2 उत्तरे
2
answers
करार समाप्ती पद्धती कशा स्पष्ट कराल?
1
Answer link
२) मूदतपूर्व करारभंग :
जेव्हा प्रस्तावक करार पूर्ततेची वेळ येण्यापूर्वीच आपले वचन पूर्ण करण्याचे नाकारतो. किंवा आपल्या वर्तनाने अशी परिस्थिती निर्माण करतो की, ज्यामुळे त्या वचनाची पुर्तता होणे अशक्य होते.. तेव्हा त्यास प्रस्तावकाने मुदतपूर्व करार भंग केला असे म्हणतात, मुदतपूर्व करार भंग हा केवळ प्रस्तावक करू शकतो. यामध्ये तो आपले वचन पूर्ण करणार नसल्याचे स्पष्टपणे प्रस्तावत्यास कळवितो. ज्यावेळी मुदतपूर्व करार भंग होतो. तेव्हा प्रस्तावकाला त्याच्या वचनपूर्तीपासून माफी मिळते आणि प्रस्तावकाविरुद्ध त्याला पुढीलप्रमाणे दोन अधिकार प्राप्त होतात.
९. प्रस्तावत्याने मूदतपूर्व करार भंगास प्रत्यक्ष करार भंग झाला असे मानून प्रस्तावकाविरुद्ध करार भंगाबद्दल ताबडतोब नूकसान भरपाईसाठी कोर्टात दावा लावता येतो.
२. करार पुर्ततेची वेळ येईपर्यंत प्रस्तावता प्रस्तावकाविरुद्ध कोणतीही कायदेशीर कारवाई करणार नाही तर तो प्रस्तावकास आपले वचन पूर्ण करण्याची आणखी एक संधी देईल आणि करार पूर्ततेची वेळ येण्याची वाट पाहील. जर प्रस्तावत्याने करार पूर्ततेची वेळ येईपर्यंत बाट पाहिली आणि दावा दाखल केला नाही दरम्यानच्या काळात काही नैसर्गिक घटना घडल्यामूळे प्रस्तावकास करारातील वचनाच्या पूर्तीपासून माफी मिळाली तर प्रस्तवत्याचा प्रस्तावकाविरुद्ध दावा दाखल करून नुकसान भरपाई मागणी करण्याचा हक्क नष्ट होतो.
लक्षात ठेवा करार समाप्तीच्या पद्धती
१. करार पूर्तता झाल्याने
२. परस्पर ठरावाने
३. कायद्यातील तरतुदीनुसार
४. करारात महत्वाचा बदल झाल्याने
५. काल मर्यादा संपल्याने
६. करार पूर्तता अशक्य झाल्याने
७. करार भंग झाल्यामूळे
९.२.६ करार भंगाबद्दलच्या उपाययोजना:
१. अर्थ :
कायदेशीर करारातून करार व्यक्तींना काही निश्चित असे अधिकार प्राप्त होतात. तसेच काही कायदेशीर जबाबदान्या देखील पार पाडाव्या लागतात. जेव्हा करार व्यक्ती या कराराअंतर्गत असलेली त्यांची जबाबदारी पार पाडण्यास नकार देतात, तेव्हा त्यास करार भंग असे म्हणतात. करार भंगामुळे ज्या व्यक्तीस नुकसान सहन करावे लागते, त्यास निर्दोषी व्यक्ती असे म्हणतात. आणि ज्या व्यक्तीने करार भंग केला त्यास दोषी व्यक्ती म्हणतात. अशा निर्दोषी व्यक्तीना दोषी व्यक्तीविरूद्ध करारभंगासाठी जी कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार उपलब्ध असता त्यास करारभंगाबद्दलची उपाययोजना म्हणतात. त्या पुढीलप्रमाणे आहेत
२६.२) करार व्यक्तीचा मृत्यू किंवा असमर्थताः
जेव्हा एखाद्या कराराची पूर्तता ही व्यक्तीच्या कलागुणावर किंवा कौशल्यावर आधारलेली असते. तेव्हा अशा व्यक्तीचा करार पूर्ततेपूर्वी मृत्यू झाला किंवा ती व्यक्ती शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या करार पूर्ण करण्यास असमर्थ ठरली तर करार पूर्तता अशक्य होवून करार समाप्त होतो. उदा. अ नेव च्या थेटरमध्ये विशिष्ट दिवशी गाणी गाण्याचा करार केला. पहिले दोन कार्यक्रम झाले. तिसऱ्या कार्यक्रमाच्या वेळी अ हा इतका आजारी पडला की त्याला तो कार्यक्रम करता आला नाही. त्यामुळे तो करार समाप्त होतो.
