औषधे आणि आरोग्य अन्न मधुमेह आरोग्य आहार

माणसाच्या शरीरात साखर कशी तयार होते, ती नियंत्रित करण्यासाठी काय करावे?

2 उत्तरे
2 answers

माणसाच्या शरीरात साखर कशी तयार होते, ती नियंत्रित करण्यासाठी काय करावे?

15
शरीरातील असणाऱ्या साखरेला शास्त्रीय भाषेत ग्लुकोज म्हणतात. शरीरातील प्रत्येक पेशीला  ऊर्जा पुरवण्याचे काम काम ग्लुकोज करते. म्हणूनच अशक्तपणा आल्यावर आपल्याला ग्लुकोज चढवले जाते.

साखर कशी तयार होते:
आपल्या खाण्यामध्ये असणाऱ्या प्रत्येक कर्बोदकात(कार्बोहायड्रेट) मध्ये साखरेचे प्रमाण असते. कर्बोदके म्हणजे असे पदार्थ जे चवीला थोड्याबहुत प्रमाणात गोड लागतात. उदा. फळे, साखर, भाकरी, चपाती, इ. 

कार्बोहायड्रेट्स जेव्हा शरीरात जातात तेव्हा पचनसंस्थेत त्याचे ब्रेकडाऊन(विघटन) होऊन ग्लुकोजचे मोलेक्युलस(रेणू) तयार होतात. 
ग्लुकोजचा मोलेक्युल खालीलप्रमाणे दिसतो:


हे ग्लुकोजचे रेणू रक्तात पाझरले जातात. आणि मग रक्तातून हे ग्लुकोजचे रेणू शरीरातील मसल्स आणि इतर पेशींना ऊर्जा पुरवण्यासाठी पाठवले जातात. तसेच फॅट्स(चरबी) तयार करण्याचे कामदेखील ग्लुकोजनेच होते. ग्लुकोजच्या या रक्तातून पेशीपर्यंतच्या वाहतुकीला जो हार्मोन मदत करतो त्याला इन्सुलिन म्हणतात.

आपण कायमच प्रमाणात कार्बोहायड्रेट्स खाऊ असे नसते, त्यामुळे कधी कधी जास्त प्रमाणात ग्लुकोज/साखर शरीरात तयार होऊ शकते. हे जादा झालेले ग्लुकोज साठवून ठेवण्याचे काम यकृत म्हणजेच लिव्हर करते. या साठलेल्या ग्लुकोजलाच बोलीभाषेत साखर म्हणतात.

साखर नियंत्रित करण्यासाठी खाण्यावर नियंत्रण हा एकाच प्रभावी उपाय आहे. हेल्थी पुरुषाला दिवसातून सुमारे ३८ ग्राम साखर गरजेची असते आणि स्त्रीला २५ ग्राम साखर पुरेशी असते. म्हणजे तुम्ही घेत असलेल्या आहारावर नियंत्रण ठेवून किती साखर असलेले पदार्थ तुम्ही खाता त्यावर नियंत्रण ठेवले म्हणजे साखर आपोआप नियंत्रित होते.

तसेच खालील व्हिडिओत अनिमेशनने ही प्रक्रिया चांगली समजण्यास मदत होईल:

उत्तर लिहिले · 4/3/2017
कर्म · 283320
0

माणसाच्या शरीरात साखर (ग्लुकोज) मुख्यतः खालील प्रकारे तयार होते:

  1. आहारातून: आपण जे अन्न खातो, त्यातील कर्बोदके (carbohydrates) पचनानंतर ग्लुकोजमध्ये रूपांतरित होतात. उदा. भात, गहू, बटाटा, फळे आणि मिठाई.
  2. यकृताद्वारे (liver): जेव्हा शरीरात ग्लुकोजची पातळी कमी होते, तेव्हा यकृत ग्लायकोजेन (glycogen) नावाच्या साठलेल्या ग्लुकोजला ग्लुकोजमध्ये रूपांतरित करते आणि ते रक्तप्रवाहात सोडते. या प्रक्रियेला ग्लुकोजेनोलायसिस (glycogenolysis) म्हणतात.
  3. ग्लुकोनिओजेनेसिस (gluconeogenesis): यकृत अमिनो ऍसिड, लॅक्टेट आणि ग्लिसेरॉल यांसारख्या गैर-कार्बोदकांपासून ग्लुकोज तयार करू शकते.

साखर नियंत्रित करण्यासाठी उपाय:

  • आहार:
    • साखर आणि प्रक्रिया केलेले पदार्थ कमी खा.
    • जटिल कर्बोदके (complex carbohydrates) असलेले पदार्थ जसे की संपूर्ण धान्य, कडधान्ये आणि भाज्या खा.
    • फळे умеренно खा.
  • व्यायाम: नियमित व्यायाम केल्याने शरीरातील ग्लुकोजची पातळी नियंत्रणात राहते.
  • वजन नियंत्रण: जास्त वजन असल्यास ते कमी करण्याचा प्रयत्न करा.
  • औषधे: डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घ्या.
  • तणाव व्यवस्थापन: तणाव कमी करण्यासाठी योग, ध्यान करा.
  • नियमित तपासणी: रक्तातील साखरेची पातळी नियमितपणे तपासा.
उत्तर लिहिले · 14/3/2025
कर्म · 5400

Related Questions

"swaduras che prakar?
शरीरातील साखर वाढल्यास कोणती लक्षणे दिसतात?
माझे वडील ६१ वर्षांचे आहेत, त्यांना शुगर आहे. परंतु काही दिवसांपासून त्यांना अचानक घबराट आणि चक्कर येते आणि नेहमी छातीत दुखते, ब्लॉकेज नाही. यावर उपाय सुचवावा?
शुगर कंट्रोलमध्ये आल्यावर शुगरच्या गोळ्या सुरू ठेवायला पाहिजे का?
मधुमेही रोग्यांनी भात खाणे योग्य आहे का?
लठ्ठपणा आणि मधुमेह बाबत व्याख्यान?
बालमधुमेह (type 1 diabetes) यावर उपचार आहेत का? सध्या लहान मुलांमध्ये बाल मधुमेहाचे प्रमाण वाढले आहे.