सण अध्यात्म धार्मिक महत्त्व

ऋषि पंचमीचे महत्त्व काय आहे?

3 उत्तरे
3 answers

ऋषि पंचमीचे महत्त्व काय आहे?

5
फक्त आपल्या भारतातच नव्हे तर संपूर्ण विश्वात आपल्या ऋषीमुनींबद्दल आकर्षण आहे. अतीव आदर आहे. अशा या श्रेष्ठ, जेष्ठ, ज्ञानी ऋषींबद्दल आपणास वाटणारा आदर, निष्ठा, भक्ती व्यक्त करणे हेच ऋषीपंचमीचे प्रयोजन आहे.

गणपतीचे आगमन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुद्ध पंचमीला ऋषीपंचमीचे व्रत करतात. या दिवशी स्त्रिया रजस्वला अवस्थेत असताना अजगातेपणी केलेल्या स्पर्शाचा दोष दूर करण्याकरीता अरुंधती, कश्यपादि ऋषींना प्रसन्न करण्यासाठी सप्तर्शीचे पूजन करतात. पूजा केल्यानंतर बैलांच्या श्रमाचे कोणतेही पदार्थ खात नाहीत. कंदमुळे खातात. ऋषीमुनी अरण्यात राहतात. अरण्यात उगवणारी कंदमुळे खाऊन ते आपले पोट भरतात. त्याची आठवण म्हणून आपण एक दिवस तरी नैसर्गिकरित्या तयार झालेले अन्न खावे व हा दिन साजरा करावा असा प्रघात आहे.

आपल्या हिंदू संस्कृतीत कश्यप, अत्रि, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी व वशिष्ठ ह्या ऋषीसप्तकाने म्हणजेच सप्तश्रींनी आपल्यासाठी ज्ञानाचे घडे भरून ठेवले आहेत. अशा या थोर विभूतींनी दाखविलेल्या मार्गावरून आचरण करण्याची कृतज्ञतापूर्वक प्रतिज्ञा करणे हाच ऋषीपंचमीचा उद्देश व संदेश आहे.

तिथी
ऋषिपंचमी हे व्रत भाद्रपद शुद्ध पंचमी या तिथीला साजरे करतात.

ऋषि
कश्यप, अत्रि, भरद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नि आणि वसिष्ठ हे सप्तर्षी आहेत.

उद्देश
अ. ‘ज्या ऋषींनी आपल्या तपोबलाने जगतातील मानवावर अनंत उपकार करून ठेवले आहेत, मानवाच्या जीवनाला योग्य दिशा दाखविली आहे, त्या ऋषींचे स्मरण या दिवशी केले जाते.’

आ. मासिक पाळी, अशौच आणि स्पर्शास्पर्श यांचा स्त्रियांवर होणारा परिणाम या व्रताने, तसेच गोकुळाष्टमीच्या उपवासानेही कमी होतो. (पुरुषांवर होणारा परिणाम क्षौरादी प्रायश्चित्त कर्माने आणि वास्तूवर होणारा परिणाम उदकशांतीने कमी होतो.)

व्रत करण्याची पद्धत

अ. या दिवशी स्त्रियांनी सकाळी आघाड्याच्या काडीने दात घासावेत.

आ. आंघोळ झाल्यावर पूजेपूर्वी ‘मासिक पाळीच्या वेळी कळत-नकळत केलेल्या स्पर्शांमुळे जे दोष लागतात, त्यांच्या निराकरणासाठी अरुंधतीसह सप्तर्षींना प्रसन्न करण्यासाठी मी हे व्रत करीत आहे’, असा संकल्प करावा.

इ. पाटावर तांदुळाच्या आठ पुंज्या घालून त्यांवर आठ सुपार्‍या ठेवून कश्यपादी सात ऋषि आणि अरुंधती यांचे आवाहन अन् षोडशोपचार पूजन करावे.

ई. या दिवशी कंदमुळांचा आहार घ्यावा आणि बैलांच्या श्रमाचे काहीही खाऊ नये, असे सांगितले आहे.

उ. दुसर्‍या दिवशी कश्यपादी सात ऋषि आणि अरुंधती यांचे विसर्जन करावे.

