प्रेम वय मानसशास्त्र भावनिक बुद्धिमत्ता

वयाच्या अगोदर झालेले प्रेम, यावर काय उपाय आहेत?

2 उत्तरे
2 answers

वयाच्या अगोदर झालेले प्रेम, यावर काय उपाय आहेत?

2



लहान वयात प्रेमात पडलाय? मग 'या' गोष्टी लक्षात ठेवा!

प्रेम होण्याला कोणते वय नसते. ते अगदी सहज होऊन जाते. पण जर कमी वयात प्रेमात पडलात तर काही गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं असतं. हे सांगण्यामागचं कारण फक्त हेच आहे की प्रेम होणं जरी आपल्या हातात नसलं तरी प्रेमातील मर्यादा सांभाळून ते टिकवणं नक्कीच आपल्या हातात असतं. अशावेळी बेजाबाबदारपणे एखादी केलेली चूकही महागात पडू शकते.






जगात अशी कितीतरी जोडपी आहेत जी कॉलेजमध्ये असताना एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि हा प्रेमाचा प्रवास लग्न करुन पूर्णत्वास नेतात. एकमेकांसोबतचा हा प्रवास नक्कीच त्यांच्यासाठी संस्मरणीय असतो. पण मित्रमैत्रीणींनो प्रत्येक वेळीच लहान वयात झालेलं प्रेम त्याच्या ध्येयापर्यंत पोहचताना सहजासहजी मार्ग काढेल असं नाही. तर कधी कधी हेच प्रेम आपल्या आयुष्यात संकटांचा डोंगर बनून देखील येऊ शकतो. प्रेमात पडलेली मुलं-मुली डोक्याने विचार करण्यापेक्षा हळवे होऊन मनाने किंवा हदयाने निर्णय घेतात. ज्यामुळे अशा काही गोष्टी घडतात की त्याचा पश्चाताप त्यांना आयुष्यभर करावा लागतो. असं होऊ नये म्हणून काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. तर मंडळी त्या काही नाजूक गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

अभ्यासावर लक्ष केंद्रित करणं

हल्लीची बरीच मुलं-मुली कॉलेजमधील आपल्या एखाद्या मित्राच्या किंवा मैत्रीणीच्या प्रेमात पडतात. येथून सुरु झालेली प्रेमकहाणी ही अनेक साहसांनी भरलेली आणि भावनिक बंधात बांधली गेलेली असते. त्यामुळे अशा परिस्थितीत बरेचजण अभ्यासापेक्षा प्रेमाला आणि नात्याला जास्त महत्व देऊ लागतात. यामुळे त्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ शकते आणि त्याचा परिणाम रिझल्टवर देखील पडू शकतो. त्यामुळे करियर डोळ्यांपुढे ठेवून जास्तीत जास्त मार्क्स पाडण्याचा प्रयत्न करा. कारण जे नातं मुळत: मजबूत आहे ते कधीच तुटणार नाही.






पैसे खर्च करणे

प्रेयसीला महागड्या भेटवस्तू देणे, प्रियकराला खुश करण्यासाठी सरप्राईज देणे आणि फिरायला जाण्यासारख्या गोष्टी या जोडप्यांमध्ये अगदी साधारण आहेत. पण यात जो सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे पैसा! या सर्व गोष्टींसाठी पैशांची गरज भासते आणि कॉलेजमधील मुलांकडे पैसे नसल्याने पैशांसाठी ते सहाजिकच आई-वडीलांवर अवलंबून राहतात. आई-वडीलांनी पैसे न दिल्यास ते मित्रांकडून उधारी घेतात आणि जेव्हा ही रक्कम चुकती करण्याची वेळ येते तेव्हा मात्र संकटाचा डोंगरच या जोडप्यांवर कोसळतो. त्यामुळे खर्च तितकाच करा जितका आपल्या क्षमतेत बसतो. अन्यथा पैशांवर चालणारे नाते जास्त काळ टिकत नाही.





शारीरिक जवळीक

ही गोष्ट फारच संवेदनशील आहे. प्रेमात आकंठ बुडालेल्या जोडप्यांसाठी शारिरिक जवळीक फारच सामान्य गोष्ट आहे. पण कॉलेजमध्ये जाणा-या मुलांनी असं करणं म्हणजे संकटांना निमंत्रण देण्यासारखं आहे. कारण थोडाा निष्काळजीपणा केल्याने मुलींना गर्भवती राहण्याचा धोका आणि एसटीडी सारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. यामुळे भविष्य देखील धोक्यात येऊ शकतं. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही लग्नाच्या वयास पात्र होत नाही किंवा त्या वेळेपर्यंत नातं घेऊन जात नाही तोपर्यंत शारीरिक जवळीकीपासून दूर राहिलेलंच उत्तम!