३) कायद्यातील बदल :
दोन व्यक्तीमध्ये करार झाल्यानंतर सरकारने अशा कराराशी संबंधित कायद्यामध्ये बदल केला आणि त्यामूळे कराराची पूर्तता अशक्य झाली तर तो करार समाप्त होतो. उदा. अ ने ब ला आपली शेतजमीन विकण्याचा करार केला. करारानंतर सरकारने राजपत्र प्रसिद्ध करून अ ची ती शेतजमीन सार्वजनिक कामासाठी आपल्या ताब्यात घेतली त्यामुळे सरकारी कायद्यात बदल झाल्याने अ आणि व यांच्यातील जमीन विक्रीचा करार समाप्त होतो.
४) युद्ध घोषित होणे :
ज्या देशाचे नागरीक आपल्या देशातील नागरिकांशी करार करतात. तेव्हा ते एकमेकांचे परकीय मित्र असतात. जर या दोन देशांमध्ये युद्ध सुरू झाले तर हेच नागरीक एकमेकांचे परकीय शत्रू बनतात. अशा परकीय शत्रूंना करार करण्यास अपात्र ठरविले असल्याने युद्ध सुरू होण्याच्या तारखेपर्यंत जे करार त्यांच्यात झाले असतील ते समाप्त होतात.
५) विशिष्ट घटना न घडल्यास
जी घटना घटन्यावर कराराची पूर्तता अवलंबून असते. ती घटना घडणे अशक्य झाल्यास करार रद्द होतो आणि कराराची समाप्ती होते.
७. करार भंगामूळे करार समाप्ती
करार व्यक्तींना करारातून निर्माण झालेली कायदेशीर जबाबदारी ही पार पाडावीच लागते. जेव्हा एखादी व्यक्ती करारामध्ये दिलेले आपले वचन पूर्ण करण्यास नकार देते किंवा टाळाटाळ करते. तेव्हा त्या व्यक्तीने करार भंग केला असे म्हणतात. जी व्यक्ती करार भंग करते तिला दोषी व्यक्ती म्हणतात. आणि करार भंगामुळे ज्या व्यक्तीचे नुकसान होते. त्यास निर्दोषी व्यक्ती म्हणतात. करार भंग झाल्यामुळे देखील करार समाप्त होतो. मात्र करार भंगामुळे निर्दोषी व्यक्तीला दोषी व्यक्तीविरूद्ध नुकसान भरपाई बसुल करण्यासाठी दावा लावण्याचा हक्क प्राप्त होतो. करार भंगामूळे करार समाप्तीचे दोन प्रकार पडतात. ते प्रत्यक्ष करार भंग आणि मूदतपूर्व करार भंग होय..
१) प्रत्यक्ष करार भंग
ज्यावेळी प्रत्यक्ष कराराची पुर्तता होणार असते त्यावेळी कराराच्या दोन व्यक्तींपैकी एकाने वचन पूर्ण केले नाही किंवा वचन पूर्ण करण्यास नकार दिला तर त्यास प्रत्यक्ष करार भंग असे म्हणतात.
२५लेखी स्वरूपात बदल करतो, की ज्या बदलामुळे व्यक्तींच्या जबाबदान्या वाढतात तेव्हा त्यास महत्वाचे बदल असे म्हणतात. अशा बदलांमुळे बदलास संम्मती नसलेल्या व्यक्तीची कराराच्या जबाबदारीतून मुक्तता होते आणि तो करार समाप्त होतो. यासाठी खालील तीन अटींची पूर्तता होणे आवश्यक असते.
१. करारातील अटींमधील बदल हा एका व्यक्तीने लेखी केला पाहिजे.
२. असा बदल हा दुसऱ्या व्यक्तीच्या संम्पती शिवाय केला पाहिजे.
३. असा बदल हा महत्वाच्या अटीबाबत असला पाहिजे, म्हणजेच करार व्यक्तींचे हक्क आणि जबाबदाऱ्या बावर परिणाम करणारा असला पाहिजे.
