अन्न पोषण आरोग्य आहार

फुटाणे खाण्याचे फायदे सांगा?

3 उत्तरे
3 answers

फुटाणे खाण्याचे फायदे सांगा?

11
फुटाणे आणि गूळ खाल्लेला शरीरासाठी खूप फायद्याचा आहे.
फुटाणे खाल्ल्याने हाडे मजबूत होतात.
👇
चेहरा उजळतो – यामधील झिंक म्हणजेच जस्त त्वचा उजळण्यास मदत करते. झिंक त्वचेला तजेला प्रदान करते. याचे नियमित सेवन केल्याने स्त्रियांचे सौंदर्य अधिक वाढते. 

 अपचनापासून मुक्तता मिळते – गूळ-फुटाणे नियमित खाल्ल्याने पचनशक्ती सुधारते. यामुळे अपचन व ऍसिडीटीच्या समस्येपासून सुटका मिळते. स्त्रियांना बहुधा पोटाचा त्रास होतो. अशा वेळी गूळ-फुटाणे खाणे योग्य ठरते.

 स्मरणशक्ती वाढते- गूळ व फुटाणे खाल्ल्याने बुद्धी तीक्ष्ण होते. यामधील विटॅमिन बी स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करते.

 दातांची सुरक्षा – गूळ व फुटाणे दातांना सुरक्षित ठेवतात. यामधील फॉस्फरस दातांसाठी उपयोगी आहे. गर्भावस्थेनंतर स्त्रियांनी गूळ-फुटाणे खायला हवे.

 ह्रदयाचे आरोग्य – यातील पोटॅशियम हार्ट अटॅकपासून रक्षण करते. ह्रदय संबंधित समस्यांसाठी गूळ-फुटाणे उपयोगी आहेत.
.
🙏🇮🇳
उत्तर लिहिले · 10/1/2019
कर्म · 22320
6
फुटाण्याला गरिबांचे बदाम म्हटले जातं. कारण, स्वस्त असूनही यामध्ये मोठमोठ्या आजारांशी लढण्याची क्षमता आहे. हिवाळ्याच्या दिवसांत चणे खाणं त्यामुळेच लाभदायक ठरतं...
पाहुयात, फुटाण्याचे फायदे... 
* हिवाळ्यात दररोज ५० ग्रॅम फुटाणे खाणे शरीरासाठी खूप लाभदायक आहे. आयुर्वेदानुसार फुटाणे आणि हरभर्‍याची डाळ शरीरासाठी पौष्टिक आहे. फुटाणे खाल्ल्याने अनेक आजार दूर राहतात.
* यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, आयर्न, कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असते. याच्या नियमित सेवनाने सौंदर्य खुलते तसेच स्मरणशक्ती वाढते.
* लठ्ठपणा कमी करण्यासाठी दररोज नाष्ट्यामध्ये फुटाण्यांचा समावेश करावा.
* गर्भवतीला उलट्या होत असतील तर भाजलेल्या फुटण्याचे सूप पाजावे.
* थंडीमध्ये हरभर्‍याच्या पिठाचा हलवा थोडे दिवस नियमित खाल्यास वातामुळे निर्माण होणार्‍या आजारांमध्ये तसेच दम्याच्या त्रासामध्ये आराम मिळेल.
* रात्री हरभर्‍याची डाळ भिजवून ठेवा. सकाळी ही डाळ बारीक वाटून घ्यावी आणि साखरेच्या पाण्यात मिसळून ते पाणी प्यावे. यामुळे मानसिक तणाव कमी होईल.
* ५० ग्रॅम फुटाणे उकळून घ्या आणि त्याच उकळलेल्या पाण्यामध्ये बारीक करा. हे कोमात पाणी एक महिनाभर पिल्यास जलोदर रोग दूर होईल.
* हरभर्‍याच्या पिठाच्या मीठ न घालता केलेल्या पोळीचे ४० ते ६० दिवस सेवन केल्यास त्वचेशी संबंधित आजार दूर होतील.
* भाजलेले फुटाणे रात्री चावून खावेत आणि त्यानंतर गरम दुध प्यावे. या उपायाने श्वासानाशी संबधित रोग तसेच कफ दूर होतो.
* सरासरी १00 ग्रॅम फुटाण्यांमध्ये २२.५ ग्रॅम प्रोटिन्स, ५.२ ग्रॅम फॅट, १ ग्रॅम फायबर (तंतूमय पदार्थ) आणि ९.५. ग्रॅम लोह असते. मधुमेही रुग्णाने दररोज सकाळ व सायंकाळी ५0 ग्रॅम फुटाणे खाल्ले तर तीन दिवसात त्याच्या इन्सुलिनची मात्रा २0 टक्क्याने कमी होते.
* कावीळ झाला असेल तर १०० ग्रॅम हरभर्‍याची डाळ दोन ग्लास पाण्यामध्ये भिजवून ठेवा. त्यानंतर डाळ पाण्यातून काढून त्यामध्ये १०० ग्रॅम गूळ मिसळून ४-५ दिवस या मिश्रणाचे सेवन केल्यास कावीळ बरा होण्यास मदत होईल.
* मातीच्या भांड्यामध्ये रात्री फुटाणे भिजवून ठेवा. सकाळी झोपेतून उठल्यानंतर भिजवलेले फुटाणे चावून-चावून खा. या उपायाने विर्‍यामध्ये वृद्धी होईल तसेच पुरुषाच्या कमजोरीशी संबंधित समस्या समाप्त होतील. भिजवलेले फुटाणे खाल्ल्यानंतर त्यावर दूध पिल्यास वीर्‍यातील पातळपणा दूर होईल.
* गूळ आणि फुटाण्याचे नियमित सेवन केल्यास मुत्ररोगाशी संबधित समस्या समाप्त होतात. दररोज भाजलेले फुटाणे खाल्या मुळव्याधीचा त्रास कमी होईल.

