निवडणूक
कागदपत्रे
मतदार नोंदणी
निवडणूक-मतदान विशेष: मतदार ओळखपत्र नोंदणी बद्दल माहिती? मतदार नोंदणी साठी कोणती कागदपत्रे लागतात? पदवीधर मतदार मतदान माहिती?
3 उत्तरे
3
answers
निवडणूक-मतदान विशेष: मतदार ओळखपत्र नोंदणी बद्दल माहिती? मतदार नोंदणी साठी कोणती कागदपत्रे लागतात? पदवीधर मतदार मतदान माहिती?
7
Answer link


*मतदार नोंदणी करण्यासाठी.....*
लोकसभा निवडणूक २०१९
मतदार यादीत आपले नाव आहे की नाही हे तपासण्यासाठी 👉
Voter Search
http://103.23.150.139/marathi/
ही लिंक उघडून आपले नांव शोधा.--->>पुढे नावाच्या शेवटच्या रकान्यात VIEW PDF ला क्लिक केल्यानंतर तुमच्या मतदार संघातील व तुमच्या भागातील मतदार यादी येईल.व ती डाउनलोड होईल.
खालील लिंक उघडून प्लेस्टोअर वरून VOTER HELPLINE APP डाउनलोड करा.
आपले नांव शोधा,आपली नांव नोंदणी करा व इतर समस्या नोंदवा.सर्व काही घरबसल्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.eci.citizen
*मतदान ही देशसेवाच आहे*
*दि.१सप्टेंबर२०१८ ते ३१ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत नवीन मतदार नोंदणी कार्यक्रम सुरू झाला आहे.तरी ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत वय वर्षे १८ पूर्ण होणाऱ्या नवीन मतदारांनी खालील कागदपत्रांसह मतदान केंद्रस्तरिय अधिकारी [B L O] यांच्याकडे संपर्क साधावा.*
📄 *मतदार यादी मध्ये तुमचं नाव आहे कि नाही असे तपासा*
🧐 _तुमचं नाव मतदार यादीमध्ये आहे की नाही हे तुम्ही http://electoralsearch.in वर लॉग इन करून बघू शकता._
🌐 _या वेबसाईटवर तुम्हाला Search by Details तर आणि Search by EPIC No असे दोन ऑप्शन दिसतील._
🖊 _Search by Details सिलेक्ट केल्यास तुम्हाला नाव, जन्म तारीख, राज्याचं नाव, लिंग, जिल्ह्याचं नाव या गोष्टी भराव्या लागतील._
🔢 _Search by EPIC No द्वारे केवळ मतदान कार्डवरील नंबर टाकल्यास तुम्हाला सर्व माहिती मिळेल._
___________________________________
🔎 *मतदार यादीत तुमचं नाव आहे का? इथे चेक करा!*
सतराव्या लोकसभेसाठी महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये म्हणजेच 11, 18, 23 आणि 29 एप्रिल 2019 रोजी मतदान होणार आहे. आपले नाव मतदार यादीत पाहण्यासाठी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर एक स्वतंत्र पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. वेबसाईटवर आपण आपले नाव, मतदान केंद्राची माहिती मिळवू शकतो. ते कसं याबाबत जाणून घेऊयात...
▪ आपले नाव पाहण्यासाठी https://ceo.maharashtra.gov.in/ या लिंकवर क्लिक करा
▪ आपण इलेक्शन कमिशनच्या साईटवर गेल्यानंतर Search your Name in Final Electoral Roll 2019 New वर क्लिक करा.
▪ यानंतर आपल्यासमोर Name Wise आणि ID Card Wise हे दोन पर्याय दिसतील
▪ यातील Name Wise पर्यायावर क्लिक केल्यानंतर पुढे District आणि Assembly असे दोन पर्याय समोर येतील
▪ त्यापैकी Assembly हा पर्याय निवडल्यास तुम्हाला पुढे चार पर्याय पुढे येतील. ते सर्व पर्याय तुम्हाला भरावे लागतील.
▪ त्यामध्ये पहिला पर्याय असेल तो Select District. यात तुमच्या जिल्ह्याचे नाव टाका.
▪ त्या पुढचा पर्याय Select Assembly. यात तुमच्या मतदारसंघांचे नाव निवडा.
▪ त्यानंतर तुमचे नाव, आडनाव, तुमच्या वडिलांचे किंवा पतीचे नाव टाका.
▪ हे सर्व रकाने भरल्यानंतर Search या पर्यायवर क्लिक करा.
▪ ही प्रक्रिया पूर्ण करताच तुमचे नाव, तुमचा मतदार क्रमांक, वय याबाबतची माहिती समोर येईल.
💫 जर तुम्हाला तुमचे मतदान केंद्र पाहायचे असल्यास त्या पर्यायातील Polling Station Address यावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या मतदार केंद्रांची माहिती उपलब्ध होईल. तसेच तुम्ही कुटुंबातील व्यक्तीचे नावही पाहू शकता.
