जीवशास्त्र कीटकशास्त्र

मिलिपीड म्हणजे काय?

2 उत्तरे
2 answers

मिलिपीड म्हणजे काय?

6
श्रावणाच्या सुमारास थोडेसे ऊन पडले की, लाल तपकिरी रंगाचे असंख्य पायांचे किडे बागेत, मोकळ्यावर एकगठ्ठा वळवळताना दिसतात. वर्षभर त्यांचा तसा पत्ता नसतो. पण थोडी पावसाची उघडीप, थोडे ऊन असा श्रावण मात्र त्यांना वाढीला पोषक ठरतो व हे हवा खाण्यासाठी मोकळ्यावर येतात. अन्यथा उरलेले दिवस त्यांचा मुक्काम जमिनीखाली असतोच. जमिनीतील नको असलेल्या गोष्टी, नाशवंत गोष्टी म्हणजे सडकी, कुजकी पाने, साली, फुले, फळे नष्ट करणे व जमीन भुसभुशीत ठेवणे हेच त्यांचे काम. गांडुळे हे काम फक्त जमिनीखालीच करतात; पण मिलिपीड्स जमिनीलगतसुद्धा काम करतात.

मिलिपीड्सच्या असंख्य जाती जगभर आहेत. महाराष्ट्रात ज्याला आपण पैसाकिडे या नावाने ओळखतो. कारण जरा कोणाचा स्पर्श झाला की हे किडे गोलाकार करून अंग मुडपून स्तब्ध पडून राहतात. या पैशांची लांबी जेमतेम इंचभर असली, तरी पायांच्या जोड्या मात्र मोजता येणार नाहीत, एवढ्या असतात. पुढे दोन लांब नाग्या व मधल्या जबड्यात लहान काटेरी दात असतातच. असंख्य गोलाकार तुकड्यांनी यांचे शरीर बनते व प्रत्येक तुकड्याला पायांच्या दोन जोड्या असतात. सेंटीपीड वेगाने नागमोडी वळणे घेत हालचाल करतात, तर मिलीपीड सावकाश पण सरळ जात राहतात. सेंटीपीडना खायला प्राणिज् व वनस्पतीज दोन्ही पदार्थ चालतात. मिलिपीड शक्यतो वनस्पतीज अन्नावर जगतात. त्यांचा एकूण जीवनकाळही कमी म्हणजे जेमतेम वर्ष दोन वर्षांचाच असतो.

पावसाळ्याच्या दिवसांत त्यांचे प्रजनन व पुनरुत्पादन होते. म्हणूनही या काळात त्यांची संख्या वाढल्याने वावर जमिनीवर होत असावा. या काळात अनेकदा हे पैसे जोडीजोडीने एकमेकांना पाठीवर घेऊन हिंडतानाही दिसतात.

असंख्य पायांचा उपयोग मुख्यत: जमीन उकरताना, बिले करताना, ती भुसभुशीत करण्यासाठी केला जातो. मिलिपीड हे निरुपद्रवी, पण उपयोगी प्राणी असून संधिपाद या संघात मोडतात. मिलिपीडचा शब्दश: अर्थ हजार पायांचा प्राणी, तर सेंटिपीड म्हणजे शंभर पायांचा. प्रत्यक्षात मात्र या दोहोंना खूपच कमी पाय आढळतात.

*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*
उत्तर लिहिले · 27/12/2018
कर्म · 569225
0

मिलिपीड (Millipede) म्हणजे काय?

मिलिपीड हे आर्थ्रोपोडा (Arthropoda) संघातील डिप्लोपोडा (Diplopoda) वर्गातील प्राणी आहेत. त्यांना अनेक पाय असल्यामुळे ते 'शंभर पायांचे किडे' म्हणूनही ओळखले जातात.

  • शरीर रचना: मिलिपीडांचे शरीर लांबट असून अनेक खंडांमध्ये विभागलेले असते. प्रत्येक खंडात दोन जोड्या पाय असतात.
  • आहार: ते सहसा मृत पाने आणि इतर सेंद्रिय पदार्थ खातात.
  • आढळ: मिलिपीड जगभर आढळतात आणि ते विशेषतः दमट ठिकाणी, जसे की जंगले आणि बागांमध्ये राहतात.

अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 980

Related Questions

अतिनील किरणांना बघून डास आकर्षित होतात का?
मानवी शरीर मानवाचे नाही म्हणतात ते कितपत खरे आहे?
मरण म्हणजे नेमकं काय होतं?
जिओ जीवशास्त्रातील उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी मांडला? वाफेवर चालणाऱ्या इंजिनचा शोध कोणी लावला? कोणत्या अवकाशयानाने पहिल्यांदा मानवाला चंद्रावर सोडले? ड जीवनसत्वाच्या अभावामुळे मुलांमध्ये कोणता आजार होतो? राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून कोणता दिवस साजरा करतात? रेबीज या आजारावरील लस कोणी तयार केली?
जीवशास्त्रातील उज्वल ज्ञान आणि प्राचीन भारतातील विज्ञान व तंत्रज्ञानाचा शोध?
मातीमधील रासायनिक किटकनाशके नष्ट करणारे सूक्ष्म जीव कोणते आहेत?
बेडूक पाण्यात व जमिनीवर दोन्ही ठिकाणी का राहू शकतो?