संस्कृती धार्मिक महत्त्व धर्म

गुढीवरील तांब्याच्या कलशाचे महत्त्व कोणते आहे?

2 उत्तरे
2 answers

गुढीवरील तांब्याच्या कलशाचे महत्त्व कोणते आहे?

1
गुढीवरील तांब्याच्या कलशाचे महत्त्व !
गुढीवर तांब्याचा कलश उपडा घालतात. हल्ली काही जण स्टीलचे किंवा तांब्याचे पेले किंवा मडक्याच्या आकाराचे तत्सम काही भांडी गुढीवर ठेवत असल्याचे पहायला मिळते. ‘तांब्याचा कलश गुढीवर उपडा ठेवावा’ असे धर्मशास्त्र का सांगते, हे लक्षात येण्यासाठी त्यामागचे अध्यात्मशास्त्रीय विवेचन येथे देत आहोत. यावरून आपल्या संस्कृतीचे अनन्यसाधारण महत्त्व आणि प्रत्येक कृती धर्मशास्त्रानुसार का करावी, हे ही लक्षात येईल !

 

१. गुढीवरील तांब्या उपडा का ठेवतात ?
तांब्याचे तोंड जमिनीकडे असल्याने तांब्याच्या कलशाच्या पोकळीतून प्रक्षेपित होणार्या लहरींमुळे तांब्यात असलेली कडुलिंबाची पाने आणि रेशमी वसन (गुढीवरील रेशमी वस्त्र) हे सात्त्विक लहरींनी भारीत बनते. भूमीच्या आकर्षणशक्तीमुळे हा रूपांतरित सगुण ऊर्जाप्रवाह जमिनीच्या दिशेने संक्रमित होण्यास आणि त्याचे जमिनीवर सूक्ष्म-आच्छादन बनण्यास साहाय्य होते. तांब्याची दिशा सुलट ठेवली, तर संपूर्णतः ऊर्ध्व दिशेने लहरींचे प्रक्षेपण झाल्याने जमिनीलगतच्या कनिष्ठ आणि मध्यम स्तराचे शुद्धीकरण न झाल्याने वायूमंडलातील फक्त ठराविक अशा ऊर्ध्व पट्ट्याचेच शुद्धीकरण होण्यास साहाय्य होते. याउलट तांब्याच्या कलशाच्या तोंडाची दिशा भूमीकडे ठेवल्याने त्यातून प्रक्षेपित होणार्या लहरींचा फायदा जमिनीच्या लगतच्या आणि मध्यम पट्ट्यातील वायूमंडलाला, याबरोबरच उर्ध्वमंडलाला मिळण्यास साहाय्य होते. – एक विद्वान (१७.३.२००५, सायं. ६.३३)

 

२. तांब्याच्या कलशाची ब्रह्मांडातील सात्त्विक लहरी
ग्रहण आणि प्रक्षेपण करण्याची क्षमता अधिक असणे !
गुढीवर असलेल्या तांब्याच्या कलशाची ब्रह्मांडातील उच्च तत्त्वाशी संबंधित सात्त्विक लहरी ग्रहण आणि प्रक्षेपण करण्याची क्षमता अधिक असल्याने या कलशातून प्रक्षेपित होणार्या सात्त्विक लहरींमुळे कडुनिंबाच्या (कडुलिंबाच्या) पानातील रंगकण कार्यरत होण्यास साहाय्य होते. या पानांच्या रंगकणांच्या माध्यमातून रजोगुणी शिव आणि शक्ती लहरींचे वायूमंडलात प्रभावी प्रक्षेपण चालू होते.

 

३. तांब्याच्या कलशातून संक्रमित झालेल्या
निर्गुण लहरींचे कडुनिंब आणि रेशमी वस्त्र
यांच्याकडून प्रभावी ग्रहण आणि प्रक्षेपण होणे
तांब्याच्या कलशातून संक्रमित झालेल्या निर्गुण कार्यरत लहरींचे कडुनिंबाच्या (कडुलिंबाच्या) पानांच्या स्तराला सगुण लहरींमध्ये रूपांतर होते. त्यानंतर या लहरी रेशमी वसनाच्या (गुढीवरील रेशमी वस्त्राच्या) माध्यमातून प्रभावीपणे ग्रहण केल्या जाऊन त्या आवश्यकतेप्रमाणे अधोदिशेकडे प्रक्षेपित केल्या जातात.

