औषधे आणि आरोग्य
घरगुती उपाय
शारीरिक उपचार
आरोग्य
मणक्यातील वाढलेले अंतर/गॅप पूर्ववत होण्यासाठी उपाय आहे का?
2 उत्तरे
2
answers
मणक्यातील वाढलेले अंतर/गॅप पूर्ववत होण्यासाठी उपाय आहे का?
2
Answer link
🌸मणक्याचे आजार होण्याची कारणे 🌸
1----डोक्या खाली मोठ्या उशीचा वापर करणे खांद्यावर किंवा पाठीवर जड वजनाच्या वस्तू उचलणे.
2---खड्डे असलेल्या रस्त्यावरून सतत मोटारसायकलवरून प्रवास करणे.
3---अपघातामुळे मणक्याला इजा होणे, सतत बसुन काम करणे.
4---पोट साफ न होणे, सतत वेदनाशामक औषधी खाणे.
5---स्त्रियांमध्ये पाळी बंद झाल्यानंतर हाडांना येणारा ठिसूळपणा.
6---गर्भाशयाची पिशवी काढून टाकणे.
7---जेवणामध्ये वातदोष वाढवणारे पदार्थ अधिक असणे उदा. वांगे, बटाटे, हरभरा डाळ, वाटाणे, तळलेले पदार्थ, अति तिखट पदार्थ इ. अनेक कारणांमुळे शरीरात वात दोष वाढून दोन मणक्यातील वंगणासारखा स्निग्ध पदार्थ कमी होऊन मणक्याचे आजार उद्भवतात.
8---संकरीत धान्य व फवारलेले धान्य तसेच पालेभाज्या यामुळे हाडांना ठिसूळपणा येतो
मणक्यातील हाडे ठिसूळ होण्याला
व्यायामाचा आभाव
कायमस्वरूपी तान तनावात राहण असे
अनेक कारणे आहेत. आयुर्वेदामध्ये मणक्यांच्या विकारावर अत्यंत उपयुक्त व स्थायी स्वरूपाचे *पंचकर्म* उपचार उपलब्ध आहेत. आयुर्वेदातील काही मूलभूत तत्त्वे अंगीकारल्यास मणक्यांचे होऊ घातलेले विकार आपण टाळू शकतो.
बरे होऊ शकतो
आयुर्वेद उपचार
1---सुरुवातीस बरेच दिवस वेदनाशामक औषधी खाऊन रुग्ण आयुर्वेदाकडे येतो. वेदनाशामक औषधींनी तात्पुरते बरे वाटते, परंतु वेदनाशामक औषधी ही काही मणक्याच्या आजाराची परिपूर्ण चिकित्सा नाही.
2---- वेदनाशामक औषधी घेणे, शरीराला वजन बांधणे व ऑपरेशन करणे, हा क्रम ठरलेलाच. परंतु आयुर्वेदीय पंचकर्माद्वारे बरीच मणक्याची ऑपरेशन निश्चित टळू शकतात.
पंचकर्मामध्ये : सर्वांग स्नेहन- बॉडी मसाज
सर्वांग स्वेदन- स्टीम बाथ
यामुळे शिरा मोकळ्या होण्यास मदत होते, वात कमी होतो. स्नायूंना आलेला कठीणपणा (stiffness)
नष्ट होऊन ते लवचिक होतात.
बस्ती - वात दोषावरील प्रमुख व खात्रीशीर उपचार मणक्याच्या विकारात प्रामुख्याने तिक्तक्षिर घृत बस्ती, यापन बस्ती, मज्जा बस्ती या बस्ती प्रकारांचा अद्भुत लाभ होतो. नियमित वर्षातून एक वेळा वरील बस्ती घेतल्यास व्याधी पुन्हा पुन्हा होत नाही.
कटी बस्ती, मन्या बस्ती - कंबर व मान या प्रदेशी औषधी सिद्ध तेल काही काळ ठेवले जाते. या सर्व बस्ती प्रकारामुळे हाडांची झीज भरून येण्यास मदत होते. मणक्यामधील वंगणासारखा पदार्थ तयार होण्यास मदत होते.
पत्रपोटली - या उपचारामध्ये विविध वातशामक औषधी उदा. एरंडपत्र, निर्गुडीपत्र, शिग्रुपत्र, चिंचपत्र इत्यादी पानाची पोटली करून शेक दिला जातो.
नस्य - या उपचारादरम्यान नाकामध्ये औषधी सिद्ध तूप किंवा तेल नाकात सोडले जाते. यामुळे मानेच्या मणक्यांचा गॅप भरून
निघतो
तसेच विविध आयुर्वेदिक उपचार, सुवर्ण कल्प,
नैसर्गिक कॅल्शियम कल्प वातनाशक औषधींनी मणक्याच्या आजारावर मात केली जाऊ शकते.
