4

🤔 *एका ईव्हीएम मशीनची किंमत किती ? जाणून घ्या माहित नसलेल्या गोष्टी*
💁‍♂ _*ईव्हीएम मशीनबद्दल जाणून घ्या सर्व काही...*_

_यंदाच्या विधानसभा निवडणूक प्रक्रियेत आणखी पारदर्शकता आणण्यासाठी ईव्हीएम मशीनला आणखी अपग्रेड करण्यात आले आहे. आज या ईव्हीएम मशीनबद्दल सर्व काही जाणून घेऊया..._

_1._ _*ईव्हीएम काय आहे?*_ : _इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन पाच-मीटर केबलने जोडलेली 2 युनिट एक कंट्रोल युनिट आणि एक बॅलेटिंग युनिटपासून बनलेली असते. कंट्रोल युनिट मतदान अधिकाऱ्यांकडे असते. बॅलेटिंग युनिट वोटिंग कम्पार्टमेंटमध्ये ती ठेवली जाते. ईव्हीएम 6 वोल्टच्या एका बॅटरीवर चालते. जेथे वीज नाही अशा ठिकाणी देखील ईव्हीएम मशीनचा वापर केला जाऊ शकतो._

_2._ _*ईव्हीएम कशी बनली?*_ : _अनेक बैठका, परीक्षण आणि अनेक वेळा ट्रायल घेतल्यानंतर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन बनली. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, बंगळुरु आणि इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, हैदराबाद यांच्या सहयोगाने निवडणूक आयोगाकडे सोपवली._

_3._ _*सुरुवात कधी झाली?*_ : _भारतात पहिल्यांदा नोव्हेंबर 1998 मध्ये 16 व्या विधानसभेच्या निवडणुकीत ईव्हीएमचा वापर करण्यात आला होता. मध्य प्रदेशमध्ये 5, राजस्थानमध्ये 5, दिल्लीमध्ये 6 जागांवर पहिल्यांदा ईव्हीएमने मतदान झाले होते._

_4._ _*एक ईव्हीएम किती मतदारांसाठी?*_ : _ईव्हीएममध्ये जास्तीत जास्त 3840 मतं नोंदवले जावू शकतात. एका मतदान केंद्रावर १५०० मतदारचं मतदान करतात. त्याच्या आधारावर ईव्हीएम मशीनची संख्या ठरवली जाते._

_5._ _*उमेदवारांची संख्या?*_ : _एका ईव्हीएममध्ये 64 उमेदवारांची नावं ठेवली जाऊ शकतात. वोटींग मशीनमध्ये मात्र 16 उमेदवारांचीच यादी असते. 16 पेक्षा अधिक उमेदवार असल्यास वोटिंग मशीनची संख्या वाढते. पण जर उमेदवारांची संख्या 64 पेक्षा अधिक असेल तर तेथे बॅलेट पेपरने मतदान घेतले जाते._

_6._ _*किंमत किती?*_ : _निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, 1989-90 मध्ये जेव्हा ईव्हीएम मशीन खरेदी करण्यात आल्या तेव्हा एका मशीनची किंमत ही 5,500 रुपये होती. विशेष म्हणजे ईव्हीएम मशीनचा खर्च बॅलेट पेपरच्या खर्चापेक्षा कमी आहे._

_7._ _*यंदा नवीन काय?*_ : _यंदा ईव्हीएमवर सगळ्या उमेदवारांचे नाव, फोटो आणि निवडणूक चिन्ह तर असणारच आहे. पण यासोबतच सगळ्या ईव्हीएमसोबत वेरिफाएबल पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपॅट) मशीन देखील असणार आहे._

_ज्यामध्ये तुम्ही मत दिल्यानंतर तुम्हाला एक पावती मिळेल. ज्यामध्ये तुम्ही कोणाला मतदान केलं त्याची माहिती तुम्हाला मिळेल. मतदानानंतर ईव्हीएम मशीन घेऊन जाणाऱ्या गाड्यांमध्ये जीपीएस सिस्टम असणार आहे._
▪ 1989-90 मध्ये जेव्हा ईव्हीएम मशीन खरेदी करण्यात आल्या तेव्हा एका मशीनची किंमत ही 5500 रुपये होती. ईव्हीएम मशीनचा खर्च बॅलेट पेपरच्या खर्चापेक्षा कमी आहे.

▪ अनेक ट्रायल घेतल्यानंतर हि मशीन भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, बंगळुरु आणि इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, हैदराबाद यांच्या सहयोगाने निवडणूक आयोगाकडे सोपवली.

▪ ईव्हीएम 6 वोल्टच्या एका बॅटरीवर चालते. जेथे वीज नाही अशा ठिकाणी देखील ईव्हीएम मशीनचा वापर केला जाऊ शकतो.