___________________________________
📝 *मतदार यादीत तुमचं नाव आहे का? इथे चेक करा.*
👉🏻 महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये म्हणजेच 11, 18, 23 आणि 29 एप्रिल 2019 रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे आता आपलं नाव मतदार यादीत आहे की नाही हे आताच पाहा. कारण ऐनवेळी मतदार यादीत नाव नसल्याने मतदान करता येणार नाही.
👉🏻 मतदाराचे नाव मतदार यादीत आहे की नाही हे पाहण्यासाठी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर एक स्वतंत्र पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. वेबसाईटवर आपण आपले नाव, मतदान केंद्राची माहिती मिळवू शकतो.
👉🏻 आपले नाव पाहाण्यासाठी या लिंकवर क्लिक करा- http://103.23.150.139/marathi/
👉🏻 याशिवाय https://ceo.maharashtra.gov.in/ या साईटवरही आपलं नाव पाहाता येईल. http://electionmsd.blogspot.com/?m=1 या ब्लॉगवरही पाहू शकता.
🔰 *असे चेक करा आपले नाव-*
🔹 वरील लिंकवर क्लिक केल्यानंतर आपण इलेक्शन कमिशनच्या साईटवर जाल.
🔹 साईटवर गेल्यानंतर आपल्यासमोर Name Wise आणि ID Card Wise हे दोन पर्याय उपलब्ध असतील.
🔹 त्यातील Name Wise पर्यायावर क्लिक केल्यानंतर पुढे District आणि Assembly असे दोन पर्याय समोर येतील.
🔹 त्यापैकी Assembly हा पर्याय निवडल्यास तुम्हाला पुढे चार पर्याय पुढे येतील. ते सर्व पर्याय तुम्हाला भरावे लागतील.
🔹 त्यामध्ये पहिला पर्याय असेल तो Select District.
🔹 त्या पर्यायात तुमच्या जिल्ह्याचे नाव टाका.
🔹 त्या पुढचा पर्याय Select Assembly (म्हणजेच तुमचा मतदारसंघ)
🔹 या पर्यायापुढे तुमच्या मतदारसंघांचे नाव निवडा.
🔹 त्यानंतर तुमचे नाव टाका. त्यानंतर तुमचे आडनाव टाका.
🔹 त्यानंतर तुमच्या वडिलांचे किंवा पतीचे नाव टाका.
🔹 हे सर्व रकाने भरल्यानंतर Search या पर्यायवर क्लिक करा.
🔹 ही प्रक्रिया पूर्ण करताच तुमचे नाव, तुमचा मतदार क्रमांक, वय याबाबतची माहिती समोर येईल. याशिवाय तुम्हाला तुमचं मतदान केंद्र पाहायचे असल्यास त्या पर्यायातील Polling Station Address यावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या मतदार केंद्रांची माहिती उपलब्ध होईल.
🔹 याशिवाय तुमच्या कुटुंबातील व्यक्तीचे नावही पाहता येणार आहे.
________________________________
*_मतदानासंदर्भात काही महत्वाची प्रश्न उत्तरे_*
*१. मतदान करताना कोणती काळजी घ्यायची?*
1.अनेकदा मतदान यादीच्या गोंधळामुळे आपले नाव भलतीकडल्याच लिस्टमध्ये असते. अशा वेळी संयमाने वागा. आपले नाव शोधून मतदान करून मगच घरी या.
2.मतदानासाठी भली मोठी लाईन आहे म्हणून मतदान न करताच परत येऊ नका. जसं देवाच्या देवळात दर्शनाला गेल्यावर गर्दी असली तरी रांगेत उभं राहून दर्शन घेता, तसंच आपल्या देशाच्या/ राज्याच्या/विभागाच्या प्रगतीसाठी मतदानाच्या रांगेत उभं राहा.
3.मतदान करताना काही अडचण येत असेल, तर मतदान केंद्रावरील कर्मचार्यांची अवश्य मदत घ्या कारण चुकीची मतदान प्रक्रिया आपले मत अवैध ठरवेल.
4.मतदान करताना घाई-गडबड करू नका. लक्षात ठेवा प्रत्येक मत महत्वाचे जाते. त्यामुळे नीट विचार करूनच बटण दाबा. घाई गडबडीत मतदान केल्यामुळे चुकीच्या चिन्हाला मत जाऊ शकते किंवा तुमचे मत अवैध ठरू शकते.
*2. मतदान कोण करू शकतं?*
- १८ वर्ष पूर्ण झालेली आणि मतदार म्हणून नोंदणी केलेली कोणतीही भारतीय व्यक्ती मतदान करू शकते.
*3. परदेशात स्थायिक असलेली अनिवासी भारतीय व्यक्ती मतदान करू शकते का?*
- होय लोकप्रतिनिधी कायदा, कलम २०/ए मधील तरतुदीनुसार, कोणतीही व्यक्ती जी भारताचा नागरिक आहे व त्याने इतर कोणत्याही देशाचे नागरिकत्व घेतलेले नाही आणि शिक्षण, नोकरी व तत्सम कारणामुळे परदेशात राहत आहे, त्या व्यक्तीस मतदानाचा अधिकार आहे.
*4. मतदान करण्यासाठी ओळखपत्र आवश्यक आहे का?*
- हो. मतदान केंद्रावर तुमचे ओळखपत्र तपासले जाते.
▪इलेक्शन कार्ड
▪आधारकार्ड
▪पासपोर्ट
▪पॅनकार्ड
▪वाहन परवाना (Driving License)
▪बँक पासबुक
▪ओळखपत्र (उदा.
*5. नोटा (NOTA) म्हणजे काय?*
- NOTA म्हणजे "None of the above". तुमच्या विभागात निवडणुकीसाठी उभ्या असणाऱ्या उमेदवारांपैकी, जर कोणताही उमेदवार तुम्हाला पात्र वाटत नसेल, तर सर्व उमेदवारांना नाकारायचा अधिकार म्हणजे नोटा (NOTA).
टिम अर्थसाक्षर प्रगत, जागृत, सामर्थ्यशाली लोकशाहीचा पुरस्कार करते.
सत्ताधारी पक्ष कायम बदलते असतात. बऱ्याचदा त्यांची विचारधारा पण कालानुरूप बदलते. अर्थसाक्षरता हा सरकार किंवा राजकीय पक्षांपेक्षा मोठा आणि खोल विषय आहे. तेव्हा आम्हाला सर्वच पक्ष आवडतात. कुठल्या पक्षाला मतदान करायचे आहे, का करायचे आहे ते तुम्ही ठरवा. कुणालाही मतदान करा पण या मतदानाच्या पवित्र कर्तव्यापासून पळून जाऊ नका.
"मी मतदान करणारच !" हे वाक्य स्वत:शी किमान ३ वेळा तरी म्हणा आणि मतदानाला जा, इतरांनाही मतदान करायला प्रवृत्त करा !
🛑 *नवीन मतदार नोंदणीसाठी कागदपत्रे*
🔵 *घरातील मुलगा/मुलगी यांच्या नाव नोंदणीसाठी कागदपत्रे*
१)जन्म पुरावा-शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट
२)रहिवासी दाखला ग्रामसेवक/तलाठी यांचे सहीचा
३)आधार कार्ड झेरॉक्स
४) १ पासपोर्ट साईज फोटो
५)घरातील नात्यातील(आई, वडील, भाऊ, बहीण)यांपैकी एकाचे ज्यांचे नाव अगोदर मतदार यादीत समाविष्ठ असेल तर त्यांच्या मतदान ओळखपत्राची झेरॉक्स
🔵
*घरातील सुनबाईचे नाव समाविष्ट करण्यासाठी कागदपत्रे*
१)जन्म पुरावा-शाळा सोडल्याचा दाखला/बोनाफाईड सर्टिफिकेट
२)रहिवासी दाखला ग्रामसेवक/तलाठी यांचे सहीचा
३)१ पासपोर्ट साईज फोटो
४)माहेरच्या गावात मतदार यादीत नाव असेल तर ते नाव कमी केल्याचा दाखला.
५)माहेरच्या गावात मतदार यादीत नाव नसेल तर यादीत नाव नसल्याचा दाखला
६)पतीचे मतदार ओळखपत्र झेरॉक्स
७)असल्यास लग्नपत्रिका
📍 *संपर्क : मतदान केंद्रस्तरिय अधिकारी [BLO]*
💁♂ *टीप--३१डिसेंबर २००० पूर्वीचे जन्म असलेले स्त्री व पुरुष मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी पात्र🔵*
✍ *मतदारांनी आपली नावे नोंदवून घ्यावीत व मतदानचा आपला हक्क/अधिकार प्राप्त करा ही विनंती.*
*"चला मतदार होवू या,*
*लोकशाही प्रबळ करु या"*
_________________________
🗳 *महाराष्ट्रातील मतमोजणीसाठी 25 हजार कर्मचारी सज्ज; जाणून घ्या कशी होते मतमोजणी?*
राज्यात 288 विधानसभा मतदारसंघांच्या सार्वत्रिक आणि सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या दि. 24 रोजी होणाऱ्या मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. यासाठी पंचवीस हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांची मतमोजणीसाठी नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी आज दिली.
🧐 *कशी पार पडेल मतमोजणी ?*
▪ सकाळी 8 वाजता सुरू होईल मतमोजणी
▪ 269 ठिकाणी 288 मतदारसंघांची मतमोजणी होणार आहे.
▪ मतदार संघातील 5 बूथच्या VVPAT मधील चिठ्ठ्यांची मोजणी केली जाते.
▪ हे पाच बूथ चिठ्ठी टाकून उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी आणि निरीक्षक यांच्या उपस्थितीत निवडले जातात.
▪ VVPAT मधील चिट्ठीतील मते आणि आणि ईव्हीएम वरील मतांची पडताळणी यावेळी केली जाते.