५. कालमर्यादा संपल्याने कराराची समाप्ती एखाद्या करारातील वचनांची पूर्तता ही ठरलेल्या विशिष्ट कालमर्यादेत झाली नाही तर त्या कराराच्या अंमलबजावणीची कालमर्यादा संपल्यामुळे करार समाप्त होतो. भारतीय कालावधी कायदा १९६३ ने वेगवेगळ्या प्रकारच्या करारांना करारपूर्ततेची वेगवेगळी कालमर्यादा घातली आहे.
उदा. कर्जवसुलीचा दावा दाखल करण्याची कालमर्यादा कर्ज दिलेल्या तारखेपासून तीन वर्षे आहे. आणि स्थिर मालमत्तेच्या हक्कांच्या अंमलबजावणीचा कालावधी बारा वर्ष आहे. अशा या दिलेल्या कालावधीच्या मर्यादा संपल्या तर संबंधित व्यक्तींचा दावा लावण्याचा हक्क नष्ट होतो. म्हणून करार पूर्ततेची कालमर्यादा संपल्याने किंवा योग्य कालावधीच्या समाप्तीनंतर करार आपोआप समाप्त होतो.
६. करार पूर्तता अशक्य झाल्याने करार समाप्ती दोन व्यक्तीमध्ये कायदेशीर करार अस्तित्वात आल्यानंतर काही अनपेक्षित घटना घडून आल्यामुळे कराराची पूर्तता करणे अशक्य होते. तेव्हा करार समाप्त होतो, करार व्यक्ती ह्या कराराच्या जबाबदारीतून मुक्त होतात. अशा या करार पूर्ततेच्या अशक्यतेला पश्चात अशक्यता किंवा नैराश्याद्वारे करार समाप्ती असे ही म्हणतात. करार करताना व्यक्तींनी ज्या घटनांचा विचार केलेला असतो, अशा नैसर्गिक, बाह्य घटना ह्या आकस्मितरीत्या घडल्यामूळे करारांची पूर्तता अशक्य होते याला नैराश्येचा सिध्दांत असे ही म्हणतात. हा नैराश्येचा सिध्दांत लागू होवून खालील कारणांमूळे कराराची पूर्तता अशक्य बनते आणि करार समाप्त होतो.
१) कराराचा विषय नष्ट होणे :
करार अस्तित्वात आल्यानंतर करार व्यक्तींचा दोष नसताना काही कारणाने कराराचा महत्वाचा विषय नष्ट होवून करार पूर्तता अशक्य बनते आणि करार समाप्त होतो. उदा. 'अ'ने आपल्या मुलीच्या विवाहासाठी कार्यालय भाड्याने घेण्याचा करार केला. विवाहाच्या तारखेच्या आदल्या रात्री शॉर्टसकटने आग लागून ते कार्यालय पूर्णपणे जळाले. येथे 'अ' आणि कार्यालयाचा मालक यांची काहीही चुक नसताना कराराचा विषय नष्ट झाल्यामुळे करार पूर्तता अशक्य बनून करार समाप्त होतो.हक्क त्याग करणे असे म्हणतात, जेव्हा प्रस्तावता असा हक्क त्याग करतो. तेव्हा प्रस्तावकाची कराराच्या जबाबदारीतून मुक्तता होते आणि करार समाप्त होतो.
६) तडजोड आणि समाधान जेव्हा प्रस्तावकास करारातील अटींप्रमाणे आपले वचन पूर्ण करणे अशक्य होते तेव्हा तो प्रस्तावत्यापुढे तडजोडीचा प्रस्ताव ठेवतो. या प्रस्तावामध्ये करारातील दिलेल्या वचनाच्या मोबदल्यात प्रस्तावक कमी रक्कम किंवा कमी मोलाची वस्तु स्विकारण्यास प्रस्तावत्याला विनंती करतो. जेव्हा अशी विनंती प्रस्तावता मान्य करतो. तेव्हा त्या दोघांमध्ये तडजोड झाली असे म्हणतात. अशा या तडजोडीप्रमाणे नंतर जेव्हा प्रस्तावक आपल्या वचनाची पूर्तता करतो, म्हणजेच कमी रक्कम किंवा कमी मोलाची वस्तु ठरल्याप्रमाणे प्रस्तावत्याच्या तब्यात देतो. तेव्हा दोन्ही पक्षांचे समाधान होवून प्रस्तावक हा आपल्या मूळ वचनाच्या जबाबदारीतून मुक्त होतो आणि दोहोंतील मूळ करार समाप्त होतो.
