पैसा संबंध कायदा शक्कल ग्राहक संरक्षण

मी एका माणसाला पलंग घेण्यासाठी १३००० रुपये दिले. तो १० दिवसात पलंग देणार होता, पण तो आज उद्या म्हणत ५ महिने झाले. तो थोडा जवळचा असल्यामुळे जास्त बोलता येत नाही. काय करावे म्हणजे पलंग पण मिळेल आणि नातेही तुटणार नाही?

4 उत्तरे
4 answers

मी एका माणसाला पलंग घेण्यासाठी १३००० रुपये दिले. तो १० दिवसात पलंग देणार होता, पण तो आज उद्या म्हणत ५ महिने झाले. तो थोडा जवळचा असल्यामुळे जास्त बोलता येत नाही. काय करावे म्हणजे पलंग पण मिळेल आणि नातेही तुटणार नाही?

13
तुमचा हात दगडाखाली अडकला आहे.म्हणजे तो तुमचा जवळचा आहे.आता तुम्हाला त्याच्याकडेन पैसे परत मिळवायचे आहेत व तेही त्याच्याशी न भांडता किंवा तुमच्या दोघांचे संबंध न बिघडता.म्हणजे तुम्हाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.तुम्ही त्याच्याशी गोडीगुलाबीने बोलून बघा.एकदम सर्व पैसे परत करता येत नसतील तर थोडे थोडे करून द्यायला सांगा.तरीही तो तयार होत नसेल तर तुमच्या दोघांचेही नातेवाईक लागत असतील अशा व्यक्तीकडे याबाबत बोला व त्याना तुमचे पैसे परत मिळण्यासाठी मध्यस्थ करा.असे करण्यापूर्वी तुमच्याकडून पैसे घेतले आहेत त्याला सांगा तू जे काही केले आहेस ते मी आपल्या नातेवाईकांना सांगणार आहे.यावर त्याचे उत्तर बघून नातेवाईकांना याबाबत सांगायचे की नाही ते ठरवे.हे सर्व करण्यापूर्वी त्याच्यआ आर्थिक परिस्थितीचा अंदाज घ्या.तो खरोखर आर्थिक तंगित आहे का ते बघा.शेवटी काय करायचे ते तुमच्यावर आहे.
उत्तर लिहिले · 2/8/2018
कर्म · 91065
9
#गोखले# सरांचे उत्तर छान आहे । माझ्यामते फक्त शेवटची ओळ कामाची आहे चेक करून घ्या खरोखरच तो आर्थिक अडचणीत असेन तर थांबून घ्या नाहीच अडचणीत असेन तर मात्र पैस्यांमुळे नाते संबंध खराब होतातच । आणि जसा तुम्ही एक चांगला विचार करत आहेत तसाच विचार त्यानेही करायला हवा. त्यामुळे तुम्ही जास्त विचार करू नका चुकी त्याची आहे । सरळ त्याच्या घरी जा आणि त्याच्या घर वाल्यांच्या समोरच बोलता बोलता तुमची निकडीची गरज दाखवा त्यालाही करंट लागेल आणि पैशाची व्यवस्था होऊन जाईल .
उत्तर लिहिले · 2/8/2018
कर्म · 6380
0
नमस्कार, तुमची समस्या मी समजू शकतो. जवळच्या व्यक्तीकडून काम करून घ्यायचे असल्यास अनेक अडचणी येतात. तरीदेखील, काही गोष्टींच्या मदतीने तुम्ही तुमच्या अडचणीवर तोडगा काढू शकता:
  • शांतपणे संवाद साधा: सर्वप्रथम, त्या व्यक्तीशी शांतपणे आणि समजूतदारपणे बोला. त्याला विचारा की पलंग देण्यास इतका उशीर का होत आहे आणि त्याला काही अडचण आहे का. तुम्ही त्याला मदत करू शकता का, हे त्याला विचारा.
  • वेळेची अंतिम मुदत: त्याला सांगा की तुम्हाला पलंगाची किती गरज आहे आणि तुम्ही आणखी किती दिवस थांबू शकता. एक अंतिम मुदत द्या आणि त्या तारखेपर्यंत पलंग देण्याची विनंती करा.
  • कायदेशीर नोटीस: जर समजा तो माणूस अजूनही टाळाटाळ करत असेल, तर तुम्ही त्याला कायदेशीर नोटीस पाठवण्याचा विचार करू शकता. नोटीस पाठवण्यापूर्वी, एकदा वकिलाचा सल्ला जरूर घ्या.
  • मध्यस्थी: तुम्ही तुमच्या कुटुंबातील किंवा मित्रांमधील एखाद्याcommon friend च्या मदतीने मध्यस्थी करू शकता. तो तुमच्या दोघांशी बोलून काहीतरी तोडगा काढू शकेल.
  • लिखित स्वरूपात करार: यापुढे तुम्ही जे काही ठरवाल, ते लेखी स्वरूपात ठेवा. त्यात पलंग कधी देणार, याची तारीख आणि इतर शर्ती स्पष्टपणे नमूद करा. दोघांनीही करारावर सही करा.
उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 1180

Related Questions

हॉटेल मध्ये जेवणात झुरळ आढळल्यास काय करावे?
ग्राहक तक्रार निवारण संस्थांवर सविस्तर टीप लिहा.
ग्राहकाचे हक्क व कर्तव्य सांगा आणि उदाहरणासह स्पष्ट करा?
ग्राहकांची कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांचा संबंधित स्वरूप?
ग्राहक संरक्षण कीर्तनाची संहिता?
‘ग्राहकांची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या’ यासंबंधीचे स्वरूप विस्तृतपणे लिहा?
ग्राहक न्यायमंच म्हणजे काय त्याची रचना व कार्य कक्षा कशी स्पष्ट कराल?