औषधे आणि आरोग्य अन्न पोषण आरोग्य आहार

भूक वाढवण्यासाठी कोणते टॉनिक वापरावे?

2 उत्तरे
2 answers

भूक वाढवण्यासाठी कोणते टॉनिक वापरावे?

7
भूक न लागणे किंवा भूक वाढीसाठी उपाय मध्ये आपण आज आपल्याला काही अश्या घरगुती टिप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने आपण कुठलेही टोनिक औषध गोळ्या न खाता भूक वाढवू शकतो.

बऱ्याचदा आपल्याला भूक लागत नाही. आणि जेवण अपूर्ण होऊन अशक्त पणा येतो. अश्या वेडेस दुर्लक्ष करू नये. योग्य वेळी योग्य उपचार करावा.

भूक न लागणे ची लक्षणे:

खायची इच्छा न होणे, तोंडाला चव नसणे, थोडं खाऊन ही पोट जड होणे व भूक न लागणे.

भूक वाढीसाठी काय खावे:

साळीच्या लाह्या, मेथी, कारले, मूग, पपई, डाळिंब, आवळा, लिंबू, ताक, आले, पुदिना, कोथिंबीर, कुळीथ, तूप, मसाल्याचे पदार्थ इत्यादी पदार्थ खावे.

भूक वाढीसाठी काय खाऊ नये:

चणे, उडीद, चवडी, पावटा, केळे, दही, चीज, सीताफळ, साबुदाणा, रताडे, थंड पाणी, तळलेले पदार्थ खाऊ नये. हे पदार्थ खाल्ल्यास पोट जड होते आणि भूक मिटते. काही खायची इच्छा नाही होत.

भूक वाढीसाठी उपाय :

एक चमचा आले लिंबाच्या रसात चिमूटभर हिंग व सैंधव टाकून जेवणाच्या आधी चाटून खाल्ल्यास भूक चांगली लागते.जेवताना भाताच्या पहिल्या घास बरोबर हिंग, मिरे, जिरे, ओवा, व सैंधव एकत्र करून केलेले चुरन पाव चमचा घ्यावे.रोज जेवताना पाव लिंबू खाल्ल्यास जेवण पचते व भूक लागते.तीव्र आचेवर बऱ्याच वेळ उकळलेले पाणी प्यावे. गरम पाणी पिणे अधिक फायद्याचे ठरते.जेवणाआधी आल्याच्या छोटा तुकडा किंचित सैंधव घालून खवा घेतल्याने भूक वाढते.जेवणात पुदिना, आले, लसूण, यांची चटणी खाल्ल्यास तोंडाला चव येते आणि भूक लागते. आणि जेवणात वाढ होते. तोंड कडू होऊन खायची इच्छा होत नसल्यास तीन चार आमसुले एक कप पाण्यात 10-15 भिजत घालावी व नंतर कुसकरून गाळून घ्यावे. या पाण्यात चिमूटभर जिरेपूड टाकून घोट घोट घ्यावे.भूक न लागणे हे पचन शक्ती मंद झाल्याचे लक्षण आहे. त्यामुडे फुलका, भाजी, ताक, असा साधा आहार घ्यावा.जेवण नंतर एक वाटी ताक चिमूटभर हिंग, जिरे, व सिंधव टाकून पिल्याने खाल्लेल लवकर पचते आणि आपली भूक वाढीसाठी मदत होते.जेवणा आधी पाणी पिणे टाळावे, दिवस झोपू नये, नियमित व्यायाम करावा.
उत्तर लिहिले · 8/1/2018
कर्म · 5360
0
भूक वाढवण्यासाठी काही टॉनिक (tonic) खालील प्रमाणे आहेत, पण कोणताही उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे:

भूक वाढवण्यासाठी उपाय:

डॉक्टरांचा सल्ला:

वरील उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. ते तुमच्या आरोग्याच्या स्थितीनुसार योग्य मार्गदर्शन करू शकतील.
उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 5220

Related Questions

व्हिटॅमिन ए बद्दल माहिती?
मासे खाण्याचे फायदे काय आहेत?
राईस ब्रँड तेलाचे फायदे?
कमी कॅलरीचे अन्न कोणते?
जेवण पोटभर जात नाही?
जेवण जात नाही?
एखाद्या व्यक्तीला एनर्जी एकदम कमी झाल्यावर लवकर एनर्जी येण्यासाठी काय करावे?