धान्य ग्राहक हक्क अधिकार

स्वस्त रेशन धान्य या बाबत ग्राहकांना काय हक्क आहेत?

2 उत्तरे
2 answers

स्वस्त रेशन धान्य या बाबत ग्राहकांना काय हक्क आहेत?

23
*स्वस्त धान्य दुकानातील धान्य वितरणाबाबत दक्षता.*
-------------------------------------------
शासनाच्या कल्याणकारी योजनेचा प्रमुख भाग म्हणजे सरकारमान्य स्वस्त धान्य दुकाने असून दुकानातून होणार्‍या धान्य व रॉकेल वितरणांत अनेक त्रुटी आढळतात, त्यासाठी नागरिकांनी दक्ष रहावे. 
सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानातून वितरीत होणार्‍या धान्य व रॉकेल वितरणाबाबत सर्वसामान्य नागरिकांना फारशी माहिती नसते, त्यामुळे नागरिकांची फसगत होत असते. या दुकानातून मिळणारे रॉकेल पहिल्या पंधरावड्यात न घेतल्यास महिना अखेरपर्यंत घेता येते, हप्ता बुडत नाही. बीपीएल आणि अंत्योदयचे धान्य पाठिमागच्या महिन्यात न घेतल्यास पुढच्या महिन्यात घेता येते किंवा चार हप्त्यात घेता येते. धान्य घेतलेल्या वस्तूची पावती दुकानातून मिळालीच पाहिजे, त्यासाठी आग्रह धरणे आवश्यक आहे. या पावतीवर रेशन दुकानाचा नंबर असतो. एका दिवशी एक पावती फाडता येते असा काही नियम नाही. ज्या वस्तू आपल्याला आवश्यक आहे. त्याच व तेवढ्याच वस्तू आपण घेवू शकतो. सर्वच वस्तू घ्या नाहीतर रॉकेल मिळणार नाही, असे दुकानदार आपल्याला म्हणू शकत नाही. रेशनकार्ड स्वत:कडे ठेवण्याचा व रद्द करण्याचा अधिकार दुकानदाराला नाही, रेशन दुकान सकाळी चार तास संध्याकाळी चार तास उघडले गेले पाहिजे.
आठवड्यातून एकदा दुकान बंद ठेवता येते. दुकानात लोकांना स्पष्टपणे वाचता येईल असा माहिती फलक ठेवणे बंधनकारक असते. त्या फलकावर दुकानाची वेळ, सुट्टीचा दिवस, दुकान क्रमांक, तक्रार वही उपलब्ध असल्याची नोंद, रेशन कार्यालयाचा पत्ता व फोन, रेशनकार्ड संख्या, भाव व देय प्रमाण, उपलब्ध कोटा ही माहिती असणे बंधनकारक असते.
बीपीएल व अंत्योदय व अन्नपुर्णा लाभार्थी यादी दुकानात लावणे कायद्याने बंधनकारक आहे. या कायदेशीर नियमावलीचे पालन गावातील दुकानात होत नसल्यास त्याबाबत दुकानातील तक्रार वहीत लेखी तक्रार नोंदवा. दुकानात तक्रारवही ठेवलेली असते, ती मागा आणि त्यात आपली तक्रार लिहून त्याखाली नाव, पत्ता लिहून सही करा. जर दुकानदाराने ही वही दिली नाही तर त्याबाबत तहसिलदाराकडे तक्रार करा. तक्रार वही न देणे हा अदखलपात्र गुन्हा ठरतो. त्यामुळे तहसिलदार निश्‍चितपणे कारवाई करतात. तक्रारवहीत पाच तक्रारी नोंद झाल्या की दुकानदाराला दंड होतो. दुकानावर देखरेख करण्यासाठी ग्रामपंचायतीची दक्षता समिती असते. या समितीत जास्तीत जास्त तरूणांनी सहभाग नोंदवावा. ही समिती दुकानावर धाड घालू शकते. गैरप्रकार होत असतील तर टाळे लावू शकते. तलाठी या समितीचा सचिव असतो.
आपल्या गावात शासकीय योजनेची जागृती करून जास्तीत-जास्त लोकांना लाभ मिळवून देण्यासाठी एक दक्ष नागरिक म्हणून आपण जागृत होवून आपली सामाजिक बांधिलकी जपूया.

👍 *येथे करा तक्रारी*
स्वस्त धान्य दुकानदारांविषयी शिधापत्रिकाधारकांची तक्रार असल्यास त्यांनी राज्य सरकारच्या e-Mahahfood.gov.in या संकेतस्थळावर किंवा १९६७/१८००-२२-४९५० या टोल फ्री क्रमांकावर किंवा helpline.mhpds@gov.in या ई-मेलवर संपर्क साधण्याचे आवाहनही कार्यालयाने केले आहे. 

