अध्यात्म चंदन धार्मिक आचरण

चंदनाचा टिळा कपाळावर लावल्यास काय होते?

2 उत्तरे
2 answers

चंदनाचा टिळा कपाळावर लावल्यास काय होते?

1
चंदनाचा टिळा कपाळावर लावल्यास मन स्थिर होण्यास आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते. थंड प्रवृत्त्तीचे चंदन शरीरात आणि कालांतराने मनाला शांतता मिळवण्यास मदत करते.




कपाळावर चंदनाचा टिळा लावण्याचे आरोग्यदायी महत्त्व !



   
पूजा - विधींमध्ये कपाळावर टिळा लावण्याची प्रथा आहे. भारतात नियमित देवपूजेमध्येदेखील चंदनाचा वापर केला जातो. परंतू आपल्या प्राचीन संस्कृतींनादेखील विज्ञानाचा आधार आहे. मग जाणून घ्या चंदनाच्या टिळा लावण्यामागील आरोग्यदायी कारण .

कपाळावर दोन भुवयांमध्ये 'अग्न' चक्राचे स्थान असते. या स्थानालाच 'तिसरा डोळा' म्हणतात. हे एक उर्जा स्थान असल्याने अध्यात्मात या स्थानाला विशेष महत्त्व आहे. म्हणूनच कपाळावर चंदनाचा टिळा लावण्याची प्रथा आरोग्यदायीदेखील ठरते.


चंदनाच्या टिळ्याचे फायदे - :

एकाग्रता सुधारते - 

आध्यात्मिक गुरू श्री श्री रवी शंकर यांच्या मते, तिसरा डोळा हा शरीरात एकाग्रता वाढवण्याचे केंद्रस्थान आहे. चंदनाचा टिळा कपाळावर लावल्यास मन स्थिर होण्यास आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते. थंड प्रवृत्त्तीचे चंदन शरीरात आणि कालांतराने मनाला शांतता मिळवण्यास मदत करते.

डोकेदुखीपासून आराम मिळतो - 
चायनिज अ‍ॅक्युप्रेशरनुसार दोन्ही भुवयांमधील जागा ही शरीरातील नसा एकत्र मिळण्याची जागा समजली जाते. त्यामुळे या ठिकाणी मसाज केल्यास डोकेदुखीपासून आराम मिळण्यास मदत होते. तसेच या ठिकाणी चंदनाचा टिळा लावल्यास नसांमध्ये थंडावा निर्माण झाल्याने डोकेदुखीच्या त्रासापासून त्वरीत आराम मिळण्यास मदत होते.

सकारात्मक बनवते - 
तिसर्‍या डोळ्याचे स्थान हे अंतर्मन आणि विचारांचे केंद्रस्थान आहे. नकारात्मक विचारातून शरीरात येणारी नकारात्मक भावना या चक्राच्या माध्यमातून आत येते. मात्र चंदनाच्या टिळ्यामुळे त्यांना रोखण्यात यश येते.

निद्रानाश आणि ताण-तणावापासून आराम - 
अतिथकवा, मानसिक ताण किंवा अतिउत्साही मनामुळेदेखील निद्रानाश होण्याची शक्यता असते. आयुर्वेदानुसार कपाळावरील या स्थानावर चंदनाने मसाज केल्यास ताण कमी होण्यास तसेच निद्रानाशाच्या समस्येवर मात करण्यास मदत होते.(रात्री झोप येत नाही? मग हे १० उपाय करून पहा !)

शरीरात थंडावा निर्माण होतो - 
चंदनामध्ये मंद सुवासाप्रमाणेच शरीरात थंडावा निर्माण करण्याची क्षमतादेखील आहे. यामुळे त्वचेच्या समस्या दूर होतात. सोबतीलाच नसांनादेखील थंडावा मिळतो. भारतासारख्या उष्णकटीबंधीय क्षेत्रात कपाळावर चंदन लावणे तुमच्या सार्‍या शरीराला थंड करण्यास मदत करते.


उत्तर लिहिले · 10/11/2022
कर्म · 53720
0

चंदनाचा टिळा कपाळावर लावण्याचे अनेक फायदे आहेत, त्यापैकी काही खालीलप्रमाणे:

  • शांतता आणि एकाग्रता: चंदन शीतल असतो आणि तो लावल्याने मज्जासंस्था शांत होते. त्यामुळे एकाग्रता वाढण्यास मदत होते.
  • तणाव कमी होतो: चंदनाच्या सुगंधाने तणाव आणि चिंता कमी होतात.
  • त्वचेसाठी फायदेशीर: चंदन त्वचेला थंड ठेवतो आणि त्यामुळे त्वचेची जळजळ कमी होते.
  • सकारात्मकता: चंदनाचा टिळा लावल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि नकारात्मक विचार कमी होतात.
  • धार्मिक महत्त्व: हिंदू धर्मात चंदनाला पवित्र मानले जाते आणि ते लावणे शुभ मानले जाते.

याव्यतिरिक्त, चंदन डोकेदुखी कमी करण्यास देखील मदत करते.

टीप: येथे दिलेली माहिती केवळ सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी तज्ञांचा सल्ला घ्यावा.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 980

Related Questions

गोसावी लागणे म्हणजे काय?
आपले शरीर पंचतत्त्वांनी बनले असेल, तर आपली ओळख काय? आपण कोण आहोत?
ब्रह्मचर्य पालन केल्यावर नेमके काय फायदे होतात?
ब्रह्मचर्य पालन म्हणजे नेमके काय करावे?
जो व्यक्ती मनोभावे पूजा करतो, दानधर्म करतो, सरळमार्गी राहतो, भविष्याबद्दल विचार न करता दुसर्‍यांसाठी खिसा रिकामा करतो, तर त्याच्याच वाटेला दुःख आणि अडचणी का येतात?
देवाचे गुरू बृहस्पति यांचे मंदिर कोठे आहे?
स्वर्गात जागा बुक करणार्‍या व्यवसायाबद्दल माहिती द्या?