3 उत्तरे
3
answers
बेळगाव आणि महाराष्ट्राबद्दल माहिती मिळेल का?
6
Answer link
बेळगाव जिल्हयात मराठी भाषिकांचे प्राबल्य असतानाही बेळगावास महाराष्ट्रापासून तोडल्यामुळे येथील जनतेच्या भावना तीव्र आहेत. गेल्या पन्नास वर्षापासून बेळगांवची जनता महाराष्ट्रात सामील होण्यासाठी झगडत आहे. नुकताच हा प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर आला असून जानेवारी २००७ मध्ये सर्वोच्च न्यायालयात या तंट्यावर सुनावणी सुरू होणार आहे.१९५६ रोजी बेळगांवात मराठी लोकांचे स्पष्ट बहुमत होते आणि आजही तेथील ३/४ लोकसंख्या मराठी भाषिक आहे.
पार्श्वभुमी :
पूर्वी बेळगांव हे तात्कालीन बॉम्बे ह्या राज्यात होते. पण कर्नाटक राज्याच्या निर्मिती वेळी लोकमताचा आदर न करता कर्नाटकात विलीनीकरण करण्यात आले. त्या घटनेमुळे बेळगांवात संतापाची लाट उसळली, मोठ्या प्रमाणात आंदोलने झाली.अनेकजण गोळीबारात ठार झाले. गेली ५० वर्षे बेळगांव ची जनता महाराष्ट्रात जाण्यासाठी लोकशाही मार्गाने लढा देत आहे.
महाराष्ट्र एकीकरण समिती:
तिथे महाराष्ट्र एकीकरण समिती नावाचा पक्ष आहे, जो या प्रश्नाचा नेहमी पाठपुरवठा करतो. सुरुवातीला या पक्षाची मजबूत पकड होती, त्यामुळे बऱ्याच वेळा विधानसभेसाठी त्या पक्षाचे ७ आमदार निवडून यायचे, सध्या ३-४ आमदार निवडून येतात. बेळगांव महानगरपालिकेवर नेहमी महाराष्ट्र एकीकरण समितीचे बहुमत असते. बेळगांवचे महापौर केवळ एखाद-दुसरा अपवाद वगळता मराठी भाषिकच झाले आहेत तिथली जनता महाराष्ट्रात जाण्याची इच्छा अनेक प्रकारे व्यक्त करते.
ताज्या घडामोडी:
कर्नाटक सरकार मराठी द्वेषी आहे अशी तिथल्या लोकांची भावना आहे. २००५ मध्ये बेळगांव महाराष्ट्रात सामील असा ठराव केल्यानंतर, तिथली महानगरपालिका बरखास्त करण्यात आली. पण ही बरखास्ती बेकायदा असल्यामुळे आंदोलने होऊन हा विषय परत चर्चेत आला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी या बरखास्तीची निंदा केली. बेळगांवचे महापौर विजय मोरे यांना बंगळूरच्या विधान सौधसमोर कन्नड गुंडानी मारहाण केली व काळा रंग फासला. यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट आली व सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन याबाबत नाराजी व्यक्त केली. बेळगांवचे 'बेळगावी' असे नामकरण करून व बेळगांवाला उपराजधानी बनवण्याचे मनसुबे कर्नाटक शासनाने रचल्याने आगीत तेल ओतल्यासारखे झाले. कर्नाटक सरकारने बेळगांवात अधिवेशन घेतले व त्यास उत्तर म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळावा आयोजित केला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आर.आर.पाटील यांनी हजेरी लावली.दरम्यान कर्नाटक सरकारने बेळगांवाचे नामकरण केले परंतु नवे नाव इंग्रजी व मराठी प्रसारमाध्यमे वापरताना आढळत नाहीत. बेळगावांचे कन्नड नामकरण करण्यास केंद्र सरकारने नकार दर्शविला आहे.उपराजधानी करण्याचा निर्णय देखिल त्यांना मागे घ्यायला लागला आहे.
म.ए. समितीने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर अलिकडेच महाराष्ट्र सरकारने कर्नाटक सरकारविरुद्ध आक्रमक पावित्रा घेतला. सरकारच्या परवानगीशिवाय महाराष्ट्रातील धरणांचे पाणी कर्नाटकला पुरवायचे नाही असा आदेश मुख्यमंत्र्यांनी पाटबंधारे खात्याला दिला.
