7
Answer link
*🤔जाणून घ्या, मतदानादरम्यान बोटाला लावण्यात येणाऱ्या शाईचा इतिहास*
💁♂देशात पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली तेव्हा मुख्य निवडणूक आयुक्त आणि अधिकाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं होतं. बनावट मतदानाचे प्रमाण जास्त होते. त्यामुळेच निवडणूक आयोगाने बोटावर लावण्यात येणारी शाई शोधली. या शाईबाबत काही गोष्टी जाणून घेऊया.
🔸निवडणूकीत वापरण्यात येणाऱ्या शाईमागचे श्रेय देशाचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांचे आहे. सुरुवातीच्या काही निवडणुकांमध्ये शाई नाही तर डायचा वापर करण्यात आला होता. त्यानंतर शाईचा शोध लावला आणि त्याचा वापर केवळ निवडणुकांमध्ये होऊ लागला.
🔸कागदावर लिहिण्यासाठी शाईचा वापर केला जातो. मात्र निवडणुकांमध्ये वापरण्यात येणारी शाई ही वेगळी असते. यामध्ये सिल्वर नायट्रेट असते. त्यामुळेच ती शाई जेव्हा बोटावर लावली जाते. तेव्हा त्वचेवर असलेल्या सॉल्टसोबत प्रक्रिया होऊन ती गडद होते.
🔸1962 मध्ये पहिल्यांदा या खास शाईचा वापर करण्यात आला. त्यानंतर ही शाई प्रत्येक निवडणुकीचा महत्त्वाचा भाग झाली. शाईचा डाग 15 दिवसांत पुसट होतो पण तो पूर्णपणे निघून जाण्यास तीन महिने लागतात.
🔸निवडणुकीची ही खास शाई जगातील अनेक देशांमध्ये वापरली जाते. भारताप्रमाणे जवळपास सर्वच देशांत ही जांभळ्या रंगाची शाई वापरली जाते. सुरीनाममध्ये एकदा नारंगी रंगाच्या शाईचा वापर करण्यात आला होता. पण त्यानंतर कधीच तशा शाईचा वापर करण्यात आला नाही.
🔸भारतात ही शाई एकाच ठिकाणी तयार होते. Mysore Paints & Varnish Ltd (MVPL) या कंपनीत तयार होणारी शाई भारतीय निवडणूक आयोगाशिवाय इतर देशांकडूनही खरेदी केली जाते. यात कॅनडा, कंबोडिया, मालदीव, नेपाळ, दक्षिण आफ्रिका आणि तुर्की या देशांचा समावेश आहे. मात्र, कोणत्याही बाजारात ही शाई विकत मिळत नाही.
🤔 _*मतदारांची शाई’ कुठून येते?*_
_फसवणूक, बहुमतदान आणि गैरव्यवहार आदी गोष्टी टाळण्यासाठी मतदान करताना मतदारांच्या बोटावर शाई लावली जाते. या शाईला मतदारांची शाई असे म्हटले जाते, त्या शाईने विशिष्ट खूण केली जाते._
_ही सर्वसाधारण शाई नसते, एकदा का ती बोटावर लावली की काही महिने ती पुसली जात नाही. भारतात कर्नाटक सरकारच्या अखत्यारीतील म्हैसूर पेंटसड् वर्निश लिमिटेड (एमपीव्हीएल) यांना या शाईचे श्रेय जाते._
_भारताबरोबरच विविध देशांना एमपीव्हीएलकडून या शाईचा पुरवठा केला जातो. गुणवत्तापूर्ण पक्क्या शाईचे उत्पादन आणि पुरवठा करण्यामध्ये एमपीव्हीएलची विशेषता आहे. यासाठी एमपीव्हीएलला भारतीय निवडणूक आयोग, राष्ट्रीय पदार्थ विज्ञान, प्रयोगशाळा आणि राष्ट्रीय संशोधन विकास महामंडळ यांचे सहकार्य लाभत आहे. अशा प्रकारच्या विश्वासार्ह पक्क्या शाईचे एमपीव्हीएल हे एकमेव अधिकृत पुरवठादार आहेत._
_नवी दिल्लीतील राष्ट्रीय संशोधन विकास महामंडळाकडून त्यांना 1962 पासून यासाठी विशेष परवाना मंजूर करण्यात आला आहे. भारतातील निवडणुकांव्यतिरिक्त म्हैसूर पेन्टसड् वर्निश लिमिटेड 1976 पासून 28 देशांना या पक्क्या शाईचा पुरवठा करत आहे._
*_🤔म्हणून मतदानानंतर लावलेली शाई पुसली जात नाही_*
