2 उत्तरे
2
answers
मुंग्याचे जीवन कसे असते?
14
Answer link
🐜 *मुंग्या* 🐜
***************
एखादा साखरेचा कण पडलेला असो किंवा उघडा अन्नपदार्थ तसाच राहिलेला असो, घर कितीही स्वच्छ असो किंवा कितव्याही मजल्यावर आपण राहात असू दे, पदार्थ स्वयंपाकाच्या ओट्यावर असु देत वा जमिनीच्या कोपर्यात असुदे; पुरेसा वेळ गेला की, त्याला मुंग्या लागणारच ! मग त्या लाल असतील, वा काळ्या, या मुंग्या त्या पदार्थांपर्यंत वाट काढत कशा येतात, त्यांना हा पदार्थ शोधायची शक्ती कशी मिळते, याबद्दल आपण बरेचसे अंधारात आहोत. पण एक गोष्ट नक्की, ती म्हणजे अन्न मिळवण्याचे हे ज्ञान मुंग्यांना उपजतच असावे. मग ते इतक्या विविध पद्धतीचे असू शकते की, आपली विचारशक्ती कुंठीत व्हावी. विविध प्रकारची बुरशी जशी त्यांना चालते, तसेच एखादा मेलेला प्राणीही आवडतो. साखरेप्रमाणेच दुग्धजन्य पदार्थही आवडतात, तर काहीच नसल्यास कुजलेला पालापाचोळाही काम भागवू शकतो.
साऱ्या जगभर विविध प्रकारच्या, आकाराच्या रंगछटांच्या, पंखांशिवायच्या व पंखांच्या मुंग्या आढळतात. मुंग्यांच्या जातीतील कीटकांच्या जवळपास १४००० जाती सापडतात. इंचभर लांबीपासून जेमतेम डोळ्यांना दिसेल एवढ्या छोट्या आकाराच्या मुंग्या सापडतात. सहसा मुंग्या हा प्राणी जमिनीखाली वारुळे करूनच राहतो. दिवसभर अन्न गोळा करण्याचे काम कामकरी मुंग्या करत राहतात, तर दिवसभर अंडी घालण्याचे काम राणी मुंगी करते. ही जमिनीखालील वारुळात असते. त्या वारुळातील सर्व म्हणजे किमान लाखभर मुंग्या या तिच्याचपासून झालेल्या असतात. कामकरी मुंग्यांना अंडी घालता येत नाहीत. अन्न गोळा करणे, राणी मुंगीला संरक्षण देणे ही त्यांची कामे भल्या पहाटेच सुरू होतात, ती थेट सूर्यास्तानंतरच थांबतात.
मुंग्यांच्या संदर्भात अनेक शास्त्रज्ञांनी संशोधन केले आहे. मुंग्यांची संदेशवहनाची पद्धत, अन्नाच्या साठ्याची दिशा शोधणे व तिकडेच येण्यासाठी निरोप देण्याची व्यवस्था करणे या क्रियांबद्दल आजही फक्त अनुमानेच बांधावी लागतात. वारूळावर हल्ला होण्याची शक्यता निर्माण झाल्यास वा भक्ष्याच्या दिशेने वाटचाल करत असताना अडथळा आल्यास मुंग्या चावतात. या चाव्यामुळे त्या जागी लहानशी गांध वा फुगवटा येऊन आग होते. बराच वेळ नंतर खाजही सुटत राहते. काही मुंग्यांचा चावा हा जास्त विषारी असल्याने त्या भागात भाजल्याप्रमाणे फोड येऊ शकतात व भाग तात्पुरता बधिर होतो. एक प्रकारचे प्रथिनद्रव्य नांगीद्वारे चावा घेतल्या जागी सोडले जाते, त्यामुळे हा प्रकार होतो.
सामाजिक राहणीच्या दृष्टीने मुंग्यांचे वारूळ हे कायम एक अभ्यासाचा विषय आहे. इतक्या प्रचंड संख्येने असलेल्या मुंग्या ठराविक पद्धतीने काम करून अन्नसाठा गोळा करण्याचा अविरत उद्योग ज्या पद्धतीने करतात, तिच्यातून मानवाला काही शिकता आले तर उत्तम.
जंगलातील मुंग्यांचे वास्तव्य निसर्गाचा समतोल राखण्याकडे जास्त लक्ष देते. लाकूड खाणारी वाळवी, झुरळासारखे प्राणी, जखमी जनावरे, जखमी झालेले सरपटणारे प्राणी यांच्यावर लाल मुंग्या झपाट्याने तुटून पडतात. जखमांनी हैराण झालेला प्राणी बघता बघता या चाव्यांनी हैराण होऊन जातो. प्रसंगी चक्क मुंग्याच त्याला नष्ट करून टाकतात. मोठ्या प्राण्यांच्या कलेवरावर प्रथम गिधाडे तुटून पडतात, तरी नंतर मुंग्याच ते पूर्ण खाऊन टाकतात.
काळ्या मुंग्या जास्त जलद हालचाली करतात. लाल काय किंवा काळ्या काय मुंग्यांना गोड आवडते, अशी आपली समजूत ही थोडीशीच बरोबर आहे. रक्तजन्य व प्राणिज पदार्थ त्यांना जास्त आवडतात. घरात मुंग्या येत असतील व विषारी औषध मारायची नसतील, तर चिमटीभर हळद पसरून टाकावी. त्या भागात मुंग्या हळदीच्या वासाने फिरकतच नाहीत.
*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातुन*

0
Answer link
मुंग्या या सामाजिक कीटक आहेत आणि त्या वसाहतींमध्ये राहतात. त्यांचे जीवनचक्र खालीलप्रमाणे असते:
- अंडी: राणी मुंगी अंडी घालते. ही अंडी लहान आणि पांढऱ्या रंगाची असतात.
- लार्वा: अंड्यातून लार्वा बाहेर येतो. लार्वा हा मुंगीच्या जीवनातील वाढीचा टप्पा आहे. या काळात, कामकरी मुंग्या लार्वाला खायला देतात.
- प्युपा: लार्वा प्युपात रूपांतरित होतो. प्युपा स्थिर असतो आणि स्वतःभोवती रेशमाचे आवरण तयार करतो.
- प्रौढ मुंगी: प्युपातून प्रौढ मुंगी बाहेर येते. प्रौढ मुंगी वसाहतीमध्ये विशिष्ट कार्य करते, जसे की अन्न गोळा करणे, घर बांधणे किंवा राणी मुंगीची काळजी घेणे.
मुंग्यांच्या वसाहतींमध्ये राणी मुंगी, कामकरी मुंग्या आणि सैनिक मुंग्या (काही प्रजातींमध्ये) अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मुंग्या असतात.
- राणी मुंगी: राणी मुंगी वसाहतीची प्रमुख असते आणि तिचे मुख्य कार्य अंडी घालणे असते.
- कामकरी मुंग्या: कामकरी मुंग्या वसाहतीसाठी अन्न गोळा करतात, घर बांधतात आणि लार्वा व राणी मुंगीची काळजी घेतात.
- सैनिक मुंग्या: सैनिक मुंग्या वसाहतीचे शत्रूंपासून संरक्षण करतात.
मुंग्या अत्यंत संघटित जीवन जगतात आणि त्यांच्यात उत्कृष्ट संवाद कौशल्ये असतात. ते फेरोमोन नावाचे रासायनिक पदार्थ वापरून एकमेकांशी संवाद साधतात.
अधिक माहितीसाठी: