अन्न साठवणूक

फ्रीजमध्ये ठेवलेले अन्न किती दिवस चांगले (खाण्यायोग्य) राहू शकते?

2 उत्तरे
2 answers

फ्रीजमध्ये ठेवलेले अन्न किती दिवस चांगले (खाण्यायोग्य) राहू शकते?

1
आजकाल सर्रास बहूतेक घरात फ्रिज पहायला मिळतो. रोजचं उरलेलं अन्न, भाज्या, फळे, यांची साठवणूक करण्यासाठी फ्रिज उपयोगी पडते. मात्र अनेकांना यात किती वेळ अन्न ठेवलेले चांगले असते हे माहित नसतं. अनेक जण फ्रिजमध्ये ठेवलेले अन्न २ ते ३ दिवस खातात.


ब-याचदा आपण एकाच रांगेत कच्चे आणि शिजलेले अन्न ठेवतो. मात्र असे केल्याने फ्रिजमध्ये बॅक्टेरिया वाढतात. त्यामुळे कच्चे आणि शिजलेले अन्न वेगवेगळ्या रांगेत झाकून ठेवावे. नाहीतर कच्च्या अन्नातील बॅक्टेरिया शिजलेल्या अन्नात जाऊन ते अन्न खराब करतील.
फ्रिजमध्ये शिजलेला भात दोन दिवस चांगला राहतो. पण यातील पोषकद्रव्ये नष्ट झालेली असतात. तरी पण खावासा वाटलाच तर तो फ्रिजबाहेर काढून गरम वातावरणात ठेऊन मग गरम करून खावे.
फ्रिजमध्ये ठेवलेली (पोळी) चपाती ब-याचदा लोकं आठवडाभर खातात. मात्र यातील पण पोषकमुल्य नष्ट झालेली असतात. त्यामुळे पोटदुखीचा त्रास उद्भवू शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त १२ ते १४ तास फ्रिज मध्ये ठेवलेली खाणे हितकारक आहे.
आणि शिजवलेल्या भाज्या आणि डाळी पण १२ ते १४ तासात वापरल्या तर त्या खाण्यास योग्य असतात.
अनेकदाआपण कापलेली फळं देखील फ्रिजमध्ये ठेवतो. मात्र कापल्यानंतर फळांचे सेवन ६ तासात करावे. नाहीतर ते खराब होते आणि मग फुड पॉयझनिंग होऊन गंभीर आजाराचा सामना करावा लागतो.
उरलेले चिकन किंवा मांस दोन दिवसांपेक्षा जास्त दिवस ठेवू नये. आणि खाताना पुन्हा गरम करूनच खावे. तसेच दही, दूध, किंवा क्रिम या पदार्थांची पॅकिंग एकदा उघडल्यानंतर पुन्हा नीट बंद करून लगेचच फ्रिजमध्ये ठेवावे.
चिज सारखे पदार्थ एक महिन्यापर्यंत राहू शकतात. पण क्रिम आणि दूध पाच दिवसापेक्षा जास्त ठेवू नये. फ्रिज आहे म्हणून कितीही दिवस अन्न ठेवले तरी चालेल असा गैरसमज कृपा करून घेऊ नका.
अनेकांना फ्रिजमधील थंडगार पाणी पिण्याची सवय असते. मात्र अती थंड पाणी शरीरासाठी अपायकारक असतो. त्यामुळे अती थंड पाणी पिणे टाळावे.
खरं सांगायचं तर, फ्रिजमध्ये अन्न ठेवल्याने त्यातील सगळी पोषण मूल्य नाश पावतात. याचा अर्थ आपण सगळी पोषण मूल्य निघून गेल्यावर अन्नाचा राहिलेला गार चोथा आपण आपल्या पोटात ढकलतो.
म्हणून अन्न पदार्थ नेहमी ताजे खावे. शक्यतो ज्या दिवशी केलेत त्याच दिवशी संपवून टाकावे. म्हणजे आपल्या शरीराला कोणतीही हानी होणार नाही.
* सध्या तर जगभर कोरोनाचा कहर सुरू आहे. अश्या वेळी गरम ताजे अन्न खाणेच सर्वात उत्तम आहे. कारण शिळे अन्नाने फायदा होण्यापेक्षा नुकसानच जास्त होण्याचा धोका असतो.
स्वस्थ राहा, सुरक्षित रहा.🙏🙂
उत्तर लिहिले · 12/4/2022
कर्म · 121765
0

फ्रीजमध्ये ठेवलेले अन्न किती दिवस टिकते हे अन्नाचे स्वरूप आणि फ्रीजमधील तापमान यावर अवलंबून असते.

सामान्य मार्गदर्शन:
  • शिजवलेले अन्न: ३-४ दिवस
  • कच्चे मांस: १-२ दिवस
  • कच्ची फळे आणि भाज्या: ३-७ दिवस (काही जास्त)
  • दूध आणि दुग्धजन्य पदार्थ: १ आठवडा

हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की ही केवळ अंदाजे आकडेवारी आहे. अन्नाची गुणवत्ता आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी, ते खाण्यापूर्वी वास घेणे आणि तपासणे महत्त्वाचे आहे.

अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1620

Related Questions

खाद्यतेल दीर्घकाळ साठविण्यासाठी हवाबंद डबा वापरणे योग्य ठरते?
शीतगृह म्हणजे काय?
खाद्यतेल दीर्घकाळ साठवण्यासाठी हवाबंद डबा वापरणे योग्य ठरते का?
जुन्या काळात फ्रिज नव्हते तेव्हा तूप तयार करण्यासाठी साय कसे साठवत असत?
सोयाबीन ऊन्हात वाळवल्यावर १ महिन्यानंतर त्याचे वजन कमी होते की वाढते?
कांदा साठवणुकीसाठी शीतगृहाची माहिती द्यावी?
गूळ शेंगदाण्याचे लाडू हवाबंद प्लास्टिक डब्यात किती दिवस टिकतील, त्यासाठी काय उपाय करावेत?