शब्दाचा अर्थ व्यवस्थापनशास्त्र अर्थशास्त्र

कार्यात्मक विभाजन या संकल्पने विषयी सविस्तर माहिती मिळेल का?

2 उत्तरे
2 answers

कार्यात्मक विभाजन या संकल्पने विषयी सविस्तर माहिती मिळेल का?

1
कोणत्याही उत्पादन कार्यासाठी सहभागी झालेल्या उत्पादन घटकाच्या एककाचे मूल्य ठरवण्याची प्रक्रिया म्हणजे कार्यात्मक विभाजन होय.



उत्पादन कार्यात भूमी श्रम भांडवल आणि संघटन या चारही उत्पादन घटकांचा कमी-अधिक प्रमाणात वापर करावा लागतोच यापूर्वी आपण पाहिले आहे या घटकांना एकत्रित करून उत्पादन कार्य पूर्ण करायची जबाबदारी उत्पादन घेतो त्याला हे सर्व कार्य त्याच्या बाजारातून विकत घ्यावे लागतात म्हणून याचा उपयोग केल्यानंतर त्या घटकांना त्यांनी दिलेल्याउपयोग केल्यानंतर त्या घटकांना त्यांनी दिलेल्या योगदानाचा मोबदला द्यावा लागतो हा मोबदला किती घ्यावयाचा घटकांच्या एकमेकांनी केलेल्या कामाची किंमत कशी ठरवायची हे प्रश्न उत्पादकास समोर असतात समजा एका मजुराने शेतात दिवसभर काम केले त्याला मजुरी किती द्यायची याचे उत्तर शोधण्यासाठी शेत मालकाला मजुराचा दराचा विचार करावा लागतो हा दर एकदा निश्चित झाला की प्रत्येक मजुराला एकूण किती मोबदला द्यावा याचा हे ठरवणे सोपे उदाहरण असतो दिवसाचा मोबदला दर पन्नास रुपये ठाण एका मजुराने सलग चार दिवस शेतात काम केले तर त्याचा एकूण मोबदला रुपये पन्नास गुणिले चार दिवस दोनशे रुपये होईल म्हणजे येथे मजुराचा दर ठरवणे महत्त्वाचे आहे. मजूर हा श्रम या घटकाचा एक तसेच इतरही अनेक घटकांची आपण माहिती बघू. एक हेक्टर जमीन हा भूमी या घटकाचा एकक.; शंभर रुपये शेकडा हा भांडवलाचा एकक; टक्केवारी (शंभर रुपये गुंतवणूक को मांगे मिळणारा नफा ) हा संघटन या घटकाचा एकक. या प्रत्येक एककाची बाजारात किंमत कशी ठरते याचे विश्लेषण अर्थशास्त्रात केले जाते.
उत्तर लिहिले · 17/4/2022
कर्म · 121765
0

कार्यात्मक विभाजन (Functional Departmentalization):

कार्यात्मक विभाजन म्हणजे एखाद्या संस्थेतील कार्यांचे विशिष्ट विभागांमध्ये वर्गीकरण करणे. हे विभाग त्यांच्या कार्यक्षमतेनुसार आणि विशिष्ट कौशल्यानुसार तयार केले जातात.

उदाहरणार्थ:

  • उत्पादन विभाग (Production Department)
  • विपणन विभाग (Marketing Department)
  • वित्त विभाग (Finance Department)
  • मनुष्यबळ विभाग (Human Resource Department)

कार्यात्मक विभाजनाचे फायदे:

  1. विशेष कौशल्ये: प्रत्येक विभागामध्ये त्या विशिष्ट कार्यासाठी तज्ञ लोक असतात, ज्यामुळे काम अधिक प्रभावीपणे होते.
  2. उत्तम समन्वय: एकाच विभागात काम करणारे लोक एकमेकांशी चांगले समन्वय साधू शकतात.
  3. व्यवस्थापनास सुलभता: प्रत्येक विभागाचे काम स्पष्टपणे परिभाषित केलेले असल्यामुळे व्यवस्थापन करणे सोपे होते.
  4. खर्च कमी: कार्यात्मक विभाजनामुळे खर्चात बचत होते, कारण प्रत्येक विभाग आपल्या कामात अधिक कुशल असतो.

कार्यात्मक विभाजनाचे तोटे:

  1. विभागांमध्ये संघर्ष: कधीकधी वेगवेगळ्या विभागांमध्ये समन्वय नसल्यामुळे संघर्ष निर्माण होऊ शकतो.
  2. ध्येय साध्य करण्यास विलंब: प्रत्येक विभाग आपल्या कामावर लक्ष केंद्रित करत असल्याने, संस्थेच्या ध्येयाकडे दुर्लक्ष होऊ शकते.

कार्यात्मक विभाजन हे मोठ्या संस्थांसाठी उपयुक्त आहे, जिथे विविध कार्ये एकाच वेळी पार पाडायची असतात.

अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 5080

Related Questions

NCMC कार्डची पूर्ण माहिती सांगा?
आधुनिक काळात व्यवहारात नाण्यांच्या संदर्भात निबंध लिहा.
राज्यांच्या कामकाजावर आर्थिक स्थितीची कारणे कोणती आहेत?
पतनिर्मिती प्रक्रिया स्पष्ट करा?
आमचा बचत गट आहे, त्यासाठी नियमावली स्टॅम्प पेपरवर बनवायची आहे. ती कशी बनवतात?
समखर्रच रेषा टिपा लिहा?
उद्योग संस्थेचे अल्पकालीन संतुलन स्पष्ट करा?