6
Answer link
📢 *आता 'विधानपरिषद' , चला माहिती जाणून घेऊ ?*
💫 भारतातील घटक राज्यांमधील कायदेमंडळाच्या वरिष्ठगृहाला विधान परिषद म्हणतात.
👉 महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, जम्मू काश्मीर, आंध्रप्रदेशआणि तेलंगणा,ओडिशा या 8 घटक राज्यात द्विगृहात्मक कायदेमंडळ पद्धती अस्तित्वात आहे व तेथे विधानसभेसोबत विधान परिषदसुद्धा अस्तित्वात आहे.
🔍 बाकी सर्व घटकराज्यात एकगृह कायदेमंडळ पद्धती आहे. तेथे विधानसभा हे एकच सभागृह आहे.महाराष्ट्राच्या विधानपरीषदेत 78 सदस्य आहेत.
💁♂ *सर्वप्रथम विधानपरिषद अस्तित्वात कशी येते याबद्दल माहिती घेऊ*
घटनेच्या कलम 169 (1) नुसार विधानसभेने सभासदांच्या किंवा दोन तृतीयांश सभासदांनी उपस्थितीने बहुमताने ठराव केल्यास संसद राज्यात विधान परिषद अस्तित्वात आणते.
👤 विधान परिषदेची सदस्य संख्या किती असावी, हे घटनेने निश्चित केलेले नाही. कलम 171 नुसार विधान परिषदेत किमान 40 सभासद किंवा विधानसभेच्या एकूण सभासद संख्येच्या एक तृतीयांश पेक्षा जास्त सदस्य नसतात. विधान परिषद तत्त्वत: वरिष्ठ सभागृह असले तरी व्यवहारात ते कनिष्ठ सभागृह आहे. या सभागृहाला सर्वच बाबीत कमी अधिकार आहेत.
🏛 *कार्यकाळ आणि पात्रता*
📍 विधान परिषद सदस्य हे विधानसभा सदस्य, स्थानिक स्वराज्य संस्था, पदवीधर, शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात.
🗣 राज्यपाल विज्ञान, साहित्य, कला व समाजसेवेतील प्रसिद्ध लोकांना विधानपरिषदेवर प्रतिनिधित्व देतात.
*1)* सभासदाचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो.
*2)* दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सभासद निवृत्त होतात. त्यांच्या जागी नवे सभासद निवडले जातात.
🤔 *कशी असते मतदान प्रक्रिया?*
1⃣ विधानसभेप्रमाणे येथे थेट मतदान प्रक्रिया अवलंबली जात नाही.
2⃣ राष्ट्रपती निवडणूक, विद्यापीठ सिनेट यासारख्या निवडणुकींसाठी पसंतीक्रमाची पद्धती वापरली अवलंबली जाते.
3⃣ विधान परिषदेसाठीदेखील पसंतीक्रम पद्धतीचाच अवलंब केला जातो.
4⃣ निवडणुकीसाठी जेवढे मतदार उभे असतील तेवढय़ा उमेदवारांना मतदार आपला (आवडीनुसार) पसंतीक्रम देतो.
5⃣ जास्त पसंतीच्या उमेदवाराला पहिला क्रम, त्यानंतर दुसर्या आवडीच्या उमेदवाराला दुसरा अशा पद्धतीने एकूण उमेदवारांएवढे मत देता येते.
🧐 *मतमोजणी कशी होते?*
✔ संबंधित मतदारसंघाची मतदान संख्या व उमेदवार यांच्यानुसार निवडणूक आयोग एक कोटा निश्चित करतात.
✔ निर्धारित कोट्याएवढी प्रथम क्रमांकाची मते मिळवणारा उमेदवार विजयी होतो. पण पहिल्या पसंतीची मते कोट्याएवढी नसल्यास दुसर्या पसंतीची मते जो पूर्ण करेल, तो उमेदवार विजयी होतो.
✔ निर्धारित कोटा पूर्ण करणारा कोणत्याही पसंतीचा उमेदवार विजयी होऊ शकतो. यात कोणाचेही मतदान वाया जात नाही.