4 उत्तरे
4 answers

देव आहे का ?

4
माऊली रामकृष्णहरि आपण समाजात जगत असताना  अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या दिसत नसतात परंतु त्या नक्कीच असतात उदा वारा वाहतो पण तो दिसत नाही म्हणजे तो नसतो का वायरमध्ये लाईट असते पण ती दिसत नाही तसंच देव जरी दिसत नसला तरी तो आहे आणि या पुढेही असेलच कारण तो पाहण्याचा नाही तर अनुभव घेण्याचा विषय आहे

जुने वाडे गड किल्ले मंदिर यावर दगडात झाडे वाढतात काय कारण कोण पाणी घालतो . खडकात बेडकी असते ती अन्न पाण्याविणा हवे विना जिवंत राहते काय कारण तेव्हा देव आहे हेच सत्य आहे कुणी मान्य करा वा नका करू

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे तो बघा

कां रे नाठविसी कृपाळु देवासी ।
  पोसितो जनासी एकला तो ॥1॥

  बाळा दुधा कोण करितें उत्पत्ती ।
वाढवी श्रीपति सवें दोन्ही ॥2॥

  फुटती तरुवर उष्णकाळमासीं ।
  जीवन तयांसी कोण घाली ॥3॥

  तेणें तुझी काय नाहीं केली चिंता ।
राहे त्या अनंता आठवूनि ॥4॥

  तुका म्हणे ज्याचें नाम विश्वंभर ।
  त्याचें निरंतर ध्यान करीं ॥5॥

अरे, तू कृपाळू अशा भगवंताचे चिंतन का करत नाहीस ? तो एकटाच सा-या जगाचे पोषण करीत आहे.

जन्मलेल्या बाळासाठी दुधाची निर्मिती कोण करतो ?
भगवान  एकाच वेळी बाळाची व स्तनात दुधाची उत्पत्ती व वाढ करीत असतात.

तीव्र उन्हात झाडांना पालवी फुटते तेंव्हा त्यांना पाणी कोण घालते ?
जो सर्वांना जगवतो त्याने काय तुझी चिंता केलेली नाही का?
मग आताही तो करीलच.

रामकृष्णहरि
उत्तर लिहिले · 12/9/2020
कर्म · 0
1
होय. जगात देव आहे. सर्व शास्त्रात व पुराणात सांगितलेले आहे एको देवस्य:। जगात सर्वत्र देव एकच आहे. पण कुणी त्याला अल्लाह म्हणतो, तर कुणी खुदा, तर कुणी येशू, तर कुणी कृष्ण म्हणतो. जसा दिवा सर्व ठिकाणी बघतो तसा देव सर्वांना बघतो. आपण कोणतीही चूक करा पण तुम्हाला वाटत असेल की मला कुणी बघत नाही तर तुमचा तो गैरसमज आहे. त्याच्या नजरेतून छोटेसे पाप-पुण्य सुद्धा सुटत नाही जगात जे जे काही चांगले वाईट होते ते ईश्वरी शक्तीने होते. जगात ज्या शक्ती आहेत त्या सर्व ईश्वरी शक्ती आहेत. आता मानायचे की नाही हा तुमचा प्रश्न आहे.
उत्तर लिहिले · 11/9/2020
कर्म · 3045
0

देव आहे की नाही हा एक कठीण प्रश्न आहे ज्याचे उत्तर देणे सोपे नाही. या प्रश्नावर अनेक भिन्न मते आहेत.

काही लोकांचा असा विश्वास आहे की देव आहे. ते त्यांच्या श्रद्धेचे समर्थन करण्यासाठी अनेक युक्तिवाद देतात. उदाहरणार्थ, ते म्हणतात की जग खूप गुंतागुंतीचे आहे आणि ते योगायोगाने अस्तित्वात येऊ शकत नाही. ते असा युक्तिवाद करतात की जगात नैतिकता आणि न्याय आहे, जे देवाने स्थापित केले आहे.

इतर लोकांचा असा विश्वास आहे की देव नाही. ते त्यांच्या मताचे समर्थन करण्यासाठी अनेक युक्तिवाद देतात. उदाहरणार्थ, ते म्हणतात की देवाला सिद्ध करणारा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. ते असा युक्तिवाद करतात की जगात खूप दुःख आहे, जे देव अस्तित्वात असल्यास होऊ नये.

अखेरीस, देव आहे की नाही हे ठरवणे आपल्यावर अवलंबून आहे. कोणताही योग्य किंवा अयोग्य मार्ग नाही. आपण आपल्यासाठी काय सत्य आहे हे शोधणे आवश्यक आहे.

या विषयावर अधिक माहितीसाठी, आपण खालील वेबसाइट्सला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 1440

Related Questions

देव आहे का नाही?
तुम्हाला देव कुठे भेटला होता का?
जगात देव आहे का? आणि असेल तर कसा आणि कुठे आहे?
सर्वसाधारणपणे, ईश्वर म्हणजे निराकार असतो का?
देव कुठे आहे?
देव आहे की नाही?
देव कुठे असतो?