 

४. कडुलिंब, कलश आणि वस्त्र या तिघांमधून
निर्माण होणार्या लहरींनी वायूमंडल शुद्ध होणे
कडुनिंबाच्या (कडुलिंबाच्या) पानांतून प्रक्षेपित होणार्या शिव-शक्तीशी संबंधित कार्यरत रजोगुणी लहरींमुळे अष्टदिशांचे वायूमंडल, तसेच तांब्याच्या कलशातून प्रक्षेपित होणार्या लहरींमुळे उर्ध्व दिशेचे वायूमंडल आणि रेशमी वसनातून प्रक्षेपित होणार्या लहरींमुळे अधोदिशेचे वायूमंडल शुद्ध आणि चैतन्यमय बनण्यास साहाय्य होते.

 

५. तांब्याचे तोंड जमिनीच्या दिशेला
असूनही उर्ध्व दिशेचे वायूमंडल शुद्ध होणे
गुढीतील घटकांना देवत्व प्राप्त झाल्यामुळे तांब्याच्या कलशाच्या पोकळीत घनीभूत झालेल्या नादलहरी कार्यरत होतात. या नादलहरींमध्ये वायू आणि आकाश ही उच्च तत्त्वे सामावलेली असल्याने तांब्याच्या कलशातून प्रक्षेपित होणार्या लहरींची गती ही उसळणार्या कारंजाप्रमाणे आणि ऊर्ध्वगामी असल्याने या लहरींच्या प्रक्षेपणामुळे उर्ध्व दिशेचे वायूमंडल शुद्ध होते. – सूक्ष्म जगतातील एक विद्वान

 

६. तांब्यावर स्वस्तिक का काढावे ?
तांब्यावर स्वस्तिक काढणे
तांब्यावर स्वस्तिक काढणे
स्वस्तिक हे शुभचिन्ह आहे. स्वस्तिकातून सात्त्विक स्पंदने बाहेर पडतात आणि त्यातील चैतन्यामुळे वातावरणातील काळे आवरण दूर होण्यास साहाय्य होते. त्यामुळे तांब्यावर कुंकवाने स्वस्तिक काढावे.

 

कलशाला कुंकू लावतांना
आणि लावल्यावर होणारी सूक्ष्मातील प्रक्रिया
खालील चित्रे मोठी करून पहाण्यासाठी चित्रांवर क्लिक करा !




उत्तर लिहिले · 20/3/2022
कर्म · 121765
0
गुढी पाडव्याच्या दिवशी गुढी उभारताना तांब्याच्या कलशाला विशेष महत्त्व असते. त्याचे काही महत्त्वाचे कारण खालीलप्रमाणे आहेत:

1. समृद्धी आणि शुभता:

तांब्याचा कलश समृद्धी आणि शुभतेचे प्रतीक मानला जातो. गुढीवर हा कलश ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि भरभराट होते, असे मानले जाते.

2. आरोग्य:

तांब्यामध्ये पाणी शुद्ध करण्याची क्षमता असते. त्यामुळे तांब्याचा कलश आरोग्य आणि चांगल्या आरोग्याचे प्रतीक मानले जाते.

3. नकारात्मक ऊर्जा दूर करणे:

तांब्यामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता असते, त्यामुळे गुढीवर तांब्याचा कलश ठेवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते.

4. परंपरा आणि संस्कृती:

गुढी पाडव्याच्या परंपरेत तांब्याच्या कलशाला महत्वाचे स्थान आहे. हा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे.

5. देवतांचे आवाहन:

तांब्याचा कलश हा देवतांचे प्रतीक मानला जातो. गुढीवर कलश ठेवल्याने देवतांचे घरात आगमन होते, अशी मान्यता आहे.

हे काही महत्त्वाचे उद्देश आहेत, ज्यामुळे गुढी पाडव्याच्या दिवशी तांब्याच्या कलशाला विशेष महत्त्व दिले जाते.
उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1040

Related Questions

बेलाच्या झाडाचे महत्व काय आहे?
उजव्या हाताने पूजा आणि भोजन करणे का शुभ मानले जाते?
गणपती मंदिराबाहेर शमीचे झाड का असते?
उदे उदे असे देवी समोर का म्हणतात व त्याचा अर्थ काय?
श्री विठ्ठलाला तुळशी आणि मंजिरी हार का वाहतात?
ऋषि पंचमीचे महत्त्व काय आहे?
Mangalsutra che mahatva kay aahe?