▪ ईव्हीएममध्ये जास्तीत जास्त 3840 मतं नोंदवले जावू शकतात. एका मतदान केंद्रावर १५०० मतदारचं मतदान करतात. एका ईव्हीएममध्ये 64 उमेदवारांची नावं ठेवली जाऊ शकतात.

🤔 *एका ईव्हीएम मशीनची किंमत किती ? जाणून घ्या माहित नसलेल्या गोष्टी*

▪ 1989-90 मध्ये जेव्हा ईव्हीएम मशीन खरेदी करण्यात आल्या तेव्हा एका मशीनची किंमत ही 5500 रुपये होती. ईव्हीएम मशीनचा खर्च बॅलेट पेपरच्या खर्चापेक्षा कमी आहे.

▪ अनेक ट्रायल घेतल्यानंतर हि मशीन भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, बंगळुरु आणि इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, हैदराबाद यांच्या सहयोगाने निवडणूक आयोगाकडे सोपवली.

▪ ईव्हीएम 6 वोल्टच्या एका बॅटरीवर चालते. जेथे वीज नाही अशा ठिकाणी देखील ईव्हीएम मशीनचा वापर केला जाऊ शकतो.

▪ ईव्हीएममध्ये जास्तीत जास्त 3840 मतं नोंदवले जावू शकतात. एका मतदान केंद्रावर १५०० मतदारचं मतदान करतात. एका ईव्हीएममध्ये 64 उमेदवारांची नावं ठेवली जाऊ शकतात.
*🤔निवडणुकीनंतर अखेर काय होतं EVMचं? जाणून घ्या...*


⚡ज्या EVMबद्दल विरोधकांकडून नेहमी टीका केली जाते त्याचे निवडणूक झाल्यानंतर होते तरी काय असा प्रश्न अनेकांना पडत असेल.....

▪विधानसभा निवडणुकीसाठी यावेळी निवडणूक आयोगाने 40 लाख EVMचा वापर केला. जेणेकरून 90 कोटी भारतीय मतदार कोणत्याही अडचणीशिवाय मतदान करु शकले. 2019च्या निवडणुकीत 60 कोटी मतदारांनी मतदानाचा हक्का बजावला.

▪मतदान झाल्यानंतर निकाला दिवसापर्यंत EVM कडक सुरक्षेमध्ये स्ट्रॉग रूममध्ये ठेवली जाते. या रूमध्ये EVM अंधारात ठेवली जातात. इतक नव्हे तर EVMच्या जवळपासन कोणतेच इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस ठेवले जात नाही.

▪मतमोजणी झाल्यानंतर कागतोपत्री प्रक्रिया पूर्ण केली जाते. मतमोजणी झाल्यानंतर पुन्हा एकदा EVM स्ट्रॉग रूम मध्ये ठेवले जातात. स्ट्रॉग रूम पुन्हा एकदा सील केली जाते. ही सर्व प्रक्रिया संबंधित मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रतिनिधीसमोर केली जाते. या प्रक्रियेत संबंधित प्रतिनिधीची सही घेतली जाते.

▪निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवाराला 45 दिवसांची मुदत दिली जाते. या काळात कोणत्याही उमेदवाराला मतमोजणी प्रक्रियेवर काही शंका असेल तर तो उमेदवार पुन्हा मतमोजणी करण्यासाठी अर्ज दाखल करु शकतो.

▪या काळात EVMच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय आणि राज्य सुरक्षा दलाची असते. 45 दिवस झाल्यानंतर पुन्हा एकदा EVM सुरक्षेसह स्ट्रॉग रूममधून बाहेर काढले जातात. त्यानंतर आयोगाचे इंजिनिअर EVMची तपासणी करणार.

▪निवडणुकीच्या काळात 20 टक्के EVM राखीव ठेवले जातात. जर काही तांत्रिक बिघाड झाले तर या पर्यायी EVMचा वापर केला जातो. जे EVM खराब होतात ते नष्ट केले जातात.



*🗳 मतदान संपल्यानंतर EVMचं नेमकं काय होतं?*

महाराष्ट्र व हरियाणातील विधानसभा निवडणुका आताच पार पडल्या यानंतर आपल्याला प्रश्न पडतो की नेमकं EVMचं काय होतं? त्याचं संरक्षण कसं केलं जातं, जेणेकरून मतमोजणीपर्यंत कोट्यावधी लोकांची मतं सुरक्षित असतील?

