2 उत्तरे
2
answers
मधमाशीची नजर तीक्ष्ण असते का?
0
Answer link
मधमाशीची दृष्टी मनुष्यासारखी तीक्ष्ण नसते.
मधमाशीच्या दृष्टीची काही वैशिष्ट्ये:
- संयुक्त डोळे: मधमाशीला दोन मोठे संयुक्त डोळे असतात. प्रत्येक डोळा लहान-लहान भागांनी बनलेला असतो, ज्यामुळे तिला वेगवेगळ्या दिशांना एकाच वेळी पाहता येते.
- रंग ओळखण्याची क्षमता: मधमाशीला अल्ट्राव्हायोलेट (ultraviolet) रंग दिसतो, जो माणसांना दिसत नाही. त्यामुळे फुलांमधील परागकण शोधायला त्यांना मदत होते.
- ध्रुवीकरण दृष्टी (Polarization vision): मधमाशी ध्रुवीकरण झालेले प्रकाश पाहू शकते, ज्यामुळे तिला दिशा शोधायला मदत होते, खासकरून जेव्हा सूर्य ढगांमागे असतो.
- हलण्याची जाणीव: मधमाशीला गती लगेच समजते. त्यामुळे ती फुलांवर लवकर पोहोचू शकते.
निष्कर्ष: मधमाशीची दृष्टी माणसांपेक्षा वेगळी असते. ती तीक्ष्ण न होता, तिच्या गरजा पूर्ण करणारी असते.
0
Answer link
*🐝मधमाशीची नजर ;असते तब्बल 30 पटीने तेज*

🐝
🐝
🐝
🐝
🐝
🐝
————————————————
★माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव कोल्हापूर★
————————————————
अत्यंत गोड आणि औषधी म्हणून मधाला ओळखले जाते. https://bit.ly/42HLALq मध म्हटले की मधमाशी आपल्या नजरेसमोर येते. या माशीची नजर यापूर्वी व्यक्त करण्यात आलेल्या अंदाजापेक्षाही 30 पटींनी जास्त वेगवान असल्याचे एका संशोधनात आढळून आले आहे.

एखाद्या शिकार्याची चाहूल लागताच आपला जीव वाचवण्यासाठी तेथून पळ काढण्याचा वेग हासुद्धा यापूर्वी व्यक्त करण्यात आलेल्या अंदाजापेक्षाही अधिक असल्याचे संशोधनात आढळून आले आहे.
मधमाशीसंदर्भात मिळालेल्या या नव्या माहितीमुळे या उडणार्या कीटकांच्या जीवनाच्या पैलूवर प्रकाश पडणार आहे. विशेष म्हणजे शास्त्रज्ञांनी मधमाशांची वेगवान नजर आपल्या नजरेसमोर ठेऊन त्याच्या मदतीने रोबोची नजर अधिक वेगवान करण्याच्या दिशेने प्रयत्न चालवले आहेत.
ऑस्ट्रेलियातील ‘अॅडलेड युनिव्हर्सिटी’तील संशोधक स्टिव्हन वाईडरमन यांनी सांगितले की, उडणार्या कीटकांच्या नजरेसंबंधी करण्यात आलेल्या संशोधनात मधमाशीची नजर यापूर्वी व्यक्त करण्यात आलेल्या अंदाजापेक्षा 30 पटींनी अधिक वेगवान असल्याचे आढळून आले आहे. या कीटकांच्या अत्यंत वेगवान नजरेने प्रेरित होऊन रोबोची नजरही अशीच वेगवान करण्याचा प्रयत्न भविष्यात केला जाऊ शकतो. या शोधामुळे उडणार्या कीटकासंबंधी अधिक माहिती उपलब्ध होणार आहे.https://whatsapp.com/channel/0029VaPJhXL84Om4z32l8I24