सौंदर्य केस घरगुती उपाय आरोग्य

कमी वयात केस पांढरे होतात, उपाय हवा आहे?

3 उत्तरे
3 answers

कमी वयात केस पांढरे होतात, उपाय हवा आहे?

12
आजकाल खूपच कमी वयात केस पांढरे होत असल्याची अनेकांची तक्रार आहे. यात युवकांबरोबरच किशोरवयीन मुला-मुलींचाही समावेश आहे. काही उपायांनी तुम्ही केस पांढरे होण्यापासून थांबवू शकता. यासाठी तुम्हाला लवकर केस पांढरे का होतात, याचे कारण माहीत असणे आवश्यक आहे. ते पुढीलप्रमाणे...

🔮अनुवंशिक
केस कमी वयात पांढरे होण्याचे कारण अनुवंशिकही असते. जर आई-वडीलांचे केस कमी वयात पांढरे झाले असतील तर अनुवंशिक कारणानेही मुलांचे केस कमी वयात पांढरे होतात.

🗿आहार घेण्याची अयोग्य पद्धत
तुम्ही जर संतुलित आहार घेत नसाल तर याचा परिणाम केसावर होतो. यामुळेही केस कमी वयात पांढरे होऊ लागतात. आहारात जीवनसत्व बी, प्रथिने, कॉपर आणि आयोडीन यासारख्या घटकांच्या कमतरतेमुळेही केस लवकर पांढरे होतात.
🚼मेलनिन
मेलनिन हे रंगद्रव्य केसाचा रंग काळा ठेवण्यास खूप महत्त्वाची भूमिका बजावते. तुमचे शरीर जेव्हा मेलनिन कोशिकांची निर्मिती करणे बंद करते, तेव्हा केसाचा रंग बदलतो. यामुळे याचे कार्य बंद झाल्यास कमी वयातही केस पांढरे होतात.
🛃ताण-तणाव
जीवन हे तणावपूर्ण बनत चालले आहे. आजकालचे युवक छोट्या-छोट्या गोष्टींचाही ताण घेत आहेत. यांचे केस कमी वयातच पांढरे होऊ लागतात. तसेच जे जास्त घाबरतात, भीतात यांच्यामध्ये ही समस्या अधिक जाणवते.
🚫कॉपरची कमतरता
शरीरामध्ये जर कॉपरची कमतरता असेल तरी ही समस्या भेडसावते. कॉपर मेलानिनची निर्मिती करते. यामुळे केस काळे दिसतात, परंतु कॉपरच्या कमतरतेमुळे केस पांढरे होऊ लागतात.
🚮अस्वच्छता
जे केसाची स्वच्छता ठेवत नाहीत, त्यांचेही लवकर केस पांढरे होतात. पर्यावरणातील प्रदूषणामुळेही लवकरच ही समस्या उद्भवते. फ्री रेडिकल्स जेवढे त्वचेला हानिकारण आहे, तेवढेच ते केसानाही आहे.
ℹ️आजार
खूप कालावधीपर्यंत आजारी असल्यास तसेच औषधाचे सेवन केल्यासही ही समस्या निर्माण होते. हार्मोन्सच्या बदलामुळे तसेच काही औषधामुळेही केसाचा रंग बदलतो.
🚭धूम्रपान
धूम्रपान करणे हे आरोग्यासाठी हानिकारक आहे. तसेच याचा परिणाम केसावरही होतो. यामुळेही केस पांढरे होण्याची समस्या वाढत आहे.

⚛️काही घरगुती उपाय-

▶️आवळा
केस पांढरे होणं थांबवण्यासाठी आवळा मदत करतो. यामुळेच तेल आणि शाम्पूमध्येही आवळ्याचा वापर केला जातो. नारळाच्या तेलामध्ये आवळ्याचे तुकडे टाका, हे तुकड्यांना काळा रंग येईपर्यंत ते मिश्रण गरम करा आणि डोक्याला लावा. याबरोबरच आवळ्याचा रस पिला तरीही केस पांढरे होणं कमी होतं. 
▶️कांदा
गळणारे आणि पिकणारे केस थांबवण्यासाठी कांदा हा उपाय आहे. कांद्यामध्ये कॅटालेस एंजाईम मोठ्या प्रमाणावर असतं. केस पांढरे होत असतील तर अर्धा कांदा घेऊन तो डोक्यावर चोळा किंवा कांद्याचा रस डोक्याला लावा आणि एका तासानंतर शाम्पूनं केस धुवा. 
▶️मेहंदी
केस पांढरे होणं थांबवण्यासाठी डोक्याला मेहंदी लावा. मेहंदी लावताना बनवण्यात येणाऱ्या मिश्रणामध्ये एरंडाचं तेल आणि लिंबाचा रस टाका आणि एक तासापर्यंत हे मिश्रण तसंच ठेवून मग ते डोक्याला लावा. 
▶️मेथीचे दाणे
मेथीच्या दाण्यामध्ये असलेल्या गुणधर्मामुळे केस पांढरे होणं कमी होतं. पिण्याच्या पाण्यामध्ये थोडे मेथीचे दाणे टाकून हे पाणी गरम करा आणि रोज एक ग्लास हे पाणी प्या. मेथीचे दाणे आणि पाणी एकत्र करून त्याची पेस्ट बनवा आणि ही पेस्ट डोक्याला लावा. 
▶️तिळाचे दाणे
तिळाचे दाणे बदामाच्या तेलात टाकून हे मिश्रण डोक्याला लावा आणि अर्ध्या तासानंतर केस धुवा, यामुळे तुमचे केस पांढरे व्हायचं प्रमाण कमी होईल. 
उत्तर लिहिले · 9/12/2017
कर्म · 5555
0

कमी वयात केस पांढरे होण्याची अनेक कारणे असू शकतात, जसे की आनुवंशिकता, जीवनशैली आणि काही वैद्यकीय परिस्थिती. येथे काही उपाय दिले आहेत जे तुम्हाला मदत करू शकतात:

आहार आणि जीवनशैली:
  • आहार:

    व्हिटॅमिन बी12, लोह, तांबे आणि आयोडीनयुक्त पदार्थांचे सेवन वाढवा. हिरव्या पालेभाज्या, फळे, आणि प्रथिनेयुक्त (proteins) आहार घ्या.

  • धूम्रपान टाळा:

    धूम्रपान केल्याने केसांवर नकारात्मक परिणाम होतो आणि केस लवकर पांढरे होऊ शकतात.

  • तणाव कमी करा:

    योगा, ध्यान आणि श्वासोच्छवासाचे व्यायाम करून तणाव कमी करा.

घरगुती उपाय:
  • आवळा:

    आवळा केसांसाठी खूप फायदेशीर आहे. आवळ्याचा रस नियमित प्या किंवा आवळ्याचे तेल केसांना लावा.

    संदर्भ: ncbi.nlm.nih.gov

  • नारळ तेल आणि लिंबू:

    नारळ तेल गरम करून त्यात लिंबाचा रस मिसळा आणि केसांना लावा. यामुळे केसांना पोषण मिळते आणि केस पांढरे होणे कमी होते.

  • कांद्याचा रस:

    कांद्याचा रस केसांना लावल्याने केस पांढरे होण्याची प्रक्रिया कमी होते, कारण त्यात catalase नावाचे enzyme असते.

    संदर्भ: webmd.com

  • चहा आणि कॉफीचा वापर टाळा:

    चहा आणि कॉफीचे जास्त सेवन टाळा, कारण यामुळेही केस पांढरे होऊ शकतात.

वैद्यकीय सल्ला:

जर समस्या गंभीर असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. ते तुम्हाला योग्य उपचार आणि मार्गदर्शन करू शकतील.

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 1040
0
*🔯 लहान वयात केस पांढरे होत असतील तर करा हे उपाय*