३. कायद्याच्या तरतुदीमुळे होणारी करार समाप्ती कायद्याच्या तरतुदीमुळे खालील घटना घडल्यास दोन व्यक्तीमधील करार हे आपोआप समाप्त होतात.
१) प्रस्तावकाची दिवाळखोरी जेव्हा प्रस्तावकाला कोर्टामार्फत दिवाळखोर म्हणून घोषित केले जाते. तेव्हा तो दिवाळखोर प्रस्तावक दिवाळखोर होण्याच्या तारखेपर्यंतच्या करारांच्या जबाबदारीतून मुक्त होतो. आणि दिवाळखोरीच्या तारखेपर्यंत त्याने केलेले सर्व करार हे आपोआप रद्द होतात.
२) करार व्यक्तीचा मृत्यू जेव्हा एखाद्या कराराच्या पूर्ततेमध्ये व्यक्तींची गुणवैशिष्ट्ये सामावलेली असतात, तेव्हा अशा करारांची पूर्तता ही स्वतः प्रस्तावकानेच केली पाहिजे. जर करार पूर्ततेपूर्वी पुस्तावकाचा मृत्यू झाला तर असा करार रद्द होतो. त्याच्या पूर्ततेची जबाबदारी दुसऱ्या व्यक्तीवर टाकता येत नाही.
३) प्रस्तावक आणि प्रस्तावता ही एकच व्यक्ती असते जेव्हा प्रस्तावक हा स्वतः प्रस्तावता बनतो. तेव्हा अशा करारातील इतर व्यक्ती ह्या कराराच्या जबाबदारीतून मुक्त होतात आणि करार समाप्त होतो. उदा. क्ष ने य वर व्यापारी हुंडी काढली त्यास य ने स्विकृती दिली. त्यानंतर क्ष ने ती हुंडी कला हस्तांतर केली, क ने पुन्हा ती हुंडी य कडे हस्तांतर केली तर येथे य हा प्रस्तावक आणि प्रस्तावता बनतो. त्यामुळे ती एकच व्यक्ती असल्याने इतर व्यक्तींची कराराच्या जबाबदारीतून मुक्तता होते आणि करार समाप्त होतो.
४) हक्कांचे विलनीकरण जेव्हा कनिष्ट दर्जाच्या हक्काचा करार हा वरिष्ट दर्जाच्या : हक्कामध्ये रूपांतर होतो तेंव्हा कनिष्ट दर्जाच्या हक्काच्या काराची आपोआप समाप्ती होते व करार व्यक्ती या कराराच्या जबाबदारीतून मुक्त होतात. उदा. भाडेकरूने राहत असलेले भाड्याचे घर घरमालकांकडून विकत घेणे.
४. कराराच्या महत्वाच्या बदलामुळे होणारी करार समाप्ती : जेव्हा करारामधील प्रस्तावक हा करारातील महत्वाच्या अटीमध्ये प्रस्तावत्याच्या संमत्ती शिवाय
२३२. करार पूर्ततेच्या पध्दती
१. करार पूर्तता झालेने
जेव्हा दोन्ही करार व्यक्ती या आपल्या वचनांची पूर्तता करारातील अटीनुसार करतात तेव्हा कराराची पुर्तता झाली असे मानुन करार समाप्त होतो. अशा या करार पूर्ततेचे दोन प्रकार पडतात.
१) प्रत्यक्ष करार पूर्तता Actual Performance : जेव्हा करार व्यक्ती ह्या करारातील अटीप्रमाणे आपापल्या वचनांची पूर्तता करातात तेव्हा त्यास प्रत्यक्ष करार पुर्तता असे म्हणतात. प्रत्यक्ष वचनांची पूर्तता झाल्याने करार समाप्त होवून दोन्ही व्यक्ती कराराच्या जबाबदारीतुन मूक्त होतात.
२) करार पुर्ततेचा प्रयत्न Tender Performance करार पूर्ततेच्या प्रयत्नास कायद्यात प्रत्यक्ष करार पूर्तता मानतात. जेव्हा प्रस्तावक करारातील आपले वचन पूर्ण करण्याची प्रस्तावत्यास तयारी प्रदर्शित करतो. परंतु प्रस्तावता त्याचा स्विकार करीत नाही, तेव्हा त्याला करार पुर्ततेचा प्रयत्न असे म्हणतात.
