2 उत्तरे
2
answers
पावसाचा किडा आता का दिसत नाही?
2
Answer link
लालभडक मृगाचा किडा गेला तरी कुठे ?http://bit.ly/3uSBMLs
__________________________
*🐞 माहिती सेवा गृप पेठवड़गाव*
__________________________http://bit.ly/3uSBMLs
पूर्वी रोहिणी नक्षत्रास प्रारंभ होण्यापूर्वी,नंतर मृग नक्षत्राच्या आसपास लालभडक रंगाचा एक किडा नांगरट,कुळवट झालेल्या शेतवडीत किंवा बांधावर हमखास दिसत असे. हा कीटक मृगाचा किडा , किटकूल नावाने ओळखला जातो. हा किडा दिसू लागला की , मशागत , धूळवाफ पेरणी आदी कामे भराभर उरकली जायची; कारण पावसाच्या आगमनाचे संकेत या मृग किड्यांद्वारे मिळत असत.मात्र शेतकऱ्यांचा मित्र असलेल्या मृग किड्याचे अस्तित्व अलीकडे दुर्मिळ झाले आहे.हे किडे आता फारसे दिसत नाहीत,असे निरीक्षण अनेक शेतकऱ्यांनी नोंदविले आहे.पावसाळ्याच्या सुरवातीला अनेक कीटकांची गर्दी रानावनात दिसते,पण मृगाचा किडा या सर्वांहून पूर्णपणे वेगळा दिसतो.हा किडा शेतीसाठी खूप उपयुक्त आहे.तो शेतजमीनीला हानिकारक,उपद्रवी कीटकांचा फडशा पाडतो.यामुळे जमिन , पिके, पेरणीनंतर आलेल्या कोंबांचे रक्षण होते. जमिनीसाठी उपयुक्त बुरशी,कवके, जीवाणूंजवळ मृग किडा राहतो. आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवड़गावची पोस्ट,वाळवी, छोटे कोळी,नाकतोडे हे मृग किड्याचे प्रमुख खाद्य आहे.पहिल्या पावसाच्या सरी बरसताना भारतीय पंचांगाप्रमाणे सूर्याचा मृग नक्षत्रात प्रवेश झालेला असतो. याच काळात हा किडा दिसतो. दोन आठवडय़ांनी आद्र्रा नक्षत्र लागल्यावर पावसाचा जोर वाढल्यावर हा किडा दिसेनासा होतो. म्हणून या किडय़ाला ‘मृगाचा किडा’ असे नाव पडले आहे. पहिल्याच पावसात या किडय़ाचा प्रजननाचा काळ असल्याने हा किडा मादीला आकृष्ट करण्यासाठी जमिनीवर येतो. एप्रिल,मेमधील जोरदार वळिवानंतर ते हळूहळू जमिनीबाहेर येतात.अन्यवेळी ते जमिनीखाली असतात. विशेष म्हणजे पावसाळ्याच्या सुरवातीलाच दर्शन देणारा हा किडा वर्षभर अजिबात दिसत नाही.साधारण पहाटे,सायंकाळी चार ते सहा वेळेतच तो शेतात दिसतो.रोहिणी किंवा मृगापासून पाऊस धुवाधार कोसळू लागला,म्हणजे ते पुन्हा जमिनीखाली जातात.
लालभडक रंगांमुळे लक्ष वेधून घेतात.हातात घेतल्यानंतर ते नाण्याप्रमाणे स्वत : ला गुंडाळून घेतात.मृत झाल्याचे भासवितात.आकार पाच ते सहा मिलीमीटर असतो.शरीराखाली आठ पाय असून कोळ्याप्रमाणे तोंड असते.संशोधकांच्या म्हणण्यानुसार, पाठीवरील सूक्ष्म तंतुंमुळे मृग किड्याला परिसराचे अचूक ज्ञान होते हे तंतू संवेदकांप्रमाणे काम करतात.लालभडक रंगांमुळे अन्य कीटक मृग किड्यांवर हल्ला करत नाहीत.🐞 🐞 🐞‘मृगाचा किडा’ पूर्वी शहरात आढळत होता.मात्र,शहरातील प्रदूषण व विशेषत जलप्रदूषण आणि शहरातील उद्यानांमध्ये झाडांसाठी होणारा रासायनिक खतांचा वापर यामुळे हा किडा शहरातून गायब झाला आहे.
माहिती सेवा ग्रूप पेठवड़गाव
9890875498

🐞

🐞
0
Answer link
पावसाळ्याच्या दिवसांत विशेषतः सायंकाळच्या वेळी पावसाचा किडा (वैज्ञानिक नाव: Plecoptera) दिसणे सामान्य होते, पण तो आता कमी दिसण्याची काही कारणे खालीलप्रमाणे असू शकतात:
- पर्यावरणातील बदल: वाढते प्रदूषण, शहरीकरण आणि नैसर्गिक अधिवासांचे नुकसान झाल्यामुळे या किड्यांच्या जीवनचक्रावर परिणाम झाला आहे. नद्या आणि तलावांच्या पाण्याची गुणवत्ता घटल्याने त्यांची संख्या घटली आहे.
- कीटकनाशकांचा वापर: शेतीत आणि बागांमध्ये वापरल्या जाणाऱ्या कीटकनाशकांमुळे हे किडे मारले जातात, कारण ते कीटकनाशकांच्या संपर्कात लवकर येतात.
- हवामानातील बदल: अनियमित पाऊस आणि वाढते तापमान यांमुळे त्यांच्या प्रजननावर आणि जीवनशैलीवर परिणाम होतो.
- प्रकाश प्रदूषण: शहरांमध्ये रात्रीच्या वेळी जास्त प्रकाश असल्यामुळे त्यांच्या नैसर्गिक वर्तनावर परिणाम होतो, ज्यामुळे ते कमी दिसू लागतात.
- नैसर्गिक शत्रू: पक्षी आणि इतर कीटकभक्षक प्राण्यांची संख्या वाढल्याने देखील त्यांची संख्या कमी होऊ शकते.
या किड्यांचे संरक्षण करण्यासाठी पर्यावरणपूरक पद्धतींचा वापर करणे, प्रदूषण कमी करणे आणि नैसर्गिक अधिवासांचे जतन करणे आवश्यक आहे.