पथ्यापथ्य : काय खावे / काय करावे.स्निग्ध,उष्ण असा आहार.गहू,नाचणी,उडीद,लसूण,आले,
एरंड तेलाची चपाती.
योगासन :
भुजंगासन, पादपश्चिमोत्तासन, धनुरासन, सुप्तरासन, पवनमुक्तासन इत्यादी योगासने तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावी.
प्राणायाम :
अनुलोमीलम15 मीनीट कपालभाती 15 मीनीट
अपथ्य- काय करू नये / काय खाऊ नये.वांगे,बटाटे,हरबरा डाळ,वाटाणे,चवळी,वाल,अतितिखट पदार्थ कटाक्षाने टाळावीत.अति परिश्रमाची कामे टाळावीत,जास्त मोटारसायकल प्रवास टाळावा.आंबट रसामुळे हाडांची व मणक्यातील चकत्यांची झीज लवकर होते.जड वजनाच्या वस्तू उचलू नये.आंबट पदार्थ,दही,चिंच व आम्ल रसाचे विदाही पदार्थ उदा.इडली,ढोकळा,पाव,डोसा बंद करावे.आतापर्यंत अनुभवातून अनेक रुग्णांना आॅरेशनशिवाय गुण देण्यास यश मिळाले आहे.
1)तेल व मसाजव्दारे सांध्यास व खोलवरील स्नायूस गरम पाण्याच्या पिशवी ने शेक देणे सांध्यातील वेदना घालवणे शक्य आहे
तेल बनवण्याची पद्धत
*मोहरी तेल1000 ml
* एरंड तेल 250 ml
*तीळ तेल 250 ml
* कोरपड 500 gram
* पारीजात चे फुले व पाण 500 gram
* निर्गुडीपत्र,500 gram
* मेथी पावडर 250gram
*आेवा 100gram
*आवळा पावडर 100gram
* 10 लवंग gram
* 100 लसुन gram
सर्व एकत्र करून
1 तास ऊकळून
घ्या थंड करून
काचेच्या बाटलीत भरुन ठेवा व
कुठल्याही सांधे दुखी व मुका मार मुचकल्यावर
चालेल
2)गरम पाण्याच्या पिशवीने शेकवने
व्यायाम पद्धती मधे मनक्या संदर्भ व्याधीचे व्यायाम ने स्नायूसंधींना बल प्राप्त करुन देणारी उपचार पद्धती आहे
व व्याधी परत होवु नये म्हणुन केली जाणारी उपचार व व्यायाम पद्धती आहे
*आहारात व आैषधी*
#जवस 1 चमचा
#तिळ 1चमचा
#आवळा पावडर
1चमचा
#अश्वगंधा पावडर 1/2चमचा सकाळी संध्याकाळी
# मेथी पावडर 1चमचारोज घ्या
गव्हा एवढा चुना रोज
दुध दही किंवा कोमट पाणी सोबत घेणे
* बाभळीच्या शेंगा बि सकट 500 ग्राम घ्या
वाळवुन चुर्ण बनवुन घ्या रोज आर्धा चमचा चुर्ण दोन वेळ मधा सोबत न चुकता घ्या चुर्ण दोन वेळ मधा सोबत न चुकता घ्या
🌸रोज उपाशी पोटी सकाळी 👇�
आळीव 1 एक चमचा रात्री भिजत घाला सकाळी त्यात एक चमचा तुप एक 2 चमचे गुळ ड्रायफ्रुट व
2 चमचे तुप इलायची
टाकुन खिर करून खा
वरील संपुर्ण उपचार पद्धतीमध्ये,रुग्णास सरासरीबरेच 3 महिने दिवस उपचार करावे लागेल,पोटातुन
औषधी साधारणतः ३ महिने घ्यावी लागतील.व्यक्ती,व्याधी व प्रकृती परत्वे उपचाराचा कालावधी बदलु शकतो.
0
Answer link
मला माफ करा, मी वैद्यकीय सल्ला देण्यासाठी योग्य नाही. मणक्यातील वाढलेले अंतर/गॅप पूर्ववत करण्यासाठी उपाय आहेत की नाही हे सांगणे माझ्यासाठी शक्य नाही. कृपया अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या. ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकतील.
I am not qualified to give medical advice. It is not possible for me to say whether there are any ways to reverse the increased space/gap in the spine. Please consult a doctor for more information. They will be able to guide you properly.