सर्वोच्च न्यायालयात सुनावणी:
महाराष्ट्र सरकारने हा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वोच्य नायालयात याचीका सादर केली आहे.सर्वोच्च न्यायालयाने ह्याची द्खल घेतली असून केंद्र सरकारला या बाबतीत आपली बाजू मांडावयास सांगितली होती.केंद्र सरकारने कर्नाट्काची बाजू उचलून धरली आहे. केंद्राच्या या पवित्र्यामुळे महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात असून महाराष्ट्रातील सर्व पक्षांनी यावर टीका केली आहे.[४] या विरोधामुळे केंद्र सरकारने आपली बाजू सौम्य केली परंतु तरीही कर्नाटकची तळि उचलून धरत सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.

0
Answer link
बेळगाव:
बेळगाव हे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेले एक शहर आहे. हे शहर दोन्ही राज्यांच्या संस्कृतीचा संगम आहे.
इतिहास:
- बेळगाव हे प्राचीन काळापासून एक महत्त्वाचे शहर होते.
- या शहरावर अनेक राजघराण्यांनी राज्य केले, ज्यात राष्ट्रकूट, चालुक्य, आणि यादव यांचा समावेश आहे.
- 19 व्या शतकात, बेळगाव ब्रिटिश राजवटीचा भाग बनले.
भूगोल:
- बेळगाव हे सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी वसलेले आहे.
- येथील हवामान आल्हाददायक आहे.
- बेळगावात अनेक नद्या आणि तलाव आहेत.
संस्कृती:
- बेळगावची संस्कृती खूप समृद्ध आहे.
- येथे मराठी आणि कन्नड भाषा बोलल्या जातात.
- गणेश चतुर्थी, दसरा आणि दिवाळी हे महत्त्वाचे सण येथे साजरे केले जातात.
अर्थव्यवस्था:
- बेळगाव हे एक औद्योगिक शहर आहे.
- येथे अनेक मोठे उद्योग आहेत.
- साखर, कापड, आणि अभियांत्रिकी वस्तूंचे उत्पादन येथे होते.
महाराष्ट्र:
महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातील एक राज्य आहे.
इतिहास:
- महाराष्ट्राचा इतिहास खूप जुना आहे.
- या भूमीवर अनेक मोठ्या साम्राज्यांनी राज्य केले आहे, ज्यात मौर्य, सातवाहन, आणि मराठा साम्राज्यांचा समावेश आहे.
- मराठा साम्राज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली होती.
भूगोल:
- महाराष्ट्र हे विविध भौगोलिक प्रदेशांनी बनलेले आहे.
- येथे सह्याद्री पर्वत, दख्खनचे पठार, आणि कोकण किनारपट्टी आहे.
- राज्यात अनेक नद्या आहेत, ज्यात गोदावरी, कृष्णा, आणि तापी यांचा समावेश होतो.
संस्कृती:
- महाराष्ट्राची संस्कृती खूप vibrant आहे.
- येथे अनेक भाषा, धर्म, आणि परंपरा आहेत.
- मराठी ही राज्याची अधिकृत भाषा आहे.
- गणेशोत्सव, दिवाळी, दसरा, आणि होळी हे प्रमुख सण येथे साजरे केले जातात.
अर्थव्यवस्था:
- महाराष्ट्र हे भारतामधील एक महत्त्वाचे आर्थिक केंद्र आहे.
- मुंबई हे भारतातील सर्वात मोठे शहर आणि आर्थिक राजधानी आहे.
- राज्यात अनेक उद्योग आहेत, ज्यात ऑटोमोबाइल, टेक्स्टाइल, आणि माहिती तंत्रज्ञान यांचा समावेश होतो.
बेळगाव-महाराष्ट्र सीमा विवाद:
बेळगाव आणि आसपासच्या काही सीमावर्ती भागांवरून महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांमध्ये अनेक वर्षांपासून सीमा विवाद सुरू आहे.
विवादाची कारणे:
- भाषाई आणि सांस्कृतिक आधारावर महाराष्ट्र बेळगावला महाराष्ट्रात सामील करू इच्छितो, कारण या भागात मराठी भाषिक लोकांची संख्या जास्त आहे.
- कर्नाटक सरकारचा दावा आहे की सीमांकन कायद्यानुसार हे शहर त्यांच्या राज्यात आहे.
हा विवाद अनेक वर्षांपासून न्यायप्रविष्ट आहे आणि दोन्ही राज्यांमध्ये यावरून अनेकदा तणाव निर्माण होतो.