2 उत्तरे
2 answers

मधमाश्यांचे जीवन कसे असते?

9
🐝 *मधमाशा* 🐝
******************

नैसर्गिकरीत्या माणसाला ज्ञात असलेला गोड पदार्थ म्हणजे मध. साखरेचा वापर सुरू होण्याआधी अनेक ठिकाणी मधाचाच वापर केला जात असे. आजही मध आरोग्यदायी समजला जातो. हा मध मधमाशा गोळ्या करतात. मधमाशा जगभर आढळतात. संख्येने प्रचंड प्रमाणावर आढळणारी ही जात एखाद्या जमातीप्रमाणे वा कुटुंबाप्रमाणे राहते. अर्थातच एका पोळ्यामध्ये आढळणाऱ्या मधमाशा या त्या कुटुंबाच्याच घटक असतात. त्या तेथेच जन्माला येतात व वाढतात.

षटकोनी आकाराची, एकात एक गुंतलेली सलग रचना असलेली मधाची पोळी वा स्वतःची वसतिस्थाने बांधण्याचे काम कामकरी माशा करतात, तर या पोळ्यात राहून फक्त अंडी घालून ती वाढविण्याचे काम राणी माशी करत असते. मुंग्या व अन्य किटकांच्या प्रमाणे या बाबतीत खूपच साधर्म्य आढळते. मोजकेच नर या पोळ्यात असू शकतात. नवीन राणीमाशीबरोबर संयोग झाल्यावर हे नर काही काळातच मरूनही जातात व राणीमाशी स्वतःचे घर बांधायला घेते. नवीन पोळे जन्माला येते.

ज्या जंगलात ज्या प्रकारची झाडे असतील, फुले असतील, त्यांतील मध गोळा करून तो पोळ्यात साचवण्याचे काम मधमाशा अथकपणे करत असतात. हा मधाचा साठा जसजसा वाढत जातो, तसतसा पोळ्याचा आकार वाढत जातो. पोळे हे मुलत: नैसर्गिक मेणाचे बनलेले असते. मधाची चव फुलांनुसार बदलते.

फुलामधील मध स्वतःच्या सोंडेने शोषून घ्यायचा व तो पोळ्यात आणून साठवायचा, ही क्रिया करत असताना मधमाशी आणखीही दोन कामे करते. एका फुलाचे परागकण पंखांना लागतात, ते दुसऱ्या फुलावर नंतर टाकले जाऊन वनस्पतींचे पुंसवन होते. याचवेळी मागील पायांना लागलेले परागकण पोळ्यात आणले जातात व ते नुकत्याच अंड्यांतून बाहेर पडलेल्या अळ्यांना खायला दिले जातात. यांवरच त्यांचे पोषण होते. काही काळातच त्यांचे पूर्ण मधमाशीत रूपांतर होते. मधमाशीचे आयुष्य हे सहसा ऋतूपरतेच मर्यादित असते. त्यातही ती जर कोणाला डसली तर शरीराच्या मागील टोकाला असलेली नांगी काटेदार रचनेमुळे तेथेच रुतून अडकते. नांगी शरीराला जोडणाऱ्या स्नायूंनाही दुखापत होऊन मधमाशी स्वतःचा जीव गमावते. ही वस्तुस्थिती लक्षात घेतली म्हणजे मधमाशी उगाचच हल्ला करून चावणार नाही, याची खात्री पटेल. पोळ्याला धोका आहे, हे कळल्यावर मात्र हजारो माशा आसपासच्या सर्वांवर हल्ला चढवतात.

मधमाशांचा मध गोळा करण्याचा गुण लक्षात घेऊनच मधुमक्षिकापालन पेटी तयार केली गेली आहे. यात पोळे तसेच ठेवून सेंट्रीफ्युगल फोर्सने मध फक्त काढून घेतला जातो. रिकाम्या पोळ्यात मधमाशा पुन्हा मध गोळा करू लागतात.

मधमाशा व गांधील माशा या दोन जाती तशा पोटजातीच आहेत. फक्त गांधीलमाशा मध गोळा करत नाहीत. त्यांची पोळी लहान असतात. त्या चावल्या तर जास्त त्रास होतो. आकाराने मधमाशीपेक्षा मोठ्या व लालभडक रंगाच्या असतात.

