वैद्यकीय उपचार आरोग्य

किलेशन थेरपी म्हणजे काय?

2 उत्तरे
2 answers

किलेशन थेरपी म्हणजे काय?

3
रक्तातील गुठळ्या विरघळवून त्यामुळे होणाऱ्या संभाव्य हृदय टाळण्यासाठी सलाईन मधून दिले जाणारे औषध हे कीलेशन थेरपीचा एक भाग आहे. म्हणजेच किलेशन थेरपी ही मुख्यत्वे हृदयविकारावर वापरली जाते. ती तुलनेने कमी खर्चिक आणि कमी त्रासदायक आहे. तसेच किलेशन थेरपी पॅरालिसीस, पायातील रक्त वाहिन्यांमधील अडथळे, गँगरीन, कॅरोटीड आर्टडीसीज, पार्किन्सन्स, संधीवात वगैरेंवर उपयुक्त आहे.

किलेशन थेरपी म्हणजे काय ?

आपल्या शरीरात ७२ कोटीपेक्षा जास्त रक्तवाहिन्या आहेत. त्यातील अनेक बंद पडलेल्या केशवाहिन्या किलेशनच्या एका ट्रिटमेंटने उघडतात. किलेशन थेरपीमध्ये शिरेत सलाईनमधून एक विशिष्ठ औषध दिले जाते. हे औषध शिरेतुन शरीरात गेल्यानंतर रक्तवाहिन्यांमधील रक्ताची गुठळी, कॉलेस्ट्रॉलचे थर, रक्तवाहिन्यांमधील ब्लॉकेज विरघळायला चालू होते य शरिरातले नको असलेले विषारी पदार्थ शरीरातून लघवीवाटे बाहेर पडतात. विषारी पदार्थ म्हणजे टॉक्सीन्स आणी हेवी मेटल्स होय. किलेशन थेरपी घेतल्यानंतर रक्तातील इतर दोष नाहिसे होतात आणि हार्ट अटक, परेलायटीक स्ट्रोक येण्याची शक्यता नाहीश्या होतात. जागतीक आरोग्य संघटनानी हे सिद्ध केले आहे की, 400 वर्षापूर्वीच्या पूर्वजांपेक्षा आजच्या आधूनिक मानवी शरीरातील हाडांमध्ये दोन हजारपटीने जास्त शिसे आहे. हे शिसे एवढ्या प्रमाणांत मानवी शरीरात कोठून आले? त्याचे कारण हवेतील प्रदूषण, दुषित पाणी, फळे, धान्य, भाजीपाला यामधील किटनाशकांचा अंश, बाटली बंद पेय व इतर खाद्य पदार्थ, व्यायामाचा अभाव, तंबाखूचे सेवन, सिगारेट या सर्व कारणांमूळे मानवी शरीरातील शिसे व इतर घातक विषारी पदार्थांचे प्रमाण वाढले हे सर्व विषारी पदार्थ फक्त किलेशन थेरपीच मानवी शरीरातून बाहेर काढू शकते.

किलेशन थेरपी कशी कार्य करते ?

ज्या प्रमाणे बर्फाचा तुकडा पाण्यामध्ये टाकल्यानंतर हळूहळू विरघळतो त्याप्रमाणे शरीरातील रक्त वाहिन्यांमधील रक्ताच्या गुठळ्या, ब्लॉकेज, कॉलेस्टरॉलचे थर हळूहळू विरघळवण्याचे काम किलेशन थेरपी करते. सर्व असाध्य रोग (हृदयरोग, कॅन्सर, डायबेटिस, संधीवात, अर्धांगवायू इत्यादी) ह्याचे प्रमूख कारण फ्रि रडीकल्स आहेत. हे फ्रि रडीकल्स रक्तामध्ये निर्माण होण्याचे प्रमुख कारण आजची आधुनिक जीवन शैली, तंबाखू , सिगारेट, मिश्रीचे सेवन, ताण-तणाव, दु:ख किंवा राग मनात दाबून ठेवणे, लठ्ठपणा, बद्धकोष्ठता, व्यायामाचा अभाव इत्यादि या फ्रि रडीकल्स मुळे शरीरातील सर्व रक्त वाहिन्या कठीण होतात व रक्त पेशींच्या आवरणाला इजा पोहचते. किलेशन थेरपी रक्तातील फ्रि रडीकल्स काढून टाकते व कठीण झालेल्या रक्तवाहिन्या परत लवचिक बनवतात. त्यामुळे शरीरातील संरक्षण प्रणाली परत कार्यरत होते. शरीरातील असंख्य बंद पडलेल्या रक्त वाहिन्या परत चालू होतात ज्यामुळे हृदय , मेंदू , पाय आणि इतर अवयवांना पुरेसा रक्त पुरवठा मिळतो आणि अवयवांचे कार्य सुरळीत चालू होते.

