राजकारण भूगोल बातम्या सीमा विवाद इतिहास

बेळगाव सीमाप्रश्नाबद्दल थोडी माहिती मिळेल का? हा प्रश्न कोणी निर्माण केला?

2 उत्तरे
2 answers

बेळगाव सीमाप्रश्नाबद्दल थोडी माहिती मिळेल का? हा प्रश्न कोणी निर्माण केला?

4
*       महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न।    *
बेळगाव जिल्हयात मराठी भाषिकांचे प्राबल्य असतानाही बेळगावास महाराष्ट्रापासूनतोडल्यामुळे येथील जनतेच्या भावना तीव्र आहेत. गेल्या पन्नास वर्षापासून बेळगांवची जनता महाराष्ट्रात सामील होण्यासाठी झगडत आहे. नुकताच हा प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर आला असून जानेवारी २००७ मध्ये सर्वोच्च न्यायालयात या तंट्यावर सुनावणी सुरू होणार आहे.१९५६ रोजी बेळगांवात मराठी लोकांचे स्पष्ट बहुमत होते आणि आजही तेथील ३/४ लोकसंख्या मराठी भाषिक आहे.

                       "पार्श्वभुमी"

पूर्वी बेळगांव हे तात्कालीन बॉम्बे ह्या राज्यात होते. पण कर्नाटक राज्याच्या निर्मिती वेळी लोकमताचा आदर न करता कर्नाटकातविलीनीकरण करण्यात आले. त्या घटनेमुळे बेळगांवात संतापाची लाट उसळली, मोठ्या प्रमाणात आंदोलने झाली.अनेकजण गोळीबारात ठार झाले. गेली ५० वर्षे बेळगांवची जनता महाराष्ट्रात जाण्यासाठी लोकशाहीमार्गाने लढा देत आहे.

        :-महाराष्ट्र एकीकरण समिती:-

तिथे महाराष्ट्र एकीकरण समिती नावाचा पक्ष आहे, जो या प्रश्नाचा नेहमी पाठपुरवठा करतो. सुरुवातीला या पक्षाची मजबूत पकड होती, त्यामुळे बऱ्याच वेळा विधानसभेसाठी त्या पक्षाचे ७ आमदार निवडून यायचे, सध्या ३-४ आमदार निवडून येतात. बेळगांव महानगरपालिकेवर नेहमी महाराष्ट्र एकीकरण समितीचे बहुमत असते. बेळगांवचे महापौर केवळ एखाद-दुसरा अपवाद वगळता मराठी भाषिकच झाले आहेत तिथली जनता महाराष्ट्रात जाण्याची इच्छा अनेक प्रकारे व्यक्त करते.

:::::::::---ताज्या घडामोडी;;;;;

कर्नाटक सरकार मराठी द्वेषी आहे अशी तिथल्या लोकांची भावना आहे. २००५ मध्ये बेळगांव महाराष्ट्रात सामील असा ठराव केल्यानंतर, तिथली महानगरपालिका बरखास्त करण्यात आली. पण ही बरखास्ती बेकायदा असल्यामुळे आंदोलने होऊन हा विषय परत चर्चेत आला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी या बरखास्तीची निंदा केली. बेळगांवचे महापौर विजय मोरे यांना बंगळूरच्या विधान सौधसमोर कन्नड गुंडानी मारहाण केली व काळा रंग फासला. यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट आली व सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन याबाबत नाराजी व्यक्त केली. बेळगांवचे 'बेळगावी' असे नामकरण करून व बेळगांवाला उपराजधानी बनवण्याचे मनसुबे कर्नाटक शासनाने रचल्याने आगीत तेल ओतल्यासारखे झाले. कर्नाटक सरकारने बेळगांवात अधिवेशन घेतले व त्यास उत्तर म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळावा आयोजित केला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आर.आर.पाटील यांनी हजेरी लावली.दरम्यान कर्नाटक सरकारने बेळगांवाचे नामकरण केले परंतु नवे नाव इंग्रजी व मराठी प्रसारमाध्यमे वापरताना आढळत नाहीत. बेळगावांचे कन्नड नामकरण करण्यास केंद्र सरकारने नकार दर्शविला आहे.उपराजधानी करण्याचा निर्णय देखिल त्यांना मागे घ्यायला लागला आहे.

