श्वसन शरीरशास्त्र विज्ञान

श्वसनाच्या मूलभूत गोष्टी कशा स्पष्ट कराल?

2 उत्तरे
2 answers

श्वसनाच्या मूलभूत गोष्टी कशा स्पष्ट कराल?

1
श्वसनाबाबत काही मूलभूत गोष्टी

श्वासोच्छ्वास प्रामुख्याने नैसर्गिकपणे होत असतो. मर्यादित स्वरूपात स्वेच्छेनेही करता येतो. प्राणवायूची त्या वेळची गरज पूर्ण करण्याकरिता श्वसनसंस्था त्यानुसार काम करत असते. सामान्यपणे नैसर्गिक श्वसनाची आपल्याला नेहमीच जाणीव होते असे नाही. कुठलेही श्रम अगर व्यायाम केला असता वाढलेली गरज पूर्ण केली जाण्याकरिता श्वसनाचा वेग वाढतो व आपल्याला त्याची जाणीव होते. म्हणजेच प्राणवायूची वाढलेली गरज किंवा त्याचा पुरवठा करण्यात आलेल्या अडथळ्यांमुळे श्वसनाकडे आपले लक्ष वेधले जाऊ शकते.

श्वसन हे शरीर व मन यांमधील दुवा समजले जाते. श्वासाची जाणीव निर्माण झाली तर मनाची जाणीव वाढण्यास मदत होते. तसेच श्वसन, शरीराची स्थिती आणि विचार यांचा एकमेकांशी दृढ संबंध आढळतो. स्थिर व शांत असलो किंवा होऊ शकलो तर श्वसन हे संथ, सावकाश व सलग होते. त्यामुळे मनाची चंचलता कमी होते.

श्वसन हे नैसर्गिकरित्या होत असते. दर मिनिटाला १२ ते १८ वेळा श्वास घेणे व सोडणे या पद्धतीने श्वसन होत असते. श्वसन हा एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार आहे. श्वास घेतल्याने व सोडल्याने समाधानच मिळते.
उत्तर लिहिले · 25/1/2023
कर्म · 53750
0
श्वसन: मूलभूत गोष्टी

श्वसन म्हणजे काय: श्वसन ही एक अत्यावश्यक शारीरिक प्रक्रिया आहे ज्यामध्ये सजीवांद्वारे ऑक्सिजन (O2) घेणे आणि कार्बन डायऑक्साईड (CO2) सोडणे समाविष्ट असते. या प्रक्रियेद्वारे शरीराला ऊर्जा मिळते.

श्वसनाचे प्रकार:

  • बाह्य श्वसन: हवा फुफ्फुसांपर्यंत पोहोचवणे आणि फुफ्फुसातून कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकणे.
  • आंतरिक श्वसन: रक्त आणि पेशी यांच्यातील वायूंची देवाणघेवाण.
  • पेशी श्वसन: पेशींमध्ये ऑक्सिजनचा वापर करून ऊर्जा निर्माण करणे.

श्वसन प्रक्रिया:

  1. श्वास घेणे: हवेतील ऑक्सिजन नाकाद्वारे शरीरात घेणे.
  2. वायूंची देवाणघेवाण: फुफ्फुसांमध्ये ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडची देवाणघेवाण होते.
  3. श्वास सोडणे: कार्बन डायऑक्साईड शरीराबाहेर टाकणे.

श्वसनाचे महत्त्व:

  • शरीराला ऊर्जा मिळवण्यासाठी.
  • शरीरातील कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकण्यासाठी.
  • शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी.

अधिक माहितीसाठी: तुम्ही खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 2380

Related Questions

पूळन म्हणजे काय?
विद्युत प्रतिरोधाचे SI एकक कोणते आहे?
उष्णतेचे SI एकक काय?
चुंबक द्रव कुठे जास्त शक्तिशाली असतात?
चुंबकाचे ध्रुव कधी नष्ट होतात?
तांबे हे कोणत्या प्रकारचा चालक आहे?
गुरुत्वाकर्षण स्थिरांक G चे मूल्य अंदाजे काय आहे?