2 उत्तरे
2
answers
चिकित्सा पद्धतीची नावे कोणती आहेत?
2
Answer link
रोग झाल्यावर त्याच्या उपचाराच्या पद्धतीला चिकित्सापद्धती म्हणतात.
चिकित्सा पद्धती
चिकित्सा पद्धती
(१) पॅथॉस म्हणजे रोग. त्याच्या विरुद्ध प्रक्रिया शरीरात करण्यासाठी जे उपचार करतात त्या पद्धतीला ‘ॲलोपॅथी’ अथवा ‘विषमचिकित्सा’ म्हणतात. या पद्धतीमध्ये रोगविरोधी औषधे देणे व शस्त्रचिकित्सा यांचा अंतर्भाव होतो. आधुनिक चिकित्सापद्धतीमध्ये अनेक उपचारांचा अंतर्भाव होत असल्यामुळे या पद्धतीला ॲलोपॅथी म्हणजे चुकीचे आहे, असे एक मत आहे. ‘आधुनिक चिकित्सापद्धती’ हे नाव अधिक समर्पक आहे.
(२) शरीरातील धातूंमध्ये दोष निर्माण झाल्यामुळे रोग होतात. ते दोष वायु-पित्त-कफ असे तीन असून त्यांच्यामधील समतोल बिघडल्यास रोग उत्पन्न होतो, अशी प्राचीन भारतातील चिकित्सापद्धती मानते. हे दोष शोधून काढून रोग बरा करता येतो असे या पद्धतीत मानले जाते. या पद्धतीला ⇨आयुर्वेद असे म्हणतात.
(३) प्राकृत (नेहमीच्या-निरोगी) शरीरात रोगासारखी लक्षणे ज्या औषधांमुळे होतात, ती औषधे अगदी सूक्ष्म प्रमाणात दिली असता रोग बरा होतो असे प्रख्यात जर्मन वैद्य हानेमान यांनी प्रतिपादिले. या तत्त्वावर आधारलेल्या चिकित्सा पद्धतीला त्यांनी होमिओपॅथी असे नाव दिले. तिलाच समचिकित्सा पद्धती असे म्हणतात.
(४) शरीरातील रोग बारा प्रमुख क्षारांपैकी (लवणांपैकी) एक वा अनेक क्षार कमी पडल्याने होतात व ते क्षार सूक्ष्म प्रमाणात दिल्यास रोग बरा होतो असे समजणाऱ्या चिकित्सा पद्धतीला 'बारा-क्षार-पद्धती' असे म्हणतात [→ बारा-क्षार-चिकित्सा].
(५) विशिष्ट रंगाचा उपयोग केला असता रोग बरे होतात असे मानणाऱ्या चिकित्सा पद्धतीला ⇨वर्णचिकित्सा असे म्हणतात. (६) रोगांचा मनाशी निकटचा संबध असून मन हेच शरीर व्यापारांचे नियंत्रण करीत असते म्हणून संमोहनावस्थेत (मर्यादित शुद्धिहरण करून सूचना समजण्याच्या अवस्थेत) असताना रोग्याला विशिष्ट संदेश देऊन रोगमुक्त करता येते असे मानणाऱ्या पद्धतीला 'संमोहनचिकित्सा' म्हणतात [→ संमोहविद्या]
(७) मनावर भय, दुःख, विफलता वगैरे संस्कार सुप्त चेतनावस्थेत होतात व त्यांमुळे रोग होऊ शकतो. ह्या सुप्तविकारांचे विश्लेषण करून रोग नाहीसे करणाऱ्या पद्धतीला ⇨मानसोपचार पद्धती असे म्हणतात. [→ मनोविश्लेषण].
(८) पाठीच्या मणक्यांच्या सांध्यांची विशिष्ट हालचाल करून रोग-मुक्ती करता येते असे मानणाऱ्या पद्धतीला ⇨अस्थिचिकित्सा पद्धती असे म्हणतात.
(९) आयर्वेद पद्धतीमध्ये उपयुक्त ठरलेली द्रव्ये सूक्ष्म मात्रेत दिली असता रोगपरिहार होतो असे मानणाऱ्या पद्धतीला ‘संजीवन-चिकित्सा’ असे म्हणतात.
(१०)चीनमध्ये शरीराच्या विशिष्ट भागात सुया टोचून रोग बरे करतात. त्या पद्धतीला ⇨सूचिचिकित्सा म्हणतात.
आधुनिक चिकित्साशास्त्राचे विभाग
(१) स्थानपरत्वे,
(२) प्रक्रियापरत्वे,
(३) द्रव्यपरत्वे आणि
(४) इतर, असे आधुनिक चिकित्साशास्त्राचे विभाग मानलेले आहेत.
स्थानपरत्वे
(अ) पोटात औषधे देऊन रोगप्रतिकार करणे. या विभागाला अन्नमार्गीय असे म्हणतात,
(आ) दंतचिकित्सा,
(इ) गुदमार्गे औषधे देऊन रोगपरिहार करणे,
(ई) त्वचेखाली वा स्नायूवाटे व नीलेवाटे औषधे टोचून घालणे; याला ‘अंतःक्षेपणचिकित्सा’असे म्हणतात.