▪ सुरवातीला पोस्टल मतांची मतमोजणी केली जाते.
▪ पोस्टल मतं आणि बरकोडद्वारे ETPB (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट) मोजले जातील.
▪ प्रत्येक टेबलला मतमोजणीसाठी उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित राहू शकतात.
▪ प्रत्येक फेरीनंतर निकलची आकडेवारी जाहीर करण्यात येते.
🌐 *कोणत्या वेबसाइटवर पाहता येईल निकाल ?*
भारत निवडणूक आयोगाच्या results.eci.gov.in या संकेतस्थळावर तसेच 'Voter Helpline' या गुगल प्लेस्टोअरवर उपलब्ध असलेल्या अँड्रॉइड ऍपवर मतदारसंघाचे फेरीनिहाय निकाल, संपूर्ण राज्यातील पक्षनिहाय आघाडीवरील उमेदवार, विजयी उमेदवार, पक्षनिहाय मतदानाची टक्केवारी आदी माहितीदेखील उपलब्ध होणार आहे.

*⚡आता मतदान ओळखपत्र नसेल तरी करता येणार मतदान* 💫
https://www.uttar.co/answer/5c9cc444331bce3ded56550b
_💫तुमच्याकडे मतदान ओळखपत्र नसेल तरी तुम्हाला मतदान करता येणार आहे. निवडणूक आयाेगाने विविध 11 ओळखपत्रांच्या आधारे मतदान करता येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु त्यासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे._
_🤔मतदान ओळखपत्र हरवले तर काय करायचे असा प्रश्न अनेकांना पडताे. तसेच मतदान करता येईल का याबाबतही संभ्रमावस्था असते. अशा मतदारांसाठी निवडणुक आयाेगाने संकेस्थळावर मतदार ओळखपत्र नसल्यास काेणती 11 ओळखपत्रे मतदान केंद्रावर घेऊन जाता येतील याबाबतची माहिती प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे मतदान ओळखपत्र नाही त्यांनाही मतदान करता येणार आहे. परंतु यासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे._
_🔘 सोमवारी होणाऱ्या निवडणुकीसाठी मतदान करताना निवडणूक आयोगाने दिलेलं मतदार छायाचित्र ओळखपत्र आवश्यक आहे. ते नसल्याच कुठलं ओळखपत्र चालेल याची यादी निवडणूक आयोगाने जारी केली आहे. मतदानासाठी देण्यात आलेली छायाचित्र मतदार पावती ही ओळखपत्राचा पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाणार नाही, असंही निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे._
*💁♂निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या ओळखपत्रांची माहिती*
१. पासपोर्ट
२. वाहन चालक परवाना ( ड्रायव्हिंग लायसन्स )
३. छायाचित्रे असलेले कर्मचारी ओळखपत्र ( केंद्र्/राज्य शासन/सार्वजनिक उपक्रम/ सार्वजनिक मर्यादित कंपनीने कर्मचा-यांना दिलेले ओळखपत्र )
४. छायाचित्र असलेले बँकेचे पासबुक
५. पॅनकार्ड
६. एनपीआर अंतर्गत आरजीआय द्वारे दिले गेलेले स्मार्ट कार्ड
७. मनरेगा कार्यपत्रिका
८. कामगार मंत्रालयाद्वारे दिले गेलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड
९. छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज
१०. खासदार/आमदार/विधान परिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र
११. आधारकार्ड
👆🏻🔹 _*मतदानासाठी या 11 पैकी कुठलंही ओळखपत्र चालणार निवडणूक आयोगाने दिली यादी*_
_🔊 मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रामध्ये आपले वैध मतदार छायाचित्र ओळखपत्र (EPIC) सोबत घेऊन जावे. मात्र मतदाराकडे जर वैध मतदार छायाचित्र ओळखपत्र (EPIC) नसेल तर मतदाराने खालील पैकी कोणतेही एक दस्तावेज ओळखपत्र म्हणून मतदार केंद्रावर सादर करावे._
_केवळ मतदार छायाचित्र ओळखपत्र आहे म्हणून मतदान करता येईल असे नाही तर मतदार यादीत आपले नाव समाविष्ट असणे आवश्यक आहे. याबाबत मतदारांनी आपले नाव नोंदणी अथवा पडताळणीसाठी https://www.nvsp.in/ या संकेतस्थळावर भेट द्यावी._
🔊 *यंत्रणा सज्ज*
_सोमवारी 21 ऑक्टोबरला (Maharashtra polling day) होणाऱ्या मतदानासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आलं आहे. 24 ऑक्टोबरला होणाऱ्या मतमोजणीची व्यवस्था (Counting day) वेगळी आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सुमारे 6.50 लाख कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलही सज्ज आहे._