तक्रारीसाठी क्रमांक
अंत्योदय अन्न योजनेमध्ये २१ किलो गहू व १४ किलो तांदूळ प्रत्येक शिधापत्रिकाधारकांना परिमाणानुसार देण्यात येतो, तर अन्नसुरक्षा योजनेत तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ परिमाणानुसार प्रतिव्यक्तीस देण्यात येतो. तरी अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील पात्र शिधापत्रिकाधारकांना धान्य मिळत नसल्यास त्यांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.

रेशनिंगचे नियम*
रॉकेल/घासलेट पहिल्‍या पंधरवड्यात न घेतल्‍यास महिना अखेरपर्यंत घेता येते. हप्‍ता बुडत नाही.

बीपीएल् व अंत्‍योदयचे धान्‍य गेल्‍या महिन्‍यात न घेतल्‍यास पुढच्‍या महिन्‍यातही घेता येते.

बीपीएल् व अंत्‍योदयचे धान्‍य महिन्‍यात 4 हप्‍त्‍यातही घेता येते.

रेशनवर घेतलेल्‍या वस्‍तूंची पावती मिळालीच पाहिजे. पावतीवर रेशन दुकानाचा क्रमांक असतो.

एका दिवशी एकच पावती फाडता येते असा नियम नाही.

ज्‍या व जेवढ्या वस्‍तू हव्‍या असतील तेवढ्याच वस्‍तू आपण घेऊ शकतो.

इतर गोष्‍टी घेतल्‍याशिवाय रॉकेल मिळणार नाही असे दुकानदार म्‍हणू शकत नाही.

*रेशनकार्ड स्‍वतःकडे ठेवून घेण्‍याचा किंवा ते रद्द करण्‍याचा अधिकार दुकानदाराला नाही*

रेशन दुकान रोज सकाळी 4 तास व सायंकाळी 4 तास उघडे असलेच पाहिजे.

आठवडी बाजाराच्‍या दिवशी उघडे असले पाहिजे.

आठवड्यातून एकदाच दुकान बंद ठेवता येते.

*रेशन दुकानात लोकांना स्‍पष्‍टपणे वाचता येईल असा महिती फलक असला पाहिजे. या फलकावर दुकानाची वेळ, सुटीचा दिवस, दुकान क्रमांक, तक्रार वही उपलब्‍ध असल्‍याची नोंद, रेशन कार्यालयाचा पत्‍ता व फोन,भाव व देय प्रमाण, उपलब्‍ध कोटा ही माहिती असणे अनिवार्य असते*.

बीपीएल, अंत्‍योदय व अन्‍नपूर्णा लाभार्थ्‍यांची यादी दुकानात लावलेली असते.

*वरीलपैकी कोणतीही गोष्‍ट आपल्‍या गावातल्‍या रेशनदुकानात होत नसेल, तर ताबडतोब लेखी तक्रार नोंदवा*

*दुकानातच तक्रारवही ठेवलेली असते. ती वही मागा आणि त्‍यात आपली तक्रार लिहून त्‍याखाली नाव, पत्‍ता, सही/अंगठा करा*
*जर दुकानदाराने ही वही दिली नाही, तर तहसिलदाराकडे वही न देण्‍याची तक्रार करा*

*तक्रारवही न देणे हा अदखलपात्र गुन्‍हा म्‍हणून तहसिलदार कारवाई करतात*

*तक्रारवहीत पाच तक्रारी नोंदल्‍या, की दुकानदाराला 15 हजार रूपये दंड होतो*

दुकानावर देखरेख करण्‍यासाठी ग्राम पंचायतीची दक्षता समिती असते. या समितीत जागरूक तरुणांनी सहभागी झाले पाहिजे.

ग्रामसभेत या समितीविषयी चर्चा करा. गरज असेल, तर समिती बदला. ही समिती दुकानावर धाड घालू शकते. गैरप्रकार असतील, तर दुकानाला टाळेही लावू शकते. तलाठी या समितीचा सदस्‍य सचिव असतो.

