2 उत्तरे
2
answers
भूकंपाची लक्षणे कोणती आहेत?
2
Answer link
भूकंपाची लक्षणे
. भूकंपाची सर्वसाधारण लक्षणे
भूकंप होत असतांना खालीलपैकी एक वा अधिक लक्षणे अनुभवण्यास मिळतात.
१. भूमीतून गुरगुर असा आवाज येतो.
२. मांडणीतील भांडी हादरतात.
३. भिंतीचा गिलावा तडकून त्याचे पोपडे खाली पडतात.
४. भिंतींना तडे जातात, दुर्बल घरे आणि भिंती ढासळतात.
५. भूपृष्ठावर भौगोलिक पालट होतात. भूकंपामुळे भूपृष्ठाचा भाग मागे-पुढे किंवा वर-खाली होतो.
६. रस्त्यांना भेगा पडणे, तसेच कडे, दरडी आणि पूल कोसळतात.
७. आगगाडीचे रूळ वाकतात किंवा वेडेवाकडे होतात.
८. धरणांच्या भक्कम भिंतींना तडे जातात.
९. सागरी भूकंपामुळे ‘सुनामी लाटा’ निर्माण होतात. या शेकडो फूट उंचीच्या लाटा समुद्रकिनारी हाहाःकार उडवून देतात.
0
Answer link
भूकंपाची काही सामान्य लक्षणे खालीलप्रमाणे आहेत:
भूकंपाची तीव्रता आणि केंद्रस्थान यानुसार लक्षणांमध्ये बदल होऊ शकतो.
- जमिनीला अचानक हादरा जाणवणे: भूकंपाचे हे सर्वात स्पष्ट लक्षण आहे. जमिनीमध्ये काही सेकंद ते काही मिनिटांपर्यंत कंपन जाणवते.
- घरांना किंवा वस्तूंना हादरा: घरातले फर्निचर, लटकलेले दिवे आणि इतर वस्तू हलणे किंवा पडणे.
- आवाज: भूकंपाच्या वेळी जमिनीतून मोठा आवाज येणे, जो गडगडाटासारखा किंवा स्फोटासारखा असू शकतो.
- दरड कोसळणे: डोंगराळ भागात भूकंपांमुळे दरडी कोसळू शकतात.
- त्सुनामी: समुद्राजवळ भूकंप झाल्यास त्सुनामी येण्याची शक्यता असते.
- भूकंपपूर्व लहान धक्के: मोठ्या भूकंपाच्या आधी लहान धक्के जाणवतात, ज्यांना 'फोreshocks' म्हणतात.