध स्पष्ट करा?
वृद्धांसाठी आरोग्य कार्यक्रमाची माहिती थोडक्यात वर्णन करा?
बद्धकोष्ठता टाळण्यासाठी कोणता आहार घ्यावा?
वृद्धत्वामुळे येणाऱ्या मानसिक अवस्थेचे वर्णन करा?
बांधकाम मंजुरीसाठी कोणकोणत्या आरोग्यविषयक तरतुदी करण्याची गरज आहे?
1 चपाती मध्ये किती कॅलरी असते?
कॅलरी आणि प्रथिने यांचे प्रमाण शरीरासाठी कसे असावेत?