मधमाशा एकमेकांना संदेश कसा देतात, हे मोठे विलक्षण आहे. एखादी माशी फुलांचा शोध घेऊन आल्यावर ती एक प्रकारचा नर्तनाचा प्रकार करून तिच्या सहचरींना फुलांची दिशा व अंतर यांची माहिती पुरवते. बघता बघता पोळ्यातील माशा तिकडे जातात. या संदेशव्यवस्थेचे अजूनही नीटसे आकलन झालेले नाही.

*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*
उत्तर लिहिले · 15/12/2018
कर्म · 569225
0

मधमाश्या या सामाजिक कीटक आहेत आणि त्या वसाहतींमध्ये राहतात. त्यांच्या जीवनात अनेक टप्पे असतात:

1. राणी माशी (Queen Bee):

  • राणी माशी ही वसाहतीतील एकमेव मादी असते जी अंडी घालते.
  • ती सुमारे 2-5 वर्षे जगते.
  • राणी माशी ফেরোमोन नावाचे रसायन स्त्रावते, ज्यामुळे वसाहतीतील माश्या नियंत्रित राहतात.

2. कामकरी माश्या (Worker Bees):

  • या माश्या वंध्य मादी असतात आणि वसाहतीतील सर्व कामे करतात.
  • त्या मकरंद गोळा करणे, পরাগकण जमा करणे, मध बनवणे, वारंवार पोळे स्वच्छ करणे आणि वसाहतीचे संरक्षण करणे अशी कामे करतात.
  • कामकरी माश्या सुमारे 6 आठवडे जगतात.

3. नर माश्या (Drone Bees):

  • नर माश्यांचे मुख्य कार्य राणी माशीसोबत मिलन करणे असते.
  • त्यांच्यात डंख नसतो आणि ते मध गोळा करू शकत नाहीत.
  • मिलन केल्यानंतर नर माश्या मरतात.

मधमाशी वसाहतीची रचना:

  • एका वसाहतीत 20,000 ते 60,000 माश्या असतात.
  • प्रत्येक माशीचे कार्य तिच्या वयानुसार बदलते.
  • लहान माश्या पोळ्यामध्ये काम करतात, तर मोठ्या माश्या बाहेर जाऊन अन्न शोधतात.

मधमाश्यांचे जीवनचक्र:

  1. अंडी: राणी माशी पेशींमध्ये अंडी घालते.
  2. लार्वा: अंड्यातून लार्वा बाहेर येतो, त्याला कामकरी माश्या खाऊ घालतात.
  3. प्युपा: लार्वा प्युपात रूपांतरित होतो आणि स्वतःला एका कोषामध्ये बंद करतो.
  4. प्रौढ: प्युपातून प्रौढ मधमाशी बाहेर येते.

मधमाश्या पर्यावरणासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, कारण त्या পরাगकण (Pollination) करण्यात मदत करतात, ज्यामुळे अनेक वनस्पती आणि पिकांची वाढ होते.

अधिक माहितीसाठी, आपण खालील वेबसाइट्सला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 980

Related Questions

अतिनील किरणांना बघून डास आकर्षित होतात का?
मानवी शरीर मानवाचे नाही म्हणतात ते कितपत खरे आहे?
मरण म्हणजे नेमकं काय होतं?
जिओ जीवशास्त्रातील उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी मांडला? वाफेवर चालणाऱ्या इंजिनचा शोध कोणी लावला? कोणत्या अवकाशयानाने पहिल्यांदा मानवाला चंद्रावर सोडले? ड जीवनसत्वाच्या अभावामुळे मुलांमध्ये कोणता आजार होतो? राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून कोणता दिवस साजरा करतात? रेबीज या आजारावरील लस कोणी तयार केली?
जीवशास्त्रातील उज्वल ज्ञान आणि प्राचीन भारतातील विज्ञान व तंत्रज्ञानाचा शोध?
मातीमधील रासायनिक किटकनाशके नष्ट करणारे सूक्ष्म जीव कोणते आहेत?
बेडूक पाण्यात व जमिनीवर दोन्ही ठिकाणी का राहू शकतो?