गैरफायदा घेणं
कॉलेजमध्ये अशी बरीच मुलं-मुली असतात जी स्वत:च्या आनंदासाठी, आरामदायी जीवनासाठी प्रेमप्रकरण सुरु करतात. त्यामुळे अशा नात्यांमध्ये प्रेम नसतं आणि कॉलेज संपताच ही नाती देखील तुटतात. अशावेळी सर्वात जास्त त्रास त्या व्यक्तीला होतो जो खरोखर मनापासून त्या नात्यात गुंफलेला असतो. अशा परिस्थितीत ब-याचदा ब्लेकमेल आणि शारीरिक अत्याचारासारख्या गोष्टी देखील घडतात आणि पोलिसांची मदत घ्यावी लागते. त्यामुळे प्रेमात पडताना नक्की कोणत्या व्यक्तीच्या प्रेमात पडताय ते नक्की एकदा पडताळून घ्या.



भूतकाळ
आकर्षण वाटलं म्हणून प्रेमात पडू नका. प्रेमात पडण्याआधी त्या मुला-मुलीबद्दल सर्व माहिती जाणून घ्या. कधी कधी नातं सुरु करण्यासाठी खोटी माहिती समोर ठेवली जाते म्हणून तिचा सुरुवातीलाच पडताळा करणं आवश्यक आहे. तसेच त्या व्यक्तीच्या भूतकाळाची आणि तो कोणत्या मित्रमंडळींमध्ये वावरतो याचीही चौकशी करायला हवी. कारण ब-याचदा आपण ज्या लोकांमध्ये वावरतो त्यांचा प्रभाव आपल्यावर प्रकर्षाने जाणवतो. त्यामुळे नात्याचा पाया हा मजबूत करण्यासाठी सर्व बाजूंनी ते सुरक्षित आहे का हे पाहणं आपली स्वत:ची जबाबदारी असते.


उत्तर लिहिले · 8/2/2023
कर्म · 53720
0

वयाच्या अगोदर झालेले प्रेम (Early relationships) ही एक गुंतागुंतीची बाब आहे आणि त्यावर उपाय अनेक गोष्टींवर अवलंबून असतात, जसे की मुलाचे वय, भावनिक परिपक्वता आणि परिस्थिती. काही सामान्य उपाय खालीलप्रमाणे आहेत:

  1. संवाद (Communication):

    पालकांनी मुलांशी या विषयावर मनमोकळी चर्चा करावी. त्यांना प्रेम, आकर्षण आणि भावना याबद्दल समजावून सांगावे.

    उदाहरणार्थ, 'तुला काय वाटते प्रेम म्हणजे काय?' असे प्रश्न विचारून त्यांची बाजू समजून घ्या.

  2. शिक्षण (Education):

    मुलांना चांगले आणि वाईट स्पर्श (Good touch and bad touch) याबद्दल माहिती द्या. सुरक्षित संबंध (Safe relationships) कसे असावेत याबद्दल मार्गदर्शन करा.

    लैंगिक शिक्षण (Sex education) योग्य वेळी देणे आवश्यक आहे.

  3. लक्ष ठेवा (Monitoring):

    मुले कोणाशी बोलतात, काय करतात यावर लक्ष ठेवा. त्यांच्या सोशल मीडियावरील (Social media) ॲक्टिव्हिटीजवर लक्ष ठेवा.

    पण हे करत असताना त्यांच्यावर पूर्णपणे अविश्वास दाखवू नका.

  4. समर्थन (Support):

    मुलांना भावनिक आधार द्या. त्यांना सांगा की तुम्ही त्यांच्यासोबत आहात आणि कोणत्याही परिस्थितीत त्यांची मदत कराल.

    त्यांच्या भावनांचा आदर करा आणि त्यांना कमी लेखू नका.

  5. नियम (Rules and boundaries):

    मुलांसाठी काही नियम आणि मर्यादा निश्चित करा. त्यांना सांगा की काही गोष्टी त्यांच्या वयासाठी योग्य नाहीत.

    उदाहरणार्थ, रात्री उशिरापर्यंत बोलणे किंवा भेटणे टाळा.

  6. व्यस्त ठेवा (Engage in activities):

    मुलांना वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये (Activities) व्यस्त ठेवा. खेळ, कला, संगीत किंवा इतर छंद जोपासण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करा.

    त्यामुळे त्यांचे मन दुसरीकडे वळण्यास मदत होईल.

  7. तज्ञांची मदत (Professional help):

    जर परिस्थिती गंभीर वाटत असेल, तर मानसोपचारतज्ज्ञांची (Psychologist) मदत घ्या. ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकतात.

हे उपाय अवलंबून तुम्ही तुमच्या मुलाला योग्य मार्गदर्शन करू शकता आणि त्यांना सुरक्षित ठेवू शकता.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 980

Related Questions

भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय?
सामाजिक भावनिक अध्ययन काय आहे?
सामाजिक भावनिक अध्ययन कौशल्ये विकसित करण्यासाठी शाळा स्तरावर कोणते उपक्रम आयोजित केले जाऊ शकतात?
सामाजिक व भावनिक बुद्धिमत्ता या दोन्हींशी संबंध असणारा घटक कोणता?
विद्यार्थ्यांमध्ये सहवेदना निर्माण करणे?
सहानुभूती कशी निर्माण करावी?
फोडासारखं जपणं म्हणजे काय?