*मतदान केंद्राची माहिती अशी मिळवा*
_▪ मतदारांना मतदार यादीत नाव आहे की नाही याची माहिती एका क्लिकवर मिळू शकेल. भारतीय निवडणूक आयोगाच्या https://electoralsearch.in या वेबसाईटवर मतदान केंद्राबद्दल एका क्लिकवर माहिती मिळू शकेल._
_▪ या वेबसाईटवर इथे क्लिक करा. स्वतःचे संपूर्ण डिटेल्स भरल्यानंतर तुमच्या नावाची माहिती मिळते. मतदाराचं नाव, वडील/पतीचे नाव, वय अथवा जन्मतारीख, लिंग, राज्य, जिल्हा, विधानसभा मतदारसंघ या गोष्टी दिलेल्या कॉलममध्ये भरल्यानंतर माहिती मिळू शकते._
_▪ याशिवाय मतदार ओळख क्रमांक आणि राज्याचं नाव टाकल्यानंतर मतदारांची माहिती मिळविण्याचा दुसरा पर्यायही संकेतस्थळावर उपलब्ध आहे._
_*⁉👤मतदार यादीत नाव शोधायचे आहे?*_
*खालील लिंकवर फक्त नुसती टिचकी मारा*
_*आपले नांव टाका,*_
_*तुमचे नांव,*_
_यादी भाग क्रमांक व क्रमांक येईल._
*तुम्ही लाभ घ्या, इतरांनाही पाठवा*
https://t.co/hPKnChwABZ
#RASUL_KHADAKALE
_____________________________
_*🇮🇳रसुल खडकाळे🇮🇳*_
_बोरगांव(देशमुख)ता.अक्कलकोट जि.सोलापूर_
_______________________________
🎓 _*पदवीधर, शिक्षकांसाठी खुशखबर; जुलैपर्यंत करता येणार मतदार नोंदणी*_
_*पदवीधर मतदार संघ निवडणूक 2020*_
आपल्याकडे ग्रामपंचायत पासून लोकसभेपर्यंत सर्वच निवडणुकांना महत्व आहे. परंतु दुर्दैवाने पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीकडे फारसं गांभीर्याने पाहिलं जात नाही. कित्येकांना तर अशी काही निवडणूक असते हेच मुळात माहीत नाही म्हणून हा माहिती देण्याचा प्रपंच…
आपल्या महाराष्ट्र राज्यात विधानसभा आणि विधानपरिषद अशी दोन कायदेमंडळ गृहे आहेत हे आपण नागरिकशास्त्रात वाचले असेलच. महाराष्ट्रासह भारतातील एकूण सात राज्यात अशी द्विगृहात्मक कायदेमंडळ पद्धती अस्तित्वात आहे. त्यात उत्तर प्रदेश, बिहार, जम्मू काश्मीर, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्राचा समावेश होतो. या सर्व राज्यांमध्ये विधानसभेसोबत विधानपरिषदेचेही कामकाज चालते. विधानसभेच्या सदस्यांना इंग्रजीत MLA म्हणतात तसे विधानपरिषदेच्या सदस्यांना MLC (Member of Legislative Council) असे संबोधले जाते. नुकतीच आपली विधानसभेची निवडणूक पार पडली आहे. त्यामुळे तिथले सदस्य कसे निवडले जातात हे सांगण्याची आवश्यकता नाही. परंतु विधानपरिषदेचे सदस्य कसे निवडले जातात याची थोडी कल्पना असणे गरजेचे आहे.
महाराष्ट्र विधानपरिषदेत एकूण 78 सदस्य कार्यरत असतात. त्यापैकी 31 सदस्य विधानसभेतून, 21 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांमधून, 12 सदस्य राज्यपालांच्या नेमणूकीमधून, 7 सदस्य शिक्षक मतदार संघातून आणि 7 सदस्य 'पदवीधर' मतदार संघातून निवडले जातात. विधानपरिषदेच्या सदस्यांच्या निवडी एकाचवेळी होत नाहीत. विधान परिषद हे कायम सभागृह असते. त्यातील सदस्यांचा सहा वर्षाचा कार्यकाळ असतो आणि दर दोन वर्षानी एक तृतीयांश सभासद निवृत्त होत असतात व तितकेच नवीन नेमले जातात. आपल्या महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत. त्यात सात पदवीधर मतदारसंघ मुंबई, पुणे, कोकण, औरंगाबाद, नागपुर, नाशिक आणि अमरावती याप्रमाणे विभागले गेले आहेत.
आता येणाऱ्या जुलै 2020 मध्ये पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका आहेत. पण मी त्याबद्दल आजच का सांगतोय? कारण या निवडणुकीसाठी मतदार म्हणून नाव नोंदणी करण्याची शेवटची तारीख आहे 6नोव्हेंबर 2019. म्हणजे आपल्या हातात आता फक्त 4 दिवस शिल्लक आहेत. महत्वाचं म्हणजे पूर्वी नाव नोंदणी केली असली तर आता जुनी यादी रद्द करण्यात आलेली आहे. यावेळी जे नाव नोंदवतील त्यांनाच मतदानाचा अधिकार असेल.