२. परस्परातील ठरावाने करार समाप्ती
ज्या प्रमाणे दोन व्यक्ती ह्या परस्परात ठराव करून करार अस्तित्वात आणतात. त्याप्रमाणे करार व्यक्ती ह्या परस्परात ऐच्छिक ठराव करून करारांची समाप्ती करू शकतात. खालीलपैकी कोणत्याही एका प्रकाराने असा परस्परांत ठराव करून करार समाप्त केला जातो.
१) कराराचे नूतनीकरण : जेव्हा करार व्यक्ती ह्या त्यांच्यातील जुना करार रद्द करून त्याऐवजी नवीन करार अस्तित्वात आणतात. तेव्हा त्यास कराराचे नूतनीकरण असे म्हणतात. या नूतनीकरणामुळे जुन्या कराराची जागा नवीन कराराकडून घेतली जाते, व मूळ कराराची समाप्ती होते.
२) करारातील बदल जेव्हा कराराच्या दोन्ही व्यक्ती ह्या परस्परांच्या संम्मतीने करारातील अटीत बदल करतात, तेव्हा त्यास करारातील अटीच्या बदलामुळे करार समाप्ती असे म्हणतात. करारातील अटी बदलामुळे मूळ करार समाप्त होतो आणि नवीन करार अस्तित्वात येतो.
३) करार रद्द करणे : जेव्हा करारातील एका व्यक्तीने किंवा सर्वानी मिळून स्वेच्छेने करार रद्द करण्याचा निर्णय घेतला तर करार रद्द करण्याच्या ठरावाच्या माध्यमाने कराराची समाप्ती होते.
४) करारात सवलत देणे : जेव्हा प्रस्तावता हा प्रस्तावकाकडून करारात ठरलेल्या प्रतिफला पेक्षा कमी प्रतिफल स्विकारतो किंवा कराराचा काही भाग स्वेच्छेने सोडून देतो तेव्हा त्यास करारात सवलत देण्याचा ठराव करून करार समाप्त करणे असे म्हणतात.
५) हक्क त्याग करणे : ज्यावेळी प्रस्तावता प्रस्तावकाविरुद्ध मिळालेला कायदेशीर हक्क स्वत:हून सोडून देतो. म्हणजेच प्रस्तावता प्रस्तावकास त्याच्या वचन पूर्तीतून माफी देतो. तेव्हा त्यास
२२
0
Answer link
करार समाप्ती (Termination of Contract) म्हणजे करारामध्ये नमूद केलेल्या अटी व शर्तींनुसार, करार कायद्याने रद्द करणे किंवा समाप्त करणे.
करार समाप्तीची कारणे:
- मुदत पूर्ण: कराराचा कालावधी संपल्यावर करार आपोआप समाप्त होतो.
- सामूहिक करार: जेव्हा दोन्ही पक्ष करार समाप्त करण्यास सहमत असतात.
- breach of contract (करारभंग): एका पक्षाने कराराचे उल्लंघन केल्यास, दुसरा पक्ष करार समाप्त करू शकतो.
- अशक्य परिस्थिती: काही विशिष्ट घटनांमुळे कराराची पूर्तता करणे अशक्य झाल्यास, करार संपुष्टात येऊ शकतो. उदाहरणार्थ, नैसर्गिक आपत्ती.
- कायद्यानुसार समाप्ती: काही विशिष्ट कायद्यांनुसार देखील करार समाप्त केला जाऊ शकतो.
करार समाप्तीच्या पद्धती:
- नोटीस देऊन समाप्ती: करारात नमूद केलेल्या वेळेनुसार, एक पक्ष दुसऱ्या पक्षाला नोटीस देऊन करार समाप्त करू शकतो.
- तात्काळ समाप्ती: कराराचे उल्लंघन झाल्यास, एक पक्ष दुसऱ्या पक्षाला तात्काळ करार समाप्त करण्याची नोटीस देऊ शकतो.
- कोर्टाद्वारे समाप्ती: काही प्रकरणांमध्ये, कोर्टाच्या आदेशानुसार करार समाप्त केला जाऊ शकतो.
महत्वाचे मुद्दे:
- करार समाप्तीची प्रक्रिया करारात स्पष्टपणे नमूद केलेली असावी.
- करार समाप्त करण्यापूर्वी कायदेशीर सल्ला घेणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी आपण कायदेविषयक पुस्तके आणि संकेतस्थळांची मदत घेऊ शकता.