स्त्रोत: झी न्यूज हेल्थ
उत्तर लिहिले · 10/1/2019
कर्म · 458560
0
फुटाणे खाण्याचे फायदे:

फुटाणे (Roasted chickpeas) हे चवीला अतिशय उत्तम लागतात आणि ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. फुटाणे खाण्याचे काही फायदे खालीलप्रमाणे:

  1. पोषक तत्वे: फुटाण्यामध्ये प्रथिने, फायबर, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि फोलेट भरपूर प्रमाणात असतात.
  2. वजन कमी करण्यास मदत: फुटाण्यामध्ये फायबर जास्त असल्यामुळे ते खाल्ल्याने पोट भरल्यासारखे वाटते आणि जास्त खाणे टाळले जाते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. Healthline
  3. रक्त शर्करा नियंत्रण: फुटाण्यामध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स असतो, त्यामुळे ते रक्तातील शर्करा नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
  4. हृदयासाठी चांगले: फुटाण्यामध्ये असलेले फायबर आणि पोटॅशियम हृदयविकारांपासून बचाव करतात.
  5. हाडे मजबूत: फुटाण्यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस असल्याने हाडे मजबूत होतात.
  6. पचनक्रिया सुधारते: फुटाण्यामध्ये फायबर असल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेची समस्या कमी होते.
  7. ऊर्जा मिळते: फुटाण्यामध्ये लोह भरपूर असल्यामुळे ते खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि थकवा कमी होतो.

हे काही फुटाणे खाण्याचे फायदे आहेत. त्यामुळे फुटाणे आपल्या आहारात नक्कीच समाविष्ट करावे.

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 1780

Related Questions

जेवण पोटभर जात नाही?
जेवण जात नाही?
एखाद्या व्यक्तीला एनर्जी एकदम कमी झाल्यावर लवकर एनर्जी येण्यासाठी काय करावे?
पसाभर बदामामध्ये किती प्रोटीन असते?
बद्धकोष्ठता टाळण्यासाठी कोणता आहार घ्यावा?
100 ग्रॅम सोयाबीनमध्ये प्रथिने किती असतात?
200 ग्राम भिजलेल्या हरभऱ्यामध्ये किती प्रथिने असतात?