_प्रत्येक पाच वर्षांतून एकदा येणाऱ्या निवडणुका एखाद्या उत्सवाप्रमाणे असतात. या उत्सवात उतरणारा प्रत्येक राजकीय पक्ष मतदात्यांना खुश करण्यासाठी विविध घोषणांचा पाऊस पाडतो. मग आपणही कोणत्या उमेदवाराला मतदान करायचे यावर चर्चा करु लागतो. पाहता पाहता मतदानाचा दिवस उजाडतो आणि मतदाता मतदान केंद्रावर पोहोचतो. तेथे मतदान करण्यापूर्वी आपल्या बोटावर निळ्या रंगाची शाई लावली जाते. चला तर मग जाणून घेऊयात या निळ्या शाईच्या गमतीशीर इतिहासाबद्दल.._
*_🙆♂एकाच निवडणुकीत दोनदा मतदान_*
१९५१- ५२ साली आपल्या देशात पहिली निवडणूक घेण्यात आली होती. त्यावेळी बोटाला निळ्या रंगाची शाई लावण्याचा नियम नव्हता. त्यामुळे अनेक मतदारांनी आपल्या आवडत्या उमेदवाराला जिंकवण्यासाठी दोन वेळा मतदान केल्याचे निवडणूक आयोगाच्या लक्षात आले. नियमाप्रमाणे एका उमेदवाराला एका मतदात्याने एकदाच मतदान करणे गरजेचे आहे. तरच या संपूर्ण निवडणूक प्रकल्पाला निष्पक्ष प्रक्रिया म्हणता येईल. परंतु पहिल्याच निवडणुकीत झालेल्या गोंधळामुळे अनेकांनी निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केली होती.
*_💁‘अमिट शाई’_*
त्याच दरम्यान ‘मैसूर पेंट्स अँड वार्निश लिमिटेड’ या कंपनीने एका रासायनिक पदार्थाचा शोध लावला होता. हा पदार्थ पाण्याने किंवा कुठल्याही प्रकारच्या रासायनिक पदार्थाच्या मदतीने मिटवता येत नव्हता. निवडणूक आयोगाने या पदार्थाची संपूर्ण माहिती घेऊन याचा वापर निवडणूक प्रक्रियेसाठी करण्याचा निर्णय घेतला. या पदार्थाला ‘अमिट शाई’ असे नाव देण्यात आले. मतदान करण्यापूर्वी प्रत्येक व्यक्तिच्या बोटावर ही निळी शाई लावली जाते.
*_🧐बनविण्याची प्रक्रिया अजूनही गुप्त_*
ही शाई एकदा आपल्या बोटाला चिकटली की पुढील काही दिवस त्याला मिटवता येत नाही. त्यामुळे एखादा व्यक्ती जर दुसऱ्यांदा मतदान करण्यास आला तर त्याला पकडता येते. या शाईमुळे आपली निवडणूक प्रक्रिया अधिक सुलभ झाली.अनेक संशोधकांनी या शाईत वापरण्यात येणाऱ्या पदार्थांचा शोध लावण्याचा प्रयत्न केला. परंतु ‘मैसूर पेंट्स अँड वार्निश लिमिटेड’ या कंपनीने निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष होण्यासाठी ही शाई बनवण्याची प्रक्रिया गुप्त ठेवली आहे.
*_📍आज जगातील तुर्कस्तान, नायजेरिया, अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका, नेपाळ, घाना असे तब्बल २८ देश या अमिट शाईचा आपल्या निवडणुकीत वापर करतात._*
___________________________________
*🧐 ‘बोटावरील मतदानाची शाई काढायची कशी?’; गुगल सर्च करण्याचे भारतातील प्रमाण वाढले*
▪गुगल ट्रेण्डसवरील माहितीनुसार ९ एप्रिलपासूनच ‘How to remove vote ink’ या टर्मच्या सर्चचे प्रमाण वाढले
▪आज सकाळी दहा वाजल्यापासूनच भारतीयांनी मोठ्या प्रमाणात ‘How to remove vote ink’ सर्च करण्यास सरुवात केली.
👉 सकाळी दहा ते बारा या दोन तासांमध्ये मोठ्याप्रमाणात यासंदर्भातील गुगल सर्च झाले
_📍आंध्रप्रदेश, तेलंगण, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांमध्ये शाई काढण्यासंदर्भात गुगल सर्च करणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे._
__________________¢_________________
🤔 *मतदानाची शाई कुठं बनवली जाते? शाई पुसता येते का?*
आज देशभरात मतदानाचा दुसरा टप्पा आहे. मतदान करताना आपलं मत किती सुरक्षित आहे? मतदानाची शाई कुठं बनवली जाते? मतदानाची शाई पुसता येते का? असे अनेक प्रश्न आपल्याला पडत असतात म्हणून आज त्याबाबत जाणून घेऊया...
