4 उत्तरे
4 answers

देव कुठे असतो?

5

देव सर्वव्यापी आहे. म्हणजेच देव स्वर्गात ही आहे व नरकात ही आहे. तो नुसता ह्र्दयात नाही तर पूर्ण शरीरात वास करतो. देव कोठे एका जागी नाही. तो सगळीकडे आहे. तो कोणा माणसामध्ये नाही, कारण मनुष्य पापी आहे. म्हणजेच स्त्री असो की पुरुष, म्हणून तो माणसात नाही किंवा थोर व्यक्ती मध्ये नाही.
मोठ्यांचा मान करावा पण ते देवाची जागा घेऊ शकत नाही. देव आपल्या पापी डोळ्याने दिसू शकत नाही. त्याला पवित्र डोळे हवे. म्हणून देव कोठे नसतो, तो सगळीकडे असतो. म्हणून देवाला पाहता येत नाही पण हवा, प्रकाश याचा आपण अनुभव घेऊ शकतो, तसा अनुभव देवा बद्दल घेता येतो.
उत्तर लिहिले · 8/9/2019
कर्म · 545
3
देव कुणी अजूनपर्यंत बघितला नाही, परंतु त्याचा अनुभव आणि प्रत्यय वेळोवेळी आपल्याला मिळतो. भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितले आहे, "सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो" म्हणजे देव आपल्या हृदयात आहे. देव तुम्हाला बघायचं असेल, भाऊंनी उत्तर दिल्याप्रमाणे देव आपल्या आई-वडिलांच्या रूपात बघा. तो चराचरात आहे, जली, स्थळी, काष्ठी, पाषाणी, हृदयी सगळीकडे तोच आहे. आपण फक्त निमित्त आहोत, फक्त बघण्याचा दृष्टिकोन बदला. धन्यवाद!
उत्तर लिहिले · 7/9/2019
कर्म · 10535
0

देव कुठे असतो? हा एक कठीण प्रश्न आहे, कारण त्याचे उत्तर तुमच्या विश्वासावर आणि दृष्टिकोनवर अवलंबून असते.

काही सामान्य विचार:

  • सर्वव्यापी: काही लोकांचा असा विश्वास आहे की देव सर्वत्र आहे, आपल्या आजूबाजूला आणि आपल्यामध्ये वसलेला आहे.
  • स्वर्गात: काही धर्मांमध्ये, देव स्वर्गात किंवा इतर विशिष्ट ठिकाणी निवास करतो असे मानले जाते.
  • मंदिरात: अनेक लोक देव मंदिरात, चर्चमध्ये किंवा इतर पवित्र स्थळांमध्ये असल्याची भावना अनुभवतात.
  • आपल्या मनात: देव आपल्या मनात, आपल्या आत्म्यात आणि आपल्या चांगल्या विचारांमध्ये असतो.
  • कुठेच नाही: काही लोक देव ही संकल्पना मानत नाहीत.

याव्यतिरिक्त, भगवतगीतेत (अध्याय १०, श्लोक २०) भगवान कृष्ण म्हणतात:

"अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशयस्थितः। अहमादिश्च मध्यं च भूतानामन्त एव च॥"

अर्थ: हे अर्जुन, मी सर्व प्राणिमात्रांच्या हृदयात वास करणारा आत्मा आहे. मीच या प्राणिमात्रांचा आदि, मध्य आणि अंत आहे.

शेवटी, देव कोठे आहे हे तुम्ही स्वतःच ठरवायचे आहे.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1440

Related Questions

देव आहे का नाही?
तुम्हाला देव कुठे भेटला होता का?
जगात देव आहे का? आणि असेल तर कसा आणि कुठे आहे?
सर्वसाधारणपणे, ईश्वर म्हणजे निराकार असतो का?
देव कुठे आहे?
देव आहे का ?
देव आहे की नाही?