बारा वर्षांनी किंवा वयाच्या पन्नाशीनंतर या व्रताचे उद्यापन करायला हरकत नाही. उद्यापनानंतरही हे व्रत चालू ठेवता येते.
उत्तर लिहिले · 23/8/2019
कर्म · 0
3
*🤔का साजरी केली जाते ऋषिपंचमी*


🚩आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक सणाचे एक विषेश महत्व आहे. काल घराघरात गणपती विराजमान झाले. आता पुढेचे १० दिवस गणेश भक्त बाप्पाची मनोभावे पूजाअर्चा करतील. तर आजच्या दिवसाचे महत्व सुद्धा अनन्यसाधारण आहे. आज सर्वत्र ऋषीपंचमी साजरी होईल. भाद्रपद शुद्ध पंचमी ऋषिपंचमी म्हणून साजरी केली जाते. ऋषीं विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे ऋषिपंचमी.

💁‍♂आजच्या या धवपळीच्या जगात आपल्या हातून नकळत अनेक पाप होतात. या नकळत झालेल्या पापांपासून मुक्तता मिळवण्यासाठी ऋषिपंचमीचा व्रत केला जातो. चतुर्थी दिवशी गणेश पूजन झाल्यानंतर दुसर्‍यादिवशी महाराष्ट्रासह देशभरात ऋषिपंचमी  साजरी केली जाते.

▪या दिवशी सात ऋषींची पूजा केली जाते. आहारात बैलांच्या मदतीने न घेतलेल्या पीकांचा, भाज्यांचा, धान्यांचा आहारात समावेश करून हे ऋषी पंचमीचे व्रत केले जाते. पंचमीची तिथी ३ सप्टेंबरला मध्यरात्री ०१:५४ नंतर सुरू होते आणि २३:२८ वाजता संपते. या दिवशी महिला नांगारापासून उत्पन्न होणारे धान्य, भाज्या ग्रहण करत नाहीत. फक्त एकदाच जेवण करतात. या व्रतामध्ये मिठाचे सेवन वर्ज्य आहे. स्नान केल्यानंतर अरुंधतीसह कश्यप, अत्री, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि वसिष्ठ या सप्तर्षींची पूजा केली जाते.
उत्तर लिहिले · 4/9/2019
कर्म · 569225
0
ऋषी पंचमीचे महत्त्व:

ऋषी पंचमी हा एक हिंदू सण आहे जो भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी (पंचमी) येतो. या दिवशी सप्तर्षींची पूजा केली जाते.

या दिवसाचे महत्त्व खालीलप्रमाणे आहे:
  • पापांपासून मुक्ती: असे मानले जाते की या दिवशी व्रत केल्याने मागील जन्मातील पापांपासून मुक्ती मिळते. स्त्रिया मासिक पाळीच्या काळात केलेल्या चुकांसाठी ही पूजा करतात.
  • सप्तर्षींचा आदर: ऋषी पंचमी हा दिवस सप्तर्षींना आदराने समर्पित आहे.
  • आत्म-शुद्धी: हे व्रत आत्म-शुद्धी आणि नवीन सुरुवात करण्यासाठी केले जाते.
  • उत्तम आरोग्य: या व्रतामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते, अशी मान्यता आहे.

ऋषी पंचमीच्या दिवशी उपवास केला जातो आणि जमिनीतून उगवलेल्या भाज्या खाल्ल्या जातात. या दिवशी गहू आणि तांदूळ खाणे टाळले जाते.

अधिक माहितीसाठी आपण खालील लिंकला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1040

Related Questions

बेलाच्या झाडाचे महत्व काय आहे?
गुढीवरील तांब्याच्या कलशाचे महत्त्व कोणते आहे?
उजव्या हाताने पूजा आणि भोजन करणे का शुभ मानले जाते?
गणपती मंदिराबाहेर शमीचे झाड का असते?
उदे उदे असे देवी समोर का म्हणतात व त्याचा अर्थ काय?
श्री विठ्ठलाला तुळशी आणि मंजिरी हार का वाहतात?
Mangalsutra che mahatva kay aahe?