*लेखी तक्रार तहसिलदार किंवा रेशन ऑफिसर यांच्‍याकडेही करता येते।
‪+91 9921417541 Only for information……. *आमच्या गावात आम्हीच सरकार*

2005 मध्ये आलेल्या नागरिकांची सनद कायद्याची अंमलबजावणी अभावानेच दिसून येत आहे. अशा परिस्थितीत  सरकारचा हा निर्णयही कागदावरच राहणार का त्याची अंमलबजावणी नीट केली जाणार का, याविषयी साशंकता आहे. राज्यात दारिद्र्य रेषेखालील कार्डधारकांची संख्या 42 लाख 94 हजार 200 इतकी आहे तर अंत्योदय अन्न योजनेखाली 25 लाख एक हजार 860 कार्ड वितरित करण्यात आली आहेत. प्राधान्य कुटुंब योजनेखालील कार्डधारकांची संख्या 80 लाख 62 हजार 206 इतकी आहे. अंत्योदय अन्न योजनेखालील कुटुंबांना दरमहा 35 किलो धान्य मिळते. प्राधान्य कुटुंबातील कार्डधारकांना प्रत्येक व्यक्तीमागे पाच किलो धान्य दिले जाते. या योजनेनुसार तीन रुपये किलो दराने तांदूळ, दोन रुपये किलो दराने गहू आणि एक रुपया किलो दराने भरडधान्य देणे  बंधनकारक आहे. मात्र, सध्या या याजनेनुसार गहू आणि तांदूळ यांचेच वितरण केले जात आहे. हे चित्र कधी बदलणार आणि रेशन दुकानाचा कारभार खर्‍या अर्थाने लोकाभिमुख कधी ठरणार??????
उत्तर लिहिले · 30/11/2018
कर्म · 569245
0
स्वस्त धान्य दुकानांमध्ये ग्राहकांना अनेक अधिकार आहेत, त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत:
  • धान्य मिळवण्याचा अधिकार: प्रत्येक रेशन कार्ड धारकाला शासनाने ठरवलेल्या അളानुसार धान्य मिळण्याचा हक्क आहे.
  • धान्याची गुणवत्ता तपासण्याचा अधिकार: ग्राहकांना धान्याची गुणवत्ता तपासण्याचा अधिकार आहे. धान्य खराब असल्यास, ते नाकारण्याचा आणि दुकानदाराकडे तक्रार करण्याचा अधिकार आहे.
  • वजन करून घेण्याचा अधिकार: ग्राहकांना धान्य व्यवस्थित वजन करून घेण्याचा अधिकार आहे.
  • पावती (Bill) मागण्याचा अधिकार: धान्य खरेदी केल्यानंतर दुकानदाराकडून पावती घेण्याचा ग्राहकांना अधिकार आहे. पावतीमध्ये धान्याचे वजन, दर आणि एकूण रक्कम नमूद केलेली असावी.
  • तक्रार करण्याचा अधिकार: दुकानदाराने नियमांचे उल्लंघन केल्यास, जसे की जास्त पैसे घेणे, कमी धान्य देणे किंवा धान्याची गुणवत्ता खराब असणे, तर ग्राहक तक्रार करू शकतात.
  • माहिती मिळवण्याचा अधिकार: रेशन दुकानातील साठा, धान्याचे दर आणि इतर माहिती जाणून घेण्याचा अधिकार ग्राहकांना आहे.

तक्रार कुठे करावी?

  • तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील अन्न व नागरी पुरवठा विभागात तक्रार करू शकता.
  • राज्य ग्राहक मदत केंद्र (State Consumer Helpline) येथे तक्रार करू शकता.
  • राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन (National Consumer Helpline) वर तक्रार करू शकता. Link
हे काही महत्त्वाचे अधिकार आहेत जे स्वस्त धान्य योजनेअंतर्गत ग्राहकांना मिळतात. या अधिकारांचा वापर करून ग्राहक आपल्या हक्कांचे संरक्षण करू शकतात.
उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 1760

Related Questions

हॉटेल मध्ये जेवणात झुरळ आढळल्यास काय करावे?
ग्राहकांचे हक्क व कर्तव्ये सांगा आणि त्यांचे उदाहरणांसह थोडक्यात स्पष्टीकरण करा?
ग्राहकांचे हक्क व कर्तव्य यांची थोडक्यात माहिती मिळेल का?
ग्राहकांची हक्क व कर्तव्य सांगून त्यांचे उदाहरणासह थोडक्यात स्पष्टीकरण?
ग्राहकांचे हक्क व कर्तव्य उदाहरणासह स्पष्टीकरण करा?
ग्राहकांचे हक्क व कर्तव्ये याबद्दल थोडक्यात स्पष्टीकरण?
ग्राहकांची हक्क व कर्तव्ये सांगून त्यांचे उदाहरणासह थोडक्यात स्पष्टीकरण करा?