अध्यात्म देव ईश्वर

जगात देव आहे का? आणि असेल तर कसा आणि कुठे आहे?

2 उत्तरे
2 answers

जगात देव आहे का? आणि असेल तर कसा आणि कुठे आहे?

3
मला माझी मतं सांगायची नाहीत आणि लादायची नाहीत.

आंब्याच्या झाडाला कधी पेरू येत नाही. आंबाच येतो. ही व्यवस्था आपोआप तयार झाली का?

पाच माणसांना एकाच गोळी दिली, तर त्यांच्यावर परिणाम वेगळा होतो. विज्ञान हे सांगू शकत नाही.

ह्या जगाची निर्मिती एका बिग बँग थियरी ने झाल्याचं विज्ञान स्पष्ट करते. तिथे मुळात सगळ्या सूर्यमाला आल्या कुठून? हे कुणीच सांगत नाही.

एक शेर ऐकला होता, न जमीन थी, न आसमान था, अल्ला हुक्का पी रहा था. राख गिरी, बनी धरती; धुवा उठा, बना आसमान.

पण कुणी सांगत नाही, अल्लाला हुक्का पिण्यासाठी कोळसा कुठून मिळाला? किंवा धूर आला कशापासून? ह्या धार्मिक माणसांच्या कल्पना आहेत. फक्त कल्पना.

पण विज्ञान आणि वैज्ञानिक लोक काय करतात? काही पाहिलं तर प्रतिसाद द्यायला दोन सेकंद तरी लागतात. पण क्रिकेट मध्ये फलंदाज एका सेकंदाच्या आत मोठा फटका कसा मारतो? हे कुणी सांगू शकलं नाही.

नरेंद्र दाभोळकर आणि तसा विचार करणारे फक्त विचार करतात, विचार बोलतात. पण साहित्याची कुठलीही पार्श्वभूमी नसलेला नामदेव ढसाळ कविता कशी करू शकला? कुणीच सांगत नाही.

ईश्वर आहे. आणि ते सहज सिद्ध करता येतं.

ज्यांच्या बुद्धीवर गंज चढला असेल त्यांना काही सिद्ध करून दाखवून मी काय करू?
उत्तर लिहिले · 30/9/2021
कर्म · 735
0
मला नक्की माहीत नाही की जगात देव आहे की नाही. हा एक असा प्रश्न आहे ज्यावर अनेक वर्षांपासून वादविवाद चालू आहे आणि यावर कोणताही निश्चित असा निष्कर्ष नाही. काही लोकांचा असा विश्वास आहे की देव आहे. ते अनेक तर्क देतात, जसे की: * जगाची रचना खूप गुंतागुंतीची आहे, ती आपोआप तयार होऊ शकत नाही. * जीवनाचा अर्थ असणे आवश्यक आहे आणि देव आपल्याला तो अर्थ देतो. * नैतिकता आणि मूल्यांची जाणीव आपल्याला देवाने दिली आहे. * काही लोकांना दैवी अनुभव आले आहेत. इतर लोकांचा असा विश्वास आहे की देव नाही. ते खालील युक्तिवाद करतात: * देवाच्या अस्तित्वाचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. * जगात खूप दुःख आहे, जर देव दयाळू असेल तर तो हे दुःख का होऊ देतो? * देव असण्याची कल्पना केवळ मानवी निर्मिती आहे. जर देव असेल, तर तो कसा आहे आणि कुठे आहे याबद्दल अनेक भिन्न मते आहेत. काही लोकांचा असा विश्वास आहे की देव एक व्यक्ती आहे, तर काही लोकांचा असा विश्वास आहे की देव एक शक्ती आहे. काही लोकांचा असा विश्वास आहे की देव स्वर्गात राहतो, तर काही लोकांचा असा विश्वास आहे की देव सर्वत्र आहे. या प्रश्नाचे उत्तर देणे माझ्यासाठी शक्य नाही. हा एक असा प्रश्न आहे ज्यावर प्रत्येकाने स्वतःच विचार केला पाहिजे आणि आपले स्वतःचे मत तयार केले पाहिजे.
उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 1440

Related Questions

देव आहे का नाही?
तुम्हाला देव कुठे भेटला होता का?
सर्वसाधारणपणे, ईश्वर म्हणजे निराकार असतो का?
देव कुठे आहे?
देव आहे का ?
देव आहे की नाही?
देव कुठे असतो?