4 उत्तरे
4 answers

भाजल्यावर काय लावावे, घरगुती उपाय काय?

12
घरातली छोटी-मोठी कामे करताना बऱ्याचदा चटका बसतो किंवा भाजते. विशेषत: स्वयंपाकघरात काम करताना उकळते पाणी किंवा तेल अंगावर पडून भाजण्याचे प्रमाण अधिक असते. अशा वेळी दवाखान्यात जाण्याअगोदर काहीतरी घरगुती उपाय करणे आवश्यक असते. त्यासाठी हे काही उपाय नक्की करून पहा –

कोरफड – 

कोरफडीमुळे भाजलेल्या जागेला मऊपणा येऊन लवकर बरे वाटते. म्हणून भाजलेल्या जागेवर कोरफडीचा गर लावावा. कोरफडीचा मऊपणा आणणारा व त्वचा पूर्ववत करणारा गुणधर्म भाजलेल्या जागी थंडावा मिळण्यास मदत करतो. कोरफडीचा गर जखमेवर चिकटून राहत नाही, त्यामुळे कोरफडीचा ताजा गर जखमेवर ठेऊन बांधावा. कोरफडीच्या ताज्या गरामुळे भाजलेली वेदनादायी जखम लवकर बरी होते व भाजल्याचे डागही राहत नाहीत.


मध –

भाजल्यावर प्रथमोपचार म्हणून मध लावतात, हे अनेक जणांना माहीत असते. मध लावल्यामुळे जखम लवकर बरी होऊन डाग पडण्याची शक्यता कमी होते. मध उत्तम अँटि-सेप्टिक असल्याने जखम लवकर भरून येण्यास मदत होते.


दही –

भाजल्यानंतर साधारणत: अर्ध्या तासानंतर जखमेवर दही लावावे. दह्यामुळे जखम थंड पडण्यास मदत होते.







–    चटका बसलेले ठिकाण थंड पाण्याने धुवा.

–    थंडपाण्याने धुतल्यावर त्या ठिकाणी हळद लावा.

–    बारीक वाटलेल्या बटाट्याचा लेप चटका बसलेल्या ठिकाणी लावा त्यामुळे ठणक कमी होईल.

–    तुळशीच्या पानाच रस चटका बसलेल्या ठिकाणी लावल्यास जळजळ कमी होते.

–    तिळ बारीक वाटून त्याचा लेप बनवा तो जखमेच्या ठिकाणी लावा. जखम दुखणार नाही. तसेच, चटका बसल्याच व्रणही निघून जाण्यास मदत होईल.

–    गाईचे तुप पीतळी भांड्यात घेऊन त्यात राईचे तेल आणि पाण्याचा थेब एकत्र मिसळून त्याचा मलम बनवा. तो हलक्या हाताने जखमेच्या ठिकाणी लावा.

–    गाजर बारीक खिसून जखमेवर लावले तरीही आराम मिळतो.

–    खोबरेल तेलाचे काही थेंब जखमेवर लावले तरीही चांगलाच आराम मिळतो.
उत्तर लिहिले · 23/7/2018
कर्म · 458580
9
घरात स्वयंपाक करताना चटके किंवा भाजते ही असतं. तर चटका बसला असेल तर लगेच, स्वंयपाक करताना पाणी पडलेले असते तर तिथेच जरासं मीठ घेऊन लावावे. चटक्याची दाह जळजळ थांबते. आणि भाजलेले असेल तर लगेच खोबरेल तेल आणि खाण्याचा चुना घेऊन त्याच मलम बनवून लावावे. लावल्या बरोबर जळजळ थांबतेच आणि लगेच भाजलेले कळत देखील नाही. डाग वगैरे काही ही दिसत नाही आणि हे कस ही भाजलेले असले तरीही हा उपाय करावा. हा उपाय गावच्या ठिकाणी सर्रास केला जातो. टुथ पेस्ट, खोबरेल तेल, मध हे तर घरगुती उपाय आहेत.
उत्तर लिहिले · 18/2/2020
कर्म · 20950
0

भाजल्यावर करावयाचे काही घरगुती उपाय खालीलप्रमाणे:

  1. तुरंत थंड पाणी: भाजल्यानंतर लगेच त्या भागावर 10-20 मिनिटे थंड पाणी टाका. यामुळे भाजण्याची प्रक्रिया थांबते आणि त्वचेला आराम मिळतो.
  2. कोरफड (Aloe Vera): कोरफडीचा गर भाजलेल्या भागावर लावल्यास आराम मिळतो. कोरफड त्वचेला थंड ठेवते आणि लवकर बरी होण्यास मदत करते.

    स्रोत: MyUpchar

  3. मध (Honey): मधामध्ये अँटीसेप्टिक आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. भाजलेल्या भागावर मध लावल्याने जखम लवकर भरते आणि infections चा धोका कमी होतो.

    स्रोत: WebMD

  4. नारळ तेल (Coconut Oil): नारळ तेलामध्ये व्हिटॅमिन ई (Vitamin E) आणि फॅटी ऍसिड (fatty acids) असतात, जे त्वचेला पोषण देतात आणि लवकर बरे करतात.

    टीप: भाजलेला भाग थंड झाल्यावरच तेल लावा.

  5. कांद्याचा रस: कांद्याच्या रसामध्ये Quercetin आणि सल्फर संयुगे असतात, ज्यामुळे वेदना कमी होतात आणि भाजलेला भाग लवकर बरा होतो.
  6. बटाटा (Potato): बटाट्याचा रस किंवा पातळ काप भाजलेल्या भागावर लावल्यास आराम मिळतो. बटाट्यामध्ये नैसर्गिकरित्या soothing गुणधर्म असतात.

इतर उपाय:

  • भाजलेला भाग स्वच्छ ठेवा.
  • जखम उघडी ठेवा, पट्टी बांधू नका.
  • भरपूर पाणी प्या.

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा:

  • जर भाजलेला भाग मोठा असेल.
  • फोले आले असतील.
  • जखमेतून पू येत असेल.
  • ताप येत असेल.

Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी आहे. कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 2300

Related Questions

मळमळ होऊन उलटी झाल्यावर काय करावे?
कुत्रा चावल्यावर काय खावे?
रुग्ण किंवा जखमी व्यक्तीचे प्राण वाचवण्यासाठी सीपीए ही अत्यंत महत्त्वाची पद्धत आहे का?
विषारी साप चावल्यास कोणती लस द्यावी लागते?
जखम झाल्यास काय करावे?
पशु प्रथमोपचार कसे करावे?
नाजूक मांसपेशींच्या दुखापतीमध्ये प्रथमोपचार कसे करावे?