अन्न पोषण आरोग्य आहार

पेरू खाण्याचे आरोग्यदायी फायदे कोणते?

2 उत्तरे
2 answers

पेरू खाण्याचे आरोग्यदायी फायदे कोणते?

14
पेरु    ( Guava )  - - - - -

गुणधर्म  --  भरपूर  ' सी '  जीवनसत्व,  कॅल्शियम,  फाॅस्फरस,  लोह,  ग्लुकोज,  टॅनिक  अॅसिड  इ.  आहे.

१)  बद्धकोष्ठता -  (  शौचास  खडा  होणे  )
रात्री  जेवणानंतर  पेरु  फोडींवर  +  लिंबू रस  +  मिठ  +  काळीमीरपूड  टाकून  खा. पोट  साफ  होते.
२)  मुलांना  टॉनिक  -
पेरू  +  मध  लावून  खा.  शक्ती  वाढते.
३)  अर्धशिशी -
कच्चा  पेरू  पाण्यात  उगाळून  कपाळावर  लेप  लावा.
४)  दारूची  नशा  -
पेरु  खा.  नशा  लवकरच  कमी  होते.
५)  बुद्धिवर्धक  काम  करण्यासाठी  -
दुपारच्या  जेवणानंतर  एक  पेरु  खा.  स्मरणशक्ती  वाढते.
६)  जेवल्यावर  घशाशी  जळजळ  होणे -
पेरु  खा.  पचन  चांगले  होते.
७)  शरीरात  उष्णता  वाढणे.
पेरु  खा.  उष्णता  लवकर  कमी  होते.
८)  गळू  झाल्यास -
पानांचा  पोटीस  करून  बांधा.
९)  दातदुखी -
पेरूची  कोवळी  पाने  चावून  थुंका. किंवा  पेरूची  कोवळी  पाने  +  तुरटी  +  मीठ  +  पाणी  सर्व  एकत्र  उकळवून  पाणी  कोमट  करून  गुळण्या  करा.क
१०)  फोडी  न  करता  पेरू  चावून  खाल्याने  दात  Strong  होतात.
११)  अति  प्रमाणात  पेरू  खाल्यास  जुलाब  होणे,  पोटाला  गुबारा  धरणे,  सर्दी  होणे,  असे  विकार  वाढतात.  मात्र  बी  मुळे  स्टोन  होतात  हे  चुकिचे  आहे. 
१२)  पेरूला  थोडे  मीठ  लावून  खाणे. कोणताच  त्रास  होत  नाही.
१३)  तयार  पेरू  खाणे.  कच्चा  योग्य  नाही.

       आरोग्य   संदेश  

पेरुची   आहे  लय   भारी   ख्याती,
खाऊन आरोग्याची   होईल  प्रगती.
उत्तर लिहिले · 22/10/2018
कर्म · 569245
0

पेरू खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत, त्यापैकी काही खालीलप्रमाणे:

पोषक तत्वांनी परिपूर्ण: पेरूमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, पोटॅशियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात.

रोगप्रतिकारशक्ती वाढवते: व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.

पचनक्रिया सुधारते: फायबरमुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता कमी होते.

वजन कमी करण्यास मदत करते: पेरूमध्ये कॅलरी कमी असतात आणि फायबर जास्त असल्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.

हृदयासाठी चांगले: पेरूतील पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे हृदयविकारांचा धोका कमी होतो.

त्वचेसाठी फायदेशीर: पेरूमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स त्वचेला फ्री रॅडिकल्सपासून वाचवतात आणि त्वचा निरोगी ठेवतात.

मधुमेहासाठी उपयुक्त: पेरू रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

अधिक माहितीसाठी आपण खालील वेबसाइटला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 2800

Related Questions

राईस ब्रँड तेलाचे फायदे?
कमी कॅलरीचे अन्न कोणते?
जेवण पोटभर जात नाही?
जेवण जात नाही?
एखाद्या व्यक्तीला एनर्जी एकदम कमी झाल्यावर लवकर एनर्जी येण्यासाठी काय करावे?
पसाभर बदामामध्ये किती प्रोटीन असते?
बद्धकोष्ठता टाळण्यासाठी कोणता आहार घ्यावा?