नैसर्गिक आपत्ती भूकंप

भूकंप आल्यावर तुम्ही काय कराल?

2 उत्तरे
2 answers

भूकंप आल्यावर तुम्ही काय कराल?

0


भूकंप भूकंपादरम्यान काय करावे?
 भूकंप परिस्थिती निर्माण झाल्यास अधिकाधिक सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करा. कधीकधी सुरुवातीला भूकंपाचा लहान धक्का बसतो व त्यानंतर त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता असते. अशावेळी कमीत कमी हालचाल करुन सुरक्षित स्थळी पोहोचावे आणि जमिनीची हालचाल थांबेपर्यंत घरात/वास्तूत थांबावे व लगेचच बाहेर पडून सुरक्षित जागी जावे.

घरामध्ये असाल तर.. 
• जमिनीवर बसा; अभ्यासाचं टेबल किंवा कोणत्याही एखाद्या फर्निचरखाली जाऊन स्वतःला झाकून घ्या आणि जमिनीची हालचाल थांबेपर्यंत तेथेच थांबा. तुमच्या आसपास कुठे टेबल किंवा डेस्क नसेल तर घराच्या एखाद्या कोपऱ्यात खाली बसून दोन्ही हात गुडघ्यभोवती गुंडाळून त्यात तुमचा चेहरा झाकून घ्या.

• आतला दरवाज्याची चौकट, खोलीचा कोपरा, टेबल किंवा पलंगाच्या खाली थांबून स्वतःचे रक्षण करा.

• काचा, खिडक्या, बाहेरील दरवाजे आणि भिंती किंवा कोसळू शकणाऱ्या कोणत्याही गोष्टीपासून लांब राहा.

• भूकंप आला असेल आणि तुम्ही अंथरुणात असाल तर तेथेच थांबवा. स्वतःचे डोके आणि चेहरा उशीने झाकून तेथेच थांबा. मात्र छतावर असलेली एखादी अवजड वस्तू खाली कोसळत नाहीये याची खात्री करा. अशावेळी एखाद्या जवळच्या सुरक्षित स्थळी जाऊन थांबा. 
• जवळ असणाऱ्या एखाद्या प्रवेशद्वाराचा निवाऱ्यासाठी वापर करा. मात्र, या प्रवेशद्वाराचा मजबूत आधार मिळेल ही खात्री करुन घ्या. 
• जमिनीची हालचाल थांबेपर्यंत आतच थांबा आणि मग बाहेर जा. भूकंप आल्यानंतर लोक बाहेर पडून इतर ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतानाच जखमी होतात असे अनेक संशोधनाअंती आढळून आले आहे. • भूकंप आल्यानंतर वीज पसरु शकते किंवा स्प्रिंकलर सिस्टम्स किंवा फायर अलार्म्स सुरु होऊ शकतात.

घराबाहेर असाल तर.. 
• तुम्ही सध्या असाल त्या जागेवरुन कुठेही हलू नका. मात्र, इमारती, झाडे, पथदिवे आणि विजेच्या तारांपासून दूर व्हा.

• जर तुम्ही मोकळ्या जागेवर असाल, तर भूकंपाचे धक्के कमी होईपर्यंत तिथेच थांबा. इमारतीबाहेरची जागा, बाहेर पडण्याची ठिकाणी आणि बाहेरील भिंतीशेजारी मोठा धोका असतो. भूकंपाचा परिणाम म्हणून बऱ्याचददा भिंती कोसळतात, काचा फुटतात आणि वस्तू जागेवरुन पडतात असे आढळून आले आहे.

चालत्या वाहनात असाल तर... 
• सुरक्षित ठिकाण पाहून लगेच वाहन थांबवा आणि तुम्हीदेखील वाहनाच्या आत थांबा. मात्र, इमारती, झाडे, विजेच्या तारांजवळ थांबू नका. • भूकंप थांबल्यानंतर हळूहळू वाहन सुरु करा. भूकंपाचा धक्का बसलेले रस्ते, पूल आणि उतारावरुन जाण्याचे टाळा.

ढिगाऱ्याखाली अडकले असाल तर... 
• काडी पेटवू नका. 
• धूळीखाली असताना हलू नका किंवा ढिगाऱ्याला लाथा मारु नका 
• हातरुमाल किंवा कपड्याने आपले तोंड झाकून घ्या. 
• जवळचा पाईप किंवा भिंत वाजवा जेणेकरुन बचावकार्य करणाऱ्या लोकांना तुम्हाला शोधता येईल. एखादी व्यक्ती जवळ असेल तर शिटी वाजवा. शेवटचा उपाय म्हणून आरडाओरडा करा. कारण असे केल्यास तुमच्या शरीरात धोकादायक प्रमाणात धूळ जाण्याची शक्यता आहे.

