भूगोल भूगर्भशास्त्र भूकंप

भूकंप म्हणजे काय ?

भूकवचाखाली असणाऱ्या द्रवरूपी पदार्थामुळे जमिनीस जे हादरे बसतात त्याला भूकंप म्हणतात. भूकंपामुळे जमिनीच्या पोटात असणारे विविध स्तर मागे – पुढे , खाली- वर सरकून जमिनीला भेगा पडल्यामुळे भूकंप होतो. भूगर्भाचा अभ्यास करणाऱ्या काही तज्ज्ञांच्या मते जगभरात दरवर्षी सुमारे ३० लाख भूकंप होतात. मात्र हे आपल्या सहजासहजी लक्षात येत नाही. कारण बऱ्याच ठिकाणच्या भूकंपाची तीव्रता कमी असते. निरिक्षणावरून असे लक्षात येते कि बहुसंख्य भूकंप हे समुद्रात होतात. भूकंपाचीनोंद करणाऱ्या यंत्रास सेस्मोग्राफ म्हटलं जातं. ही नोंद रिश्टर स्केल या गणिती एककात मोजतात. ही यंत्रे बऱ्याचदा मोठया- मोठया धरणांजवळ बसवलेली असतात. कारण अशा ठिकाणी जमिनीत पाणी मुरुन भूकंप होण्याची शक्यता असते. याठिकाणी भूकंप झालच तर जलाशय फुटून मोठे नुकसान होऊ शकते.

भूकंपाची कारणे
१.ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूकंप होतात.

2. मोठ –मोठया धरणाचा जमिनीवर पडणारा ताण, खाण काम, मोठया रस्त्याचा कामासाठी सुरुंग लावाणे, जमिनीच्या आत घेतल्या जाणाऱ्या अणुचाचण्या अशा मानवनिर्मित कारणांमुळे देखील भूकंप होतात.

3. पृथ्वीच्या पोटात प्रचंड उष्णता असल्याकारणाने त्यात असलेला तप्त लाव्हारस उफाळून वर येऊन भूकंप होतात.

भूकंपाचे परिणाम
1. भूकंपामुळे मनुष्यासह वन्यजीव व पाळीव प्राणी यांची जीवित हानी होते.

2. जमिनीला तडे गेल्यामुळे घरे, लहान-मोठया इमारती, रस्ते,शासकीय कार्यालये जमीन दोस्त होतात.त्यामुळे मोठया प्रमाणात वित्त हानी होते.

3. विजेचे खांब, वीजवाहक तारा, रस्ते,रेल्वे रूळ धरणे, गॅस व जल वाहिन्या यांचे मोठया प्रमाणात नुकसान होऊन पुन्हा नवी आपत्ती ओढवण्याची शक्यता असते.

४. जैवविविधतेचे नुकसान होऊन परीसंस्था धोक्यात येते.

५. भूकंपामुळे बऱ्याचदा नदया, नाले आपले प्रवाह बदलतात.

६. मनुष्य व प्राण्यांची जीवितहानी झाल्यामुळे परिसरात दृगंधी पसरून रोगराई निर्माण होते.

भूकंप काळात घ्यावायची दक्षता
घरातून बाहेर पडण्यापूर्वी
१.जाणीव होताच शक्य होईल तितक्या लवकर मोकळ्या मैदानात जाण्याचा प्रयत्न करावा.

२. घरातील वृद्ध,अपंग,लहान मुले यांना मोकळ्या मैदानात नेण्याचा प्रयत्न करा.

३. घरातील विजेची उपकरणे बंद करून ठेवावीत.

४. घरातील स्टोव्ह, गॅस बंद करा.

५. घरातून बाहेर पडताना डोक्यावर जाड कापड उदा. ब्लंकेट अथवा गोधडीची घडी, उशी ठेऊन सुरक्षित बाहेर पडा.

६. सोबत पिण्याचे पाणी, खाण्याचे थोडेफार साहित्य ठेवा.

घरातून बाहेर पडल्यानंतर
१. मोकळ्या जागेत उभे राहा.

२. आसपास उंच झाडे ,इमारती,विजेच्या तारा व खांब नाहीत याची खात्री करा.

३. डोंगराळ किंवा उंच परिसर असेल तर घरंगळत येणाऱ्या दगडांपासून सावध राहा.

४. थोडं स्थिर झाल्यावर आपल्या घरातील, शेजारी, लहान मुले, वृद्ध, अपंग सुरक्षित आहेत का? याची खात्री करा.

भूकंपानंतर
१. लहान मुले, वयोवृद्ध व अपंग व्यक्तींकडे विशेष लक्ष द्यावे.

२. मृत व्यक्तींना ओळखण्यास मदत करा व त्यांच्या कुटुंबीयांना शक्य होईल ती मदत करा.

३. मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना धीर देण्याचा प्रयत्न करा.

४. भुकंपा दरम्यान काही इजा झाली असेल तर त्वरित उपचार घ्या.

५. तात्पुरत्या स्वरुपात आपली एखादया घरात राहण्याची व्यवस्था केली असेल तर घराला कुठलाही धोका नाही ना ? याची खात्री करा.

 
1 उत्तर
1 answers

भूकंप म्हणजे काय ?

1
भूकंप म्हणजे जमिनीची होणारी हालचाल. कधी-कधी आपण जमिनीवर धक्के अनुभवतो. यालाच भूकंप म्हणतात.
उत्तर लिहिले · 4/9/2022
कर्म · 2530

Related Questions

अंतरंगातील शीघ्र भू हालचाली कोणत्या घटकावर आधारित आहेत?
भूकंपाची तीव्रता कोणत्या परिमाणात मोजली जाते?
भूकंप आल्यावर तुम्ही काय कराल?
खालील आपत्तीच्या वेळी लष्कराने जनतेला काय मदत केली व त्या प्रत्येक घटनेची माहिती कशी मिळवाल? गुजरात मधील भूकंप (२००१)
ज्वालामुखी उद्रेकामुळे भूकंप होऊ शकतो का?
भूकंप लहरीं विषयी सविस्तर कसे लिहाल?
भूकंपाची लक्षणे कोणती आहेत?