लक्षात घ्या, सामान्य नागरिक म्हणून आपली जशी कर्तव्ये आणि अधिकार असतात तसेच अधिकार पदवीधर म्हणूनही असतात. ग्रॅज्युएट झाल्यावर घटनेने आपल्याला आपला प्रतिनिधी निवडायची संधी दिली असते. हा आपण निवडलेला प्रतिनिधी आपल्या समस्या सभागृहात मांडतो आणि त्याचा पाठपुरावा करतो. जर तो तसे करत नसेल तर त्याला जाब विचारण्याचा अधिकारही आपल्याला आहे. आपण अपेक्षेप्रमाणे कामे झाली नाही तर आमदाराला जाब विचारतोच ना? मग निवडून गेलेला पदवीधर प्रतिनिधी नेमकं काय करतोय हे ही जाणून घ्यायला हवंच की.
*● पदवीधर मतदार नोंदणीकरिता पात्रता:*
१. तो भारताचा नागरीक असावा.
२. तो मतदार नोंदणीकरिता अर्हता दिनांकाच्या किमान ३ वर्षापूर्वी, मान्यताप्राप्त विद्यापीठाचा किंवा तत्सम विद्यापिठाचा पदवीधर असावा.
३. सर्वसाधारणपणे संबंधित मतदारसंघातील रहिवासी असावा
४. त्याने विहित कागदपत्रांसह फॉर्म क्र. १८ भरावा.
५. पदविका (Diploma) जर पदवीतूल्य असेल तरच पदवीधर गृहित धरण्यात येईल.
*● पदवीधर मतदार नोंदणीकरिता आवश्यक इतर कागदपत्रे:*
१. रहिवासाचा पुरावा. (पासपोर्ट, वाहन अनुज्ञप्ती, टेलीफोन/विज बिल किंवा इतर मान्यताप्राप्त कागदपत्रांची साक्षांकित प्रत.)
२. मार्क लिस्टची साक्षांकित प्रत.
३. पदवी/पदविकेची साक्षांकित प्रत.
४. विवाहित महिलेने विवाहानंतर नाव बदलले असल्यास त्याबाबतचे राजपत्र, पॅन कार्ड, राजपत्र नसल्यास प्रतिज्ञापत्र.
५. प्रमाणपत्रांचे साक्षांकन संबंधित जिल्ह्यात कार्यरत तहसीलदार किंवा गट विकास अधिकारी, किंवा शासन मान्यता प्राप्त विद्यालयाचे प्राचार्य किंवा जिल्ह्यातील अन्य राजपत्रित अधिकार्यांकडून करून घ्यावे.
६. ही कागदपत्रे आपण तहसीलदार कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय येथे जमा करू शकता.
*● मतदान पद्धत*
- पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी मतदान हे मतपत्रिकेवर होते.
- मतपत्रिकेवर नमुद उमेदवार क्रमांकानुसार, उमेदवारांना पसंती क्रमांक द्यायचा असतो.
- सर्वात पहिली पसंती असणा-या उमेदवारासमोर मराठी, इंग्रजी किंवा रोमन यापैकी एका भाषेतील आकडय़ांमध्ये अंक लिहिता येतो.
- पसंती क्रमांक लिहिताना तो एका भाषेतील आकडय़ांमध्येच लिहावा. उदाहरणार्थ (१, २, ३ असे मराठीत किंवा 1, 2, 3 असे इंग्रजीत पसंतीनुसार आकडे लिहिता येतील).
- मतपत्रिकेवर पसंती क्रमांक सोडून दुस-या कसल्याही खाणाखुणा करू नयेत.
- मतपत्रिकेवर पसंती क्रमांक लिहिताना स्वत:चा पेन किंवा पेन्सिल वापरण्यास परवानगी नाही. जांभळ्या रंगाच्यास्केच पेन मतदान केंद्रावर मतदारांना दिला जातो, त्याचाच वापर मतदानासाठी करण्यात यावा. अन्यथा मत बाद ठरेल.
-"वरीलपैकी कोणी पर्याय नाही" (नोटा) हा पर्याय मतपत्रिकेवर उपलब्ध असतो.
- 'नोटा' किंवा पसंती क्रमाने मत देता येते. यापैकी एकच पर्याय मतदारांनी वापरावा....
☺
🤔 *कस असेल शेड्युल* :
▪ 6 नोव्हेंबर पर्यंत मतदारनोंदणी केल्यानंतर 19 नोव्हेंबरला प्रारूप मतदार यादी जाहीर केली जाईल.
▪ तीन ते नऊ डिसेंबर या कालावधीत त्यावर हरकती सुचना स्विकारल्या जातील व त्यावर 26 डिसेंबरला सुनावणी होणार आहे.
▪ त्यांतर 30 डिसेंबरला पदवीधर व शिक्षक या दोन्ही मतदारसंघाची अंतिम मतदार यादी जाहीर केली जाईल. या दोन्ही जागांसाठी जुलै महिन्यात निवडणुका होणार आहेत.