पूर जर तुमच्या आजूबाजूच्या भागात जर पूर आला असेल तर... 
• माहितीसाठी रेडिओ किंवा टीव्ही ऐका. 
• अतिवृष्टीमुळे पूर येऊ शकतो हे लक्षात ठेवा. पावसामुळे पूर येण्याची शक्यता असल्यास उंचावर जाऊन थांबा. त्यासाठी कोणाच्याही सूचनेची वाट पाहू नका. 
• प्रवाह, ड्रेनेज चॅनेल, कॅन्यन आणि पूराचा धोका असणाऱ्या प्रदेशांमध्ये सावधान राहा. अशा भागांमध्ये कोणत्याही पुर्व इशाऱ्याशिवाय पूर येऊ शकतो.

तुम्ही घराबाहेर पडण्याची तयारी करत असाल तर... 
• आपले घर सुरक्षित ठेवा. हातात वेळ असेल तर बाहेरचे फर्निचर आत आणून ठेवा. महत्त्वाच्या वस्तू वरच्या मजल्यावर हलवा. 
• तुम्हाला सूचना मिळाली असेल तर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे मुख्य स्विचेस आणि वॉल्व बंद करा. सर्व विद्युत उपकरणे बंद करुन ठेवा. तुम्ही पाण्यात असाल किंवा ओले झाले असाल तर विद्युत उपकरणांना स्पर्श करू नका.


उत्तर लिहिले · 4/3/2023
कर्म · 53710
0
ভূমিকম্প आल्यावर काय करावे हे येथे आहे:

भूकंप येत आहे असे जाणवल्यास:

  • शांत राहा: घाबरू नका.
  • सुरक्षित ठिकाणी आसरा घ्या:
    • घरामध्ये असल्यास, टेबलाखाली किंवा मजबूत फर्निचरच्या खाली स्वतःला सुरक्षित करा.
    • घराबाहेर असल्यास, इमारती, झाडे आणि वीजवाहिन्यांपासून दूर राहा.
  • डोक्याचे संरक्षण करा: डोक्याला आणि मानेला हाताने किंवा इतर वस्तूने झाका.

भूकंप थांबल्यानंतर:

  • नुकसान तपासा: स्वतःला आणि इतरांना काही दुखापत झाली आहे का ते पहा.
  • घरातून बाहेर पडा: जर घर असुरक्षित वाटत असेल तर शक्य तितक्या लवकर बाहेर पडा.
  • सुरक्षित ठिकाणी जा: भूकंपानंतर काही वेळाने आफ्टरशॉक (भूकंपाचे धक्के) येऊ शकतात, त्यामुळे सुरक्षित ठिकाणी थांबा.
  • मदत मागा: आपत्कालीन सेवांना संपर्क करा आणि आवश्यक असल्यास मदतीसाठी तयार राहा.

इतर महत्वाचे मुद्दे:

  • भूकंप किट तयार ठेवा: आवश्यक वस्तू (पाणी, फर्स्ट-एड किट, बॅटरी, इत्यादी) असलेली एक किट तयार ठेवा.
  • आपत्कालीन योजना तयार करा: कुटुंबासोबत आपत्कालीन परिस्थितीत काय करायचे याबद्दल योजना तयार करा.
  • जागरूक राहा: भूकंपाच्या धोक्यांबद्दल आणि तयारीच्या उपायांबद्दल माहिती ठेवा.

हे काही महत्वाचे मुद्दे आहेत जे तुम्हाला भूकंपाच्या वेळी सुरक्षित राहण्यास मदत करू शकतात.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1040

Related Questions

अंतरंगातील शीघ्र भू हालचाली कोणत्या घटकावर आधारित आहेत?
भूकंपाची तीव्रता कोणत्या परिमाणात मोजली जाते?
खालील आपत्तीच्या वेळी लष्कराने जनतेला काय मदत केली व त्या प्रत्येक घटनेची माहिती कशी मिळवाल? गुजरात मधील भूकंप (२००१)
भूकंप म्हणजे काय ?
ज्वालामुखी उद्रेकामुळे भूकंप होऊ शकतो का?
भूकंप लहरीं विषयी सविस्तर कसे लिहाल?
भूकंपाची लक्षणे कोणती आहेत?