2 उत्तरे
2
answers
लिखित साधने कोणती आहेत?
2
Answer link
लिखित साधनांत निरनिराळ्या भाषांमधील ग्रंथ, शकावल्या, करीने, वंशावळी, मआसिर, बखरी, तवारिखा, कागदपत्रे, ताम्रपट, शिलालेख, नामे इत्यादिंचा समावेश होतो. अलिखित साधनांत पुरातत्त्वीय वस्तू, भांडी, आयुधे, चित्रे, शिल्पे, वास्तू व स्मारके यांचा समावेश होतो. याशिवाय इतिहाससाधनांच्या भाषेवरून उदा., मराठी, फार्सी, डच, इंग्रजी इ.
लिखित साधने
मानवजातीच्या निर्मितीच्या काळात अश्मयुगातील मनुष्याने त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग व गोष्टी मुख्यत: चित्राद्वारे रेखाटून व्यक्त केल्या आहे व इतरांसमोर मांडल्या आहे. माणसाच्या उत्पत्ती च्या हजारो वर्षानंतर मानवाला लिखित कला अवगत झाली. त्यापूर्वी माणूस प्रतिके, चिन्हे, यांचा वापर करत त्यानंतर त्या प्रतिके आणि चीन्हांपासून मानवाला लिखित कला अवगत झाली.
सुरुवातीच्या काळात मानव हा खापरे, कच्या विटा, झाडाची साल, भूर्जपत्रे या सारख्या साधनांच्या मदतीने लिखाण करत असे. जसे जसे अनुभव आणि ज्ञान मिळत गेले तसे तसे लिखाणपद्धतीत सुधारणा होत गेली. काही कालांतराने प्रवास वर्णने, दरबाराचे निर्णय, सामाजिक घटना, व्यवहारिक घटना,वृतांत लिहून ठेवण्याची सुरवात झाली. काही काळानंतर अनेक वाड्मयाचे प्रकार तयार होऊन ग्रंथ, गोष्टी, नाटके, काव्ये, वृत्तपत्रे, नियतकालिके, आराखडे, नकाशे सारखे लिखानकाम सुरु झाले. या सर्व गोष्टींमुळे त्या त्या काळातील इतिहास समजण्यास आपल्याला मदत होते . म्हणून या सर्व साधनांना आपण लिखित साधने म्हणून ओळखतो.
खापरे, कच्च्या विटा, झाडाची साल, भूर्जपत्रे, या सर्व गोष्टी अश्मयुगातील म्हणजेच प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासातील परिस्थिती समजण्यास आपल्याला मदत करतात
आधुनिक इतिहासात लेखन कामाची कला मानवाला पूर्णपणे अवगत झाली होती त्यामुळे माणूस वृत्तपत्रे, नियतकालिके, ग्रंथ, पुस्तके, दस्तावेज, नकाशे, आराखडे या सारख्या गोष्टींचे लेखन करु लागला होता या सर्व लिखाणकामापासून आपल्याला त्यांचे राहणीमान, त्यांची संस्कृती, त्यांची अग्रलेख, राजकीय आणि सामाजिक परिस्थितीचे ज्ञान आपल्याला होते. तसेच त्या काळातील माहिती व इतर सांस्कृतिक, आर्थिक, व राजकीय घडामोडींचे दर्शन आपल्याला होते.
0
Answer link
लिखित साधने:
लिखित साधने इतिहासाच्या अभ्यासासाठी महत्त्वाचा आधार आहेत. त्यामध्ये विविध प्रकारच्या कागदपत्रांचा समावेश होतो. काही प्रमुख लिखित साधने खालीलप्रमाणे:
- पुराणी कागदपत्रे: यामध्ये राजांचे हुकूम, न्यायनिवाडे, आणि शासकीय पत्रव्यवहार यांचा समावेश होतो.
- बखरी: बखरी म्हणजे ऐतिहासिक घटनांवर आधारित वर्णनात्मक लेखन.
- दैनंदिनी (डायरी): व्यक्ती writes रोजच्या जीवनातील घटना आणि विचार डायरीत नोंदवतात.
- प्रवास वर्णने: प्रवासादरम्यानचे अनुभव आणि माहिती प्रवास वर्णनात लिहिली जाते.
- चरित्र आणि आत्मचरित्र: एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर आधारित लेखन म्हणजे चरित्र, तर स्वतःच्या जीवनावर आधारित लेखन म्हणजे आत्मचरित्र.
- वृत्तपत्रे: त्या काळातील बातम्या आणि घटनांची माहिती वृत्तपत्रांमधून मिळते.
- नियतकालिके: विशिष्ट विषयांवर आधारित लेख आणि माहिती नियतकालिकांमध्ये असते.
- पुस्तके: विविध विषयांवरची पुस्तके त्या वेळच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक परिस्थितीवर प्रकाश टाकतात.
या साधनांमुळे तत्कालीन परिस्थिती, चालीरीती, आणि लोकांच्या जीवनशैलीबद्दल माहिती मिळते.