भाषा भाषाविज्ञान

प्रमाणभाषा म्हणजे काय?

2 उत्तरे
2 answers

प्रमाणभाषा म्हणजे काय?

1
प्रमाण भाषा – Praman Bhasha
काळानुरूप साहित्य आणि शिक्षण निर्मिती होत असते त्यासाठी प्रमाण भाषा वापरावी लागते. अशा भाषेच्या निर्मितीसाठी सर्वमान्य असतील असे शब्द आणि त्यातून भाषा निर्मिती करणे गरजेचे होऊन जाते. बहुतेकदा प्रमाण भाषा आणि बोली भाषा एकत्रच अस्तित्वात असतात.

शिक्षण निर्मिती झाल्यावर त्यासाठी एखादी भाषा प्रमाणित करावी लागते. त्यातील शब्द सर्व विद्यार्थ्यांना समजले पाहिजेत आणि त्याचे आकलनही झाले पाहिजे. प्रसिद्ध लेखक आणि कवी यांचे साहित्य व त्यामध्ये वापरलेली भाषा ही प्रमाणित ठरू शकते कारण लेखकांचे संपूर्ण ज्ञान हे भाषाधिष्ठीत असते.

बोली भाषेला कमी प्रतीची न हिणवता प्रमाणित भाषेचा प्रचार शिक्षणाद्वारे व्यवस्थित होत गेला तर आपल्याला हवा असलेला फरक दिसून येईल, नाहीतर संस्कृत भाषेसारखे अनुभव येतील. पूर्वी प्राचीन काळी सर्वत्र संस्कृत भाषा ही प्रमाण भाषा होती. सर्व पांडित्य आजदेखील संस्कृत भाषेत आहे. परंतु त्या भाषेची समज सध्या समाजातील बहुतांशी लोकांना नाही.

पुस्तके किंवा साहित्य वाचताना जी भाषा वाचली जाते त्याचा संबंध बोली भाषेशी जुळत नाही. त्यासाठी प्रमाण भाषा बोलली जाणे हे जास्त बुद्धिमत्तेचे प्रतिक मानू नये कारण आपण जे बोलतो तेच आपल्याला शिकवले गेले आहे. त्यासाठी प्रत्येक भाषेचा आदर आणि सन्मान करणे गरजेचे आहे.

बोली भाषा शिक्षणात वापरली गेली नसल्याने आपल्याला शिक्षणात संवेदना आणि भावना जाणवत नाहीत. बोली भाषेतून जास्त आपलेपणा आणि गोडवा अनुभवता येतो, तेवढा गोडवा प्रमाण भाषेत जाणवत नाही.

सांगायचा अर्थ एवढाच की प्रादेशिक भाषा या बऱ्यापैकी बोली भाषा असतात. तेथील लोकांची वाणी आणि आवाजाचा चढउतार, स्वर हा वेगवेगळा असू शकतो. त्यामुळे कोणतीही भाषा ही प्रमाण भाषा नसते पण आता सर्वत्र एकसाथ जर शिक्षणात अमुलाग्र बदल घडून आले तर बहुतांश लोकसंख्या एकसारखी भाषा बोलू शकेल.
उत्तर लिहिले · 14/1/2023
कर्म · 7460
0

प्रमाणभाषा म्हणजे भाषेचा तो प्रकार, जो शासकीय, औपचारिक व्यवहार आणि साहित्य यासाठी वापरला जातो.

व्याख्या:

  • प्रमाणभाषा म्हणजे समाजात मान्यता पावलेली, नियमबद्ध आणि व्याकरणदृष्ट्या योग्य भाषा होय.
  • शिक्षण, न्याय, आणि शासन यांसारख्या क्षेत्रांमध्ये याच भाषेचा वापर होतो.

प्रमाणभाषेची वैशिष्ट्ये:

  1. नियमबद्धता: प्रमाणभाषा व्याकरणाच्या नियमांनुसार वापरली जाते.
  2. मान्यता: समाजातील उच्चशिक्षित आणि जाणकार लोकांमध्ये या भाषेला मान्यता असते.
  3. उपयोग: शासकीय कामे, शिक्षण, साहित्य आणि इतर औपचारिक क्षेत्रांमध्ये वापर.

मराठी भाषेतील प्रमाणभाषा:

मराठी भाषेतील प्रमाणभाषा ही पुणे शहरात बोलली जाणारी भाषा मानली जाते.

अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1660

Related Questions

प्रमाणभाषा व बोलीभाषा यातील संबंध उलगडून दाखवा?
व्यवहार भाषा व साहित्य भाषा स्पष्ट करा?
व्यवहाराची भाषा आणि साहित्यिक भाषा यांचे स्वरूप विशद करा?
व्यवहाराची भाषा व साहित्याची भाषा या संकल्पना विशद करा?
ध्यानव्याकरणात्मक भाषा आणि तिचा विकास यांची मांडणी वैज्ञानिक पद्धतीने कोणी कोणत्या ग्रंथात केली आहे?
ऐतिहासिक भाषा विज्ञान आणि समाजविज्ञान प्रश्न आणि उत्तरे?
व्यवहारभाषा आणि साहित्याची भाषा यातील वेगळेपणा स्पष्ट करा?