2
*_🙆‍♂भावी मुख्यमंत्री जे एका मताने पडले...आणि हो त्यांच्या बायकोने मतदान केलं नव्हतं!_*

_‘एक चुटकी सिंदूर की किमत’ रमेश बाबूंना समजली की नाही ते माहित नाही पण ‘एक व्होट की किमत’ ज्यांना चांगलीच समजली असणार असे ३ नेते भारताच्या राजकीय इतिहासात सापडतात.पहिले आणि सगळ्यात फेमस म्हणजे दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी. वाजपेयींच्या १ मताने पडलेल्या सरकारचा किस्सा तर आपल्या सगळ्यांनाच माहितेय. पण अजून २ माणसं अशी आहेत की ज्यांना केवळ १ मतामुळे विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला होता_

*_📣पहिला किस्सा २००८ सालचा._*
राजस्थानच्या विधानसभा निवडणुकांमधला.
सी.पी. जोशी हे राजस्थान प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होते. राजसमंद जिल्ह्यातील नाथद्वारा विधानसभा मतदारसंघातून ते काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवत होते. विरोधात होते भाजपचे कल्याण सिंह चौहान.सी.पी. जोशी हे संभाव्य विजेते मानले जात होते. प्रचाराची रणधुमाळी पार पडली. निवडणुकांचा निकाल लागला. त्यात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. पण नाथद्वाराचा जो निकाल आला त्याने जोशींना धक्काच बसला. अतिशय काट्याच्या लढतीत भाजपच्या कल्याण सिंह चौहान यांच्याकडून सी.पी. जोशी यांचा अवघ्या १ मताने पराभव झाला होता.या अनपेक्षित निकालाने एकच गोंधळ उडाला. जोशी यांच्याकडून पुन्हा मतमोजणी करण्याची मागणी करण्यात आली. त्यांच्या मागणीवरून निवडणूक आयोगाने २ वेळा फेरमतमोजणी केली. पण दोन्हीही वेळा निकाल कायम राहिला.

*_📍त्यानंतर काही दिवसांनी एक बाब अशी समोर आली की या निवडणुकीत सी.पी. जोशी यांच्या बायको आणि ड्रायव्हरने मतदानच केलं नव्हतं._*

*_📣दुसरा किस्सा आहे २००४ सालच्या कर्नाटक विधानसभा निवडणुकांमधला._*
कर्नाटकातील संथेमराहल्ली विधानसभा मतदारसंघ. जनता दल सेक्युलरचे ए.आर. कृष्णमूर्ती आणि काँग्रेसचे आर. ध्रुवनारायण यांच्यादरम्यान थेट लढत होती. या निवडणुकीचा ज्यावेळी निकाल हाती आला त्यावेळी ए.आर. कृष्णमूर्ती हे केवळ १ मताने पराभूत झाले होते.२००४ साली १ मताने विधानसभा निवडणुकीत पराभूत होणारे ते देशातील पहिलेच नेते ठरले होते.

*_📍विशेष म्हणजे त्यांनी मतदान करायला निघालेल्या आपल्या ड्रायव्हरला त्यापासून थांबवलं होतं._*

खालील बातमी वाचा
घरात 9 सदस्य तर मतं पडली 5
https://m.maharashtratimes.com/india-news/man-with-nine-people-in-family-breaks-down-saying-i-got-only-5-votes/amp_articleshow/69477238.cms



*मतदान नक्की कराच*...कारण
1776 ला अमेरिकेमधे केवळ एक मत जास्त मिळाल्याने जर्मनभाषेऐवजी इंग्रजी भाषा राष्ट्रभाषा बनली.
*मतदान नक्की कराच्* ...कारण
इस 2008 मधे राजस्थानच्या नाथद्वारा सीटवर श्री सी. पी. जोशी फक्त एका मताने हारले आणि गंमत म्हणजे वेळेअभावी त्यांचा ड्रायव्हरच मतदान करु शकला नव्हता.
*मतदान नक्की करा*... कारण
1923 ला फक्त एक मत जास्तं मिळाल्यामुळे हिटलर नाझी पार्टीचा प्रमुख झाला आणि  हिटलर युगाची सुरुवात झाली.
*मतदान अवश्य करा*...कारण
1875 ला फ्रांस मधे केवळ एका मताने राजेशाही जाऊन लोकशाही प्रस्थापित झाली.
*मतदान अवश्य करा*...कारण
1917 ला सरदार पटेल अहमदाबाद
महानगरपालिकेची निवडणुक केवळ एका मताने हरले होते.
*मतदान अवश्य अवश्य करा*...कारण
1998 ला वाजपेयी सरकार फक्त एका मताने पडलं होत.
आता ,
*मत कोणाला द्यायचं ते आपल्या अंतरआत्म्याला विचारा.  देश्याच्या भवितव्या करीता , आपल्या मुलांच्या भवितव्याकरीता,कोणाला मतदान करणे गरजेचे आहे हे‌ ठरवा!मनात ठाम निश्चय करून 100% मतदान करा*
Pls do vote its ur right and responsibility 🙏🙏🙏
उत्तर लिहिले · 24/5/2019
कर्म · 569265