किलेशन थेरपी कोणकोणत्या आजारांवर उपयुक्त आहे ?

किलेशन हृदयरोगांवर उपयुक्त आहे. बायपास, अन्जिओप्लास्टी पूर्णपणे टाळता येते. किलेशन थेरपी पॅरालिसीस, पायातील रक्त वाहिन्यांमधील अडथळे, गँगरीन, कॅरोटीड आर्टडीसीज, पार्किन्सन्स, संधीवात वगैरेंवर उपयुक्त आहे. किलेशन थेरपी ही बायपास सर्जरीपेक्षा 300 पटींनी सुरक्षित आहे.

किलेशन थेरपी घेण्यास अऍडमिट व्हावे लागते का ?

किलेशन थेरपी घेण्यास अडमिट व्हावे लागत नाही. ही ट्री­टमेंट आठवड्यातून 1 किंवा 2 वेळा ध्यावी लागते. प्रत्येक किलेशन ट्री­टमेंट अडीच ते तीन तास चालते. ह्या ट्री­टमेंटस ज्या त्या रोगांवर अवलंबून असतात. उदा. बायपास सर्जरी टाळण्यासाठी 20 ते 30 ट्री­टमेंट घ्याव्या लागतात. मी चिंतीत आहे, मला बायपास सर्जरी टाळता येईल का ? बायपास सर्जरी टाळण्यासाठी प्रथमत: किलेशन थेरपी घ्यावी. जीवन पद्धतीत बदल करणे, आहारामध्ये योग्य बदल, चालण्याचा व्यायाम व प्राणायाम, हे बदल कायम स्वरूपी करावे लागतात. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हे सर्व बदल तुम्हांला बायपास सर्जरीनंतरही करावे लागतात

किलेशन थेरपीचे इतर फायदे

रक्तातील चिकटपणा कमी होतो
कोलेस्ट्रॉल कमी होते
ब्लॉकमधील कॅल्शीयम विरघळते
दृष्टी, ऐकण्याची क्षमता, स्मरणशक्ती सुधारते
कंपवात कमी होतो
कॅन्सर पेशींची वाढ होत नाही.
शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते
संधीवात कमी होतो
हायपरटेन्शन व उच्च रक्तदाब कमी होतो
छातीत दुखणे बरे होते.
मधुमेहाने शरीरावर केलेले दुष्परीणाम कमी होतात
ह्रुदय, फुफ्फुस, यकृत, मेंदू, नजर इ. अवयवांचे कार्य सुधारते.
आयुष्य वाढते.
उत्तर लिहिले · 18/4/2022
कर्म · 121765
0

किलेशन थेरपी (Chelation therapy):

किलेशन थेरपी एक वैद्यकीय प्रक्रिया आहे ज्यामध्ये विशिष्ट रसायनांचा वापर करून शरीरातील विषारी धातू (toxic metals) काढले जातात. EDTA ( Ethylenediaminetetraacetic acid) नावाचे रसायन रक्तप्रवाहात इंजेक्ट केले जाते, जे धातूंना बांधून घेते आणि नंतर मूत्रमार्गे शरीराबाहेर टाकले जाते.

उपयोग:

  • शरीरातील शिसे (lead), पारा (mercury), लोह (iron), आर्सेनिक (arsenic) आणि कॅडमियम (cadmium) यांसारख्या जड धातूंची पातळी कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो.
  • ज्या लोकांना जड धातूंच्या संपर्कात येऊन विषबाधा झाली आहे, त्यांच्यावर उपचार करण्यासाठी किलेशन थेरपी वापरली जाते.

धोके आणि साइड इफेक्ट्स:

  • किलेशन थेरपीमध्ये किडनीचे नुकसान, ॲलर्जी, रक्तदाब कमी होणे आणि रक्तातील साखरेची पातळी घटणे यासारखे धोकेPossible आहेत.
  • FDA ( Food and Drug Administration ) ने फक्त विशिष्ट विषबाधांसाठी किलेशन थेरपीला मान्यता दिली आहे. इतर उपचारांसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

महत्त्वाचे:

किलेशन थेरपी घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 980

Related Questions

शिर्डीमध्ये मोफत उपचार केले जातात का, काही माहिती मिळणार का?
माझ्या मुलाचा अपघात झाला आहे, त्याच्या पायातील रॉड काढायचा आहे. पुण्यामध्ये तो दवाखाना कुठे आहे ते सांगा?
Lipoma ajaraavar upachaar?
पोटॅनियम दुरुस्ती कशी करतात?
चिकित्सा पद्धतीची नावे कोणती आहेत?
डेंग्यू झाला आहे, उपचार पण चालू आहेत आणि पेशी कमी व्हायला लागल्या आहेत. पेशी वाढवण्यासाठी काही उपाय?
मळमळ होत असल्यास काय करावे?