2 उत्तरे
2
answers
जगात अस्तित्वात असलेले वेगवेगळ्या वारुळांचे प्रकार कोणते?
6
Answer link
*वारुळे*
वारुळे कोणाची असतात ? मुंग्यांची ! एका दमात दिलेले उत्तर जेमतेम एक टक्काच बरोबर आहे. आपल्याला माहीत असलेल्या तांबड्या मुंग्या व काळ्या मुंग्या यांची वारुळे असतात. पण ती जेमतेम जमिनीलगत फूटभरापर्यंतची. तीही एका जागी नसतात. तर बदलती सोयीची जागा त्याला शोधली जाते. मग खरी वारुळे कोण बांधते ? शतकानुशतके जागा न बदलणारी वारुळे व त्यातील वाळवी ही जगाच्या पाठीवरची खरे वारुळे म्हणता येतील. अशाच पद्धतीने लाकूड खाणारे बिटल नावाचे कीटक व झुरळासारखे प्राणी असतात, ते वारुळे बांधतात. झुरळांना पंख असतात, तर बीटलचे पंख उघडण्याइतके जोरदार नसतात. मानवी वस्तीचा जेथे स्पर्श नाही अशा ठिकाणी अक्षरश: हजारो वर्षे ही वारुळे अस्तित्वात आहेत. त्यांचे आकारही अवाढव्य आहेत. आठ दहा फूट उंचीचे व पंधरा वीस फूट व्यासाचे वारूळ पाहायला मिळणे ही जंगलातील नवलाची गोष्ट नव्हे.
या वारुळांची रचना मोठी सुबक असते. एखादे मोठे शहर वसवताना जसे डझनभर रचनाकार विविध गोष्टींबद्दल निर्णय घेतात, तसेच या वारुळातील सोयींची रचना करताना व्यवस्था करताना विचार केलेला आढळतो. वाळवी व बीटल यांची सामाजिक व्यवस्था मोठी काटेकोरपणे आखलेली आहे. पुनर्जनन, काम करणे, संरक्षण, घरे बांधणे, अन्नपुरवठा या विविध गोष्टी करणार्यांची भली मोठी फौज त्यासाठी राबत असते. प्रत्येक जण फक्त स्वतःला नेमून दिलेले काम करत असतो. त्यामुळेच ही वारुळे इतकी सुबक होऊ शकतात.
प्रचंड जोराच्या पावसाच्या माऱ्याचे यांच्यावर फारसा परिणाम होत असे होत नाहीत, तसेच एखाद्या दांडग्या प्राण्याने यांची केलेली नासधूस ही काही थोडक्या दिवसांत भरून काढण्याची व्यवस्था केली जाते, कारण वारुळाचा गाभा असतो जमिनीखाली किमान सहा ते आठ फुटांवरती. खोलवर आडव्या तिडव्या दिशांनी पसरलेली ही वारुळे अक्षरश: चार पाच लाख वाळवीच्या किड्यांना सामावून घेतात. वारुळांची जागा सहसा एखाद्या मोठ्या वृक्षांच्या बुंध्यापासून जवळच असते. वृक्षाची कोवळी मुळे, पडणारा पालापाचोळा, मुळांजवळचा ओलावा यांचा फायदा अन्नपाणी म्हणून हे दोन्ही कीटक करून घेतात. वस्ती स्थिरावली की मग गरजेनुसार त्यांचे लक्ष आजूबाजूला जाऊ लागते. अन्नासाठी चारी दिशा धुंडणे सुरू होते.
लाकूड खाणारे बीटल हे तर मोठ्या झाडाच्या बुंध्यात खोलवर शिरून घरे करण्यात पटाईत आहेत. वाळवी मात्र स्वतःच्या जाण्या येण्याच्या मार्गावर मातीसारख्या पदार्थांच्या बोगद्यांची सोय करते व मगच झाड पोखरू लागते. यातूनच एक दिवस असाही येतो की झाड निष्पर्ण होते, वाळून जाते व त्या जागीच वारूळ उभे राहू लागते. जमिनीच्या वरपर्यंत वाढत जाणारी वारुळांची उंची त्यामुळे मिळत असते.
या वारूळांचा आश्रय साप व नागही घेतात. त्यांना आयता आडोसा मिळतो. वारुळातील वाढवी खायलाही मिळते. पण त्यांचे वसतिस्थान मात्र वाळवीप्रमाणे कायमचे नसते. शेतातील वारूळ खांदले असताना नाग बाहेर पडतो, हे अनेकदा पाहिले असले, तरीही हा बहुधा नांगरटीचा, शेतीच्या कामाचाच काळ असतो. हे प्राणी या वारुळांचा पावसामुळे तात्पुरता आडोसा, पुनरुत्पादन एवढाच आश्रय घेताना दिसतात.
अमेरिका खंडातील काही ठिकाणी अश्मीभूत झालेले प्रदेश आहेत. कदाचित मोठ्या उल्कापातामुळे नष्ट झालेले जीवन जसेच्या तसे अश्मीभूत झाले असावे, असा कयास आहे. हा काळ काही कोटी वर्षांपूर्वीचा आहे, असाही निष्कर्ष आता काढला गेला आहे. या अश्मीभूत अवशेषांतही प्रकर्षाने लक्षात आलेली गोष्ट म्हणजे भली मोठी वारुळे व नागसापांशी साम्य असलेले क्रेफिश या जातीचे मासे.
मानवी वस्तीची बांधणी व सामाजिक व्यवस्था यापेक्षा कितीतरी पुरातन काळापासून या कीटकांची घरबांधणी व सामाजिक व्यवस्था अस्तित्वात होती, याचाच हा पुरावा नाही काय ?
*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*
0
Answer link
जगात अस्तित्वात असलेल्या वारुळांचे काही प्रकार खालीलप्रमाणे:
- घुमटाकार वारूळ (Mound Termites):
हे वारूळ मातीच्या ढिगाऱ्यांसारखे दिसते.
ते उष्णकटिबंधीय प्रदेशात आढळतात.
- बुरुजासारखे वारूळ (Cathedral Termites):
या वारुळांची रचना उंच मनोऱ्यासारखी असते.
ते ऑस्ट्रेलियामध्ये जास्त प्रमाणात आढळतात.
- सपाट वारूळ (Flat Termites):
हे वारूळ सपाट असून जमिनीलगत तयार होतात.
हे वारूळ झाडांच्या मुळांजवळ किंवा लाकडी सामानाजवळ आढळतात.
- झाडावरील वारूळ (Arboreal Termites):
हे वारूळ झाडांच्या फांद्यांवर तयार होतात.
हे विशेषतः घनदाट जंगलांमध्ये आढळतात.
- भूगर्भीय वारूळ (Subterranean Termites):
हे वारूळ जमिनीत खोलवर तयार होतात आणि त्यांच्या वसाहती जमिनीच्या आत असतात.
इमारती आणि लाकडी वस्तूंना नुकसान पोहोचवतात.
टीप: वारुळांचे प्रकार तेथील भौगोलिक परिस्थिती आणि वाळवीच्या प्रजातीनुसार बदलू शकतात.