📍 त्यामुळे 6 नोव्हेंबर पर्यंत ज्यांना मतदारनोंदणी करता आलेली नाही, त्यांना जानेवारी ते जुलै महिन्यात उमेदवारी अर्ज भरण्याच्या 10 दिवस आधी पर्यंत नवीन मतदारनोंदणी करता येणे शक्य आहे.
✍🏻 *हे करू शकणार मतदारनोंदणी* :
▪ पदवीधर विधान परिषद मतदारसंघाचे मतदार बनण्यासाठी 1 नोव्हेंबर 2016 पूर्वी पदवीधर असणे आवश्यक आहे. पदविधर साठी फॉर्म क्रमांक 18 भरणे आवश्यक आहे.
▪ शिक्षक मतदारसंघासाठी 1 नोव्हेंबर 2013 ते 1 नोव्हेंबर 2019 या कालावधीत कोणत्याही संस्थेत किमान तीन वर्ष शिक्षकाची नोकरी केलेली असणे अनिवार्य आहे. यासाठी फॉर्म क्रमांक 19 भरावा लागतो.
या निवडणुकीच्या मतदार नोंदणीचा तपशील https://ceo.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. पदवीधर मतदारसंघामध्ये मतदार म्हणून नाव नोंदण्यासाठीचा अर्ज क्र. १८ सोबत दिलेल्या दुव्यावर उपलब्ध आहे. https://ceo.maharashtra.gov.in/Downloads/pdf/Form18_Marathi_English.pdf सध्या मुंबई शहरात राहणारा, तीन वर्षे आधी पदवी मिळालेला कोणीही पदवीधर मतदार म्हणून पात्र आहे. आपल्याला मिळालेली पदवी, पदविका या पात्रतेत बसते की नाही हे ज्या मतदारांना तपासून पाहायचे असेल त्यांनी https://ceo.maharashtra.gov.in/Downloads/PDF/Instruction_Graduate_2017oct.pdf या दुव्यावर जाऊन तिथे दिलेल्या पदव्यांच्या यादीमधून खातरजमा करून घ्यायची आहे. बरेचदा पदवीधर मंडळी मतदार नोंदणीसाठी आणि त्यातही विशेषतः अर्ज भरण्यासाठी आळस करतात. विधानसभा आणि पदवीधर मतदारसंघाची तुलनात्मक आकडेवारी पाहिली तर हा फरक आपल्याला प्रकर्षाने लक्षात येईल.
मुंबईतल्या ३६ विधानसभा मतदारसंघांमध्ये विजेत्या उमेदवाराला सरासरी ५० ते ८० हजार मतं मिळतात. म्हणजे सर्व विजेच्या मतदारांच्या मतांची बेरीज पंचवीस लाखांहून अधिक होते. मात्र संबंध मुंबईभर पसरलेल्या पदवीधरांच्या मतदारसंघामध्ये २०१२ च्या निवडणूकीमध्ये विजेत्या उमेदवाराला १५ हजारांहून कमी मतं मिळाली होती. याचा अर्थ शिकलेला वर्ग या मतदान प्रक्रियेपासून अज्ञान किंवा उदासीनतेमुळे कमालीचा दूर आहे.
मतदार यादी तयार करण्यासाठी निवडणूक आयोगाने कालमर्यादा घालून दिलेली असली तरी प्रत्यक्षात संघटीत राजकीय पक्षांकडून होणारी नोंदणी वगळता स्वतंत्रपणे केली जाणारी नोंदणी फारच किरकोळ असते. इतर निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीने मतदार जागृतीचे कार्यक्रम सातत्याने हाती घेतले जातात तसे या निवडणुकीच्या बाबतीत घडत नाही. अनेक पदवीधरांकडे त्यांची प्रमाणपत्रं नीट ठेवलेली नसतात, किंवा या मतदानाचा अर्ज भरावा यासाठी ती शोधणं त्यांना महत्त्वाचं वाटत नाही. त्याचाही परिणाम मतदार नोंदणीवर होतो. एक लक्षात घ्यायची गोष्ट म्हणजे ही निवडणूक मतदान यंत्रावर होत नाही, तर मतपत्रिकेवर होते. मतपत्रिकेवर असलेल्या उमेदवारांच्या नावापुढे १, २, ३ असा पसंती क्रम देऊन मतदान करायचे असते.