🧐 *मतदानाची शाई कुठं बनवली जाते?* :
▪ मतदानाची विशेष शाई शोधण्याचं सगळं श्रेय भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांना जाते.
▪ ही शाई दक्षिण भारतातल्या म्हैसूर पेंट अँड वार्निश लिमिटेड (MVPL) या कंपनीत तयार केली जाते.
▪ 1937साली या कंपनीची स्थापना झाली. म्हैसूर प्रांताचे त्यावेळचे महाराज नलवाडी कृष्णराजा वाडियार यांनी या कंपनीची सुरुवात केली होती.
▪ ही शाई घाऊक बाजारात विकत नाही. MVPLद्वारे सरकार आणि निवडणुकीत सहभागी झालेल्या संस्थांनाच ही शाई विकली जाते.
▪ निवडणुकीतल्या शाईसाठी ही कंपनी प्रसिद्ध आहे. 1962पासून या शाईचा वापर केला जात आहे.
❓ *मतदानाची शाई पुसता येते का?* :
▪ मतदानाची शाई पुसता येत नाही. कारण या शाईत सिल्व्हर नायट्रेट या रसायनाचा वापर केला जातो.
▪ ही शाई 40 सेकंदाच्या आत सुकून जाते. त्याची प्रक्रिया इतकी जलद होते की, एका सेकंदात त्याची छाप सोडून जाते. यामुळे ही शाई बोटावरून काढता येत नाही.
▪ कमीत-कमी 72 तासापर्यंत ही शाई पुसली जात नाही.
▪ सिल्व्हर नायट्रेटचा पाण्याशी संपर्कात आला की, त्याचा रंग काळा होतो आणि तो पुसला जात नाही. तसेच त्याचा संपर्क हा आपल्या शरिरातल्या क्षाराशी आल्यावर त्याचे सिल्वर क्लोराइडमध्ये रुपांतर होते.
▪ सिल्वर क्लोराइड पाण्यात विरघळत नाही. ते बोटाला चिटकून राहतं. बोटाच्या पेशी जशा जुन्या होत जातात तसं-तसं ही शाई निघू लागते.
_*मतदानाची शाई का पुसता येत नाही?*_
_जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीच्या महोत्सवाला सुरुवात झाली आहे. या दरम्यान, मतदान करताना एक प्रश्न सतत आपल्याला येतो. तो म्हणजे आपलं मत किती सुरक्षित आहे? आपल्या नावे दुसरं कुणी मत देणार नाही ना? ही भीती दूर करण्यासाठी मत देताना निवडणूक अधिकारी आपल्या बोटाला निळी शाई लावतात._
_मत दिल्यानंतर अनेकजण शाई लावलेल्या बोटासहित सेल्फी फोटो काढून सोशल मीडियावर टाकत असतात. तर काहीजणांना मत दिल्यावर ही शाई कशी काढता येईल? याविषयीही कुतुहल निर्माण होतं. म्हणून आज जाणून घेऊया मतदानाची शाई का पुसता येत नाही..._
_मतदानाच्या शाईत सिल्व्हर नायट्रेट या रसायनाचा वापर केला जातो. त्यामुळे ही शाई कमीत कमी 72 तासापर्यंत पुसली जात नाही. सिल्व्हर नायट्रेटचा पाण्याशी संपर्कात आला की त्याचा रंग काळा होतो आणि तो पुसला जात नाही. तसेच त्याचा संपर्क हा आपल्या शरिरातल्या क्षाराशी आल्यावर त्याचे सिल्वर क्लोराइडमध्ये रुपांतर होते._
_सिल्वर क्लोराइड पाण्यात विरघळत नाही. ते बोटाला चिटकून राहते. ते साबणानंही निघत नाही. बोटाच्या पेशी जशा जुन्या होत जातात तसं तसं ही शाई निघू लागते. ही शाई 40 सेकंदाच्या आत सुकून जाते. त्याची प्रक्रिया इतकी जलद होते की एका सेकंदात त्याची छाप सोडून जाते. याच कारणांमुळं ही शाई बोटावरून काढता येत नाही._
ही बातमी वाचा
https://www.bobhata.com/lifestyle/voting-ink-helps-mumbai-police-solve-murder-case-3025