*🗳 मतदान संपल्यानंतर EVMचं नेमकं काय होतं? घ्या जाणून*

या मशीन्सना सुरक्षित ठेवण्यासाठी आणि त्यांच्या संरक्षणासाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर ठरवण्यात आली आहे. त्यामुळे मशीनशी छेडछाड किंवा गैरप्रकार टाळले जातात.
*🗳 मतदानानंतरची प्रक्रिया काय असते?*
शेवटच्या मतदाराने मतदान केल्यानंतर मतदान केंद्राचे प्रमुख किंवा प्रिसायडिंग ऑफिसर तिथे CLOSE हे बटण दाबतात. त्यानंतर कोणतंही मत नोंदवलं जाऊ शकत नाही.
मशीनमध्ये एकूण नोंदवलेल्या मतांचा आकडा तिथे उपस्थित असलेल्या राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना सांगितला जातो. मतमोजणीच्या दिवशी ही माहिती आणि एकूण मतदान जुळवून पाहिलं जातात.
या दोन आकड्यांमध्ये काही फरक असल्यास मतमोजणी करणारे निवडणूक अधिकाऱ्यांच्या ते लक्षात आणून देऊ शकतात.
मतदानानंतर EVMला एका बॉक्समध्ये ठेवून त्यावर शिक्का मारला जातो. तसंच निवडणूक आयोगाने दिलेली विशेष सुरक्षा पट्टी लावली जाते.
निवडणूक अधिकारी आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी त्यावर स्वाक्षरी केली की ते बॉक्स स्ट्राँग रूममध्ये जमा केले जातात.

*🚪 कसं असतं स्ट्राँग रूम?*
सील केलेले EVM ज्या खोलीत ठेवले जातात, त्याला स्ट्राँग रूम म्हटलं जातं. त्याची सुरक्षा व्यवस्था CISF, BSF, ITBP, CRPF सारख्या केंद्रीय निमलष्करी दलांकडे असते.
या खोलींना एकच दरवाजा असतो. बाकीचे कुठलेही इतर दरवाजे किंवा खिडक्या असल्यास ती जागा विटांनी बंद केली जाते. या खोलीची किल्ली स्थानिक जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या ताब्यात असते.
स्ट्राँगरूमचा दरवाजा बंद केल्यावर सील करून अधिकाऱ्यांबरोबर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या स्वाक्षऱ्या होतात. या सर्व प्रक्रियेचं व्हीडिओ चित्रिकरण केलं जातं.
सर्व अभ्यागतांची नोंदणी केली जाते आणि ती नोंद केंद्रीय सुरक्षा दलाच्या ताब्यात असते.
या खोलीत सतत वीजपुरवठा व्हावा, यासाठी पर्यायी व्यवस्थाही केली जाते आणि इमारतीमध्ये अग्निशामक यंत्रणेची व्यवस्था ठेवली आहे.
राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनाही निरीक्षणासाठी नोंदणी करावी लागते. तसंच सर्व घटनाक्रम रेकॉर्ड करण्यासाठी केंद्रीय सुरक्षा दलांना व्हीडिओ कॅमेरा देण्यात आलेला असतो.
या संरक्षित क्षेत्रात कोणत्याही नेत्याच्या किंवा अधिकाऱ्याच्या वाहनाला येण्यास परवानगी नसते.

*⚙🛡 स्ट्राँग रूमचं संरक्षण*
स्ट्राँग रूमच्या संरक्षणासाठी एक सनदी अधिकारी आणि एक पोलीस अधिकारी जबाबदार असतात.
या खोलीसाठी त्रिस्तरीय संरक्षण व्यवस्था असते. या खोलीच्या संरक्षणाच्या पहिल्या स्तराची जबाबदारी केंद्रीय सुरक्षा दलाकडे असते. दुसऱ्या स्तराची जबाबदारी राज्य पोलीस दलांकडे देतात आणि त्यानंतर पोलिसांकडून सामान्य संरक्षण दिले जाते.
स्ट्राँग रूमजवळ 24 तास कार्यरत असलेला नियंत्रण कक्ष असतो. हे सर्व लोक दिवसरात्र EVM संरक्षणाच्या कामात गुंतलेले असतात. सर्व हालचाली CCTV द्वारे रेकॉर्ड केल्या जातात.
मतमोजणीच्या वेळेस राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये स्ट्राँग रूमचं सील उघडलं जातं. त्याचंही व्हीडिओ रेकॉर्डिंग होतं.
सर्व मतदानयंत्रं केंद्रीय सुरक्षा दलाच्या सुरक्षेखाली मतमोजणीच्या ठिकाणी आणली जातात. राजकीय पक्षांचे प्रतिनिधी त्यांच्यामागे वेगळ्या वाहनातून जाऊ शकतात.
उत्तर लिहिले · 14/3/2019
कर्म · 569265