अध्यात्म देव ईश्वर

देव आहे का नाही?

2 उत्तरे
2 answers

देव आहे का नाही?

1
देव आहे की नाही...? देव कुठे असतो आणि कसा असतो या पेक्षा देवाचे खरे महात्म्य समजून घ्या ...जे आपले दुःख इच्छा विसरून आपल्या मुलांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी जी धडपड करतात ते आई वडील देव असतात ...दिवस रात्र स्वताचे घाम गाळून पोटाला मार देऊन आपले पोट भरण्यास ज्याचा हातभार असतो त्या अन्नदाता बळीराजांत देव असतो ...जो व्यक्ती स्त्री जातीचा मान सन्मान राखतो त्यात देव असतो ...ज्या दगडात देव म्हणून संबोधले जाते आणि त्याचे मंदिर बांधून त्यात पावित्र्य राखले जाते की तिथे जाऊन मनाला एक शीतलता शांति समाधान मिळते ते वास्तव्य देव असते ...जी झाडं ,फळं ,फुलं ,पानं , पशु प्राणी अशी नैसर्गिक जीवंत उदाहरणं आहेत ज्यांमुळे ही सृष्टि निर्माण झाली आणि आजतगायत आहे त्यात देव वसले आहे ...तुमच्या मनातील चांगुलपणात देव आहे जो तुम्हाला सन्मान मिळवून देतो...निसर्गात देव आहे जो आपल्याला जीवन प्रदान करतो ...देवाचे विभिन्न प्रकार आहेत ...तुम्ही नास्तिक आहात असं नाही म्हणनार मी पण तुम्ही देवांवर विश्वास ठेवत नाही कारण देवाच्या नावाने अनेक गोष्टी चुकीच्या केल्या जातात किंवा कोणाचा बळी घेतला जातो ...कोणावर विनाकारण जबरीने प्रथा लादल्या जातात ...पण म्हणून देव वाईट नाही तर ती परिस्थिति वाईट आहे आणि त्या परिस्थितिला असलेले व्यक्ती कारणीभूत असतात ...मानवधर्म हाच खरा धर्म होय ...माणुसकी हीच खरी जात होय ...आणि प्रेम माया दया संयम हुशारी व्यक्तिमत्त्व हाच खरा ईश्वर होय ...देव आहे तो आपल्या सुंदर नजरेत आहे ....
काही चुकले असल्यास क्षमस्व..!
उत्तर लिहिले · 13/5/2022
कर्म · 53710
0

देव आहे की नाही हा एक कठीण प्रश्न आहे ज्याचे उत्तर देणे सोपे नाही. या प्रश्नावर अनेक विचारवंत, शास्त्रज्ञ आणि सामान्य लोकांनी अनेक मते मांडली आहेत.

देव असण्याची शक्यता:

  • अनेक लोकांचा असा विश्वास आहे की देव आहे आणि तो या विश्वाचा निर्माता आहे.
  • धार्मिक ग्रंथ आणि परंपरांमध्ये देवाच्या अस्तित्वाचे दावे केले जातात.
  • काही लोकांना त्यांच्या जीवनात दैवी अनुभव येतात, ज्यामुळे त्यांना देवाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवण्यास प्रवृत्त करते.

देव नसण्याची शक्यता:

  • काही लोकांचा असा विश्वास आहे की देव नाही आणि हे जग नैसर्गिक नियमांनुसार चालते.
  • विज्ञान देवाची गरज नसताना जगातील घटनांचे स्पष्टीकरण देऊ शकते, असे काही शास्त्रज्ञांचे मत आहे.
  • जगात दुःख आणि अन्याय आहे, ज्यामुळे काही लोकांना देवाच्या अस्तित्वावर शंका येते.

अखेरीस, देव आहे की नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. यावर कोणताही ठोस पुरावा नाही, त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या श्रद्धा आणि अनुभवांनुसार निर्णय घ्यावा.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1440

Related Questions

तुम्हाला देव कुठे भेटला होता का?
जगात देव आहे का? आणि असेल तर कसा आणि कुठे आहे?
सर्वसाधारणपणे, ईश्वर म्हणजे निराकार असतो का?
देव कुठे आहे?
देव आहे का ?
देव आहे की नाही?
देव कुठे असतो?