म.ए. समितीने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर अलिकडेच महाराष्ट्र सरकारने कर्नाटक सरकारविरुद्ध आक्रमक पावित्रा घेतला. सरकारच्या परवानगीशिवाय महाराष्ट्रातील धरणांचे पाणी कर्नाटकला पुरवायचे नाही असा आदेश मुख्यमंत्र्यांनी पाटबंधारे खात्याला दिला.

@@सर्वोच्च न्यायालयात सुनावणी@@@@@

महाराष्ट्र सरकारने हा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वोच्य नायालयात याचीका सादर केली आहे.सर्वोच्च न्यायालयाने ह्याची द्खल घेतली असून केंद्र सरकारला या बाबतीत आपली बाजू मांडावयास सांगितली होती.केंद्र सरकारने कर्नाट्काची बाजू उचलून धरली आहे. केंद्राच्या या पवित्र्यामुळे महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात असून महाराष्ट्रातील सर्व पक्षांनी यावर टीका केली आहे. या विरोधामुळे केंद्र सरकारने आपली बाजू सौम्य केली परंतु तरीही कर्नाटकची तळि उचलून धरत सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.

संदर्भ:*

फायनान्शीयल एक्सप्रेस मधील बेळंगाव विषयीचा लेख
उत्तर लिहिले · 20/11/2017
कर्म · 123540
0
बेळगाव सीमाप्रश्नाबद्दल (Belgaum Border Dispute) थोडक्यात माहिती खालीलप्रमाणे:

बेळगाव सीमाप्रश्नाची पार्श्वभूमी:
१९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर, राज्यांची पुनर्रचना भाषावार प्रांतरचना तत्त्वावर करण्यात आली. त्या वेळी मराठी भाषिक बेळगाव (Belgaum) प्रांत म्हैसूर राज्यात (आताचे कर्नाटक) जोडण्यात आला. या निर्णयामुळे मराठी भाषिकांमध्ये असंतोष निर्माण झाला, कारण बेळगाव आणि आसपासचा भाग भौगोलिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महाराष्ट्राशी जवळीक साधणारा होता.

प्रश्नाची सुरुवात:
१९५६ मध्ये राज्य पुनर्रचना कायद्यानुसार (States Reorganisation Act) बेळगाव, कारवार, निपाणी आणि बिदर हे भाग तत्कालीन म्हैसूर राज्याला जोडले गेले. यानंतर महाराष्ट्र शासनाने या निर्णयाला विरोध केला आणि बेळगावला महाराष्ट्रात सामील करण्याची मागणी केली.

विवाद कोणी निर्माण केला?
हा सीमावाद राज्य पुनर्रचना कायद्यामुळे निर्माण झाला. महाराष्ट्र राज्याची मागणी होती की बेळगाव आणि आसपासचे मराठी भाषिक भाग महाराष्ट्रात असावेत, तर कर्नाटक राज्याने या भागावर आपला दावा सांगितला. त्यामुळे दोन्ही राज्यांमध्ये हा सीमावाद निर्माण झाला.

सध्याची स्थिती:
हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. केंद्र सरकारने या प्रकरणात तटस्थ भूमिका घेतली आहे आणि दोन्ही राज्यांनी सामोपचाराने तोडगा काढण्याचा सल्ला दिला आहे.

अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:
उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 1700

Related Questions

भारत आणि चीन दरम्यान तणावाची मुख्य कारणे काय आहेत?
बेळगाव आणि महाराष्ट्राबद्दल माहिती मिळेल का?
कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमा प्रश्न काय आहे आणि त्याबद्दल माहिती मिळेल का?