————————————————
★माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव कोल्हापूर★
————————————————
लहान वयामध्येच अनेकांचे केस पांढरे होतात. https://bit.ly/4jcw8MU तणाव, चिंता, चुकीचा आहार, अनुवंशिक दोष आणि प्रदुषण ही केस पांढरे व्हायची प्रमुख कारणं आहेत. पांढरे केस लपवण्यासाठी अनेक जण ते कलर किंवा डाय करतात पण नैसर्गिक उपायांनीही तुमचे केस पांढरे होणं थांबवता येऊशकतं. याघरगुती उपायांवर एक नजर टाकूयात. 
🍈आवळा - केस पांढरे होणं थांबवण्यासाठी आवळा मदत करतो. यामुळेच तेल आणि शाम्पूमध्येही आवळ्याचा वापर केला जातो. नारळाच्या तेलामध्ये आवळ्याचे तुकडे टाका, हे तुकड्यांना काळा रंग येईपर्यंत ते मिश्रण गरम करा आणि डोक्याला लावा. याबरोबरच आवळ्याचा रस पिला तरीही केस पांढरे होणं कमी होतं. 
🌿पेरुची पाने-पेरुची पाने वाटून त्याची पेस्ट करा. ही पेस्ट केसांना लावल्याने केस काळे होण्यास मदत होते. पेरुच्या पानात व्हिटॉमिन बी, सी असते. त्यामुळे केसगळती रोखण्यास आणि केस पुन्हा उगवण्यास मदत होते.
🌿कडीपत्ता-कडीपत्ता फक्त पदार्थाचा स्वाद वाढवत नाही तर त्यात अनेक आरोग्यदायी गुणधर्म ही आहेत. कडीपत्ता खोबरेल तेलात घालून रोज त्या तेलाने केसांना मसाज करा. रात्रभर ठेवा आणि दुसऱ्या दिवशी शॅम्पूने केस धुवा. असे नियमित केल्यास लवकरच परिणाम दिसू लागेल.
✨कांदा - गळणारे आणि पिकणारे केस थांबवण्यासाठी कांदा हा उपाय आहे. कांद्यामध्ये कॅटालेस एंजाईम मोठ्या प्रमाणावर असतं.𝔐𝔞𝔥𝔦𝔱𝔦 𝔰𝔢𝔳𝔞 𝔤𝔯𝔬𝔲𝔭 𝔭𝔢𝔱𝔥𝔳𝔞𝔡𝔤𝔞𝔬𝔫केस पांढरे होत असतील तर अर्धा कांदा घेऊन तो डोक्यावर चोळा किंवा कांद्याचा रस डोक्याला लावा आणि एका तासानंतर शाम्पूनं केस धुवा. 
🎍मेहंदी - केस पांढरे होणं थांबवण्यासाठी डोक्याला मेहंदी लावा. मेहंदी लावताना बनवण्यात येणाऱ्या मिश्रणामध्ये एरंडाचं तेल आणि लिंबाचा रस टाका आणि एक तासापर्यंतहे मिश्रण तसंच ठेवून मग ते डोक्याला लावा.
ही मेंहदी म्हणजे (तयार मिळणारी डाय मेंहदी नव्हे)
☄मेथीचे दाणे - मेथीच्या दाण्यामध्ये असलेल्या गुणधर्मामुळे केस पांढरे होणं कमी होतं. पिण्याच्या पाण्यामध्ये थोडे मेथीचे दाणे टाकून हे पाणी गरम करा आणि रोज एक ग्लास हे पाणी प्या. मेथीचे दाणे आणि पाणी एकत्र करून त्याची पेस्ट बनवा आणि ही पेस्ट डोक्याला लावा. 
☄तिळाचे दाणे - तिळाचे दाणे बदामाच्या तेलात टाकून हे मिश्रण डोक्याला लावा आणिअर्ध्या तासानंतर केस धुवा, यामुळेतुमचे केस पांढरे व्हायचं प्रमाण कमी होईल.

https://whatsapp.com/channel/0029VaPJhXL84Om4z32l8I24


Related Questions

व्हिटॅमिन डी व कॅल्शियम कोणकोणत्या पदार्थांमधून व आणखी कशामधून मिळू शकते?
माझे वय ३७ वर्ष आहे आणि माझे समोरील खालचे दोन दात हलतात, ते पक्के करण्यासाठी काही उपाय सांगा आणि याचा वजनाशी काही संबंध असू शकतो का?
माझं वय ३७ वर्ष आहे आणि माझे वजन फक्त ४३ किलो आहे, तरी वजन वाढवण्यासाठी काय खावे व काही आयुर्वेदिक उपाय सांगा?
सेक्सवर नियंत्रण कसे ठेवावे?
शरीराची ऊर्जा वाढवण्यासाठी काय करावे?
पायाच्या अंगठ्याचा कोपरा दुखत आहे, ते बरे होण्यासाठी कोणते लिक्विड ऑइंटमेंट (liquid ointment) त्यावर सोडावे?
इलायचीचे फायदे काय?