प्रक्रियापरत्वे
(अ) शस्त्रक्रिया,
(आ) परिफुप्फुसात (फुप्फुसाभोवतालच्या द्रवयुक्त आवरणात) हवा भरून क्षयरोगाचे निवारण करणे,
(इ) काही मानसिक रोगांत शरीरात इन्शुलीन टोचून रक्तातील ग्लुकोजाचे प्रमाण एकदम कमी झाल्यामुळे जो आघात होतो त्याचा उपयोग करणे,
(ई) विद्युत उपकरणांनी शरीरात खोलवर उष्णता उत्पन्न करणे, [→ ऊतकतापन चिकित्सा],
(उ) क्ष-किरण किंवा जंबुपार (दृश्य वर्णपटातील जांभळ्या रंगाच्या पलिकडील अदृश्य) किरण वापरून केलेली चिकित्सा,
(ऊ) शरीरात कृत्रिम रीतीने ज्वरोत्पादन करणे (ज्वरचिकित्सा),
(ए) उत्सर्गी किरण (विशिष्ट मूलद्रव्यांपासून बाहेर पडणारे भेदक किरण) वापरून ग्रंथीवर व अर्बुदांवर (नवीन पेशींच्या अत्याधिक वाढीमुळे निर्माण झालेल्या गाठींवर) उपचार करणे [→ प्रारण चिकित्सा].
द्रव्यपरत्वे
(अ) अंतःस्राव अंतःस्त्रावी (वाहिनीविना सरळ रक्तात स्राव मिसळविणाऱ्या) ग्रंथीचा उपयोग करणे [अंतःस्रावी चिकित्सा, → अंतःस्रावी ग्रंथि],
(आ) कृत्रिम रसायने वापरणे [→ रासायनी चिकित्सा],
(इ) प्रतिजैव (अँटिबायॉटिक) पदार्थ वापरणे [प्रतिजैव चिकित्सा, → प्रतिजैव पदार्थ],
(ई) रक्तरस (प्रतिकारशक्ती उत्पन्न केलेल्या जनावरातील रक्तद्रव) वापरून रोग निवारणे करणे [रक्तरसचिकित्सा; → रक्तरसविज्ञान],
(उ) जंतुविषनाशक लस वापरणे [लसचिकित्सा, → लस व अंतःक्रामण],
(ऊ) वनस्पतिजन्य वा प्राणिजन्य पदार्थ वापरणे [→ औषधिचिकित्सा].
इतर
(अ) अपंग व्यक्तींच्या ग्रस्त अवयवांचे कार्य पुन्हा चालू करणे (व्यावसायिक चिकित्सा),
(आ) उष्मा, जल, संमर्दन इ. भौतिक उपाय करणे [→ भौतिकी चिकित्सा],
(इ) मानसोपचार-चिकित्सा.
0
Answer link
जगामध्ये अनेक प्रकारच्या चिकित्सा पद्धती उपलब्ध आहेत. त्यापैकी काही प्रमुख पद्धती खालीलप्रमाणे आहेत:
- ॲलोपॅथी (Allopathy): याला आधुनिक चिकित्सा पद्धती म्हणून ओळखले जाते. औषधे आणि शस्त्रक्रियांद्वारे रोगांवर उपचार केले जातात.
अमेरिकन मेडिकल असोसिएशन - आयुर्वेद (Ayurveda): ही प्राचीन भारतीय चिकित्सा पद्धती आहे. यामध्ये वनस्पती, आहार आणि जीवनशैलीतील बदलांद्वारे उपचार केले जातात.
आयुष मंत्रालय, भारत सरकार - होमिओपॅथी (Homeopathy): या पद्धतीत 'समान ते सिमान' (like cures like) या तत्त्वावर आधारित उपचार केले जातात. अत्यंत सौम्य औषधे वापरली जातात.
नॅशनल सेंटर फॉर होमिओपॅथी - युनानी (Unani): ही प्राचीन ग्रीक आणि मध्य पूर्वेकडील चिकित्सा पद्धती आहे. यामध्ये नैसर्गिकरित्या रोग बरे करण्यावर लक्ष केंद्रित केले जाते.
नॅशनल युनानी मेडिसिन संस्था - सिद्ध (Siddha): ही दक्षिण भारतातील प्राचीन चिकित्सा पद्धती आहे. धातू आणि खनिजांचा वापर करून औषधे तयार केली जातात.
सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन सिद्धा - नॅचरोपॅथी (Naturopathy): या पद्धतीत शरीर स्वतःच बरे होते यावर विश्वास ठेवला जातो. आहार, व्यायाम आणि नैसर्गिक उपायांचा वापर केला जातो.
अमेरिकन असोसिएशन ऑफ नॅचरोपॅथिक फिजिशियन्स - ॲक्युपंक्चर (Acupuncture): ही चीनी चिकित्सा पद्धती आहे. शरीरावरील विशिष्ट बिंदूंना सुया टोचून उपचार केले जातात.
एव्हिडन्स बेस्ड ॲक्युपंक्चर - कायरोप्रॅक्टिक (Chiropractic): या पद्धतीत मणक्यांच्या हाडांमधील समस्यांवर लक्ष केंद्रित केले जाते आणि हातानेadjustments करून उपचार केले जातात.
अमेरिकन कायरोप्रॅक्टिक असोसिएशन
या व्यतिरिक्त, अनेक पारंपारिक आणि स्थानिक चिकित्सा पद्धती जगभरात प्रचलित आहेत.