औषधे आणि आरोग्य
व्यायाम
शरीर
घरगुती उपाय
शारीरिक समस्या
आरोग्य
पायाची टाच खूप दुखत आहे, त्यावर काय उपाय आहे?
3 उत्तरे
3
answers
पायाची टाच खूप दुखत आहे, त्यावर काय उपाय आहे?
17
Answer link
*टाचदुखीपासून आराम देणारे घरगुती उपाय*
सतत उभे राहणार्यांमध्ये, सतत हाय हिल्स घालून चालल्यानेही पायदुखीचा आणि प्रामुख्याने टाचा दुखतात. स्टाइल्सच्या या काही कारणांसोबतच शरीरात पोषकतत्त्वांची कमतर्ता असल्यास, साखर, फॅट्स, हार्मोन्स यांच्या असंतुलनामुळे टाचा दुखतात. टाच्यांच्या दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी नेमकं काय करावं? हे अनेकांना ठाऊक नसते. त्यामुळे टाचांच्या दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय मदत करतात.
*टाचदुखीपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय*
1. टाचांच्या दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी दिवसांतून किमान 3 वेळेस नारळाच्या तेलाने किंवा मोहरीच्या तेलाने मसाज करा.
2. हळदीमध्ये अॅन्टी ऑक्सिडंट घटक मुबलक प्रमाणात असतात. टाचदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी ग्लासभर दूधात हळद व मध मिसळून प्यावे.
3. टाचा दुखत असतील टपअम्ध्ये कोमट पाणी घेऊन त्यात मीठ मिसळा. या पाण्यात पाय बुडवून काही वेळ बसल्याने थकवा कमी होण्यास, टाचदुखीचा त्रास काम होण्यास मदत होईल.
4. नियमित सकाळी रिकाम्यापोटी कोरफडीचा रस प्यावा. यामुळे वारंवार टाचदुखीचा त्रास असणार्यांना आराम मिळतो.

1
Answer link
सकाळी उठल्यानंतर पडणारे पहिले पाऊल अतिशय त्रासदायक असते. या वेळी रुग्णांना सर्वाधिक कळ जाणवते. हा त्रास कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय आहेत. मात्र या उपायांचा अवलंब करताना त्यात सातत्य हवे. या उपायांमुळे गुण आला नाही तर एक्सरे काढणे, इंजेक्शन देणे अशा प्रकारचे उपाय तज्ज्ञांच्या निरीक्षणाखाली केले जातात. या इंजेक्शनमध्ये कमी प्रमाणात वेदनाशामक औषधे असतात. कोणत्याही उपायांना प्रतिसाद मिळाला नाही तर मात्र अखेरीस शस्त्रक्रिया करून स्ट्रेच झालेले स्नायू कमी करण्यात येतात.
पायांचा व्यायाम
टाचांच्या दुखण्यासाठी व्यायाम हा अतिशय गुणकारी उपाय असून दिवसातून किमान तीन वेळा हा व्यायाम केल्यास पायाचे दुखणे कमी होऊ शकते. भिंतीसमोर उभे राहल्यानंतर दोन्ही हातांच्या तळव्यांचा भार िभतीवर द्यावा. त्यानंतर टाच उंच उचलून दहापर्यंत आकडे मोजून पुन्हा खाली घ्यावे. चवडा जमिनीवरून उचलू नये. एका वेळेस किमान पाच वेळा व्यायाम करावा. या व्यायामामुळे तळव्याचे घट्ट झालेले स्नायू सल होण्यास मदत होते. खुर्चीवर बसून पायांचा चवडा हाताने मागेपुढे केला तसेच हाताने टाचेभोवती मसाज केल्यासही आराम पडतो.
गरम पाण्याचा शेक
तळव्यांच्या स्नायूंवर अतिरिक्त भार आल्यामुळे ते घट्ट होतात. अशा वेळी पायाचा तळवा जाड आणि टणक होतो. हा टणकपणा कमी करण्यासाठी गरम पाण्याचा शेक देणे उपयुक्त ठरते. गरम पाण्यात पाय ठेवल्यामुळे तळव्यांचे स्नायू सल होण्यास मदत होते आणि रक्तप्रवाह सुरळीत होतो. यामुळे रुग्णाला काही काळ आराम पडतो.
मेणाचा लेप
रुग्णालयात उपचारासाठी गेल्यास तळवा दुखण्याच्या प्रमाणानुसार मेणाचा लेप दिला जातो. या पद्धतीत तळवा आणि वरील भागात वितळलेले आणि साधारण गरम असलेल्या मेणाचा लेप दिला जातो. हे मेण फार गरम नसते. मेण वाळल्यानंतर आपोआप निघते. मेणाच्या उबदारपणामुळे तळव्यांच्या स्नायूंना आराम मिळतो. ही पद्धत तज्ज्ञांच्या निरीक्षणाखाली करणे गरजेचे आहे, रुग्णांनी घरी करणे धोकादायक आहे.
मऊ चपलांचा वापर
उंच टाचांच्या चपला वापरण्याऐवजी सपाट किंवा टाचेची उंची कमी असलेल्या मऊ चपला वापराव्यात. त्यातही तळव्याखाली मऊ गादीप्रमाणे स्तर असलेल्या चपला अधिक चांगल्या. आणि बूट घालायचे असल्यास त्यातही तळव्याखाली मऊ स्तर असावा. घरातही वावरताना मऊ पादत्राणे वापरावीत.

0
Answer link
पायाची टाच दुखण्याची अनेक कारणे असू शकतात, त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत:
- प्लेंटर फॅ fasciitis: पायाच्या तळव्याच्या बाजूला होणारी वेदना.
- ऍकिलिस टेंडिनाइटिस: घोट्याच्या मागच्या बाजूला होणारी वेदना.
- Calcaneal Bursitis: टाचांच्या हाडांच्या खाली होणारी वेदना.
- नर्व्ह कंप्रेशन (Nerve compression): मज्जातंतूवर दाब आल्याने होणारी वेदना.
- फ्रॅक्चर (Fracture): हाड मोडल्याने होणारी वेदना.
उपाय:
- बर्फ लावा: दिवसातून 2-3 वेळा 15-20 मिनिटे बर्फ लावा.
- स्ट्रेचिंग व्यायाम: पायाचे आणि घोट्याचे स्ट्रेचिंग व्यायाम करा.
- योग्य footwear: चांगले सपोर्ट देणारे शूज वापरा.
- वजन कमी करा: जास्त वजन असल्यास ते कमी करण्याचा प्रयत्न करा.
- पेनकिलर: डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेदनाशामक औषधे घ्या.
जर दुखणे गंभीर असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. ते योग्य निदान करून योग्य उपचार देऊ शकतील.
अधिक माहितीसाठी आपण खालील वेबसाईटला भेट देऊ शकता: