2 उत्तरे
2 answers

फळमाशी म्हणजे काय?

3
*फळमाशी म्हणजे काय?*
🐝🐝 *फळमाशी* 🐝🐝


जानेवारी च्या शेवटी कार्यरत होणारी बॅक्‍ट्रोसेरा जातीची हि एक कीड असून जगभरात हिच्या चार हजार प्रजाती आहेत. या पैकी १०० प्रजातीमध्ये फळपिकाची मोठी हानी करायची क्षमता आहे. भारतात तिच्या सुमारे दोनशे प्रजाती असून त्यातील पाच ते सहा प्रजाती पिकांना थेट नुकसान पोचविणाऱ्या असल्याने महत्त्वाच्या मानल्या जातात. बॅक्‍ट्रोसेरा डॉरसॅलिस, बॅक्‍ट्रोसेरा झोनाटा, बॅक्‍ट्रोसेरा करेक्‍टा व बॅक्‍ट्रोसेरा कुकुरबीटी  हि निवडक उदाहरणे आहेत.

*फळमाशी कोण-कोणत्या पिकात हानीकारक आहे?*

आंबा, पेरू, सीताफळ, वेलवर्गीय फळ पिके जसे कलिंगड, खरबूज, भोपळा, कारली व काकडी

*फळ माशी प्रादुर्भावाची लक्षणे कोणती?*

🐛फळे वाकडे होतात

🐛अकाली पक्वता येते

🐛फळात अळ्या पडतात - बुरशी लागते 

🐛फळांवर डाग दिसतात

🐛फळगळ होते

*फळमाशीचे जीवनचक्र कसे असते?*

🐝फळमाशीची एक मादी, नराशी मिलन झाल्यावर, तिच्या जीवनकाळात फळाच्या सालीखाली 500 ते 1000 अंडीपुंजके देते.

🐝 त्यातून 3 ते 4 दिवसांत अळ्या बाहेर येतात. या अळ्या फळाच्या गरावर उपजीविका करून फळे कुजवतात.

🐝अळीचा नंतर कोष होतो. गळलेल्या फळातील कोश मातीत मिसळतात. कोषातून प्रौढ माशी जन्मते.

🐝अशा प्रकारे एका वर्षात फळमाशीच्या अनेक पिढ्या पूर्ण होतात. या विशिष्ठ जीवनचक्रामुळे फळमाशी कमी काळात मोठ्या प्रमाणात उत्पत्ती करते.

*फळ निर्यातीसाठी फळमाशी बद्दल काय नियम आहेत?*

🐛फळमाशीचा प्रादुर्भाव फळतोडणी आधी होत असला, तरी फळ वाहतुकीदरम्यान वा मार्केटमध्ये येताना प्रादुर्भाव दिसून येतो. म्हणूनच फळमाशी ही "क्वारंटाइन' कीड आहे. (एका देशाहून दुसऱ्या देशात शेतमाल आयात-निर्याती वेळी महत्त्वाची) युरोप, अमेरिका आदी देशांत ही माशी "क्वारंटाइन' म्हणून जाहीर झाली आहे.

🐛 त्यामुळे आंबा, कारले आदी शेतमाल निर्यात या देशांत करताना त्यात फळमाशीचा आढळ चालत नाही.

*फळमाशी वर उपाय काय?*

फलमाशीचा प्रकोप झाल्यावर उपाय करणे म्हणजे "वराती मागून घोडे" असे आहे. जर तुम्ही आंबा, पेरू, सीताफळ, कलिंगड, खरबूज, भोपळा, कारली व काकडी हि पिके घेत असाल तर माक्षिकारी सापळे वापरायला हवे. बाग स्वच्छ ठेवावी. सामुहिक स्तरावर नियंत्रणाचे प्रयत्न करणे अधिक फायद्याचे ठरते.
उत्तर लिहिले · 4/4/2019
कर्म · 569225
0

फळमाशी (Fruit Fly):

फळमाशी ही एक लहान माशी आहे, जी ड्रोसोफिला मेलॅनोगॅस्टर (Drosophila melanogaster) प्रजातीतील आहे. फळमाशी साधारणपणे 3 ते 4 मि.मी. आकाराची असते.

स्वरूप:

  • या माश्या पिवळसर-तपकिरी रंगाच्या असतात.
  • त्यांचे डोळे लाल रंगाचे असतात.
  • त्यांच्या पंखांमध्ये क्रॉस नसा (cross veins) असतात.
उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 980

Related Questions

माणसाला चावल्यानंतर मधमाश्या खरोखरच मरतात का?
मधमाशीची नजर तीक्ष्ण असते का?
मुंग्या गंधकण केव्हा सोडतात?
पावसाचा किडा आता का दिसत नाही?
जगात अस्तित्वात असलेले वेगवेगळ्या वारुळांचे प्रकार कोणते?
मुंग्याचे जीवन कसे असते?
मिलिपीड म्हणजे काय?