घटनाकारांनी समाजातल्या शिक्षित वर्गाचं प्रतिनिधित्व संसदीय व्यासपीठावर व्हावं यासाठी विचारपूर्वक या मतदारसंघाची रचना केली आहे. मात्र गेली काही वर्षे आपल्या कार्यकर्त्यांची सोय लावण्याच्या प्रयत्नांत असलेल्या राजकीय पक्षांनी विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त प्रतिनिधींच्या जागांप्रमाणेच पदवीधर मतदारसंघही बळकावून टाकले आहेत. त्यामुळे शिकलेल्या तरुणांचे नोकरी, रोजगार धंद्याचे प्रश्न, मातृभाषेतून उच्च शिक्षण घेणाऱ्या तरुणांसमोर उभी राहणारी आव्हानं आणि जागतिकीकरणानंतर शिक्षितांपुढे निर्माण झालेले प्रश्न यांसारख्या कळीच्या प्रश्नांची चर्चाच विधिमंडळात होत नाही. पदवीधर मतदारसंघातनं होणाऱ्या प्रतिनिधित्वाची अशा रीतीनं झालेली कोंडी फुटायला हवी. शिक्षित, पदवीधर मतदार लोकशाही प्रक्रियेबद्दल सजग आणि सक्रिय होणं महत्त्वाचं आहे. मतदार जागरुक झाला तरच लोकशाही व्यवस्था पारदर्शक आणि सक्षम होऊ शकेल.
हे ही वाचा
उत्तर -> 🤔 *एका ईव्हीएम मशीनची किंमत किती ? जाणून घ्या माहित नसलेल्या ...
https://www.uttar.co/answer/5c8a522187f8323f7a910bd5
उत्तर -> *_🤔एक्झिट पोल म्हणजे काय ?_*
https://www.uttar.co/answer/5cdfceadf7a70769a7b646c3
उत्तर -> *🤔जाणून घ्या, मतदानादरम्यान बोटाला लावण्यात येणाऱ्या शाईचा इतिहास*
https://www.uttar.co/answer/5c8538d8a8e7a3ef0ded0a04
उत्तर -> *_🤔NOTA : ‘नोटा’ म्हणजे काय, मतदानावेळी का वापरला जातो हा पर्याय?_* ...
https://www.uttar.co/answer/5c9b7e51331bcef689564017
उत्तर -> *_🙆♂भावी मुख्यमंत्री जे एका मताने पडले...आणि हो त्यांच्या बायकोने मतदान नाही केलं ...
https://www.uttar.co/answer/5ce80694f7a7077fefb68e81
उत्तर -> *⚡आता मतदान ओळखपत्र नसेल तरी करता येणार मतदान* 💫
https://www.uttar.co/answer/5c9cc444331bce3ded56550b
उत्तर -> 📢 *आता 'विधानपरिषद' , चला माहिती जाणून घेऊ ?*
https://www.uttar.co/answer/5de0ce250bb03741eedc9442
1
Answer link
मतदार नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे
1. बोनाफाईट किंवा शाळा सोडलेला दाखला किंवा जन्माचा दाखला.
2. रेशन कार्ड.
3. आईचे किंवा वडिलांचे मतदान ओळखपत्र.
4. तुमचे आधारकार्ड.
सर्व कागदपत्रे साक्षांकित केलेले.
1. बोनाफाईट किंवा शाळा सोडलेला दाखला किंवा जन्माचा दाखला.
2. रेशन कार्ड.
3. आईचे किंवा वडिलांचे मतदान ओळखपत्र.
4. तुमचे आधारकार्ड.
सर्व कागदपत्रे साक्षांकित केलेले.
0
Answer link
निवडणूक आणि मतदार नोंदणीबद्दल माहिती खालीलप्रमाणे:
निवडणूक-मतदान विशेष: मतदार ओळखपत्र नोंदणी
मतदार ओळखपत्र (Voter ID) हे एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. हे केवळ मतदानासाठीच नाही, तर ओळखपत्र म्हणूनही वापरले जाते.
मतदार नोंदणी:
- नवीन मतदार नोंदणी करण्यासाठी, तुम्हाला निवडणूक आयोगाच्या (Election Commission of India) वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
- तुम्ही तुमच्या এলাকার निवडणूक कार्यालयात जाऊन ऑफलाइन अर्ज देखील भरू शकता.
- १८ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचा कोणताही भारतीय नागरिक मतदार म्हणून नोंदणी करू शकतो.
मतदार नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे:
- ओळखीचा पुरावा (Proof of Identity): आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड इ.
- पत्त्याचा पुरावा (Proof of Address): आधार कार्ड,Utility Bill (उदा. वीज बिल, पाणी बिल), रेशन कार्ड, बँक स्टेटमेंट इ.
- जन्म दाखला किंवा वयाचा पुरावा (Date of Birth Proof): जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, इ.
- नवीन पासपोर्ट साईझ फोटो
पदवीधर मतदार (Graduate Voter) माहिती:
पदवीधर मतदारसंघासाठी (Graduate Constituency) मतदान करण्यासाठी, तुमच्याकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे.
- पदवीधर मतदार नोंदणी प्रक्रिया नियमित मतदार नोंदणीपेक्षा वेगळी असते.
- या निवडणुकीत मतदान करण्यासाठी पदवीधर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही विशिष्ट नियम व अटी पूर्ण कराव्या लागतात.
- पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरताना पदवी प्रमाणपत्र (Degree Certificate) सादर करणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी:
- निवडणूक आयोग (Election Commission of India): eci.gov.in